कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या नवऱ्याच्या एका काकूने लग्न होऊन घरी आल्यावर गाणं म्हणण्याचा खूपच आग्रह झाला तेव्हा 'ना कोई उमंग है' म्हटलं होतं (आणि आग्रह करणारे नातेवाईक गार झाले होते Proud ) असा किस्सा नवऱ्याने सांगितला होता.

>> अमृत मधला किस्सा मनात कल्पून खूप हसायला आले. अजून थोडा वेळ थांबलो तर आपल्यालाच खिडकीतून बाहेर फेकून देतील अशी भीती वाटली असेल त्यांना Biggrin
>> Submitted by चंपा on 13 March, 2021 - 21:53

हे वाचायचं राहून गेलं बहुतेक. हो, मुलगी पसंत आहे का बोला. अन्यथा मी आहे तुम्ही आहात आणि ती खिडकी आहे Lol असेल पसंत तर जिन्यातून खाली जाल, नसेल तर खिडकीतून!

>> लग्न होऊन घरी आल्यावर गाणं म्हणण्याचा खूपच आग्रह झाला तेव्हा 'ना कोई उमंग है' म्हटलं होतं

Rofl सासरचे सर्वजण अवतीभवती उभे आणि एकेकाकडे पाहत "न कोई उमंग है, न कोई तरंग है" आणि सगळ्यात शेवटी "मेरी जिंदगी है क्या..." सासूकडे पाहत "एक कटी पतंग है"

अशी गाणी म्हणण्यापूर्वी 'हे माझ्या मनातलं एका संभाव्य भविष्याचं सुंदर प्रतिबिंब' असं काहीतरी डायरी वाक्य धपकन टाकता येईल Happy (हे वाक्य मनात ऐकताना एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या कुहूच्या आवाजात ऐका.) एखादा हवा असलेला सखाराम गटणे नक्की गटेल.होणारा नवरा अतिशय खुश होऊन गाणं ऐकेल.

खूप अ‍ॅटिट्यूड मारणारे, अगदी आता नकार देतात की मग असे वागणारे मुलाकडचे बघायला आले असल्यास 'इसमे तेरा घाटा, मेरा कुछ नही जाता' पण म्हणता येईल Happy

आमच्या आत्तेबाई घरी प्रत्येकाच्या बघण्याच्या कार्यक्रमात न सांगता हजर आणि समोरच्या मुला मुलीला नावे ठेवण्यात एक नंबर.
आत्ते सोबत येते म्हंटल की लग्न जुळताना कठीण.
माझी सून अशीच हवी. तशीच हवी, नाहीतर सरळ नाही म्हणून सांगणार....असं बरच काही चालायचं त्यांच.
चार महिन्यापूर्वी मुलाने लग्न केले....लंडनलाच...आत्तेला विचारपूस तर नाहीच, दोन आठवडे उलटून गेल्यावर इकडे समजले.
आता आत्तेचे तोंड अगदी पाहवेनासे झाले आहे. Lol

मी मज हरपून बसले गं, पाडाला पिकलाय आंबा, ना कोई उमंग है ... वाचून भयंकर हसले. Rofl

असल्या वेळी लोकं गाण्याचा आग्रह का करतात कळेना.

<<<<<<<< फुलले रे क्षण माझे फुलले रे. .>>>> माझ्या लग्नाच्या विडिओमधे हे गाणे आहे >>>>>>>>>>>>

हे तर काहीच नाही! माझ्या लग्नाच्या व्हिडियोत 'मेंदीच्या पानावर' आहे! एखादी जख्ख म्हातारी तारुण्यातील आठवणींनी मोहरून जाते तेव्हाचं गाणं आहे ना हे? 'अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं, अजून तुझ्या डोळयातील मोठेपण कवळे गं' ह्या सर्व वाक्यात 'अजून' आल्यामुळे अर्थ एकदम बदलून जातो. व्हिडियोवाल्याने सरसकट हळदीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं लावलं आहे!!

'अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं, अजून तुझ्या डोळयातील मोठेपण कवळे गं' हे फार भारीए Rofl

माझ्या हळदीच्या कार्यक्रमावेळी.. हि पोरगी कुणाची सिनेमातलं....अय्यय्यो हिला नजर न लागो अय्यय्यो हे गाणं आहे..

आमच्या मामाच्या लग्नात मामीने कुठलं गाणं म्हटलं होतं आठवत नाही, पण तिच्या भावाला गायचा आग्रह केल्यावर त्याने 'जाने कहाँ गए वो दिन' म्हटलं होतं Happy

Lol
मी मज हरपून बसले गं, पाडाला पिकलाय आंबा, ना कोई उमंग है ... Lol
मला वाटायचं गाऊन दाखवा हे फक्त सिनेमातच असतं....

धमाल धागा आहे.

