भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा स्नोई ( तोच तो - पान 4 वरचा बोका ) रोज खाली जाऊन धुळीत खूप खूप मळून येतो. त्याचे नाव आता ग्रेई ठेवावे इतका मळका होतो रोजच. खाली सोडले नाही तर खूप दंगा करतो. जोरात ओरडत बसतो. कधीतरी स्वतःला चाटून साफ करतो पण फारसा फरक पडत नाही. बेडशीट सारखी बदलावी लागतात. शिवाय त्याच्या मळकट अवतारामुळे त्याला जवळ घेतल्याने मुलांना काही त्रास होईल का असे वाटते. त्याला रोज अंघोळ नाही घालू शकत. फडक्याने पुसून फरक नाही. . त्याला साफ करायला काही तरी सोपा उपाय सुचवा प्लीज. ..

माव्या ची गंमत. हुषार म्हणून वारेमाप कौतुक करून घेतो पण काही बाबतीत अगदी म्हणजे अगदी येडबंबू आहे. Happy फ्रन्ट डोअर उघडले की कोणीतरी "बाहेरचा" माणूस आत येऊ शकतो हे माहित आहे. डोअर बेल वाजणे किंवा बाहेर गाडी उभी राहणे ही त्या आधीची स्टेप आहे हेही डोक्यात बसले आहे. त्यामुळे दोन्हीपैकी काही घडले की भुंकत सुटतो. पण मज्जा अशी की तो स्वतः जरी बाहेरून वॉक ला जाऊन आला आणि त्याच्या बरोबरच्या ह्यूमन ने घरात यायला बेल वाजवली तरी भुंकत सुटतो येडा Lol किती सांगितलं तरी कळत नाही. दोन तीन वेळा त्याच्या पंज्याने बेल वाजवून दाखवली. पण ते काही नाही, बेल वाजली की भुंकणार म्हणजे भुंकणार. तसंच टिव्ही वर जरी बेल वाजल्याचा आवाज आला तरी भुंकणार. टिव्हीवर एखादी गाडी थांबली आणि कोणीतरी उतरले असा सीन असेल तरी भुंकतो. Lol कसं शिकवावं कळत नाही Happy

तसंच टिव्ही वर जरी बेल वाजल्याचा आवाज आला तरी भुंकणार. टिव्हीवर एखादी गाडी थांबली आणि कोणीतरी उतरले असा सीन असेल तरी भुंकतो.>>> smiley36.gifsmiley36.gif

I love dog म्हणून फेसबुकवर एक भुभुविषयक पेज आहे
मला कंटाळा आला की ते ओपन करून पाहते
क्यूट भुभु पिल्ले बघू न कंटाळा कुठेच पळून जातो

https://www.facebook.com/ilovedogs.ts/

पण ते काही नाही, बेल वाजली की भुंकणार म्हणजे भुंकणार>>>> Lol

जाई,मॅक्स माझा फेव्हरिट आहे.खरंच स्ट्रेसबस्टर आहे.त्यातल्या सर्व फॅमिलीमेंबरांचे कौतुक वाटते.
https://www.youtube.com/watch?v=-KRF8VOGxaI&list=RDCMUC-KY2f2NS8pf5ZWCYK...

हा हा हा
माऊई चे कन्सेप्ट धमाल आहेत
आणि पंजाने बेल वाजवताना तर अगदी डोळ्यासमोर आला तो
काही वेळेला असले डंब चेहरे करतात ना
जाम लाड येतो अशा वेळी

आमच्याकडे सध्या नवीन वेड चालू आहे.
सकाळी ४-४.३० मध्ये आमचे बोके महाराज उठतात आणि दरवाज्याच्या जवळ जाऊन ओरडतात.
कशाला?

तर बाहेर जायला..
सध्या अलार्म लावायची गरज पडत नाही.
पण घरात तीन कॅटस असल्याने एक उठला की बाकीचे पण उठतात..
त्यांच्या मस्तीत माझी पाठ आणि कंबर शेकून येते.
अंगावर उड्या मारणे, एकमेकांना मारताना मला पण मारणं हे आता नॉर्मल झाल आहे.
मी ऐकलं होतं की मांजर हा आळशी प्राणी असतो..
पण आमचे तर अर्धा दिवस जास्त करून रात्र.. मस्तच करत असतात.
तरी आजकाल खिडकीच्या बाहेर एक पिटूकलंस उंदराचे पिल्लू येतं.. मग किचनच्या खिडकीवर जाऊन त्याच निरीक्षण करत बसतात..
Lol Lol Lol

पण आमचे तर अर्धा दिवस जास्त करून रात्र.. मस्तच करत असतात.>>>फोटोवरून हे महाशय अजून लहान आहेत.वयात आल्यानंतर पहा,नुसते लडदू होतात.

<<>>>आमच्याकडे सध्या नवीन वेड चालू आहे.
सकाळी ४-४.३० मध्ये आमचे बोके महाराज उठतात आणि दरवाज्याच्या जवळ जाऊन ओरडतात.
कशाला?

तर बाहेर जायला..
सध्या अलार्म लावायची गरज पडत नाही.>>>>
सेम पिंच. .........
स्नोई पण असेच करतो. खर तर त्याला घरी आणल्यापासून माझ्या झोपेचे पूर्ण खोबरे झाले आहे. रात्री ओरडत बसणे हा आवडता छंद आहे.
वाटी भरून खाऊ असेल तरी तो खाताना स्नोई मला उठवून त्याच्याबरोबर थांबायलाच लावतो.

आता पण तो पूर्ण मळून आलाय. .
कोणी तरी झटपट सफाईचा उपाय सांगा ना प्लीज. ...

