विचित्र विश्व - रोचक माहिती, संकल्पना आणि घटना

Submitted by मामी on 17 April, 2020 - 01:40

जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.

शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.

तेवढाच विरंगुळा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणूस पृथ्वीवर उपराच

हे पुस्तक वाचण्यात आलं त्यातली माहीती रोचक तर आहेच पण आपल्यालाही विचार करायला भाग पाडते.

माली देशातले डोगोन आदिवासी दर पन्नास वर्षानी सेगुई मेजवानी नावाचा उत्सव साजरा करतात..त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा खुजा व्याध तारा मोठ्या व्याध तार्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा जगाचे नुतनीकरण होते..

ह्या अप्रगत आदिवासींना ह्या तार्याविषयी इतके ज्ञान कसे? हा प्रश्न पडतोच पण लेखकाला हेच सूचित करायचं आहे.. कुणीतरी आपल्यापेक्षाही अतिप्रगत जीव ह्या पृथ्वीवर येऊन गेले आहेत आणि ते पूर्वी मानवाच्या संपर्कात होते..

पिरॅमिडबद्दल पण माहीती दिली आहे..जगाला आताही भेडसवणारे प्रश्न आहेतच जसे की, पिरामिड बांधले कसे असतील..इतके जड वजनाचे दगड कापून मापून रचले कसे असतील? आणि व्याध तार्याशी काय सबंध? नेमके त्याच्या खालीच का बांधले असतील आणि डोगोन आदिवासींप्रमाणे मिस्रांनापण हे ज्ञान कसे?

तर थोडं व्याध तार्याविषयी जाणून घेऊया..

व्याध ब ह्या तार्याच द्रव्यमान आश्चर्यकरित्या सूर्यापेक्षाही जास्त आहे.. व्याध ब हा तारा पृथ्वीपेक्षा तीनपट आहे आणि सूर्य पृथ्वीपेक्षा लाख पट..ह्यावरुन अनुमान काढता येत..

तिथल्या एक चमचा द्रव्याचा भार एक टन होईल..

व्याध ब तार्याबद्दल जाणून घेतल्यावर दुवा जोडला जाऊ शकतो का? हाच मी विचार करत होतो.. तर एक कल्पना डोक्यात आली.. अंदाज म्हणू शकत नाही म्हणून फक्त कल्पना..

ज्याअर्थी द्रव्यमान जास्त आहे त्याअर्थी (समजा तिथे जीव राहत असतील तर) त्यांची शारिरिक आणि बौद्धिक क्षमता आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त असली पाहीजे.. दोन तीन टनाचे वजनदार दगड ते लोक सहज पेलू शकणारे असतील...त्यांच्यासाठी हे सहज शक्य असलं पाहीजे आणि लेखकही कदाचित हे सांगू इच्छीत आहे..

किंवा जशी आपली पृथ्वी कधी ना कधी नष्ट (३०००कोटी वर्षानी) होणारच आहे तसाच त्यांचा ग्रह पण ह्याच तार्यांच्या भोवती आस्तित्वात असला पाहीजे

नंतर कालातरांने नष्ट झाला असेल आणि नष्ट होण्यापूर्वी त्यांनी पृथ्वी शोधून आपली निर्मिती केली असेल..

ह्या संसारात आपण अजूनही अज्ञात आहोत.. खरं खोटं हे त्या विधात्यालच ठाऊक..

आणि व्याध तार्याशी काय सबंध? नेमके त्याच्या खालीच का बांधले असतील >> त्याच्या खाली कश्या काय? व्याध तारा तिकडे उगवत/मावळत नाही का?