मी मज हरपून बसले गं, पाडाला पिकलाय आंबा, ना कोई उमंग है >>> Lol Lol Lol

माझे आणि माझ्या नवऱ्याचे कांदे पोह्यांचे इतके विनोदी किस्से होते की आमच्या पहिल्या काही भेटींमध्ये आम्ही ते आठवूनच खूप हसलो होतो.

माझ्याकडे एक अतिशय मातृसत्ताक कुटुंब मला बघायला आलं होतं. सुरुवातीलाच मुलाच्या आईने आमचं घर किती स्क्वेअर फूट आहे (बिल्ट अप किती आणि कार्पेट किती) वगैरे अतिशय तांत्रिक माहिती मागून श्रीगणेशा केला. मग गाड्या तुमच्या पर्सनल आहेत की कंपनीच्या आहेत वगैरे. आणि मग त्यांनी मुलाचं कौतुक सुरु केलं आणि त्या थांबेचनात. त्यात त्यांनी "आमचा मुलगा इतका शहाणा आहे की तो पाळणाघरात असताना सगळ्यात आधी संडासात शी करायला शिकला. आणि त्याने इतरांना शिकवलं" असं सांगितलं. यावर माझ्या आईचा कंट्रोल सुटला आणि ती आत किचनमध्ये जाऊन एकटीच हसू लागली.

माझा नवरा एकदा मुलगी बघायला गेला होता तेव्हा तो अशा खुर्चीत बसला होता की त्याला त्यांच्या स्वयंपाकघरातला गॅस दिसत होता. आणि सगळे गप्पा मारत असताना त्या गॅसवरचं दूध उतू जाऊ लागलं. तेव्हा ते दूध सांडतंय या पॅनिकमध्ये नवराच उठून ते बंद करायला जाऊ लागला. मग त्याला आठवलं की आपण यांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या बारीक लक्ष ठेवण्याच्या वृत्तीचं फार कौतुक झालं होतं.

नवऱ्याला भेटायला एक मुलगी सीसीडी मध्ये आली होती. ती काही वेळ गप्पा मारून पुस्तक वाचू लागली असं त्याचं म्हणणं आहे. पण मला हे आजवर पटलेलं नाही.

त्यात त्यांनी "आमचा मुलगा इतका शहाणा आहे की तो पाळणाघरात असताना सगळ्यात आधी संडासात शी करायला शिकला. आणि त्याने इतरांना शिकवलं" असं सांगितलं >>> Rofl

सई Rofl कायच्या काय! आयांचं कौतुक कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही!
मेंदीच्या पानावर हे गाणं नवविवाहितेच्या मनातल्या भावनांबद्दल, तिच्या अनुभवांबद्दल आहे असं कुठे तरी वाचलेलं.

त्यात त्यांनी "आमचा मुलगा इतका शहाणा आहे की तो पाळणाघरात असताना सगळ्यात आधी संडासात शी करायला शिकला. आणि त्याने इतरांना शिकवलं" असं सांगितलं >>> Lol Lol Lol

माझ्या मोठ्या मामेजावेनं लग्न होऊन आल्यावर गाणं म्हणायचा आग्रह झाल्यावर चक्क सलाम-ए-इश्क मेरी जान हे गाणं म्हटलं होतं. कुटुंब अगदी पारंपरिक वळणाचं असल्यानं (घूंघट वगैरे) सगळ्यांना धक्काच बसलेला. (असं ऐकण्यात आहे.) त्यांच्याच मुलीचं लग्न जुळवताना आलेले भयंकर आणि विनोदी अनुभव लिहिते.

सई, अशक्य Lol

मी आणि माझा नवरा CCD ला भेटणार अस ठरलं होतं, पण तिथे गेल्यावर समजलं दोघे पण भुक्कड प्रकारातले आहोत, वैशाली मध्ये जास्त वेळ बसू देणार नाहीत म्हणून वाडेश्वर ला गेलो.
तिथे बोलता बोलता समजलं आमचे किमान बरेच कॉमन मित्र मैत्रिणी आहेत. आणि पुढचा सगळं वेळ तो हा काय करतो , ती सध्या काय करते, आपण आधी कसे काय नाही भेटलो. हा क्लास, तो क्लास. असल्याच गप्पा मारण्यात गेला. नंतर तर त्याने गप्पांच्या नादात माझ्या डिश मधल पण खायला सुरवात केली (जे मला तेव्हा अजिबात नव्हतं आवडलं Lol )

हाहा ही-ही करून घरी परत आल्यावर जेव्हा आई ने इतर चौकशा करायला सुरवात केली तेव्हा लक्षात आलं आपण हे काहीच विचारलं नाही किंवा विचारावं अस डोक्यात पण आल नाही. घरून खूप पडी झाली होती माझ्यावर.

नंतर तर त्याने गप्पांच्या नादात माझ्या डिश मधल पण खायला सुरवात केली>> हे भारी आहे >>≥>>>

मलापण इथेच फिस्सकन हसु आले Lol

Pages