रूखवतः चित्रे, कथा, नि किस्से

Submitted by Barcelona on 20 February, 2021 - 11:10

लग्नसराई जवळ आली की रुखवताच्या तयारीला ही सुरुवात होते. पारंपरिक रुखवतावर नांव घातलेली स्टीलची पाच ताटे, वाट्या, कुकर इ गृहोपयोगी वस्तू व संसारोपयोगी कलाकुसरीच्या वस्तू जसे पडदे, पलंगपोस (उर्फ बेडशीट) इ असायच्या. रुखवताचे जेवण/नाश्ता असा सोहळाही असायचा. 

आता स्वरूप बरेच बदलले आहे. प्री-वेडींगशूटचे फोटो ते रोपवाटिका असे अनेक नवे प्रकार बघायला मिळतात. रुखवताच्या सामानाचे काही किस्से ही घडतात - रंगीत करंज्या नवरीने लग्नाआधीच खाऊन टाकल्या. नवरा-नवरी हनिमून होऊन परत आले तरी माहेरून केलेले रुखवताचे पार्सल आले नाही. लग्नानंतर रूखवताच्या सामानाचे काय केले त्याचे ही किस्से असतात. पुठ्ठ्याची सप्तपदी, मोत्याची महिरप, सुपारीचे भटजी, साखरेचे तुळशीवृंदावन असले काहीबाही सामान खूप वर्ष जपले जाते किंवा इतरांच्या लग्नात खपवले ही जाते. रूखवताचे काय केले याचे ही किस्से असतात.

अशा गंमतीच्या (किंवा गंभीर ही) रुखवत कल्पना-किस्से-कहाण्यासाठी हा धागा. चित्रे उपलब्ध असतील ती ही टाकू शकता. फार सुंदर कलाकुसरीचे नमुने बघायला मिळतात.  

हल्ली बऱ्याच लग्नात रुखवत नसतेही. परंपरा लोप पावत चालली आहे. त्यात वाईट काही नाही. कालपरत्वे बदल होतात. असे विनारूखवताचे अपारंपरिक लग्न केले असेल तरीही इथे स्वागतच आहे. त्या ऐवजी काही केले असल्यास लिहू शकता.              

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांची हौस लग्नातल्या रूखवताने भागली नसेल अशांसाठी डोहाळजेवणातला रूखवत
डायपर केक-
7E55F83B-1122-434D-B29F-68C786476CC3.jpeg

कलिंगडातलं बाळ
F9E1EF2B-3E35-4C45-8E14-EBA80B98934F.jpeg

मुंजीचं रुखवत आणि कलिंगडाचं बाळ गोड आहे.

आमच्या ओळखीचे एक रामदासी होते. मुळात ते शिक्षणाने आर्किटेक्ट होते. त्यांचं आमच्या घरी जाणंयेणं होतं. माझ्या बहिणीचं लग्न ठरल्यावर त्यांनी स्वतःहून एक देऊळ, आजूबाजूला झाडाखाली बसलेले ऋषी, त्यांचे शिष्य असं सुंदर मॉडेल बनवून रुखवतात ठेवण्यासाठी तयार करून आणून दिलं होतं. अतिशय साध्या सामग्रीचा वापर करून त्यांनी ते सगळं तयार केलं होतं. नेहमीपेक्षा एकदम वेगळीच वस्तू असल्यामुळे सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं तेव्हा. फोटो सापडला तर चिकटवते.

