शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२चे सगळे क्ल्यू एकत्र पहा --
२, १० येथे वर्षातील ठराविक काळी प्र...चंड गर्दी असते;
उत्तराच्या नावात नाथ नाही पण नाथ शी संबंध मात्र आहे.
सुरेख स्थान म्हणजे सौंदर्य संपन्न . ज्याची वर्णने केली जातात साहित्यात.

२ मध्ये प्रज्ञा-सत्त्व-धीर हे वसणार्‍याचे वर्णन / गुणविशेष आहेत. प्रज्ञा, सत्त्व, धीर किंवा प्रज्ञा, सत्त्वधीर
हे बघा कोण ते.... सात्विकता ज्ञान आणि समाजाच्या नकारात्मक रूपाचा धैर्याने सामना --- याचे मानवी प्रतीक

(अभाव दर्शक शब्द --- सुरेख स्थान नाव --- पुरी ) = आपले उत्तर

१० इथे गानरसिक, गानलुब्ध लोक रहातात
गानरसिक, गानलुब्ध लोक = गाणे ऐकायला आवडणारे
इथे रहातात = स्थान, शहर = पूर
गाणे ऐकायला आवडणारे >>>
गाणे ऐकण्याची इच्छा व्यक्त करणारच = गाणे / गाणं गा --- <सुलभीकरणाने गाण गा>
गाणगापूर -- गाणे आवडते म्हणून ते म्हणायचा आग्रह करणार्‍या लोकांचे ठिकाण

कळले
५ मध्ये
गुंत वळ हे नक्की असावे
तळ पण आहे
गुंतवळीत ?

टी टैम झाला, तरतरी आली... मग ह्यांना उडवा

खूप दिवसांनी एक गूढकोड्याचा प्रयत्न. सगळे शब्द ५ अक्षरी. उत्तराबरोबर त्याची उकलही द्यायची आहे.
* = शब्द वा काही भाग मराठीशिवाय इतर भाषातही आहे / आढळतो.
काही फक्त शोधसूत्रे आहेत; काहीत उत्तरांचा अर्थ / भावही दिलेला आहे.

५. व गुंतव // नि मागे बघ // काय गदळ उरलय जाळीवर
६. आवडीने घे; + हुशारी आली? // मग चालू लाग की // वटवट्या *
७. गलबल्याचा ल // कौशल्याने हटवा // म्हणजे छान दिसेल

५चे सगळे क्ल्यू एकत्र पहा --
२, ५, १० -- ठिकाणे आहेत
५ एकेकाळी महत्त्वाचे ठिकाण, आता सुनसान
? वळ ??
गुंतवळ नाही; पण वळ आहे
तळ पण आहे >>>> नाही काय शोधसूत्रावरून?
व पण गुंतायचा आहे आणि जाळीवरचा कचरा शोधायचा आहे.

तळ शब्दात नाहीये पण निगडीत असणारच; ठिकाणच तसे आहे.
यावेळची शोधसूत्रे चुकली बहुतेक.... मानव आले असते तर त्रुटी तपासून घेतल्या असत्या.

विमा न तळ >>> तसे सुनसान नाही हो.
? वळ ?? दिलेय ना
व कुठेय गुंतलेला?
जाळीवरचा कचरा?
तळ पण आहे >>>> नाही; तसे कुठे काय आहे शोधसूत्रात

तळ शब्दात नाहीये पण निगडीत असणारच; ठिकाणच तसे आहे.
यावेळची शोधसूत्रे चुकली बहुतेक.... मानव आले असते तर त्रुटी तपासून घेतल्या असत्या.

6) चव आणि चाल हे घटक आहेत का? >>>>>
आवड आहे
हुशारी येणार आहे
चाल नाही चालू लाग आहे ..... गेट्टाऊट्ट
चव अध्याहृत आहे (आवड आहे कारण 'चव' आहे; घेणार आहे कारण 'चव' आहे)

६ अक्कल खा ती >>>> नाही

7) हा गळसरीसारखा गळ्यातला दागिना असावा. गल ऐवजी गळ >>>>
नव्हे
पण उत्तराच्या जवळ आलायत अपघाताने

७ चपलाहार >>>>>
दागिना नाहीये
पण या शब्दाशिवाय दागिना नसणारच. दागिन्याची जान आहे

७. गलबल्याचा ल // कौशल्याने हटवा // म्हणजे छान दिसेल
गलबला घ्या.... कुणाचा घ्याल ....
कुठे कुठे कोण जास्त करतं.... उदा शाळेत मुलं, बाजारात विक्रेते, स्पर्धेत प्रेक्षक, झाडावर कावळे वगैरे
मग एकदम हलक्या हाताने कौशल्याने ल उडवा.

५ मा वळ **
रावळ **? >>>> नाही
(? [व) ळ] ? ?

५. व गुंतव // नि मागे बघ // काय गदळ उरलय जाळीवर
नि मागे बघ --- [व) ळ] साप डला
व गुंतव -- (? [व) शोधा
? ? --- जाळीवरला कचरा शोधा
आधी जाळी शोधा कचरा प़कडणारी

मा वळ आणि रावळपिंडीच्या तुमच्यापासून असलेल्या अंतराच्या सरासरी अंतरावरचे ठिकाण ( अंदाजे हं, कमीच असेल थोडे)

करनावळ / करणावळ
म्हणजे मेकिंग ??? दागिने बनवताना मेकिंग चार्जेस लागतात ते.
हे लिहून काढून टाकले होते.

करणावळ >>> नाही
७ चे सांगताय ना? मी ५चा वळ मध्ये गोंधळले.
छान दिसले पायजे.... करणावळ काय वेव ऑफ पण करतात लोक.

कलकलाट घेतला तर कनकलड कनकलता >>>
कनकलड कनकलता नाही
कनकलड लागते दागिन्याला पण प्रत्येक कनकलडीचा दागिना होतो थोडीच?
बरं आता कलकलाट थोडा अ‍ॅडजस्ट करा.... लांबी कमी वॉल्यूम जास्त
मग बघा दागिन्याची जान मिळते का

गोंधळ /दंगल घेऊन बघावे >>>>
सरांनी बघायचे नाही..... डस्टर आपटायचे..... काय _____ लावलाय म्हणत.
कल्कलाटामधूनच रस्ता सापडेल

Pages