आजच्या मटा ला बातमी आहे.
खूप जुन्या,जाणत्या कलाकारांच्या मुलाखती आहेत
आणि प्रत्येक मुलाखत pdf स्वरूपात इंग्रजी मध्ये ही उपलब्ध आहे
ही लिंक
https://nfai.gov.in/audio_interview_detail.php?id=Nw==

गिझा ह्या सगळ्यात मोठ्या पिरॅमिडच्या आत काही एअर शाफ्ट्स आहेत त्यातले काही तेव्हाच्या थुबान ह्या ध्रुवताऱ्याच्या दिशेने तोंड करून आहेत. धृवतारा आकाशात फार काही वर नसतो. पृथ्वीचा आस 23 अंशाने कललेला आहे, त्या आसाच्या बरोबर समोर तारा असेल तर त्याला धृव मानायची पद्धत आहे. पाच हजार वर्षांपूर्वी थुबान धृव होता. पण तो काही फारसा ठळक तेजस्वी असा नव्हता. मुद्दाम तिकडेच तोंड करून बसायचे तर अजून भरपूर तेजस्वी तारे आकाशात होते. शुक्र तारा नसला तरी चंद्रानंतर तेजस्वी आहे आणि त्यानंतर नंबर लागतो व्याधाचा. त्यामुळे थुबानच्या दिशेने तोंड करून असलेला एअर शाफ्ट हा योगायोगही असू शकतो. पण कित्येकांच्या मते थुबानकडे तोंड करण्यामागे आत सतत प्रकाश यावा हा हेतू होता आणि त्या द्वाराने राजे स्वर्गाच्या पायऱ्या चढत असेही मानले जात होते.

बाकी मानव इथला नसून कुठल्यातरी ग्रहावरची नको असलेली ब्याद इकडे आणून टाकली गेली असावी हा माझाही ठाम समज आहे Lol

पृथ्वीवरील निसर्गात मानवाला कुठेही जागा नाही. इथल्या अन्नसाखळीत तो नाही. त्याने स्वतःच स्वतःला सगळ्यात उच्च स्थानी ठेवलेले आहे. मानवच उच्च यावर इतर सजीवांनी स्वतःच्या अप्रूवलचा स्टॅम्प अद्याप मारलेला नाही. इथल्या कुठल्याही प्राण्याचे तो भक्ष्य नाही पण तो स्वतः कुठल्याही प्राण्याला स्वाहा करायला एका पायावर तयार आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवाला निसर्गचक्रात काम दिलेले आहे, दुसऱ्याच्या मदतीशिवाय कोणीही इथे जगु शकत नाही. पण मानवाला या प्रचंड चक्रात काहीही रोल नाही. इतरांनी केलेले काम हा आयते फस्त करतो आणि वर त्यांच्या कामात डोंगराएव्हढे अडथळेही निर्माण करून ठेवतो. हे अडथळे शेवटी याच्याच गळ्याचा फास बनणार आहेत हे माहीत असूनही हा गाढवपणा हजारो वर्षे घडत आहे. मानवाने त्याच्या मते सिविलाईज्ड होण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल हे निसर्गाच्या विनाशाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल ठरले आहे. हा आउटकास्ट स्वतःसोबत इतरांना घेऊन कधी संपतोय हेच आता पहायचे. तेव्हाच पृथ्वीचा नवा चांगला अध्याय सुरू होईल.

खूपच अवांतर झाले. मला प्रवीण मोहनचे विडिओ बघायला आणि त्याचे अमेरिकन इंग्लिश ऐकायला आवडते. कधी त्या व्हिडिओतली स्थळे प्रत्यक्ष पाहिली जातील तेव्हा मी।नक्कीच व्हिडिओ खरा खोटा का ते चेक करेन.

जगातील सर्वात लांब चालत जाता येण्यासारख्या मार्गाची माहिती काल वाचनात आली. चालत जाता येण्यासारख्या याचाच अर्थ या मार्गावर मध्ये कुठेही जलाशय किंवा डोंगर वा दरी इत्यादीमुळे खंड पडत नाही. दुसऱ्या शब्दात या मार्गावर कुठेही जलमार्गे किंवा हवाई मार्गे प्रवास करावा लागत नाही. हा मार्ग आहे दक्षिण आफ्रिकेत दक्षिण टोकावर असलेल्या केप-टाऊन या शहरापासून ते रशियातील अतिपूर्वेकडील टोकाला असलेले मागडान या बंदरापर्यंतचा. या मार्गाची लांबी तब्बल २२३८७ किलोमीटर इतकी भरते.

