कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो प्रसंग कल्पून बाकीच्यांची तोंडे कशी झाली असतील याचा विचार करून हसु येतंय फार. शिवाय हाच प्रश्न मुलाने विचारला असता तर ?>>>> खरंय!

सगळेच किस्से मजेदार.
साधारण 25वर्षांपूर्वी माझ्या सख्ख्या आत्येबहीणीच्या कांदेपोहे कार्यक्रमात मुलाकडील मंडळी पाहायला आली होती. आल्या आल्या मुलाची आई अंग टाकून जमिनी वर गडाबडा लोळायला लागली. सगळ्याना वाटले उन्हामुळे चक्कर आली असेल पण तिच्या अंगात देवी आली होती आणि ती बाई काहितरी बडबडत होती. आम्ही लहान मुले घाबरुन स्वयंपाकघरात पळालो. आमची आत्येबहीण आतच होती तिला झाला प्रकार सांगायला. ते लग्न तर जमलेच नाही पण असे अंगात देवी येणे प्रकार असतो त्याचे प्रात्यक्षिक पहायला मिळाले.

"आमचा मुलगा इतका शहाणा आहे की तो पाळणाघरात असताना सगळ्यात आधी संडासात शी करायला शिकला. आणि त्याने इतरांना शिकवलं" >>>

नंतर तर त्याने गप्पांच्या नादात माझ्या डिश मधल पण खायला सुरवात केली>>

कुतृसत्ताक>>

Rofl Rofl Rofl

रामलाल ड्युटी, कापो च्या कार्य क्रमात आले भलतेच सावट लग्न ठरले माझे आणि नवरा मिळाला चावट, चडडीचा ब्रॅण्ड >>> Lol Lol Lol

पोहायला जाताना swimming costume घालतेस का साधा पंजाबी ड्रेस?" >>> Uhoh

ह्या धाग्यावरून आठवलं की काही दिवसांपूर्वी Youtube वर लीना आराध्ये - जोशी (स्वप्नील जोशीची बायको) व समिधा गुरु ह्यांची 'किस्से तेरा लगीन मेरा' नावाची बारा भागांची लघु मालिका आली होती. स्वप्नील जोशीशी लग्न होण्याआधी लीनाला जी इतर स्थळे सांगून आली होती, त्यातल्या १२ कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाचे अतरंगी व विनोदी किस्से ती समिधाला सांगायची. तेराव्या/शेवटच्या भागात ती स्वप्नील जोशीसोबतच्या कांदेपोह्यांचा किस्सा सांगणार होती, पण तो अद्यापही झळकला नाही. आता ह्या धाग्यावरचे सर्वांचे अतरंगी किस्से वाचल्यावर लीना आराध्ये - जोशींचे किस्से अजूनच खरे वाटत आहेत. तसे तर तिच्या किस्स्यांमध्येही तेव्हाही कुठेही तद्दन फिल्मीपणा नव्हता, वा खोटेपणा वाटला नव्हता. मी खाली पहिल्या भागाची लिंक देत आहे, इतरही भाग Youtube वर मिळतील

https://youtu.be/ULd9SwpLCjw

तर आतापर्यंत संडासाचे ऑब्सेशन, सर्वांसमोर चड्डी कोणती वापरतो, आल्याआल्या अंगात येऊन लोळण घेणे असले किस्से वाचल्यावर धक्का बसेल असे काही राहिले आहे का कोणाकडे सांगायचे?

माझा एक मित्र आहे, नकार द्यायचे ह्याला फार टेंशन येत होते, एक तर मुली कडची मंडळी जेवणाचा बेत करतात (पाहण्याचे कार्यक्रम जर परगावी असेल तर), आपण मस्त श्रीखंड पुरी ओरपतो आणि नकार देतो, त्याला ह्याचे फार गिल्ट येत असे.

एका कांपो च्या कार्यक्रमात त्यांनी काही खाल्लेच नाही, मुली कडच्या नी त्याला फार आग्रह केले, तर ह्यांनी नको सांगितले आणि सांगितले की फारच आग्रह करत आहात तर फळ खातो, मुली कडच्या नी तरी फार आग्रह केले, तर ह्याच्या तोंडुन निघुन गेले, अहो नका आग्रह करु, नंतर नकार द्यायला गिल्ट येतं, सारं वातावरण एकदम चिडीचुप, ह्याला एकदम कळले की काय झाले आहे ते.

