रूखवतः चित्रे, कथा, नि किस्से

Submitted by Barcelona on 20 February, 2021 - 11:10

लग्नसराई जवळ आली की रुखवताच्या तयारीला ही सुरुवात होते. पारंपरिक रुखवतावर नांव घातलेली स्टीलची पाच ताटे, वाट्या, कुकर इ गृहोपयोगी वस्तू व संसारोपयोगी कलाकुसरीच्या वस्तू जसे पडदे, पलंगपोस (उर्फ बेडशीट) इ असायच्या. रुखवताचे जेवण/नाश्ता असा सोहळाही असायचा. 

आता स्वरूप बरेच बदलले आहे. प्री-वेडींगशूटचे फोटो ते रोपवाटिका असे अनेक नवे प्रकार बघायला मिळतात. रुखवताच्या सामानाचे काही किस्से ही घडतात - रंगीत करंज्या नवरीने लग्नाआधीच खाऊन टाकल्या. नवरा-नवरी हनिमून होऊन परत आले तरी माहेरून केलेले रुखवताचे पार्सल आले नाही. लग्नानंतर रूखवताच्या सामानाचे काय केले त्याचे ही किस्से असतात. पुठ्ठ्याची सप्तपदी, मोत्याची महिरप, सुपारीचे भटजी, साखरेचे तुळशीवृंदावन असले काहीबाही सामान खूप वर्ष जपले जाते किंवा इतरांच्या लग्नात खपवले ही जाते. रूखवताचे काय केले याचे ही किस्से असतात.

अशा गंमतीच्या (किंवा गंभीर ही) रुखवत कल्पना-किस्से-कहाण्यासाठी हा धागा. चित्रे उपलब्ध असतील ती ही टाकू शकता. फार सुंदर कलाकुसरीचे नमुने बघायला मिळतात.  

हल्ली बऱ्याच लग्नात रुखवत नसतेही. परंपरा लोप पावत चालली आहे. त्यात वाईट काही नाही. कालपरत्वे बदल होतात. असे विनारूखवताचे अपारंपरिक लग्न केले असेल तरीही इथे स्वागतच आहे. त्या ऐवजी काही केले असल्यास लिहू शकता.              

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंजीत रूखवताची पद्धत आधीपासून होती की गेल्या काही वर्षात आली माहीत नाही.>>> पुर्वी नसावी बहुतेक तरी. माझ्या भावाच्या मुंजीत असे काही केले नव्हते. गेल्या काही वर्षांत ज्या मुंजीना जायचा योग आला, तिथे बघितले रुखवत. पण मला कल्पना आवडली. फार काही खर्चिक करायची गरजही नाही तिथे. मुलांना आवडणारे असे काही केले तर त्यांना मजा वाटते इतकेच. माझा भाचा आणि आलेली बच्चे कंपनी सुपर खुश झाली रुखवत बघून. फुकटही गेले नाही काही. नंतर सगळ्या मुलांना चॉकलेट वाटून, भाच्याने स्वतः करताही मेजर भाग राखून ठेवून वाटणी करुन इतिश्री झाली.

हे रुखवताचे फोटो:

१) rukhvat.jpg

२) jhad & ghar.jpg

झाड - शोभेचे आहे. कुंडी घरातलीच वापरलेय. झाडाचे खोड कुंडीत फिक्स करायला कुठल्यातरी खरेदीसोबत आलेला थर्माकोलचा तुकडा गोल कापून बसवला आहे कुंडीत आणि त्यात खोड आरपार खोचलय. थर्माकोल लपवायला वरुन नुसती चॉकलेट्सच आजूबाजूने पसरली आहेत. हॉट ग्ल्यु वापरुन चॉकलेट चिकटवली आहेत. रॅपरसकट चिकटवल्यामुळे आतील चॉकलेट खाण्यात काहीच अपाय नाही.

३) ghar 2.jpg

४) ghar 1.jpg

घराचा सांगाडा कार्डबोर्डचा आहे. पण तो मी दादरच्या फॅमिली स्टोअरमधू १००-१५०/- ला विकत घेतलाय. मी आधी घराच्या शेपची या साईजची पिगी बॅन्क मिळते का शोधत होते. म्हणजे नंतर ती त्याला वापरता येईल. पण नाही मिळाली. घरीच लेफ्ट ओव्हर बॉक्सेस मधून घर तयार करायचा पर्याय होता पण मी फार काही क्राफ्ट एक्सपर्ट नसल्याने आणि दरम्यान ऑफलाईन ऑफीस सुरु झाल्याने त्या धांदलीत "करायला गेले गणपती झाला मारुती" असे व्हायची शक्यता होती म्हणून कार्डबोर्डचे घर रेडीमेड मिळाल्यावर त्याचा लाभ घ्यावा म्हणत घेतले.

