भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती मस्त.हे भाऊ बहीण एकमेकांना भेटले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?
माऊई गोड दिसतोय केक कापताना.

सगळी बाळे खुपचं गोड आहे. आमचा बनी पण मस्त रुळला आता.
तो खूप एकटा एकटा वाटायचा म्हणून त्याला सोबत म्हणून अजुन एक बनी आणला. पण आता वेगळाच प्रोब्लेम झाला. Male bunny सारखा female bunny ला त्रास देतो. ती खूप घाबरुन गेलीय. सारखी इकडून तिकडे पळते म्हणून मी दोघांना वेगळे ठेवले तर male bunny खूप aggressive होऊन जातो त्याच्या केज मधला कपडा रागात खात बसतो नाहीतर Cage ला जोरात चावतो खूप चिडचिड करतो. मग परत बाहेर सोडलं की तिला खूप त्रास देतो. दोघे 1 वर्षाचे आहेत. त्यांना पिल्लू झाले की मला चांगलेच वाटेल पण जबरदस्ती काही नकोय. आणि female bunny ला या गोष्टी नवीन असल्यामुळे कदाचित ती त्याला respond करत नाही. पण हा मात्र खूप overactive आहे..तिला चावतो वगैरे..मला खूप राग येतो त्याच्या अशा वागण्याचा..दोघे सोबत छान राहतील खेळतील अस वाटलेल पण हा वेगळाच प्रकार झालाय आता..कुणाला काही माहिती असेल बनी behaviour bddl तर कृपया सांगा..vet कडे न्यायचे आहे पण corona मुळे बाहेर जायचं टाळते..1 2 दिवस वेगळे ठेऊन पाहते दोघांना..नाहीच जमल तर नेईल मग vet कडे..

Male and female rabbit will mate and breed. The female will.have period and you willl need to wipe of her bleeding from the floor. Once they mate and breed there will.be more rabbits to look after. Prepare a proper space for them all. It should be in shadow. And they should have place to run around a bit
Stock up o. Their food. As lock down may be imposed. You should always have safety stock of Pet food. And they should have access to drinking water at all times. Ask all your doubts to the vet. All the best

Please check on the vaccination schedule for rabbits.

मस्त फोटो व शोध मैत्रेयी. त्यांना भेटवताल तेव्हा तो क्षण नक्की रेकॉर्ड कर. बघू लागेबंधे आपोआप समजतात का.

ओडीन ची प्रेम कहाणी फुलण्याअधिक संपली
बेला च्या पालकांना बेला ला सांभाळणे झेपेना,पोरांच्या आग्रहाने घेतलं आणि ते झाले अभ्यास परीक्षेत मग्न
काकांना एकट्यानेच फिरवायला जमेना
त्यांनी मग इकडे तिकडे विचारायला सुरुवात केली
आम्हलाही अडून अडून विचारलं की शक्य आहे का
मला खरं तर जाम मोह झालेला की ओड्याला लाईफ पार्टनर म्हणून आणावी
पण एकाच वेळी दोघांना सांभाळणे आथिर्क आणि शारीरिक रित्या शक्य नाही हे लक्षात आल्यावर नाईलाजाने नाही म्हणून सांगितले
आता तिला त्यांनी गावाकडे एकामित्राला फार्म हाऊस वर देऊन टाकली.
ओड्या बिचारा त्याला कळत पण नाही आणि सांगता ही येत नाही

अर्र.. का करतात लोकं असं? इथेही कोविड काळात भरपूर लोकांनी कुत्रे घेतले आहेत (आत्ताच का ह्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर अजून मिळायचं आहे) आणि आता जबाबदारी झेपत नाही. मुळात आसापासची चार लोकं घेताहेत म्हणून आपणही घेण्यात काय पॉईंट आहे?

ओह अरेरे! Sad हो बर्‍याच केसेस ऐकल्या अशा. घाई ने कुत्रा घेतला आणि १-२-४ महिन्यात जमलं नाही म्हणून देऊन टाकला. त्या मुक्या प्राण्याचा विचार करून वाईट वाटतं.
ओडिन ची काही चिंता नको. त्याला मिळेल दुसरी गर्लफ्रेन्ड Happy

हो मी गोडीत बरेच सुनावले त्यांना
म्हणलं भुभु म्हणजे काय वस्तू नाहीये, मोबाईल सारखी की वाटलं तर घेतली नैतर देऊन टाकली
इतकी महिने तुमच्याकडे आहे, तुम्हाला तिचा जेवढा लळा लागला असेल त्याच्या कैक पटीने तिला तुमचा असणारे
आणि ती आता नव्या जागी सेटल होईल ही पण तिला तुमची सवय आहे
ती रोज तुम्ही याल म्हणून वाट बघत राहील,तिला हे कळणार नाही की तुम्ही तिला शिक्षा केली आहे का काय
अनेकदा भुभु पालकांनी सोडल्यावर ट्रॉमा मध्ये जातात
तुम्हहाल जेव्हा वेळ होत नसेल तेव्हा आमच्या कडे आणून सोडा, दिवसभर
मी आनंदाने करीन
पण देऊन टाकू नका कोणाला
पण त्यांनी ऐकलं नाहीच
मलाच खूप त्रास झाला, मी तिचा लास्ट डे होता तेव्हा तिला खाऊ घेऊन गेलो, खूप खूप माया केली, पोटाला छातीला रब करून दिला
फोटो काढला
बिचारी अगदी गोंडस प्रेमळ लॅब होती

ओह Sad
सूनबाईंची प्रेमकहाणी उमलण्या पूर्वीच निपटली.
तिला इथे पिंपळे सौदागर मध्ये अडोप्शन ला विचारले नाही का कुठे?