आमच्या ओळखितल्या एक ताई, जुन्या ५०१ बारपासुन रुखवतातल्या सुन्दर सुन्दर वस्तु बनवायच्या. तो साबण नरम करुन त्याच्या बाहुल्या बनवायच्या. म्हणजे वरातीतलि गाडी/ घोडा, वर नवरदेव, नाचणारे वर्हाडी, पंक्तिला बसलेल्या नौवारी साडी नेसलेल्या बायका, त्यांना वाढणारी वधुमाय, वरमाय, ... ताटातले पदार्थ आणि या सर्वांना नन्तर सुंदर चमकिदार कलरींग.
साखरेचे ताट, ताम्ब्या, वाटी, पेला, तुळशी वृंदावन, .... हे ही बनवायच्या.
आमची आई, भिजवलेल्या साबुदाण्याला वेगवेगळे कलर देउन, नंतर ताटात त्यांची सुंदर डिझाईन बनवुन, कधी त्यात वधु वरांचे नाव, कधी स्वस्तिक, ओम वै शुभचिन्हे .. करुन ती ताटे वाफवायला ठेवायची. तेच नन्तर सावलीत सुकवाय्चे. आणि रुखवतात मांंडायचे.

माझ्या आठवणीतली २ रुखवतं

एका मैत्रीणीला वाचनाची खूप आवड होती. तिच्या लग्नात रुखवत म्हणून खूप सारी पुस्तकं ठेवली होती Happy

एका मैत्रीणीच्या रुखवतात तिला लागणारा सगळा संसार ठेवला होता Uhoh अगदी भांडीकुंडी, गाद्या, कपाट, टीव्ही, Washing machine सगळं होतं

मी_आर्या, साबणावर रंग चढवणे अवघड असावे- ऑईल पेंट लागेल कुठलातरी. आई हौशी आहेत! छान वाटतात शुभचिन्हे रूखवतावर.
मी नताशा, मला दिल धडकने दो मधला प्रियांकाचा डायलॉग आठवला - किसी मॉल से शादी करवा देती मेरी... Sad अजूनही असं करतात लोकं म्हणजे...

मस्त आहेत रुखवतं.
यामागे पूर्वीच्या काळी काही वेगळा हेतू असेल का विचार करतेय
म्हणजे जाहिरपणे 'आम्ही मुलीला हे सर्व अलरेडी दिलंय हां,सर्वांसमोर सांगतोय. बघून खात्री करा.नंतर हे लोक 'दिलंच नाही म्हणतील' असं काही.'
आमच्या कडे तुळशी बागेच्या मागच्या बाजूला जाऊन आणलेली रुखवताची पालखी आणि बांगडीत काही काही लिहीलेली सप्तपदी अजून आहे.

डाय पर केक बघुन कसेतरी झाले.

फेसबुकावर रुखवत म्हणून एक पेज आहे तिथे मस्त वस्तु उपलब्ध आहेत. भातुकली, साखरेच्या वस्तु. मला आव ड ते लग्नामधले रुखवत बघायला.

मी चित्पाव न पद्धतीचे लग्न हे पुस्तक व रुखवत पेज च्या मालकैणीशी बोलून ठेवले आहे. लग्न कधी ठरते बघू. विहीण बाईंसाठी चांदीच्या लवंगा घ्यायच्या आहेत अजून.

पूर्वी मुलींची लग्ने लहानपणीच होत, बरेचदा त्यांचे वय बाहुल्यांशी खेळण्याचेच असायचे. अशावेळी सासरी विरंगुळा म्हणून ही खेळणी वगैरे देण्याची पद्धत पडली असावी. भोंडल्याच्या गीतांमधूनही हे जाणवते. "अस्सं माहेर सुरेख बाई, .. अस्सं सासर द्वाड बाई .. " ई.

मी आणि लेकीने नुकतेच भाच्याच्या मुंजीसाठी रुखवत केले. उद्यापरवा जरा साईझ कमी करुन फोटो देते इथे.
आम्ही दोघींनी केलेला चॉकलेटचा बंगला आणि चॉकलेटचं झाड बच्चे कंपनीत चांगलेच हिट्ट झाले.

