कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ऑफिसमध्ये भयाण चिडवत होते मला.. उदाहरणार्थ: खांद्यावर हात टाकून चाललास तर बायको आणि कडेवर घेतलं तर तुझं बाळ शोभेल

माझ्या नणंदेचा कांदे पोह्यांचा कार्यक्रम होता घरी, प्रथमच ती सामोरी जाणार होती. Nurvous होती.
मुलाचे बाबा म्हणाले की आम्ही जेवायलाच येऊ, नाश्त्यावर पाठवू नका आम्हाला (मला तिथेच राग आला होता त्यांचा )
ती मंडळी (६जण )आली, पाहुणे येणार म्हणून खपून सांग्रसंगीत बेत रांगोळ्या, पंगत सगळं झालं. घरची सून म्हणून मलाही साडी नेसावी लागली होती. त्यात ते पंगतीला वाढणं वगैरे.

जेवणे झाली, ते काका washroom ला जाऊन आले. आणि तुम्ही आग्नेय दिशेला टॉयलेट का बांधलंय म्हणून विचारू लागले. (माझ्या मनात काय काय उत्तरे येऊन गेली, असो ) ह्यावर पाऊण तास चर्चा झाली
मुलगा मुलगी ना बोलू द्या म्हंटलं तर ते काका चक्क नाही म्हणाले. मुलीला त्यांनी काहीही प्रश्न विचारले, स्वयंपाक येतो का, पुरणाचा केला आहेस का, किती वेळ लागतो, एकत्र कुटुंबात राहण्याची तयारी आहे का (त्या मुलाला २ भाऊ होते आणि कोणीही एकत्र राहत नव्हते ही माहिती होती आमच्याकडे ), वगैरे. तिने जमतील तशी हो नाही मध्ये उत्तरे दिली. एक प्रश्न असं होता तुझी खास डिश कोणती? नणंद म्हणाली थालीपीठ, पाहुणे आले तर चटकन खायला काय करशील? उत्तर - थालीपीठ Happy नशीब धपाटे म्हणाली नाही Lol

तिला मुलगा आवडलं नव्हता, (मला हे समजलं होतं एव्हाना )
तो मुलगा काहीच बोलत नव्हता, मान खाली घालून बसला होता. मी ह्यांना खुणावलं. त्यांनी संधी हेरून त्याला casually काही प्रश्न विचारले, कंपनी कामं etc.
पटलं नाही अशी उत्तरे मिळाली.
काय माहिती विचित्रपणा सगळा
लगेच नकार कळवला

त्यांच्यातली एक खवचट काकू सारखी मला निरखत होती व बोलता बोलता मला तोंडावर चक्क जाड म्हणाली (मी आहे जाड त्याचं काही नाही ) पण ओळख ना देख उगाच काय?माझा काय संबंध?
Proud
मग तिला मीच लग्नाळू वाटले असेल असं मी गोड समज करून घेतला, आपल्याला काय बुआ

त्यांच्यातली एक खवचट काकू सारखी मला निरखत होती व बोलता बोलता मला तोंडावर चक्क जाड म्हणाली >>> केवढा आगाऊपणा! पण काही लोकांना बहुधा समजतच नाही की आपण बोलतोय ते समोरच्याला कसं वाटेल.

एक ( न झालेल्या कांपोचा ) किस्सा आठवला यावरून. मुलाच्या बाबांनी माझ्या बाबांना प्राथमिक विचारपूस करण्यासाठी कॉल केला. पत्रिका वगैरे जुळत होती वाटतं. पण बाकी भेटण्याबद्दल काहीही बोलणं करण्याआधी त्या गृहस्थांनी माझ्या बाबांना विचारलं "आधी सांगा तुमची मुलगी सुंदर आहे का"? टोटल गुगलीच पडली बाबांना. त्यांनी काहीतरी उत्तर दिलं. आणि फोन खाली ठेवल्यावर जाम हसत सुटले.
मुलाच्या बाबांना काय उत्तर अपेक्षित होतं देव जाणे. पण मला हा प्रश्नच पडला की एखादी मुलगी नसेल सुस्वरूप तर असं कुठले वडील सांगतील की 'नाही हो, आमची मुलगी अगदी काहीतरीच आहे दिसायला' Uhoh
या स्थळाला भेटायला चक्क माझ्या बाबांनी नकार कळवला होता Proud