यात वापरलेली चॉकलेट्स ही पटकन मऊ पडतील अशी वापरली नाही आहेत. जी वापरली आहेत ती टु वे टेपने चिकटवली आहेत. यातही रॅपरसकट चिकटवल्याने अर्थातच खायला सेफ आहेत.

झाड आणि घर या दोन्हीसाठी खर्च फार झाला नाहीये.

५) mangalashtak 2.jpg

याचा खर्च तर प्रिन्ट आणि लॅमिनेशनमिळून ४०/- इतकाच आलाय. या आपल्या असच आत्याला लिहून बघायची हौस सदराखाली केल्या गेल्यात. गाता गळा कोणाचाच नसल्याने नुसत्याच वाचनमोडात रुखवतात मांडल्यात Lol

तो खायचा नाहीये, कलात्मक रित्या बांधलेले डायपर होणार्‍या बाळाच्या आईला भेट म्हणुन देत आहेत ते >>> राखी Lol होपफुली नंतर कोणी तो खायचा प्रयत्न केला नसेल.

कविन - चॉकोलेटचा बंगला व मंगलाष्टक दोन्ही छान. मंगलाष्टकाच्या पानावरची चित्रेही आवडली.

यात वापरलेली चॉकलेट्स ही पटकन मऊ पडतील अशी वापरली नाही आहेत >>> मी किटकॅटबद्दल विचारणारच होतो. बाकी नेस्टले आणि कॅडबरीज् दोन्ही खेळीमेळीने नांदत आहेत Happy

मस्तच आहे चॉकलेट बंगला कविन.
जेम्स ला छतात वापरण्याची आयडीया भारी आहे. याचा प्रयोग केला कधी तर तुला काय रॉयल्टी देऊ ? Happy

धन्यवाद मंडळी Happy

याचा प्रयोग केला कधी तर तुला काय रॉयल्टी देऊ ?>>> माझ्या नावाची एक गोळी बटूला एक्स्ट्रा खाऊ घाल Lol

आणि हे असे प्रयोग रॉयल्टी फ्री कॅटेगरीतलेच असतात गं. अगदी असा नसेल पण चॉकलेटचा बंगला याआधी कोणीतरी केला असेलच की. प्रत्येकाचे आपापले व्हेरिएशन अ‍ॅड होतच रहातात. कोणालाही करायचा झाल्यास सोपे जावे म्हणूनच तर मी लिहीलय सोबत कसा केला ते.

माझ्या मुलाची मुंज २०१९ मधे झाली तेव्हा रुखवताचे काँट्रॅक्ट दिले होते एका काकूंना त्या मुंज झाली की परत घेऊन जातात ते बटू पोस्टर वगैरे.
मी इथून जिंजरब्रेड हाऊस चे डेकोरेशन सामान घेऊन गेले होते म्हटलं मुलं बनवतील आणि खातील आणि ट्विक्स, स्निकर, एम & एम सारख्या चॉकलेटचा बुके बनवला होता. मुंज संपताच दोन्ही खल्लास झाले. Happy टेबल रिकामे.

चॉकलेटचा बंगला मस्त आहे!! >>>+10000
चॉकलेटचा बंगला वरून आठवलं, शाळेत असताना इयत्ता पहिली-दुसरी मध्ये कधीतरी एका प्रदर्शनासाठी शिक्षकांच्या सोबतीने
"चॉकलेटचा बंगला " बनवला होता.
त्यात "बिस्किटांच्या गच्चीवर..." आणि "टॉफीचे दार " नुसार पारले जी चा गच्चीचा कठडा आणि रावळगाव चिकटवलेले दार अजूनही डोळ्यासमोर येते. Happy

माझ्या बहिणीच्या लग्नात , माझ्या साबानी रंगीत चिरोटे बनवले होते.
एका छोट्याशा वेताच्या टोपलीत , गुलाबाचे चिरोटे आणि पानं म्हणून चंपाकळ्या. फोटो मिळाला तर बघते .
आमच्या माहेरच्या आणि तिच्या सासरच्या सगळ्याना हा प्रकार नविन होता.