'आम्ही मुलीला हे सर्व अलरेडी दिलंय हां,सर्वांसमोर सांगतोय. बघून खात्री करा.नंतर हे लोक 'दिलंच नाही म्हणतील' असं काही.' >> यावरून आठवलं -एकदा एका साखर कारखान्याच्या गावी लग्नाला जाण्याचा योग आला. दोन्हीकडचे लोक अनेक गणमान्यांशी ओळख ठेवून असलेले. मुलीला लग्नात एक डबलबेड दिला होता आणि टेबलाऐवजी त्यावरच सर्व सामान मांडले होते. कुणी लग्नाला आहेर देवून गेले की माईकवर जाहिर करायचे "यांच्यातर्फे नवदांपत्याला इतकेतितके रूपये व आशीर्वाद". पद्धत आहे म्हणे. माहिती नव्हती तेव्हा. कधी जेवण होतयं नि कधी बाहेर पडतो असं झालं... (मुलीकडून गेले होते. गावातल्या जवळच्या हॉटेलात जेवले असते तर त्या काकूंना ऐकावं लागलं असतं म्हणून थांबलो सगळे ).

चॉकलेटच्या बंगल्याच्या प्रतिक्षेत.

कुणी लग्नाला आहेर देवून गेले की माईकवर जाहिर करायचे "यांच्यातर्फे नवदांपत्याला इतकेतितके रूपये व आशीर्वाद" >> मी तर अशी बरीच लग्नं अटेंड केली आहेत. बर्‍याच वेळा मान्यवरांच्या आशीर्वादाकरता मुहूर्त टळून गेला तरी माईकबाजी चालूच असलेली पाहिलेली आहे. माझ्या लहानपणी सगळे फर्निचर द्यायची खुप पद्धत होती. मग कोणाच्या घरी गेलो की शोकेस वर, कपाटावर कोणाकडून आले आणि कुठल्या तारखेला हे वाचणे एक विरंगुळा होता. Lol (रच्याकने - यामुळे गावातल्या पेंटरला मात्र रोजगार मिळायचा - नावे टाकून देण्याचा)

कुणी लग्नाला आहेर देवून गेले की माईकवर जाहिर करायचे "यांच्यातर्फे नवदांपत्याला इतकेतितके रूपये व आशीर्वाद" >>> आमच्या घराजवळच्या एरियामधेही अशी पद्धत होती.

मुंजीत रूखवताची पद्धत आधीपासून होती की गेल्या काही वर्षात आली माहीत नाही. तसेच ती लोकांनी नाचत वरात काढण्याचीही - ती नक्कीच गेल्या काही वर्षातली आहे.

आमच्या घराच्या जवळ सार्वजनिक रस्त्यावर मधोमध मांडव टाकून जे लग्न करत त्यांच्यात पण ही प्रथा होती. एक कळशी, पैशाचे पाकीट आणि त्यात येवढे येवढे रुपये, दोन कढया असल्या अनाउंसमेंट ऐकणे हा एक टोटल विरंगुळा होता. ही अनाउंसमेंट आणि मागे 'जवा नवीन पोपट हा, लागला विठू विठू बोलायला' किंवा काळ बदलला तसं 'मला लगीन करावं पायजे, रेतीवाला नवरा पायजे' हे गाणं. हे गाणं कधी लागलं की अजुनही अंगावर शहारल्या सारखं होतं. Rofl

मुंजीत रूखवताची पद्धत आधीपासून होती की गेल्या काही वर्षात आली माहीत नाही. तसेच ती लोकांनी नाचत वरात काढण्याचीही - ती नक्कीच गेल्या काही वर्षातली आहे.>>>
हे मलाही थोडं खटकतयं.. उगाच खर्च वाढवणे आहे हे. आता तर घोडा , आहेर , रूखवत पुन्हा भिक्षावळीत पण काही बाही महागडं देताहेत. येणाऱ्या पाच बटूंना पण विशेष आहेर.. आम्ही लाखोंच्या मुंजी पाहिल्यात.

जवा नवीन पोपट हा, लागला विठू विठू बोलायला'  ..... या गाण्याचे वळ अजूनही मनावर आहेत .
वावे मस्त किस्सा.