नंतर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी कट्ट्यावर भेटला तेव्हा त्याला विचारले, तर ह्यांनी सर्व सांगितले. त्याच्या अण्णांनी त्याला भर रस्त्यात फक्त तुडवायचं बाकी ठेवलं होतं त्याला, मुली काय रस्त्यावर पडले आहेत काय, स्वतः किती कमवतो, तुला काय माधुरी दिक्षीत सांगुन येणार आहे का. तरी दोन्ही कडची मंडळी ने सावरुन घेतले, देण्या घेण्याचे मुलं मुली असतात हे सर्व करावंच लागतं, कुठे काय बोलावं ह्याचे काही भान.
काकी ने नंतर हाच अनुरुप नाहीये असे सांगुन निभावुन नेले. दुसर्‍यांच्या मुलींना नावं ठेवत बसलाय.

मी त्याला सांगितलं बरोबर आहे अण्णांचं, त्यांना तुझ्या प्रकरणा विषयी काही माहित नाही, म्हणुन हा सगळं खटाटोप चाललाय, तुला श्रीखंड पुरी चापल्या बद्दल गिल्ट तर आहेच पण जास्त गिल्ट आहे ते तु तिला पण फसवत आहे त्याचं.

तर आतापर्यंत संडासाचे ऑब्सेशन, सर्वांसमोर चड्डी कोणती वापरतो, आल्याआल्या अंगात येऊन लोळण घेणे असले किस्से वाचल्यावर धक्का बसेल असे काही राहिले आहे का कोणाकडे सांगायचे? >>>>> + १०००००

>> आल्या आल्या मुलाची आई अंग टाकून जमिनी वर गडाबडा लोळायला लागली.

मंदिरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर देव/देवीचे दर्शन झाले कि काहींना भावनातिरेकाने "अंगात येते" अशी त्या मागची कारणमीमांसा सांगितली जाते. इथे त्यांना मुलीच्या रुपात देवी दिसली असेल Lol

तरी इथे कोणत्याही किश्श्यातील "दुसऱ्या बाजूचे" कोणी धाग्यावर उपस्थित नाही. योगायोगाने तसे झाले असते तर.... "ओह्ह! अहो आम्हीच होतो ते ज्यांचा तुम्ही हा किस्सा सांगितला... हा आयडी म्हणजे ते तुम्हीच का? बरे झाले इथे पुन्हा भेटलात" अशा प्रतिक्रिया आल्या असत्या Proud

नणंदेच्या कां पो चा आणखी एक किस्सा
ह्यावेळेस आम्ही ठरवलं होतं जेवणाचा घाट घालायचा नाही, फार दमणूक होते आणि पाहुणे सुद्धा ४वाजता येणार होते तर चहा पोहे करू असं ठरलं. सून म्हणून मी आणि उपवर मुलगी दोघीनी साड्या नेसल्या, उपवर मुलाकडचे नऊ लोक आले होते. आजी आजोबा सहित! आजी एकदम कूल वाटल्या मला. गोड होत्या.
प्रत्येकजनाला(मुलाला सोडून )मुलीने नमस्कार केला (ते लोकं जुन्या वळणाचे आहेत असं ऐकलं होतं म्हणून तिने स्वतः असं केलं ).
तर त्या प्रत्येकानी तिच्या हातात भेट म्हणून काही पैसे ठेवले. नंतर मोजले आम्ही total हजार रु झाले होते. Happy
हवापाण्याच्या गप्पा झाल्या. मुलगा सुद्धा smart वाटत होता. छान बोलत होते सगळे. मग विषय मुलगा काय करतो कुठे असतो वर वळला. ह्यावर सगळ्यांनी जो कौतुक सोहळा सुरु केला की ज्याचं नाव ते!
Manager आहे, jio reliance मध्ये, सगळ्या पुण्याचं internet चालवण ह्याच्या हातात आहे.१००लोकं हाताखाली कामं करतात, स्वतंत्र cabin आहे. कुणालाही नौकरी लावू शकतो. त्याच्या हातात सगळी power आहे. अमुक अमुक ला इतक्या पगाराची नौकरी लावली.
मग अचानक ते म्हणाले तुम्हाला कुणाला नौकरी हवीये का त्याच्या कम्पनीत? आणि माझ्याकडे आणि नवऱ्याकडे पाहू लागले Lol
आम्ही नम्रपणे नकार दिला. मी तर हलकेच हसून मानेने नाही म्हटलं. कारण प्रसंग काय होता आणि ह्यांनी कुठे नेला होता विषय!
काकू मुलीला म्हणाल्या तुला आरामात लावून देईल हा नौकरी एका कम्पनीत काम करा वगैरे.
मुलाने विचारले, करायचा आहे का तुला job तिथे ? मी बघतो काय करायचं ते (एकदम फुशारून गेला होता तो , मनात म्हटलं, 'बाबारे असं नसतं, qualification,interview, interst नावाच्या गोष्टी असतात आयुष्यात' ) तर मुलगी स्पष्ट् नाही म्हणाली.
सगळे शांत झाले, इकडच्या तिकडच्या गप्पा करून आवरत घेतलं त्यांनी आणि गेले निघून.
नंतर समजलं, तो मुलगा म्हणाला मुलगी उद्धट आहे, आणि त्यांनी लगोलग नकार कळवला " घरातल्या इतर सर्वांना तिचं मत समजलं होतं त्यांना प्रॉब्लेम नाही असंही समजलं.