लहान असताना आमच्या भावकीतल्या एका काकाला लातूरला स्थळ बघायचं निमंत्रण आलेलं. मध्यस्थ माझा दूरचा मामा. मुलीच्या वडिलांनी सहकुटुंब, सहपरिवार निमंत्रण दिलेलं. त्यांना सगळे सांगत होते की फक्त मुलगा आणि एक दोन वडिलधारे येतील तरी ते ऐकत नव्हते. आमच्याकडे असं नसतं वगैरे वगैरे. त्यांच्याच दोन खेपा होऊन गेल्या. शेवटी इतका आग्रह करतात तर म्हणून आजी , माझी आई, बाबा, मी, तेव्हां कडेवर असलेला भाऊ आणि भा का चा मोठा भाऊ असा लवाजमा रात्रीच्या गाडीने निघालो. सकाळी नऊला पोहोचलो.

वाटलेलं मुलगी येईल स्वागताला. पण नाही. चहा पाणी झालं. मग मुलीला बोलवा म्हटलं. तर म्हणाले तयार होतीय. मग म्हटलं कांपो घेऊन येईल. पण कसचं काय. जेवणं सुद्धा झाली. पण कांपो आणि मुलगी दिसले नाहीत. आता दुपार टळून गेली.
आमच्या मुलाला Proud म्हणजे भा का ला नैसर्गिक बुलावा आला. त्याने विचारणा केली तर एक दणकट काळाढुस्स इसम सोबत आला. त्याने बादली पाण्याने भरून घेतली आणि परेड करत मागच्या बाजूला संडास बांधले होते तिकडे परेड गेली.

इकडे दुस-या एका काकूने बंगल्याला फेरी मारली. तिने खिडकीतून मुलीच्या खोलीत डोकावले. येऊन सांगितलं की मुलगी सुंदर आहे, जमणार हे स्थळ. आजी म्हणाली कशी आहे दिसायला ? तर म्हणे की चेहरा नाही दिसला, कारण कोपर चेह-यावर घेऊन ती झोपलीय. पण हात खूप सुंदर आहे आणि रंग गोरापान आहे.
आजीने कपाळावर हात मारला.

इकडे भावकीतला काका (मुलगा) अस्वस्थ होऊन आला आणि म्हणाला , "आत्ताच्या आत्ता परत जायचं"
आजी म्हणाली काय झालं ? तर हा अस्वस्थ. मग मोठ्या काकाने विचारलं तर अडचण अशी होती कि
त मनुष्य टॉयलेट दाखवायला आलेला आत घुसला ते जायलाच तयार नव्हता. याला जा म्हणायला पण कसंतरीच वाटत होतं.
मोठा काका म्हणाला " बहुतेक त्याला रामलाल ड्युटी असेल "
जेव्हां आम्हाला उलगडून अर्थ समजला तेव्हां सगळे फिस्सकन हसलो.

मुलीचे वडील कसं नुसं होऊन "काय काय " करत राहीले.
त्या आधीचा एक किस्सा तर खतरनाक आहे पण इथे द्यावा कि नाही म्हणून नाही दिला.
शेवटी चार वाजून गेले तरी कांपो आणि मुलगी यांचं दर्शन न घेताच रामलाल च्या हृद्य आठवणींसह आम्ही एसटी स्टँडकडे कूच केली.

