कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच किस्से आहेत एकेक. फारच एंटरटेनिंग धागा आहे Wink
माझ्या मामेभावाने असाच एक सांगितलेला किस्सा, तो छोट्या शहरातून पुण्यात येऊन स्थायिक झालेला आई वडिलांसोबत. असाच एका मुलीला ccd मधे भेटला. मुलगी आयटी वाली आणि पुणेकर होती. आता पुणेकर असण्याचा problem नक्कीच नव्हता त्याला पण ती सुरवातीपासूनच ॲटीट्यूडने बोलत होती असं त्याला जाणवलं आणि तिच्या
' लग्नानंतर तुझे आई-वडील तुझ्या सोबतच राहणार का ? ' या प्रश्नाला महाशयांनी काय उत्तर द्यावं, ' नाही,मी त्यांच्या सोबत राहणार आहे '. यामुळे एवढं mutual understanding होऊन गेले दोघांत, की पुढच्या दहा मिनिटात ती भेट संपली Lol Lol

मध्यस्थी ने अजूनही होतात की लग्ने. आमच्या गावाकडे म्हणतात की चांगली स्थळे ओळखीने संपतात उरलेला गाळ मंडळात जातो म्हणून शक्यतो कोणी मंडळात किंवा ऑनलाईन स्थळे शोधत नाहीत
माझा नवरा अश्याच मध्यस्थी सोबत आला होता घरी , पण माझी लग्न करायची इच्छा नव्हती म्हणून बघायचा कार्यक्रम न ठेवता, सहज भेटायला आल्यासारखे आले होते ते, तेव्हा मी सोडून सगळ्यांना माहीत होते की तो मला बघायला आलाय, त्यामुळे कांदा पोहे, साडी, नट्टापट्टा करायचा प्रश्नच नव्हता. सहज गप्पा झाल्या. नंतर जेव्हा मला कळले तेव्हा आधी रागावली मी, पण मला तो आवडला होता म्हणून परत एकदा बाहेर भेटलो अन लगेच महिनाभरात लग्न पण केले.

एकेक मजेदार किस्से आहेत. माझं लग्न जरी योग्य वयात झालं तरी लग्नाच्या वयाच्या आधीच प्रपोजल आलं होतं, त्यामुळे आयुष्यात कांदेपोहे प्रसंग कधीच येणार नव्हता हे माहीत होतं. माझं लग्न करायचं ठरलं की तो भारतात येऊन लग्न होणार होतं.

पण लग्न करायची वेळ आली तोपर्यंत मात्र आम्ही छोटं भांडण आणि मोठा इगो तत्वावर ब्रेक अप जाहीर केला. यावर सहा महिने गेल्यावर बाबानी विचारलं की आता पुढे काय? लग्नाचा विचार करायचा की तू त्याची वाट पहाणार आहेस? मी अजुन रागातच होते, म्हणुन स्थळं पहायला हो म्हणुन टाकलं. आणि जो कांदेपोहे प्रसंग कधीच अनुभवायला मिळणार नाही वाटलं तो प्रत्यक्षात घडला. फारच इन्फॉर्मल. कांदेपोहे नव्हतेच. साडी नेसणं, प्रश्नोत्तरे असं काहीच घडलं नाही. होकार पण आला आणि मग आता झालेला नवरा आणि तेव्हाचा ब्रेक अप झालेला ex धावत आला. बरेच गमतीदार ट्विस्टस होऊन शेवटी लग्न झालं. पण त्या 6 महिन्याच्या ब्रेक अपमुळे हुकणारा कांदेपोहे प्रसंग मात्र अनुभवता आला.