उद्धट च होता की.
सरळ नीता अंबानी नावाच्या आमच्या मैत्रिणीला जॉब देऊ शकशील का हे विचारायचं होतं...

असा नोकरी लावण्याचे आमिष प्रकार चुलत दिराच्या कांदेपोहे च्या वेळी पहिले होते. त्याना मुलगी जिथे नोकरी करत होती(एका बिल्डर कडे अकाउंटट म्हणून) ते आवडले नव्हते.

एका ऑफिसात एक कलिग मी कधी ही सुट्टी घेतली की दुसर्‍या दिवशी माझ्या कडे येऊन ओये ओये, कांदा पोहे असे चिडवुन जात होता, मला काहीच कळत नव्हते, मी फक्त स्मित करायचो, कारण मी दांडी मारुन दुसर्‍या नोकरी च्या मुलाखतीस जात होतो, बघण्याच्या कार्यक्रमाला कांदे पोहे कार्यक्रम म्हण्तात हे मला फार फार नंतर कळले.

तरी इथे कोणत्याही किश्श्यातील "दुसऱ्या बाजूचे" कोणी धाग्यावर उपस्थित नाही. >>
अतुल हाच विचार माझ्या मनात आला होता. इथे लिहिलेले किस्से त्यांच्या पैकीच नव्हे तर इतरही कांदापोहे कार्यक्रमात त्यांच्या दृष्टीने आपणही काय दिवे लावले होते ते कळाले तर मजा येईल.

इथे लिहिलेले किस्से त्यांच्या पैकीच नव्हे तर इतरही कांदापोहे कार्यक्रमात त्यांच्या दृष्टीने आपणही काय दिवे लावले होते ते कळाले तर मजा येईल.>>>>

एका कार्यक्रमात माझ्या बाबांनी एकदा केलाय असा किस्सा जो 'तिकडचे' लोक सांगत असतील.

पुण्यात वाकडची एक मुलगी सांगून आली होती. एकदा ठरलेला प्रोग्रॅम (त्यांच्याकडून) कॅन्सल झाला. नंतर परत त्यांनीच स्वतः फोन करुन एक सोमवार ठरवला. मी कामावरुन आल्यावर आई बाबा आणि मी त्यांच्या घरी गेलो. बाबा तिकडे जातानाच जरा वैतागले होते.

घरात आई, बाबा, मुलगी तिघेच होते. सुरुवातीचे नमस्कार चमत्कार झाले. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांच्या मालकीची गिरणी होती. मुलीची आई दर पाच मिनिटांनी कामगा रावर लक्ष ठेवायला आणि गिर्‍हाईक बघायला ( पैसे द्यायला/घ्यायला) तिकडे जात होती. आम्हाला म्हणाली की आमच्याकडे अशी गडबड असते त्यामुळे आधी ठरलेली भेट postpone करावी लागली.
मुलगी एकदाच आली चहा बिस्किटे देऊन आत निघून गेली. मी आपला वाट बघतोय कि तिचे आई वडील म्हणतील कि तुम्हाला मुलीशी बोलायचे असेल तर आत/ गच्चीवर वगैरे किंवा अमुक तमुक ठिकाणी जा पण कसले काय!