अहाहा! स्वस्ती, चिरोटे आणि चंपाकळी तोंपासू रुखवत एकदम Happy

मी यंदा दिवाळीत प्रयोग केला होता असा (मुंजीची रंगीत तालिम) पण मुंजीच्या दरम्यान कॉलेज ॲडमिशनची पळापळी सुरु झाली आणि वेळ नाही मिळाला. प्रवासात करुन न्यायला डेलिकेट आयटम म्हणूनही हा ड्रॉपच झाला.

छान सगळी रुखवतं. त्या रंगीत वेगवेगळ्या आकारातल्या करंज्या आणि त्यावर नावं हे माझ्या मुलाच्या मुंजीत पण केलं होतं. पण त्याचा असा फोटो नाहीये.
कविन , मंगलाष्टक छान रचलय.

छान धागा.

मुंजीचे रुखवत फार सुरेख.

माझ्या लग्नाचे रुखवत खूप छान होतं, बहिणीचे तर अजूनच छान होतं. बहिण स्वत: फार क्रिएटीव्ह आहे, मैत्रिणींनी पण काहीना काही करून दिलेलं. माझ्या रुखवतात मी स्वत: , बहिणीने, आईने केलेली कलाकुसर होतीच पण माझ्या एका student (मी क्लासमध्ये शिकवायचे, नंतर घरीही घ्यायचे ट्युशन्स ) सुपारीचे भटजी करून दिलेले. तो समोरच राहायचा. पाच पाच पैसे जमवून बंगला वगैरे पण आम्ही केलेला. माझी आई साबणाच्या वस्तू करायची वर आर्याने सांगितल्या तशा, साबण लाईफबॉय किंवा हमाम वापरायची असं आठवतंय मला.

खाण्याचे पदार्थ रंगीत करंज्या त्यावर नावं , मोठे मोठे लाडू वगैरे होतेच, नातेवाईक मदतीला यायचे. एका आतेने वेगवेगळे मुरांबेपण केलेले पाच प्रकारचे, एका वहिनीनेपण काहीतरी कलाकुसर दिलेली. नंतर एका आतेने माझ्या पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने पण स्वत: करून दिलेले. सोन्याचा कागद लाऊन नारळ करतात त्याला शेजारी पाजारी मदत करायचे. एका मैत्रिणीने लोकरीने भरलेली पर्स दिलेली, एका शेजाऱ्यांनी वायरचं शिंकाळ करून दिलेलं. सर्व काही आठवत नाही. सांगायचा मुद्दा काय माझ्या रुखवतात बऱ्याच जणांचा सहभाग होता. आई, आम्ही दोघी बहिणीही करायचो शेजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी जमेल तसं थोडं.

कविन फार सुरेख सर्व, मंगलाष्टक पण फार छान. हे आवडतं रुखवत बघून भाचा खुश तर होणारच ना.

बाकी डायपर केक Lol . कलिंगड बाळ क्युट.

मंगलाष्टके सुरेख लिहिली आहेत कविन. सर्वच रुखवते छान. पाच प्रकारच्या डाळी , लोणचे, जॅम वगैरेच्या बरण्या, पुठ्ठ्यावर कापूस व क्रेप पेपर, सोनेरी कागद चिक टवून केलेली साडी व खण. सुक्या खोबर्‍यावर चॉकोलेटी कव्हर काढून केलेल्या कलाकृती. साखरेचे ताट व तांब्या भांडे पावलांच्या कटाउट वर लिहिलेली सप्त पदी, खाली मुलीने भरतकाम केलेले बेडशीट व पिलो कव्हर आणि टेबल क्लॉथ, काही क्रोशे कामाचे नमुने. हे फेमस आयटेम अनेक लग्नात बघितलेले आहेत. पार ७०ज मध्ये.

f8f4a061-3abf-4b79-ae49-bb9ebcef7d01.jpgIMG_8367.JPGIMG_8368.JPG
फोटो झोपले Happy

छान आहे रूखवत अंजली. पहिलं पाहिल्यासारखे वाटते आहे भाच्याच्या मुंजीत.
साइझ लहान कर उठतात.

Lol थँक्यू... चॉकलेट बुके म्हणजे प्लास्टीक डब्ब्यात खाली बराच स्पंज घातला आणि त्यात वूड्न स्क्युअर्स खोचून त्याला टेपने चिकटवले सगळे चॉकलेट्स.

रुखवतातला नाही पण ह्यावर्षी ख्रिसमसला मुलींनी केलेला चॉकोलेटचा बंगला! आयकीआमध्ये सांगाडा सेट मिळाला होता. डेकोरेशन त्यांचचं. 80636E5C-95B4-4E07-89D6-14E058F843C7.jpeg

Pages