चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला आहे.. thriller आहे..पाहु शकता..
माझ्या कडे प्रिंट होती आणि इंग्रजी चैनलवर लागतो नेहमी..
You tube,Ott वर आहे कि नाही पाहावे लागेल.

परवा प्राईम वर "January has two faces" हा चित्रपट पाहिला . थ्रिलर कॅटेगरी मध्ये होता .
सुरुवात स्लो आहे , तसं पाहिला तर अक्खा चित्रपट थोडा स्लो आहे . कथेचा जीव एवढासा आहे .

एक श्रीमंत जोडपंं ग्रीस मध्ये फिरायला येतं , तिथे एका अमेरिकन गाईडशी त्यांची ओळख होते .
ते रहात असलेल्या हॉटेलमध्ये एका अनाहुताशी नवर्याची झटपट होते .
नंतर काही घटना घडतात की त्या जोडप्याला त्या गाईडची मदत घेणे अपरिहार्य होते .
शेवट अगदी सरळसोट आहे .

पण पूर्ण सिनेमा बघायला मजा आली . how one thing leads to another...
आपल्याकडे वेब सिरिज बनली तर तो गाईड चा रोल जीतु भैयाला ( पंचायत वाला अभिषेक) द्यावा ,

Netflix वर रेणुका शहाणे दिग्दर्शित त्रिभंग चित्रपट पाहिला. चांगला वाटला. तीन पिढ्यांमधील बायकांचे जीवन...आई-मुलगी-नात. त्यांची आवड-निवड, त्यातून त्यांनी घेतलेले निर्णय, त्याचे होणारे परिणाम छान दाखविले आहेत.

Is love enough Sir पाहिला, फारच आवडला. दोघांचा अभिनय आवडला. तो विवेक गोम्बर आहे ना? कोर्टमध्ये होता तो. उत्तम अभिनय करतो. कोर्टमध्ये गीतांजली कुलकर्णी पण होती इथे पण आहे.

त्रिभंग पाहिला. अभंग, समभंग बद्दल सांगून काजोल म्हणते - मै त्रिभंग... त्रिभंग कसली ती अगदी रसभंग आहे. कथा तशी बर्‍यापैकी चांगली आहे पण काजोल त्या कुछ कुछ मधल्या 'अंजली' तून बाहेर पडलीच नाही! तन्वी आझमी बर्‍यापैकी वाया घालवली आहे तर मिथीला पालकर बर्‍यापैकी चांगली आहे.

काजोल त्या कुछ कुछ मधल्या 'अंजली' तून बाहेर पडलीच नाही!
>>> कोणती अंजली- कॉलेज मधली की इंटरवल नंतरची? दोन्ही वेगळ्या आहेत...

Is love enough Sir पाहिला, फारच आवडला. दोघांचा अभिनय आवडला. तो विवेक गोम्बर आहे ना? कोर्टमध्ये होता तो. उत्तम अभिनय करतो. >>
मस्त आहे Is Love enough Sir . आणि विवेक तर खुपच आवडला. खुप कमी शब्द आहेत. अशा विषयांमध्ये बरेचवेळा खानदानकी इज्जत, गरीब श्रीमंत भेद भाव , भव्य दिव्य संवाद असलं काही काही बघितलय. इथे तस काही नाहीये. दोघही अगदी खरेखुरे वाटतात इतका सुंदर अभिनय केला आहे. तिचे साडी ब्लाउअज सुद्धा अगदी साध्ये मेडच्या पगाराला परवडणारे घेतलेत. उगाच ग्लॅमराईज केल नाही.
अजुन भरपुर लिहण्या सारख आहे या चित्रपटाविषयी पण वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघाच.

खुप कमी शब्द आहेत. >> Happy अगदी!! विशेषतः ती गावी जाते आणि तो फोन करतो. फार बोलणे दाखवले नाही. पण तिच्या आयुष्याबद्दल त्याचं आस्थेने कमी शब्दात चौकशी करणे इतकं गोड आहे ना...

प्राईम वर द लास्ट कलर बघितला. अतिशय सुंदर चित्रपट आहे. नीना गुप्ता आणि त्या लहान मुलीचं काम अतिशय सुरेख झालंय.
विधवा असलेली नीना गुप्ता आणि अस्पृश्य असलेली छोटी यांचं जगणं बहुतेक सारखंच एकाकी क्लेशकारक असतं. पण दोघी एक्मेकींना भेटल्यावर खूप छान असा भावबंध तयार होतो. पुढे अशा काही घट्ना घडतात ज्यामुळे त्या वेगळ्या होतात.
सगळ्यांचीच कामे छान झाली आहेत. फोनवरुन जास्त टाईप करता येत नाहीये नाहीतर अजून लिहिले असते पण नक्की बघा.

मला प्रचंड आवडलाय "सर"! अश्विन सारखा अतिशय चांगला आणि देखणा माणूस हिरो म्हणून असलेला एकही सिनेमा इतक्यात आठवत नाही. विवेक गोंबर अ सुटेबल बॉय मध्ये लताचा मोठा भाऊ आहे. त्यातही उत्तम काम केलंय त्याने. आणि तिलोत्तमा शोम is a gem! तिचा राजीव मसंदच्या क्लास ॲक्ट मधला एपिसोड (https://youtu.be/l1-3owCWphs) नक्की पहा. फार छान बोलली आहे ती!
त्रिभंग बघायचा आहे. मला काजोल आवडते. अभिनेत्री म्हणून नाही पण एकूण तिचा प्रेझेन्स आवडतो. इथले सगळे अभिप्राय वाचून बघणारे त्यामुळे अपेक्षा नीट सेट झाल्या आहेत!
द लास्ट कलर पण बघते.