आई दर दोन पाच मिनिटांनी घर ते गिरणी आणि गिरणी ते घर. बराच वेळ शांततेत गेल्यावर बाबा तिच्या वडिलांशी बोलायला लागले काय करता वगैरे... तिचे वडिल ईलेक्ट्रिक Contractor होते. विषय हळूहळू कुठे कुठे कामे चालू असतात वगैरे कडे वळला. बाबांना पण या विषयातली सखोल माहिती असल्याने विषय रंगत गेला आणि अचानक मधेच बाबांनी गप्पांच्या नादात त्यांना अमूक तमूक कामाचे पर रनिंग मीटर काय चार्ज लावता वगैरे विचारायला सुरुवात केली. मी आणि आई नेत्रपल्लवी करत एकमेकांकडे बघत बसलो, आता ते दोघे एवढे बोलत असताना बाबांना थांबवायचे कसे? एक तर बाबा येतानाच जरा वैतागले होते शिवाय आई, मुलीने आमच्याशी न बोलणं त्यांना जरा खटकलंच असावं. बाबा म्हणजे जमदग्नीचा अवतार. त्यांना तिथे थांबायला गेलो आणि माझ्यावरच भडकले तर काय घ्या?

शेवटी मुलीशी बोलायचा काही चान्स दिसत नाही म्हणल्या वर मीच म्हणालो की मला ऊद्या कामानिमित्त बाहेर गावी जायचे आहे आणि निघालो. मुलगी चहा द्यायला जे एक दोन मिनिटे आली त्यावर काही परत दिसलीच नाही.

गाडीत बसल्यावर बाबांना म्हणालो, अहो काय हे? तुम्ही मुलगी बघायला गेल्यावर ते काय रेट ने कॉन्ट्रॅक्ट घेतात? हा काय गप्पा मारायचा विषय आहे का?

तर मलाच ऊलट "अरे मग ईलेक्ट्रिक Contractor शी काय अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करु का? "

माझा दुसरा एक साधासुधा किस्सा.

पुण्यातलीच एक मुलगी सांगून आली.

मुलीचे आई बाबा घरी येऊन गेले. त्याच्या पुढच्या आठवड्यात आम्ही त्यांच्याकडे गेलो.

चहा पाणी झाल्यावर मुलगी आणि मी टेरेसवर गप्पा मारायला गेलो. जनरल गप्पा झाल्या. दोघेही खाली आलो. मी शूजच्या लेस काढून ते रॅक मधे ठेवे पर्यंत मुलगी आत गेली आणि तिने सेफ्टी डोअर लावून पण घेतले. ती हॉल मधून सरळ आत गेली आणि तिचे बाबा जिथे बसले होते त्यांना मी दिसत नव्हतो.
मी हाक मारावी की डोअर बेल वाजवावी या विवंचनेत बावळटासारखा दाराबाहेर ऊभा. तेवढ्यात तिची आई किचन मधून बाहेर आली आणि तिने मला पाहिलं, त्यांनाच कळलं काय घोळ झालाय ते. मग त्यांनीच दार उघडलं. मुलगी बाहेर आली आणि हसत हसत सॉरी म्हणून गेली.....

मी आपला मनातल्या मनात.... "नसेल आवडलो तर तसं सांगायचं ना? हे असं वागवायची काय गरज होती...."

लातूरचाच किस्सा
ती मुलगी बाहेर येण्याची लक्षणे दिसत नव्हती. तिने झोपून घेतलेय हे आमच्याकडच्या आजीला (चुलत काकाची आई) पटत नव्हते.
मुलाने जाउयात असा आग्रह सुरू केल्याने मध्यस्थांची मुलीच्या वडिलांना तसे सांगितले. तर ते म्हणाले "गाडी उद्या सकाळी दहा वाजता आहे. रहायलाच आलाय ना?"
आम्ही उडालोच.
आधी त्यांना कपडे आणलेले नाहीत असे कारण सांगितले. तर ते म्हणाले "तुम्ही आता आमचे पाहुणे आहात. अजिबात काळजी करू नका. कुणाला काय कपडे लागतात ते सांगा, मापं द्या, तासात घेऊन येतो. शिवायचं असेल तरी अर्जंट मधे शिवून देतील "
या माणसाला कुठलीही समस्या कळवली तरी असं चुटकीसरशी सोल्युशन निघत होतं. आमच्या कडे खूसुर फुसूर चालू झाली होती की हे जरा जास्तच होतंय. गळेपडूपणा असेल पण बघायच्या कार्यक्रमात नवीन कपडै? अंडरगारमेंटस सुद्धा??
मग मध्यस्थाने मग मुलगी आली नाही म्हणून नाराज झाले आहेत असे सांगीतल्यावर म्हणाले "मुलगी दाखवायचा कार्यक्रम उद्या सकाळी आहे. सकाळी तुमच्या अंघोळी झाल्या कि लगेच उरकून टाकू"

पण या अवधीत एक बाई सतत आत जायच्या आणि मुलीच्या वडिलांना सांकेतिक भाषेत काही तरी सांगायच्या हे लक्षात आले होते.