काहीही Lol
किल्ली, भारी किस्सा आहे.
लोकांना स्वच्छतागृहाबद्दल (तेही दुसऱ्यांच्या घरच्या) एवढा का जिव्हाळा वाटतो पण?
@रानभुली, तुमचा प्रतिसाद आत्ता वाचला. तुमच्या केसमध्ये स्वच्छतागृह हे फारच मोठं कारण होतं नकार द्यायला Lol

धमाल धागा आहे ! Happy
पळून जाऊन लग्न केलेल्यांचे किश्शे लिहायला एक धागा हवाच ! Proud

माझ्याकडे दुसऱ्यांचा पळून जाऊन लग्न किस्सा सुद्धा आहे.
माझ्या एका मैत्रिणीने असं लग्न केलं. तिचे आई बाबा लग्नाला येणार नव्हते म्हणून तिच्या सासरी मी लग्नाआधी तिची वऱ्हाडी म्हणून गेले. मी भारतात आल्यानंतर लगेच लग्न (रजिस्टर आधीच झालं होतं) होतं म्हणून jetlag होऊ नये म्हणून तिनेच मला झोपेची गोळी दिली (ती डॉक्टर आहे). आणि मी ती गोळी घेऊन झोपल्यावर तिला प्रचंड existential crisis होऊ लागला. म्हणून तिनं मला त्या गोळीच्या झोपेतून रात्री उठवलं आणि आम्ही तिनं पळून जाऊन केलेल्या लग्नातून पळून जायचा बेत केला. पण तो execute करायला उठताना मी दोन तीन ठिकाणी पडले. म्हणून तिनं तो कॅन्सल केला असं तिनं मला सकाळी सांगितलं. आणि खरंच माझ्या हातावर पडल्याचे bruises होते पण मला काही आठवत नव्हतं. तेव्हा प्रचंड ताण होता. पण आता आठवून फार हसू येतं.

माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला किस्सा : पाहायला आलेला मुलगा १० वि बारावी बोर्डात आलेला हुशार मुलगा होता .. चहा पोहे झाल्यावर हे दोघे गॅलरी मध्ये गप्पा मारायला गेले तेव्हा त्याने हिला दहावी , बारावी , graduation असे सगळे मार्क्स विचारले हिने प्रामाणिक पणे सगळे सांगितले . त्यात हिला बारावी ला थोडे कमी(६८%) मार्क्स होते तर ,
मुलगा : बारावी ला कमी अभ्यास केला होतास का ?? या पेपर ला आजारी होतीस का ?? काही प्रॉब्लेम होता का ?? अमुक अमुक क्लास लावलेलास का ??? वगैरे वगैरे आणि यावर तासभर गप्पा ...
या नंतर माझ्या मैत्रिणीने ८ महिने तरी मुलाचा विषय या घरात काढायचा नाही असं आई वडिलांना सांगितलेलं ...
आम्ही अजूनही १२ च्या मार्क्स वरून चिडवतो तिला
२) अजून एका मैत्रिणी च्या बाबतीत घडलेली गम्मत : तिला पाहायला येणाऱ्या मुलाचं आडनाव होतं " चावट " तिचं अर्थातच लग्न नाही झालं पण आम्ही अजूनही या नावावरून तिला चिडवतो

माझा पण एक अनुभव. वाशी ला कांदे पोह्याचा कार्यक्रम होता, मुलाच्या घरी.

वीस वर्षांपूर्वी सुद्धा मी काही साडी वगैरे नेसत नव्हते मुलाला बघायला जाताना. माझ्या बऱ्याच मैत्रिणी मात्र साडी नेसायच्या, गजरा माळायच्या. ह्या वाशीच्या कार्यक्रमाला जाताना मी चांगला पंजाबी सूट घातला, अंगाई BIBA brand चा, चांगल्या पैकी. गेल्या गेल्या मुलाच्या वडिलांनी कंमेण्ट केली - "साडी नाही नेसली?". सगळे प्रश्न मुलाचे वडील विचारात होते. स्वयंपाक येतो का? घराची कामे करता येतात का? लग्ना नंतर जॉब करणार का?

