रूखवतः चित्रे, कथा, नि किस्से

Submitted by Barcelona on 20 February, 2021 - 11:10

लग्नसराई जवळ आली की रुखवताच्या तयारीला ही सुरुवात होते. पारंपरिक रुखवतावर नांव घातलेली स्टीलची पाच ताटे, वाट्या, कुकर इ गृहोपयोगी वस्तू व संसारोपयोगी कलाकुसरीच्या वस्तू जसे पडदे, पलंगपोस (उर्फ बेडशीट) इ असायच्या. रुखवताचे जेवण/नाश्ता असा सोहळाही असायचा. 

आता स्वरूप बरेच बदलले आहे. प्री-वेडींगशूटचे फोटो ते रोपवाटिका असे अनेक नवे प्रकार बघायला मिळतात. रुखवताच्या सामानाचे काही किस्से ही घडतात - रंगीत करंज्या नवरीने लग्नाआधीच खाऊन टाकल्या. नवरा-नवरी हनिमून होऊन परत आले तरी माहेरून केलेले रुखवताचे पार्सल आले नाही. लग्नानंतर रूखवताच्या सामानाचे काय केले त्याचे ही किस्से असतात. पुठ्ठ्याची सप्तपदी, मोत्याची महिरप, सुपारीचे भटजी, साखरेचे तुळशीवृंदावन असले काहीबाही सामान खूप वर्ष जपले जाते किंवा इतरांच्या लग्नात खपवले ही जाते. रूखवताचे काय केले याचे ही किस्से असतात.

अशा गंमतीच्या (किंवा गंभीर ही) रुखवत कल्पना-किस्से-कहाण्यासाठी हा धागा. चित्रे उपलब्ध असतील ती ही टाकू शकता. फार सुंदर कलाकुसरीचे नमुने बघायला मिळतात.  

हल्ली बऱ्याच लग्नात रुखवत नसतेही. परंपरा लोप पावत चालली आहे. त्यात वाईट काही नाही. कालपरत्वे बदल होतात. असे विनारूखवताचे अपारंपरिक लग्न केले असेल तरीही इथे स्वागतच आहे. त्या ऐवजी काही केले असल्यास लिहू शकता.              

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@कविन,
आत्याने रचलेली मंगलाष्टके, मस्त आहेत.

Pages