पण आपल्याला झेपत नसताना उगाच त्या प्राण्याचे हाल करण्यापेक्षा जर दुसतिकडे सोय लावत असतील तर चांगलंच आहे की. कुत्रा आणायचा निर्णय चुकला असला तरी चुकलं हे समजण आणि त्यादृष्टीने काहीतरी उपाय करणं हे दोन्ही बाजूंना त्रास होऊन रेटत राहण्यापेक्षा बरं !

बरोबर आहे पण निर्णय चुकला हे कळायला सहा सात महिने लागणे अक्षम्य आहे
निदान माझ्यासाठी तरी
मुळात फार आवड नसताना पाळीव प्राणी घरी आणणारे लोकं मला कळतंच नाहीत
त्यांच्या अपेक्षाही अफाट असतात, भुभिजनी घरात इकडे तिकडे हिंडू नये, कशात तोंड घालू नये, जास्त भुंकू नये
म्हणजे भुभूपणा सोडून त्यांनी माणसं व्हायला पाहिजेत असलं काहीतरी

आशुचँप, बरोबर आहे. हेच म्हणायचं आहे.
ज्या व्यक्तिला/फॅमिलीला आवड आहे त्यांनी कोविडकरता थांबायचं कशाला? आणि आवड नसेल तर मुलांना हवाय, त्यांच्या/आमच्या मित्रांनीही घेतलाय म्हणून उगाच जबाबदारी अंगावर घ्यावीच का?

समजण आणि त्यादृष्टीने काहीतरी उपाय करणं >>>>हो दुसर्‍या घरात सोय केली तर बरेच आहे. पण सोडून देणे, अबान्डन करणे, शेल्टर मधे नेऊन देणे हे फार वाईट - अमानुष आहे.

बरोबर आहे पण निर्णय चुकला हे कळायला सहा सात महिने लागणे अक्षम्य आहे >>>> मला नक्की समजलं नाही. त्यांनी २/३ महिन्यांत दुसरीकडे नेऊन दिलं असतं तर ते क्षम्य आहे का? क्षम्यपणाचा नक्की थ्रेशोल्ड किती आणि कसा ठरवतात?
इथे आमच्या नेबरहूडमध्ये पाच-सहा वर्षांनंतरी रिअडॉप्ट केलेली (दिलेल्या आणि घेतलेली) उदाहरणं आहेत. भुभु आणि जुने नवे मालक सगळेच मजेत असतात.

म्हणजे भुभूपणा सोडून त्यांनी माणसं व्हायला पाहिजेत असलं काहीतरी >>>>> ह्याची पण दुसरी बाजू ह्याच बाफावर दिसते की. Happy भुभुंचे बड्डे साजरे करणं आणि एकंदरीतच personification आणि भुभूंनी माणसासारखी शिस्त पाळायला हवी ही अपेक्षा ठेवणं ह्यात मलातरी तात्त्विकदृष्ट्या काही फरक वाटत नाही. (आमचं ते कौतूक आणि प्रेम, आणि तुमचा तो जाच)

भुभु मजेत आहेत हे कोण आणि कसे ठरवतात?
मी वरती म्हणलं तसेच आपल्याला जितका लळा लागतो त्यापेक्षाही जास्त त्यांना आपला असतो
पालकांनी सोडल्यामुळे ट्रॉमा मध्ये गेलेली कितीतरी केसेस आहेत
त्यामुळे पालक असू शकतील मजेत पण भुभु पण मजेत असतात हे विधान धाडसी आहे
ते काय लहान मुलांसारखे धाय मोकलून रडून पण दाखवू शकत नाहीत.

आणि वाढदिवस साजरा करणे यात आणि भुभु ने माणसासारखी शिस्त पाळावी ही अपेक्षा यात फरक नसेल समजत तर मग माझी माघार
इथं वाद घालून मला एनर्जी खर्च करायची नाही
तुमचं चालू द्या

वाढदिवस साजरा करणे यात आणि भुभु ने माणसासारखी शिस्त पाळावी ही अपेक्षा यात फरक नसेल समजत >>>> समजवा मग. नसेल समजवायचं तर राहू द्या. हरकत नाही. (मी एकंदरीतच personification असंही लिहिलं होतं.)

तुमचं चालू द्या >>>> मी काय चालवणार ? Proud विषय निघाला आणि एकतर्फी नावं ठेवणं पटलं नाही म्हणून मी लिहिलं.

Pages