मला अजिबात अनुभव नाही मांजरांना साफ करण्याचा
मला वाटत होतं मांजर कायम स्वच्छ असतात
स्नोई जोरदार अपवाद आहे Happy
कसं शिकवणार त्याला हा मोठाच प्रश्न आहे
मध्ये ओडीन ला सकाळी फिरायला न्यायचो तिथे एक मोठा रोटवायलर यायचा, त्याला भरपूर लाळ सुटायची आणि मग ओडीन च्या अंगाला लागून, मातीत खेळून अक्षरशः आखड्यातून आल्यासारखं दिसायचा
त्याला घरी आणून थेट नळाखाली उभं करावं लागायचं
सलग चार दिवस असं झाल्यावर मी आता रस्ताच बदलला
पण स्नोई आपणहून च पाळतोय बाहेर कसं करावं
मोठाच प्रश्न आहे

आज ओडीन ला घेऊन टेल्स ऑफ द सिटी म्हणून डॉग हॉस्टेल आहे तिकडे गेलो
त्यानी नवीनच सुरू केलं आहे, एकदम उत्साही आणि ट्रेंड स्टाफ आहे
भुभुज ना खेळायला भरपूर जागा, 25 बाय 25 चा स्विमिंग पूल, त्या आधी शॉवर मग पोहून झाल्यावर द्रायर असं सगळं आहे
नंतर ग्रुमिंग सेंटर पण सुरू करणार आहेत
प्रमोशन असल्याने त्यांनी बुकिंग करून आल्यास अर्धा तास स्विमिंग फ्री ठेवल होतं.
लगेच चान्स घेऊन ओड्या ला नेलं
तो म्हणजे पाणी बघून नाचतच होता, कसा तरी शॉवर घेईपर्यंत धीर धरला पण प्रत्यक्षात पाण्यापाशी गेल्यावर तांतरली
कॅनाल चा पाण्यात खोली दिसत नाही त्यामुळे बेधडक उड्या मारतो तो वरून, इथे त्याला तळ दिसत असल्याने डेरिंग होईना
मग त्यांनी व्यवस्थित धरून नेला, त्यांना सांगत होतो त्याचा बॉल किंवा बाटली टाका तो जाईल
नंतर मग एकदा करून दाखवलं आणि तो दणदणीत पोहतोय म्हणल्यावर मोकळा सोडून दिला
मस्त पोहला, द्रायर ने अंग वाळवून घेतलं तेव्हा घाबरला अववाजने
पण मग ब्रेव्ह बॉय कोण आहे, सगळयात शूर वीर असं करत जवळ घेऊन त्यांना मारायला लावला
लगेच मग चाटून बिटून मीच कसा एकटा ब्रेव्ह आहे वगैरे बडेजाव मारून झाला
ओव्हराल धमाल अली एकदम

कसलं मस्त
स्विमिंग चे फोटू पाहीजेत.

<<मला वाटत होतं मांजर कायम स्वच्छ असतात
स्नोई जोरदार अपवाद आहे Happy
कसं शिकवणार त्याला हा मोठाच प्रश्न आहे>>>
हो ना..

पण मग ब्रेव्ह बॉय कोण आहे, सगळयात शूर वीर असं करत जवळ घेऊन त्यांना मारायला लावला>>>>>>>>>>>> पपीज खरंच किती बाळांसारखेच असतात Happy क्यूट आहेत सगळी बाळं इथली.

कझुमि - सांगायचे राहिलेच, तुमच्या बोक्यांचे फोटो पण फार क्यूट आहेत! मस्त मोमेन्ट्स टिपल्यात!

मस्त फोटो व बाळांच्या गोष्टी.

धनवन्ती, शर्टपँट घालून पहा, थोडा कमी मळेल. पण अवघड प्रश्न आहे.
डॉग हॉस्टेल मस्तच आहे.
मैत्रेयी त्याला नको त्या वेळी ओरडायला लागला की ‘बस’ वगैरे सारखी काही आज्ञा शिकवता येईल का? म्हणजे तो जोड्या लावेल.
काझुमीचे बोके मन्या फार सुंदर आहेत.

धनवंती कॅट् पाव्डर असते का? जशी डॉग पाव डर असते तसे? त्याच्या अंगावर पाव ड र टाकून हलक्या हाताने ब्रश करून घ्यावे. तो हातात सापडतो का? आमच्या इथली स्ट्रे मांजरे आहेत त्यातली काही कधी कधी पार सिमेंट मध्ये लोळतात एकदम . कानात कचरा जातो.

काल आमच्या भू भूची आंघोळ झाली. सोच्च सोच्च माउ माउ. झाले आहे. ओडिन व माउई च्या गंमती मस्त.

सगळ्यांच्या बेबीजचे फोटोज क्युट आणि किस्से धमाल आहेत.
बऱ्याच पोस्ट्सना उत्तरं/प्रतिसाद द्यायला आवडले असते, पण मधे फार दिवस गेल्याने नुसती वाचण्याची मजा घेतली.
धनवंती, पेट शॉपमध्ये ड्राय शॅम्पू मिळतात. नुसता स्प्रे करून एक-दोन मिनिटं राहुन द्यायचा आणि मग मऊ कपडा किंवा त्यांच्या टॉवेलने अंग स्वच्छ पुसुन घ्यायचं. मी Just Dogs मध्ये बरेच पाहिले पण हिमालया ओळखीचा ब्रँड असल्याने लक्षात राहिला. त्यांचे बरेच क्लेम्स आहेत, त्यातले अंशतः तरी खरे असतील तर ड्राय शॅम्पू वापरुन उपयोग व्हायला हवा. मी सध्या जर्मनीहुन आणलेला वापरते आहे, पण पुढे कधी तरी हिमालया वापरेन.

Pages