अगदी पितृसत्ताक घर वाटत होते, मुलाची आई अगदी बिचारी कोपऱ्यात उभी होती. मुलाच्या वडीलानी पुढचा प्रश्न विचारला, "पोहता येते का?", मी उत्तर दिले, "हो, येते पोहता", त्यावर पुढचा प्रश्न, "पोहायला जाताना swimming costume घालतेस का साधा पंजाबी ड्रेस?"

आईला, असली डोस्क्यात तिडीक गेली होती. मी काही बोलले नाही, पण तिकडून नकार आला तेच बरे झाले.

त्या मुलाचे नाव आठवत नाही, त्याचा चेहरा पण आठवत नाही. फक्त त्या मुलाच्या आईचा गरीब बिचारा चेहरा अजून आठवतो, ती फक्त हो नाही म्हणत होती, स्वयंपाक घरातून पोहे सरबत घेऊन येत होती. येऊन जाऊन वाटते, फक्त तिच्या साठी तरी चांगली भक्कम खंबीर सून त्या घराला मिळाली असेल.

अग हो! असतात काही लोक ज्यांची अपेक्षा सुनांनी फक्त साडी नेसावी. हे वीस वर्षांपूर्वी होते, आता नसावे. पण झी मराठी च्या सुना साडीच नेसतात अजून तरी, उगाचच हे TV वाले काहीबाही शिकवतात.

माझे लग्न झाल्यावर कळले की सासरकडे (चुलत, आत्ते) सुनांना फक्त साडी घालायची मुभा होती, लिपस्टिक लावायची असेल तरी सासूची परवानगी घ्यावी लागायची. नशीब माझे सासू सासरे पुढारलेले होते. माझ्या सासूला सुद्धा तिच्या नणंदा ऐकवायच्या कारण माझी सासूची माझ्यावर काही बंधने नव्हती. माझी सासू US मध्ये आली तेव्हा मुद्दाम Tshirts Jeans घालायची, हौस पुरती करून घेतली

असतात काही लोक ज्यांची अपेक्षा सुनांनी फक्त साडी नेसावी. हे वीस वर्षांपूर्वी होते, आता नसावे. >>> अगं आहे अजूनही हे असं. आमच्या ओळखीत एका मुलीचं नुकतंच लग्न ठरलं तिला सासरच्यांनी पसंती देताना अश्या 'अटी'(?) घातल्या होत्या की घरात चुडीदारच घातला पाहिजे, पुरणाचा स्वयंपाक आलाच पाहिजे इ. इ.

अजून एका मैत्रिणी च्या बाबतीत घडलेली गम्मत : तिला पाहायला येणाऱ्या मुलाचं आडनाव होतं " चावट " तिचं अर्थातच लग्न नाही झालं पण आम्ही अजूनही या नावावरून तिला चिडवतो
>>उखाणा मस्त झाला असता!
कापो च्या कार्य क्रमात आले भलतेच सावट
लग्न ठरले माझे आणि नवरा मिळाला चावट
ह्हपुवा