तिथून अक्षरशः आग्र्याहून सुटका करून घेतली आणि स्टॅंड वर आलो. बस नाही हे पण खोटे होते. कुर्डूवाडी ची बस होती.

नंतर त्या मध्यस्थाने कबूल केलं की मुलीने पळून जाऊन लग्न केले होते आणि तिचे वडील जबरदस्तीने दुसरे लावून द्यायच्या खटाटोपात होते.
खरं तर मोठ्यांंना संशय आलाच होता.

भारी किस्से आहेत मस्त धागा आहे वाचायला मजा येत आहे.
एका मित्राने सांगितलेला किस्सा मस्त आहे. तो एकदा अमरावतीला मुलगी बघायला गेला होता. मुलीकडल्यांचा अमरावतीला होलसेलचा व्यवसाय होता. मित्र IT मधे होता. सारा कार्यक्रम झाल्यावर मुलीच्या आजोबांचा एकच प्रश्न तुमची कंपनी काय बनविते. त्याने कितीही IT services म्हणजे काय ते समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी त्या आजोबांना काही केल्या समजत नव्हते. त्यांचा एकच प्रश्न ते सार ठिक आहे पण कंपनी बनवते काय? शेवटी ते आजोबा कंटाळले आणि त्यांनी विचारले किती पगार मिळतो. त्याने सांगितले पंचवीस हजार खरतर त्याला वीसच्या आसमपासच पगार होता. आजोबा म्हणाले ठिक आहे मी पस्तीस देतो या इकडे आणि सांभाळा दुकान.
वडिलांनी नागपूरला एक दोन ठिकाणी नांव नोंदवले. त्यावेळी जी मुलगी हो म्हणेल तिला लगेच हो म्हणायचे असेच मी ठरविले होते पण कुणी हो म्हणतच नव्हते. कारणेही विचित्र होती. एक मुलीने माझ्या ऑफिसमधल्या कामाविषयी विचारले आणि नंतर खूप किचकट काम आहे म्हणून नकार कळविला. थोडक्यात काय जडबुद्धी मुलगा आहे. अर्थात खरे कारण वेगळेच असणार असो. .
एक मुलगी बघायला गेलो होतो मुलगी डॉक्टर होती, मी आधीच विचारले होते इंजीनियर चालेल का नाहीतर नकार द्यायला कारण होते. हो म्हणाले. तरी परत एकदा मुलीला विचारु असे मी ठरविले. अगदी पारंपरीक पद्धतीचा कार्यक्रम होता. मुलगी येऊन बसली तेवढ्यात ज्यांच्या घरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता त्यांच्या घरी कुणीतरी त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेउन आले. त्या यजमानांनी त्यांनाही आमच्यात बसविले. त्यांचा मुलगा आणि जावई दोघेही अमेरिकेत होते. त्यानंतर अर्धा पाउण तास त्यांचा जावई, मुलगा यांचे कौतुक ऐकण्यात गेला. ते अमेरिकेत काय करतात, जेवणाचे कसे करतात, कधी येणार आहे, मग विमानानेच कसे ते मुंबईवरुन नागपूरला येणार आहे, (त्यावेळी याचेही कौतुक होते). सारे किस्से ऐकले. या साऱ्यात पोहे चहा सारं संपून सुपारी घेउन निघायची वेळ आली. मुलगी बघण्याचा कार्यक्रम पूर्णपणे हायजॅक झाला. शेवटी अपेक्षेप्रमाणे डॉक्टर इंजीनियर जमणार नाही असा निरोप आला.
एकदा एका मुलीच्या आईने पहिलेच पुस्तकी वाक्य फेकले मुंबईतली घर म्हणजे कबुतराची खुराडे. मग पुढचे प्रश्न घरात सूर्यप्रकाश येतो का? हवा येते का? लग्नानंतर तुमचे मित्र तुमच्या सोबतच राहणार आहे का? असे कितीतरी फक्त घरविषयी प्रश्न विचारले. माझे नशीब त्या मुलीने हो म्हटले नाही, तसे झाले असते तर मला माझा नियम मोडावा लागला असता.
या धाग्यामुळे सतरा अठरा वर्षे पूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या.

Pages