मुंजीत रूखवत वगैरे खर्च वाढवणे असले तरी जवळच्या नातेवाईकांना काय काय गोष्टी बनवून त्यात ठेवायला आवडतात. अनेक कल्पक गोष्टी बघितल्या आहेत मुंजीच्या रूखवतात सुद्धा Happy

Happy

बाय द वे, पूर्वी नेपोलियनचे चरित्र की आत्मचरित्र लोक वाचत शाळेत असताना (यावरून "नेपोलियन होणारा साने पोष्टात चिकटला..." वगैरे पुलंचे आठवते). पण एकदम हिटलरचे आत्मचरित्र वगैरे? ते ही पुढच्या सगळ्या वाईट गोष्टी करण्याआधी लिहीलेले?

नेपोलियन होणारा साने पोष्टात चिकटला.. >>> हा हा.
भिक्षावळीत व रूखवतावर पुस्तकं सुद्धा देण्याची कल्पना छान आहे. मला रूचिरा भाग एक दोन दिले होते व मैत्रिणींना हमखास पाकसिद्धी.

हे रुखवतात बेड, शोकेस, कपाट वगैरे ठेवण्यावरून आठवलं. आमचं लग्न झालं तेव्हा सासूबाई आधी पुढे घरी गेल्या, ओवाळण्याची वगैरे तयारी करण्यासाठी. त्यांनी रुखवत नेलं होतं घरी. तेव्हा घरी आजींना सांभाळायला एक बाई यायच्या. त्यांनी ते सामान बघून विचारलं, "बाकी सामानाचा ट्रक मागून येतोय का? " Lol सासूबाई म्हणाल्या, नाही हे एवढंच आहे! 'ट्रक' वरून नंतर आम्ही खूप हसलो. पण अर्थात त्या बाईंचंही बरोबर आहे.

ते पुलंच्या एका लेखात आहे नं आमच्या मुलांच्या मुंजीत श्यामची आई पुस्तक आहेर. आणि श्रिमंतांच्या मुलांना पाच पाच रुपयाचे चांदीचे नाणे आहेर.
चालायचंच. रुखवत हौस ह्या सदरात आहे. आता रेडिमेड मिळते . मी वेडिंग प्लॅनर ला सांगणार आहे एक टेबल रुखवताचे पण हवे म्हणून.
पूर्वी संगीत मेहंदी पण इतके जोरात कुठे व्हायचे. आता एखादा सांस्कृतिक कार्यक्रम व मेहंदी असे तर करतातच.

नेट फ्लिक्स मध्ये आता एक नवीन सिरीअल आली आहे लग्नांची त्यात अमेरिकेत वाढलेल्या शिकलेल्या व चांगली नोकरी असलेल्या जोडप्याचे लग्न दाखवले. त्यांनी मद्रास मध्ये करवले लग्न. तर अ‍ॅलिस इन वंडर लँड स्टाइल मॅड हॅटर पार्टी व बॉलिवुड नाइट पार्टी केलेली. रुपयां मध्ये बघितले तर जबरीच खर्च असेल पण जर डॉ. अर्निंग करून रुपी मध्ये हौस मौज करायची तर भरपूरच स्कोप आहे. छान आहे तो एपिसोड.

फेसबुक वरील रुखवत पेजेस नक्की बघा.

ते टावेल टोपी आहेर आंध्रात पण असते . मग पत्रिकांमध्ये चाळीस पन्नास नातेवाइकांची नावे पन भारी वाटते. ग्रेट टु हॅव सच अ बिग फॅमिली.

छान आहे हा धागा! Happy
अरे, त्या डायपर केक वरच्या प्रतिक्रिया बघून लिहावसं वाटलं: तो खायचा नाहीये, कलात्मक रित्या बांधलेले डायपर होणार्‍या बाळाच्या आईला भेट म्हणुन देत आहेत ते Happy नुसता एक बॉक्स डायपर्स देण्या ऐवजी वेगळी मांडणी. केक सारखी दिसते म्हणुन केक म्हणायचं.

Pages