माझ्या मावसभावाच लग्न ठरलं तरी सुट्टी नसल्याने मी गैरहजर होतो. लग्नाच्या दहा दिवस आधी मुलीचा वाढदिवसच होता. मी आणि त्याचा जवळचा मित्र आम्ही भरीस पाडलं की असा चान्स पुन्हा पुन्हा येत नाही आपण सरप्राईज देऊ. केक, गिफ्ट वगैरे कारण लग्न ठरलं तरी ते एकमेकां सोबत बोलत पण नसत. माझ्या कडे सांगितले की मावशी कडे चाललो जेवण करुन येतो आणि त्याने पण घरी तेच सांगितले. आम्ही गेलो वाढदिवस साजरा झाला. तर याने माझी काही ओळख करून दिली नाही वर त्याच्या होणार्या सासरे ना सांगितले पण की घरी कळू देऊ नका. पुढल्या दिवशी त्याचे सासरे आमच्या गावात आले होते तर वडिल त्यांना घेऊन घरी आले तर, अहो ही बाहेर गाडी आहे ती काल रात्री घरी आली होती आमच्या. माझे वडील काय ते समजले आणि मला आवाज दिला जरा खाली ये. त्यांना पाहुन मला शाॅक बसलाच पण त्यांना डबल शाॅक बसला. मी तर थांबलोच नाही सरळ आतल्या खोलीत निघून गेलो. त्यांनी थोडक्यात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला वर माझ्या वडिलांना छान आहे तुमचा मुलगा, एक मुलगी आहे छान जोडा दिसेल. वडिलांनी सांगीतले की, तुम्हाला आता चहा आणुन दिला ती माझी लहान सुनबाई आणि बाहेर खेळतोय ना त्याचाच मुलगा आहे...
ते गेल्या नंतर मावशीकडे आणि आमच्या कडे रामायण, महाभारत तर झालं ते वेगळंच.

कांदेपोह्यांचा अनुभव अजिबात नाही , वरचं सगळं वाचून really ?? असं होत आहे. पण हल्लीच एक गम्मत ऐकायला मिळाली त्यावरून वरील सर्व अगदीच शक्य कोटीतले वाटते. बहिणीच्या मुलाचे कांदेपोहे कार्यक्रम चालू आहेत, एका ठिकाणी मुलीने घरच्यांच्या देखत त्याच्या अंतर्वस्त्रांचा ब्रॅण्ड विचारला. विचारताना चडडीचा ब्रॅण्ड असाच शब्दप्रयोग केला होता

तो प्रसंग कल्पून बाकीच्यांची तोंडे कशी झाली असतील याचा विचार करून हसु येतंय फार. शिवाय हाच प्रश्न मुलाने विचारला असता तर ?

कापो च्या कार्य क्रमात आले भलतेच सावट
लग्न ठरले माझे आणि नवरा मिळाला चावट
ह्हपुवा>>>>>>>>>>हाहाहाहा....हहपुवा ...हे बेस्ट होतं...

संडास वरून आठवले.
एका मैत्रीणीच्या किस्स्यात सुद्धा हेच झाले होते.तिला एक चाळीतला मुलाचं स्थळ आलेलं.
मुलाने हाच प्रश्ण केला, तुमचा संडास घरात आहे का?
मैत्रीणीच्या वडिलांना वाटले, त्याला सुसु आली म्हणून विचारतोय. ते उठले आणि सांगायला लागले, या ना इथे आतल्या बाजूला आहे.
तर मुलगा लगेच, आमचा बाहेर जिन्याजवळ आहे, मुलीला जमेल ना मग?
ह्या प्रश्णावर सगळे शांतच झाले.
एकीकडे त्याचा प्रामाणिकपणा बरा वाटला पण मुलगी फ्लॅट सिस्टम मध्ये वाढलेली आहे हे कळले होते तर आधीच विचार करायचा ना. अर्थात लग्न जमलेच नाही. बराच संशयी वाटला इतर प्रश्णांवरून.
किती वाजता नोकरीला जाते? परत कितेर्पर्यंत येते? घरची कामं सकाळी करते का आई करते?
जॉब सोडणार का? (मग नोकरीवाली मुलीला का बघता? असा सुद्धा मैत्रीणीला त्याला विचारावं वाटलेलं).
पण एकांदरीत, गावंढळ मागासलेलं वृतीचा मुलगा होता.
मुंबईत वाढला म्हणून तिच्या आई-बाबांनी विचार केला की, बरा असेल.
ह्या मुलीला, २१ स्थळं पहावी लागली. तिच्या स्टोर्‍या खुप प्रसिद्ध होत्या आमच्या ग्रूपमध्ये.
एकंदरीत, स्वतंत्र विचाराच्या मुली, अजून “बर्‍याच” मुलांना झेपत नाहीत. ९०-२००० च्या काळात तरी हाच सीन होता.

Pages