जर कुणी दररोज न चुकता दिवसाकाठी आठ तास चालायचे ठरवले तर हे अंतर चालत चालत पार करायला त्या व्यक्तीला ५८७ दिवस लागतील. या कालावधीत या मार्गावर दक्षिण आफ्रिका, बॉटस्वना, झिम्बाब्वे, झाम्बिया, टांझानिया, बुरुंडी, रवांडा, युगांडा, सुदान, जॉर्जिया, इजिप्त, जोर्डन, सिरीया, टर्की, रोमानिया आणि बेलारूस असे जवळपास १६ देश लागतात. इ.स. २०१९ मध्ये एका रेड्डीट युजर ने हा मार्ग गुगल नकाशावर शोधून काढला.

अधिक माहिती:
https://www.skratch.world/post/worlds-longest-walk-the-14000-mile-journe...

अतुल, खूपच छान माहिती. असे काही असू शकते हे कधी लक्षातही आले नाही.

असे काही वाचले की हातातील इंटरनेटचा किती सदुपयोग होऊ शकतो हे लक्षात येते.

Happy

ब्राउन रंग हा खरा रंग नाही? असा काही रंग अस्तित्वातच नाही?

चॉकलेटी अथवा ब्राऊन रंग हा खरा रंग नाही म्हणे. प्रकाशात जे रंग असतात त्यात ब्राऊन असा वेगळा रंग दिसत नाही. रंगाचा जो स्पेक्ट्रम आहे त्यात ब्राऊन अस्तित्वातच नाहीये. कमाल आहे ना? म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसतो पण तरीही नसतो. आहेही आणि नाहीही.

आपण जो रंग ब्राऊन म्हणून ओळखतो तो ऑरेंज + काळा याचं मिश्रण आहे. त्यामुळे तो कलरव्हिलवर दिसत नाही.

मग हा रंग आपल्याला कसा काय दिसतो? यावर ही मस्त व्हिडिओ क्लिप आहे.
Brown; color is weird : https://www.youtube.com/watch?v=wh4aWZRtTwU

काही अजून माहिती
https://en.wikipedia.org/wiki/Brown
BROWN COLOR IN SCIENCE AND NATURE : https://www.hisour.com/brown-color-in-science-and-nature-26779/

मी मध्यंतरी युट्युबवर एक व्हिडिओ पाहिला. एकामागोमाग एक टीव्हीवर व्हिडिओ सुरु होते त्यात तो लागला व संपुन गेला व मी विसरुनही गेले पण त्यातली एक गोष्ट लक्षात राहिली. जगातल्या विचित्र गोष्टी असलं दर्शवणारं नाव होतं. त्यात म्हणे एका देशात कोणत्यातरी गावाबाहेर क्रेटरमधे खोदकाम करताना जमीनीतुन वायुगळती (मिथेन बहुतेक) सुरु झाली. त्याने जीवाला धोका उत्पन्न झाला व वायु काही थांबेना. जमीनीचे भोक बुजवता येईना वगैरे वगैरे. तर त्या सरकारने त्या वायुच्या तोंडाला आगच लावली का तर तो जळून संपून जावा म्हणून. आणि तो गेली ७५ की त्याहुन जास्त वर्षे जळतोच आहे. त्यामुळे आता तिथले आकाश काळसरच असते व त्या भल्यामोठ्या खड्ड्यात ठिकठिकाणी भोके आहेत व सतत आग. सापडला तर लिंक देईन.

