चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रेनमधली मुलगी ... मलाही अजिबात आवडला नाही. त्यातून त्यात ३ कंटाळवाणे चेहरे - किर्ती कुल्हारी, आदिती राव हैदरी आणि परिणती. गाणी बिणी टाकून अजून पाणीदार केला सिनेमा. मला मूळ इंग्रजी सिनेमा आवडला होता. त्याची ही बोअर धेडगुजरी कॉपी अजिबात झेपली नाही. एकतर पूर्ण कॉपी करा किंवा पूर्ण भारतीय करा. आव आणून इंग्रजी सिनेमासारखे अभिनय करतात ते अजिबात बघवत नाही. महान पकाऊ.

The deciple बघितला. उदाहरणार्थ ज्यांना कट्यार काळजात घुसली आवडला त्यांनी मुस्कडात खावून घ्यायला पहावा. Wink

दृश्यम २ वन टाईम वॉच आहे. पहिला भाग अतिशय भन्नाट होता. दुस-या भागात वेगळं कथानक असायला हवं होतं.
तेच कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. या भागात नायकाचा सुपरहिरो झाला आहे. बुद्धीबळाच्या दोन्ही बाजू खेळणा-याप्रमाणे लेखक -दिग्दर्शकाची अवस्था आहे. तीच नायकाची पण आहे. थोडंसं इथे दुर्लक्ष केलं तर मध्यंतरानंतरची सफाईदार हाताळणी प्रेक्षणीय आहे.
जास्त लिहीले तर स्पॉयलर ठरेल. कुणी धागा काढला तर त्यावर बोलूयात.

I care a lot बघितला नेफ्लिवर, ठीक ठीक आहे. थ्रिलर , ब्लॅक कॉमेडी. हिरवणीला ह्या रोलसाठी यंदा गोल्डन ग्लोब मिळालाय.

ठीक ठीक आहे >>> हो मलाही तसेच वाटले. फार भारी नाही, पण बघणेबल आहे.

एचबीओमॅक्सवर स्टीव्ह कॅरेल चा Irresistible पाहिला. तो चांगला आहे. लाइट पॉलिटिकल कॉमेडी. विस्कॉन्सिन मधल्या एका लहान गावातील मेयर रेस मधे वॉशिंग्टन मधले एलिट्स घुसतात आणि त्यातून जे नाट्य होते त्यावर आहे. शेवट मजेदार आहे.

I care a lot बघितला नेफ्लिवर, ठीक ठीक आहे. थ्रिलर , ब्लॅक कॉमेडी. हिरवणीला ह्या रोलसाठी यंदा गोल्डन ग्लोब मिळालाय.>>> मलाही ठीकठाक वाटला म्हणजे सुरवात एकदम भारी होती पण नतर जरा कुठेच गेला अस वाटल.

गर्ल ऑन द ट्रेन नाहीच आवडला आज्जिबात. परिणीतीला नाही झेपलंय ते कॅरेक्टर करायला. मलाही इंग्लिशच मुव्ही जास्त आवडला होता.

नेफ्लि वर जिंदगी इन शॉर्ट म्हणून छान आहेत छोट्या स्टोरीज. नीना गुप्ता आणि दिव्या दत्ताची आवडली. बाकीच्या ठिक आहेत. थोड्या संथ वाटल्या.

I care a lot ..मी देखिल पाहिला. सुरुवात एकदम झक्कास. म्हातारी खवट वाटली आणि आता ती यांना पुरून उरणार आणि ती कशी मात देते यावरच सिनेमा बेतला असेल असं वाटून सरसावून बसले. तर तो सिनेमा कायच्याकाय वळणं घेत कुठच्याकुठे गेला.

सिनेमा बघतानाच हे असं होऊ शकतं या कल्पनेनं भिती वाटली. आताही होत असेल, नसेल तर आता कोणाच्यातरी टाळक्यात येईल आणि हे प्रकार सुरू करेल.

सोनाली कुलकर्णीचा नवीन चित्रपट येतोय 'छत्रपती ताराराणी' म्हणून. त्यात ती घोड्यावर स्वार होऊन युद्ध करताना दाखवलेली आहे. तिच्या वेषभूषेवरून हा युध्दप्रसंग राजाराम हयात असतानाचा वाटतोय. पण राजाराम गेल्यावर ताराराणींनी स्वराज्य सावरून धरले आणि त्या समरांगणात उतरल्या. त्यामुळे याची नीट संगती लागत नाही.

एकूण ऐतिहासिक वेषभूषांचा जरा गोंधळच असतो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधे प्रतापगडाचा पोवाडा आहे त्यात जिजाबाई पांढर्‍या पातळात दाखवल्या आहेत पण तेव्हा तर शहाजीराजे हयात होते. जरा थोडा basic research ही मंडळी का करत नाहीत असा प्रश्न पडतो Sad

ज्युनिअर सोनाली कुलकर्णी आता टाईपकास्ट होतेय का असे वाटतेय हिरकणी मूवी नंतर.
मला काही ती इतकी सूट होतेय असे वाटले नाही. हिरकणीत तर अजिबातच नाही.

blackcat धन्य वाद
द्रिश्यम २ चांगला वाटलं

काही गोष्टी खटकल्या

स्पॉईलर्स

१) ती मुलाची आई आता पोलीस नसताना पण तिला इंटरफेरे का करून देतात
२) फॉरेन्सिक लॅब मध्ये घुसून हाड चांगले करणे एवढे सोपे असते ? ते पण तुम्ही मुख्य आरोप आणि अक्ख्या गावाला तुमच्याबद्दल माहित अस्ल्यावर
३) छोट्या मुलीची साईड स्टोरी काही डिटेल मध्ये कळलंय नाही

नेटफ्लिक्सवर डॉंकी किंग हा पाकिस्तानी ऍनिमेटेड सिनेमा पाहिला. भारी वाटला. पण हा भारतातून दिसत नसल्याने बाहेरच्या ओळखीच्या कोणाच्या अकौंटवर व्हीपीएनच्या मदतीने पाहता येईल.