रा.आ. यांनी त्यांचा प्रतिसाद/ शाका परिच्छेद असंबद्ध गप्पा धाग्यावर पण टाकला. मला का ते कळेना म्हणून यूट्यूबवर जाऊन सिनेमा शोधला. त्या सिनेमाचे "अधिकृत" वर्णन -
"This story documents the great warrior who revolutionized the tactics of warfare reated the great Zulu Nation. It’s originally depicted from a mini TV series. The story is of a young boy named Shakka, whose parents were killed by a zulu gang. He is on his quest to avenge the murder of his parents. To accomplish this task he even joins the very gang that killed his parents. In his mission, Qasim bhai helps him. Watch out the movie how Shakka reaches to Captain and teaches him a lesson"
https://www.youtube.com/watch?v=fXaVKRWDrvM (वर्णन इथे बघा). smiley-sad001.gif

शाका हा चित्रपट नाही, चळवळ आहे. >>>>>>> ही ओळ वाचून मला आधी वाटल की ऋन्मेष आला की काय इथे मध्येच.

फारएण्डने डुआयडी बदलली का? रात्रीचा आत्मा अशी नवी आयडी घेतली की काय त्याने?

क्या एक शिलाई मशीनवाली पैतालीस की पहिला सुख की कामना नही कर सकती >>>>>>>> पैतालीस की महिला अस आहे ना?

दोघही अगदी खरेखुरे वाटतात इतका सुंदर अभिनय केला आहे. तिचे साडी ब्लाउअज सुद्धा अगदी साध्ये मेडच्या पगाराला परवडणारे घेतलेत. उगाच ग्लॅमराईज केल नाही.>> अगदी अगदी! नकळत कळले सारे अशी हळुवार लव्ह स्टोरी आहे, मोस्ट ऑफ द स्टोरी त्या फ्लॅट मधेच घडते त्यामुळे त्याचाही आर्किटेक्ट एक कॅरेक्टर प्ले करत, अश्विनच घर खुप टेस्टफुली सजवलेले दिसते, श्रिमन्तीच प्रदर्शन न मान्डणारी सुरेख रचना दिसते.

त्रिभंग बघितला, आवडलाय मुव्ही, रेणुका शहाणे लिहलेला आणि डायरेक्ट केलेला मुव्ही आहे ८०% काम काजोलच असल तरी सिनेमातली एकूणएक पात्र चोख निवडलियेत आणि त्याचेही रोल तितकेच महत्वाचे आहेत,स्टोरीचा बेस मराठी असल्याने भरपुर आणी शुद्ध मराठि एकायला येत,
हिन्दी-मराठी अशी सरमिसळ असली तरी अजिबात खटकत नाही मोस्टली सगळेच इतर कलाकार मराठीच घेतलेत जे उत्तम काम करतात.
सगळ्याची काम खुप आवडली.
विषेश करुन मिथिला,वैभव,तन्वी आझमी यान्चा अभिनय अगदी सहज सुरेख आहे, घरच प्रॉडक्शन असल्याने काजोलला पर्याय नसावा, तिने नेहमिप्रमाणेच सवयिचा( करण जोहरी मुव्ही छाप) लाउड अभिनय केलाय, थोडाफार तो अनुच्या कॅरेक्टरला सुटही होतो पण काजोल एवजी दुसरी कोणी जिला थोडफार ओडीसी न्रुत्य पण येत अस कूणाला घेतल असत तरी चालल असत.

सर नेफ्लि वर आहे का! वेळ मिळाला तर बघेन.
राआ - नवा धागा सुरु करा सिरीयसली.
त्रिभंग नाहीच बघणार.

नाही तरी उजाडलं की अंधारात बसावं लागत. चला. सूर्य उगवला. आमची मावळण्याची वेळ झाली. >>>>>>> बोकलतचा तर डयुआयडी नाही ना हा? अमानवीय धाग्यावरुन आल्यासारखा वाटतोय.

नेटफ्लिक्सवर व्हाईट टायगर पाहिला काल. पुस्तकापेक्षा बरा वाटला. प्रियंकापण कधीनवत चांगली वाटली तिच्या भूमिकेत. राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांनी चांगली कामे केलीत. स्लमडॉगची आठवण येत राहते अधुनमधून.

मी मूळ पुस्तक वाचलं आहे
अजिबात आवडलं नाही
पण काल ट्रेलर।पहिला चांगला वाटलं
पण स्टोरी माहिती असलयाने किती इंट्रेंड्सत राहील माहिती नाही

मी मूळ पुस्तक वाचलं आहे
अजिबात आवडलं नाही >> मलापण खास नाही वाटले म्हणूनच पुस्तकापेक्षा चित्रपट बरा आहे असे लिहलं. पुस्तक नाही वाचलेलं त्यांना चित्रपट नक्की भारी वाटेल.

होय बायको ने नव्हतं वाचलं, तिने लगेच काल बघितला
शेवट गंडला आहे म्हणे
म्हणलं आता पुस्तक वाच जमलं तर

Leap year पहिला. हसत खेळत चालणारी रोमँटिक कथा आहे. त्यातून कॅमेराने टिपलेले आयर्लंड ची ठिकाणे म्हणजे डोळ्यांना आनंदच.
सर्व काही predictable आहे तरीसुद्धा शेवटपर्यंत पहावा वाटतो.
फील गुड मूवी . सध्या netflix वर आहे.

Pages