काय हा गॅस चा अपव्यय.
लगे हाथ जरा त्यावर कबाब वगैरे मोठ्या प्रमाणात भाजायला ठेवून एखादा विश्व विक्रम करता येईल Happy

असेल हेच असेल. मी बर्‍याच महिन्यांपुर्वी पाहिला होता म्हणा तो व्हिडिओ. थरारक वाटते. असे व्हिडिओ पहायला.

Admin काल उडवायचा होता ना याचा आयडी. त्याने खास यासाठीच घेतलाय आयडी हा. विनाकारण फ्लडिंग करतोय सगळीकडे.

छान माहिती सर
शिक्षक दिन विषयी संपूर्ण माहिती नक्की बघा
नवीन Submitted by Computer Basic ... on 21 August, 2021 - 19:51

छान माहिती
रक्षाबंधन विषयी माहिती नक्की बघा.
नवीन Submitted by Computer Basic ... on 21 August, 2021 - 19:52
> सगळ्या धाग्यांवर हे डकवतच आहात तर वेमा आणि ऍडमिन यांच्या विपुला कशाला सोडता? खुश होऊन कदाचित ते मुख्यपानावरही स्थान देतील याला Wink

Unravelling the Mysteries of Our Past… Examining Out of Place Artefacts. : https://www.youtube.com/watch?v=2gKLj2Bljb4

खाणी, विहीरी वगैरे खोदताना जमिनीच्या आत पुराण्या स्तरातून काही आश्चर्यकारक वस्तू मिळाल्या आहेत. या वस्तू आणि त्या जमिनीच्या ज्या थरात मिळाल्या तो थर यांचा मेळ लागत नाही. अजूनही आपण अनेकानेक गोष्टींबाबत किती अनभिज्ञ आहोत हेच यातून लक्षात येते.

१. जगातले सर्वात प्राचीन मंदीर
Göbekli Tepe : https://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6bekli_Tepe

२. रहस्यमय स्थळं
https://www.veenaworld.com/blog/8-most-mysterious-places-around-the-world

३. दुसर्‍या दुनियेचे द्वार
https://www.youtube.com/watch?v=k4-UAGrjuCA

कोकणातली कातळशिल्पं आणि दुसर्‍या विश्वाचे दार याची लिंक आत्ता उपलब्ध नाही. पण कातळशिल्पं सर्वांनाच ठाऊक असतील.

आपण जे फँटा हे कोकाकोला कंपनीचे फिझी ड्रिंक पितो ते मुळात उत्क्रांत झाले दुसऱ्या महायुद्धामुळे, अमेरिकेने नाझी जर्मनीवर अर्थिक निर्बंध घातल्यावर कंपनी तगवायची कशी ह्या विवंचनेतून कोकाकोला जर्मनीच्या एका अधिकाऱ्याने उपलब्ध असेल त्या सगळ्या पदार्थांचा ज्यात काही फूड इंडस्ट्री लेफ्टओव्हर्स पण होते वापर करून फँटा बनवले, नंतर त्याने हाच फॉर्म्युला कोकाकोला नेदरलँड्सला पण दिला, कोकाकोला कंपनीनं युद्ध संपल्यावर हे उत्पादन त्याचे प्रताधिकार अन युद्धकाळात कंपनीने कमावलेला नफा असे सगळेच मोजून घेतले त्या अधिकाऱ्याकडून, आज आपण पितो ते फँटा आहे त्या स्वरूपात १९५५ साली लाँच झाले, पण होय, फँटा मुळातच नाझी जर्मनीत उत्क्रांत झालेले प्रॉडक्ट होते

अजून एक गंमत म्हणजे तत्कालीन जर्मनीत साखरेचे रेशनिंग इतके जबर होते की लोक फँटाचा वापर जेवणात गोड चवीला म्हणून वापरू लागले होते चक्क शुगर सबस्टीट्यूट म्हणून

मामी, मस्त व्हिडीओ आहे आणि मला वेळेत मिळाल्याबद्दल आभार. Happy
असल्याच गूढ गोष्टींबद्दल जाणून घेतेय गेले दीड दोन वर्षे.

Pages