आमचा एकच कार्यक्रम झाला. पण कांदेपोहे मीच नेउन दिले. विषेश म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांशी काहिही न बोलता पसंती दिली. बरं चाललय आता :).
माझ्या दोन मित्रांच्या कर्यक्रमाला मी गेलो होतो. पण त्यांनीही पहिल्या फटक्यात पसंती केली. आम्ही सगळे इंजिनियर. मुलीला नाही म्हणायला जिवावर यायचे ना. तेंव्हा. Happy

माझे पहिले नोकरीचे ठिकाण म्हणजे शहरापासून दूर. आमच्या कंपनीचीच वसाहत होती. आम्ही वीस एक जण होस्टेल मधे रहायचो. इंजिनिअर्स होस्टेल म्हणून फेमस होते. Happy सगळ्यांच्या रूम्स होस्टेलमधे असतात तशाच असायच्या.
तेंव्हा इंटर्नेट वगैरे नसल्यामुळे मुलींचे पालक पहिल्यांदा रेसी करण्यासाठी यायचे. आम्ही एक रूम कंपनीशी भांडून मोकळी करून ठेवली होती, आमच्या पैकी कुणाचे आई वडिल आल्यावर रहाता यावे म्हणून या कारणासाठी. ही रूम आम्ही एकदम स्वच्छ ठेवायचो. कुणाची रेसी होणार असेल त्या दिवशी तो मित्र त्या रूम अम्धे ट्रान्स्फर. ही माझी आयडिया. एकदम टापटीप इम्प्रेशन वगैरे.
सगळ्यांना चांगल्या बायका मिळाल्या. Happy बिचार्‍या.

ही रूम आम्ही एकदम स्वच्छ ठेवायचो. कुणाची रेसी होणार असेल त्या दिवशी तो मित्र त्या रूम अम्धे ट्रान्स्फर. ही माझी आयडिया. एकदम टापटीप इम्प्रेशन वगैरे.

😀
सगळ्यांना चांगल्या बायका मिळाल्या.
😀 😀

धमाल किस्से आहेत एकेकाचे. मजा येतेय वाचताना.

एका मुलाला भेटायला मी आणि माझे वडील त्यांच्या घरी गेलो होतो. माणसं चांगली वाटली, घरही चांगलं होतं. मुलगा मात्र नोकरी आणि मला येत असणार्‍या टेक्नॉलॉजिज बद्दल खूप प्रश्न विचारत होता. ते झाल्यावर त्याने पुढच्या ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतेस वगैरे प्रश्न विचारायला सुरूवात केली आणि मग मात्र मी वैतागले. एकमेकांचे स्वभाव काय आहेत वगैरे काही जाणून घेणं त्याच्या खिजगणतीत पण वाटलं नाही. मी त्याला मग एकच प्रश्न विचारला की 'तुम्ही मला जॉब देणार आहात का?' Proud तेव्हा मात्र जरा आवरतं घेतलं त्याने. आणि पुढच्या ५ मिनीटांत आम्ही निघालो तिथून.

अजून एका मुलाला भेटायचा प्रसंग फारच गमतीशीर होता. तो बहुधा पुण्याबाहेरचा होता आणि नोकरीनिमित्त पुण्यात रहात होता. त्याचा फ्लॅट होता (रेंटेड की कसा ते आठवत नाही). एकटा राहणारा मुलगा म्हणून वडील म्हणाले की तुम्हीच आमच्याकडे या. त्याला तो नाही म्हणाला. आम्ही दोघांनीच बाहेर भेटावं याचीही त्याची तयारी दिसली नाही. आम्हीच त्याच्या घरी जावं असं त्याचं म्हणणं पडलं. मग वेळ वगैरे ठरवून मी आणि माझे वडील त्याला भेटायला गेलो. तर आधी या बाबाने दारच उघडलं नाही २ मिनीटं. मग उघडलं तर तो नुक्ताच झोपून उठलेल्या अवतारात. मळकी जीन्स, चुरगळलेला टीशर्ट, खुरटी दाढी. बघूनच राग आला मला. एखादी मुलगी अश्या मळकी जीन वगैरे अवतारात आलेली चालली असती का? मुलींनी नेहमी चांगलंच दिसावं आणि रहावं ही अपेक्षा. असो. जांभया देत थोडा वेळ काहीतरी बोलला तो. मग चहा करतो म्हणाला. मग २ मिनीटांनी बाहेर येऊन दूध संपलंय म्हणाला. मग माझे वडील पण वैतागले. त्याला म्हणाले असं करा, तुम्ही तयार व्हा, आपण बाहेर कुठेतरी जाऊया चहा प्यायला. तसे आम्ही तिघे गेलोही. जुजबी बोलणं झालं. अर्थात माझं उत्तर मी आधीच ठरवून टाकलं होतं Proud

त्याने पुढच्या ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतेस >> Biggrin चांगला प्रश्न आहे हा!! आवडला मुलगा तर "तुला "मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं" सांगताना स्वतःला बघते." असं म्हणता तरी येतं.... नाही आवडला तर "तुला सांगून काय उपयोग? तू थोडीच तिथे असणार" - जागीच सोक्षमोक्ष!!!!