रुही हा चित्रपट कसा आहे? बघावा का?
सध्या थेट थिएटर ला (पुण्यात ) किशोरवयीन मुलांना घेऊन बघायचे झाले तर कोणते बॉलीवूड पिक्चर चांगले आहेत? (इंग्लिश/डिस्ने नकोत.)

अनु, पुन्हा करोनाचे एवढे रुग्ण वाढले असताना किशोरवयीन मुलांना सिनेमाघरात घेऊन जाणे ठीक असेल का ?

रूही बघू शकता थेटरात... रराजकुमार म्हणजे acting मस्त असेल...
आणि किशोरवयीन मुले आहेत म्हणजे जान्हवी फॅन असणारच...

Ruhi अजून आला नाही ना ?

सीट अरेंजमेंट 1 आड 1 आहे , जास्त लोक नसतात , मुलांना घेऊन जाऊ शकता

पी एम रूम मधून हाड बदलणे हाच जर प्लॅन होता , तर मग दृश्याम पहिला पार्ट निर्थरकच होता म्हणायचा

हाडच बदलायचे होते तर मढे इकडे तिकडे फिरवायची गरज काय होती ?

गर्ल ऑन द ट्रेन - वाईट रीव्ह्यू वाचून पण बघितला ! अति भयाण, बकवास, कै च्या कै च्या कै इ. आहे.
उगीच द्यायचे म्हणून काहीही ट्विस्ट्स. ओरिजिनल सिनेमाची स्टोरी कशी घेतलीय माहित नाही पण यात काहीच लॉजिकल वाटत नाही. परिणितीच्या कॅरेक्टर ला अ‍ॅम्निसिया असतो पण डायरेक्टर ला च तो असावा असे वाटत राहते. इतक्या मूर्ख चुका आहेत. असो. मीम किंवा टिंगल म्हणून बघायचा असल्यास बघा Happy

इथे जुन्या चित्रपटाबद्दल लिहिलं तर चालेल ना?

काल यूट्यूबवर दिलीपकुमार-वैजयंतीमालाचा 'मधुमती' बघितला. दिग्दर्शक बिमल रॉय. १९५८ सालचा सिनेमा आहे.

मी हा सिनेमा जवळजवळ २३-२४ वर्षांपूर्वी पाहिला होता. शाळेत असताना. तेव्हा जुने, ब्लॅक अँड व्हाइट सिनेमे कंटाळवाणे वाटायचे, पण हा मात्र मला आवडला होता आणि काल परत बघतानाही खूप आवडला.
पुनर्जन्माची कथा आहे, त्यामुळे त्यात तसं विशेष वेगळं सांगण्यासारखं काही नाही. मात्र दिलीपकुमारचा अभिनय, त्याने उभं केलेलं आनंदचं व्यक्तिमत्त्व, वैजयंतीमालाने केलेला निरागस मधुमतीचा अभिनय हे सगळं सहज आहे. कुठेही मोठेमोठे, पल्लेदार संवाद नाहीत. उगाच फार मेलोड्रामा नाही, त्या दोघांचं उत्कट प्रेम मात्र फार छान दाखवलंय. एकूणएक सगळी गाणी सुंदर आहेत. यूट्यूबवर चित्र चांगलं स्पष्ट असलं तरी आवाज तितका स्पष्ट नाही, त्यामुळे सबटायटल्सची गरज पडली.

आम्ही टॉम अँड जेरी बघायला आलोय.सॅनिटायझर मास्क सामग्री सह सज्ज.
पूर्ण थेटरात पालक व मुले मिळून 10 माणसे
अर्थात रुही ला मात्र बुकिंग आहेत भरपूर
हा हिंदी असल्याने फार लोक नसावे.

अ‍ॅन ऑफिसर अ‍ॅन्ड अ जन्ट्ल्मन (१९८२) पाहिला. नेट्फ्लिक्ष वर . दोन ऑस्कर आहेत. नेव्ही ट्रेनर चि भूमिका ब्लॅक कलाकाराने केली आहे Louis Cameron Gossett Jr. त्याला सपोर्टिन्ग चे ओस्कर आहे. पाहिल्यावर नाना पाटेकरच्या प्रहार ची आठवण झाली . नानाचे कॅरॅक्टर अगदी याच्यावर बेतलेले आहे. तसेच प्रहार मधला आर्मी प्रशिक्षनाचा भाग अगदी जसाच्या तसा घेतला आहे. नाना आणि ह्या कलाकाराचे व्यक्तिमत्व दिसतेही सारखेच. अर्थात प्रहार हा नानाचा सर्वोत्तम सिनेमा आहे असे मला वाटते.

Pages