भन्नाट किस्से, रमड....

तुला सांगून काय उपयोग? तू थोडीच तिथे असणार" - जागीच सोक्षमोक्ष!!!! >>> भारी, सी! Lol

अजून आठवले तर लिहीते किस्से. शक्यतो फायनल कांदेपोह्यांचा पण Wink

अजून एक किस्सा माझ्या मैत्रिणीचा आहे. ती आणि तो मुलगा(जो आता तिचा नवरा आहे) बाहेर भेटले होते आणि जनरल एकमेकांना पसंत केलं होतं. मग तिच्या घरी दोन्हीकडची मोठी माणसं भेटणं, कांदेपोहे असा कार्यक्रम होता.
मुलगा मुलगी पसंती झाली असल्याने लग्न ठरल्यातच जमा होतं. तर तिच्या आईने इम्प्रेशन मारायला 'आमची मुलगी शास्त्रीय संगीत शिकते आहे, फार सुरेख गाते' असं सांगितलं. ते खरंच होतं. पण मग तिची भावी सासू म्हणाली की आम्हाला एखादं गाणं म्हणून दाखव.
तर आमच्या म्याडमनी सुरेश भटांचं 'मी मज हरपून बसले गं' म्हटलं. Lol तिच्या आईने ते गाणं घाईघाईने आवरतं घ्यायला लावलं.
पुढे त्या बैठकीत लग्नाचं फायनल होईपर्यंत तिची आई बिचारी टेन्शनमध्ये होती. पण झालं सगळं नीट.

हा धागा आणि मी असा उंदीर मांजराचा खेळ आहे. धागा वर आला की मी डोळे मिटून घेते. कारण घरात कांदेपोहे बनवण्यासाठी प्रेशर येतंय Proud
मग एक डोळ्याने नवीन अमूक वर क्लिक केलं की नजरेला पडेल ती पोस्ट वाचतेय. आता ठरवलंय की जे होईल त्याला धीराने तोंड द्यायचं. त्यासाठी इथे काही अनुभवातून शहाणे होण्यासाठी मिळतंय का बघावं.

स्थळं पळवून लावण्याचे अनुभव असतील तर लवकर लवकर येऊ द्यात Lol

rmd च्या प्रतिसादावरून (नोकरी, टेक्नॉलॉजी वगैरे) आठवलं, माझ्या रूममेटच्या बहिणीला बघायला एक मुलगा आला होता, त्याने तिला विचारलं होतं, तुला कुठल्या कुठल्या लँग्वेजेस येतात? ही म्हणाली, मराठी, हिंदी, इंग्लिश. तर तो हसायलाच लागला. त्याला कंप्यूटर लँग्वेजेस म्हणायचं होतं म्हणे Lol

कंप्यूटर लँग्वेजेस म्हणायचं होतं>> Lol
'मी मज हरपून बसले गं' म्हटलं. Lol तिच्या आईने ते गाणं घाईघाईने आवरतं घ्यायला लावलं.>>> Lol
वंदना गुप्तेने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते कि माणिक वर्मांची मुलगी म्हणून तुला गाणे येतच असेल तर गाऊन दाखव असे भावी सासू-सासऱ्यांनी विचारल्यावर तिने ‘पाडाला पिकलाय आंबा’ हे गाणे गायले होते.

सगळे किस्से एकसे एक बढकर एक आहेत, धमाल धागा आहे हा
मी मुबैला एक स्थळ बघायला गेले होते तिथे मुलाच्या आइने बिटाच्या वड्या,कॉर्न आणी गाजर घालुन पोहे असे क्रिएटिव्ह पदार्थ केले होते
आणी चहाच्या एवजी घरातले सगळे कुठलातरी काढा पितात म्हणे दुपारी ,आमच्या साठी गवती चहा +चहा मसाला घालुन चहाच केला होता.
आईने ९९ % सवान्द साधला आणी बाकी मुलाचे वडील्,भाउ,मुलगा सगळे एक्दम शान्त.
तो मुलगा इतका अबोल होता की एकेमेकाशी बोला या टाइमस्पॅन मधे मी शोधुन ५-६ प्रश्न विचारले त्याला त्याने अगदिच त्रोटक उत्तर दिली आणि एकही प्रश्न विचारला नाही शेवटी लोकल सुटेल असे मुबैच्या नातेवाइकानीच काहितरी कारण शोधुन आम्ही सटकलो.
पुण्यातल एक स्थळ शनिवार पेठेत माझ्या मावसभावाकडे बघायला येणार होत त्यानी फोनवरच गाडी पार्क करायला जागा आहे का? कुठल्या गल्लित राहता, गाडी सुरक्षित राहिल का? असे सगळे प्रश्न विचारले त्यावर वहिनी म्हटली " पार्किन्गला जागा आहे पण सुरक्षेची गॅरेन्टी देवु शकत नाही तेव्हा बसनेच या" पुण्यातल्या लोकाना टोलावायला अस्सल पुणेकरच लागतात.

मी मज हरपून बसले मधे काय वाईट आहे?मी पूर्ण ऐकलेलं। नाही ते.
होणाऱ्या नवऱ्यावर जीव जडला या अर्थाने वापरता येईल.

Happy वाईट काही नाही पण पाहण्याच्या कार्यक्रमात आईला निश्चित कसं कसं होईल... हे असं आहे-

आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग
साखरझोपेत मध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग.

त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर लाजत, उमलत झुलले गं

त्या नभशामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं
दिसला मग तो देवकीनंदन, अन मी डोळे मिटले गं
मी मज हरपुन

* फुकटचा सल्ला - कार्यक्रम जयंती ते मयंती कुठलाही असो "मैंने तेरेलिए ही सात रंग के सपने" सगळीकडे चालतं....

मला पण पूर्ण गाणे माहीत नव्हते...
आता पूर्ण गाणे कळल्यावर,मी मज हरपून किस्सा Lol फुकटचा सल्ला Lol
बाकी किस्से पण Rofl

त्याने पुढच्या ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतेस >> Biggrin चांगला प्रश्न आहे हा!! आवडला मुलगा तर "तुला "मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं" सांगताना स्वतःला बघते." असं म्हणता तरी येतं >>> Lol
सगळेच किस्से एकसे एक आहेत.

>> पुढच्या ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतेस?
>> तुला कुठल्या कुठल्या लँग्वेजेस येतात?

नोकरीच्या मुलाखतीचे प्रश्न वैवाहिक जोडीदार निवडताना? करीयर करायच्या नादात लोक व्यक्तिगत आयुष्य विसरलेत कि काय.
मी मुलगी असतो तर विचारले असते, "Dude, have you lost your mind?"

>> मी मज हरपून बसले मधे काय वाईट आहे?

हो मलाही हाच प्रश्न पडला होता. मला वाटले अवघड गाणे निवडले म्हणून असेल.

मस्तच किस्से. माझा वीकांत ह्या बा फ वरच गेला. परफेक्ट गाणे म्हणजे फुलले रे क्षण माझे फुलले रे. मेंदीच्या...

फुलले रे क्षण माझे फुलले रे. मेंदीच्या...>>>>
माझ्या लग्नाच्या विडिओमधे हे गाणे आहे..पहिल्यांदा तेव्हाच ऐकलेले..

परफेक्ट गाणे म्हणजे फुलले रे क्षण माझे फुलले रे. >> आवडली समोरची पार्टी तर... नायतर "जय जय शिवशंकर आज मूड है भयंकर" पण चालतयं.... Wink

मी मज हरपून... बरं झालं "तरुण आहे रात्र अजुनी" किंवा "मालवून टाक दीप" नाही म्हटलं!

सुरेश भट म्हणजे भलताच रोमँटिक शायर!

Pages