शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* = शब्द वा काही भाग मराठीशिवाय इतर भाषातही आहे / आढळतो. >>>>
जर मराठीत + इतर भाषांत असेल तर ठीक पण जर भाषांतर असेल तर कुठल्या भाषेत करायचंय त्याची सूचना कोडे रचताना कोड्यातच खुबीने देणे अपेक्षित आहे, तसा प्रयत्न करावा.
उदा.
कुणी इंग्रजी सून हिंदीत नाचली की मध्येच दोन ठेवून द्या एक सारख्या (४). हे तुम्हीच सोडवले होते. इंग्रजी / हिंदी ऐवजी विलायती, उत्तर भारतीय असे खुबीने देऊ शकता.

काही फक्त शोधसूत्रे आहेत; काहीत उत्तरांचा अर्थ / भावही दिलेला आहे. >>> >>उत्तरांचा अर्थ, भाव शोधसूत्रातच खुबीने देणे अपेक्षित आहे.

पूर्ण उत्तर
१. मनसोक्त खा वारंवार पण नेमलेल्या निरूंद जागीच -- चराचरात
>> >>>
मनसोक्त खा = चरा. नेमलेल्या निरुंद जागी = चरात, यातून पाच अक्षरी पूर्ण उत्तर मिळत असताना वारंवार हा शब्द दिशाभूल करतो. जर वारंवार मुळे चरा दोनदा घेतला तर चार अक्षरे होतात, उरते फक्त एक अक्षर त. सामाईक शब्द चालून जातील, कळतील असे गृहीत धरू नये.

मनसोक्त खा पण नेमलेल्या निरुंद जागेत, पोचाल सर्व सृष्टीत (५) : कदाचित असे कोडे नेमकी अक्षरे देऊन, सोबत अर्थही शोधसूत्रात देईल?

२. सुरेख जागेसी जडे अभाव चिन्ह जेथे, प्रज्ञा-सत्त्व-धीर वसे तेथे --- अलंकापुरी >>>>
हे कोडे खूप छान रचले आहे.
इथे "प्रज्ञा-सत्व धीर वसे तेथे" हा कोड्याचा अर्थ आहे आणि
"वसे तेथे" यातून पुरी असे ही सुचवायचे आहे पण वसे तेथे शेवटी टाकल्याने ते स्पष्ट होत नाही.
सुरेख जागेसी जडे अभाव चिन्ह वसे तेथे प्रज्ञा-सत्त्व-धीर (५)
इथे वसे तेथे &lit होऊन दोन्ही सूचना पूर्ण करते असे माझे मत.

३. इवलेसे कुणी याचा वास येताच संशय येऊन मेले * --- जंतुनाशक >>>>
भाषांतरा बद्दल वर सांगितले आहेच. इवलेसे कुणी : जंतु,
संशय: शक, ना कुठून आणायचा?


४. ना तेल ना पाणी ओतून घे भाजके रूचकर ओथंबलेले --- भरभरीत
>>>>> छान कोडे.

५. व गुंतव नि मागे बघ काय गदळ उरलय जाळीवर --- गोवळकोंडा >>
सामाईक व बद्दल बोलून झालेय, तो भाग वगळता बरोबर + शोधसूत्रातच अर्थ असल्यास उत्तम.

६. आवडीने घे; हुशारी आली? मग चालू लाग की वटवट्या * --- चहाटळकी >>>> विक्रमसिंह यांनी सांगितल्या प्रमाणे वटवट्या = चहाटळ, चहाटळकी हे त्या शब्दाचे रूप. + आवडीने घे ने जरा गोंधळ होतो. घेतल्याने आली हुशारी? असे असते तर योग्य क्लू मिळतो

७. गलबल्याचा ल कौशल्याने हटवा म्हणजे छान दिसेल --- कलाकुसर>>>
पूर्ण उकल कळली नाही. गलबला = कल्ला असे घेऊन का? तसे असेल तर शब्दशः सुचने प्रमाणे ककुसरला होईल, पण ठीक आहे.

८. दिसतो तसा नसतो त्याला याने चोपा भारीच नखरेल भासेल --- नटमोगरा/री >>>> छान.

९. जर कैदी नाही तर हालचालीवर कडा पहारा का? * --- नजरबंदी >>> मस्त!

१०. इथे गानरसिक, गानलुब्ध लोक रहातात --- गाणगापूर >>>> छान. अशा शोधसूत्रात शेवटी प्रश्न चिन्ह देण्याची प्रथा आहे. म्हणजे तिथे खरोखरीच असे लोक रहातात असे नाही, म्हणुन.

माहिती करीता, तसेच माझ्या माहिती नुसार विश्लेषण केले आहे. चुकभुल देणे घेणे.

काही बाबतीत जसे की "आवडीने घे, हुशारी आली" , " व गुंतव" &lit होऊन व सामाईक करणे सुचवते का वगैरे बाबतीत मतांतरे असू शकतील.

जबरदस्त विश्लेषण !
आपण आतापर्यंत कुठली कुठली कोडी दिली आहेत ते प्रकार व ती सोडवायची कशी याबाबत छोट्या छोट्या सूचना वर धाग्यात देता येतील का कुमारसर ??!
नवीन प्रकारांचे स्वागत आहे अशीही भर घालता येईल.
शिवाय शब्दकोशांचे दुवे देता येतील, म्हणजे नवीन कोडी प्रेमी मंडळी आत्मविश्वासाने भाग घेईल.
सहज सुचवत आहे. Happy

धन्यवाद मानव, सुंदर स्पष्ट केलेय. मला असेच त्रयस्थ नजरेतून डिसेक्शन हवे होते. वाचते आता एकेक.

सामाईक शब्द चालून जातील, कळतील असे गृहीत धरू नये. >>> हीच चूक झाली. जिथे सामाईक होते तिथे अडकले. व, की क्ल्यू न देता सूत्रातच दिसतील असे जोडले. समोर आहेत तर लोक जोडून बघतील असे गृहीत धरले. पण त्यांना कसे कळणार हे? बरोबर.

भाषा म्हणाल तर चहा, शक, नजर, बंदी, नजरबंदी हे सर्व हिंदी-मराठी दोन्ही आहेत. म्हणून भाषेचा क्ल्यू प्रत्येक सूत्रात न देता वर कॉमन ठेवला. चहा - पेय, आवड; शक - संशय.

वसे तेथे यमक जुळायला शेवटी टाकले. यात अ लंका पासून पुरी दूर गेले हे लक्षात नाही आले.

जंतुनाशकमध्ये -- त्याचा वास येताच (हा कसला वास असा) शक (जंतूंना) आला तोवर ते मेलेही.
इवलेसे कुणी याचा वास येताच (त्यांना) संशय येऊन (ते) मेले. हे डोक्यात होते. टेक्निकली चुकले.

५ गोवळकोंडासाठी लाईव्ह क्ल्यू होतेच + मला कोणालातरी कोंडा सुचेल मग उत्तर येईल असे वाटले होते.

हो, कलाकुसरमध्येही सूत्राच्या वाक्यरचनेमुळे ल शब्दशः कुसरने रिप्लेस करा असा अर्थ निघतोय.

पुढच्या वेळी अधिक काळजीपूर्वक वाक्यरचना करायला हवी.

शब्दव्यूह आणि अंताक्षरी

खाली ओळीने ९ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. एक आड एक अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.

• नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून सुरवातीस २ लागोपाठची उत्तरे एकदम द्या.
पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
……..

१. सतत (४, म ) : फारसी उगम
२. हा मध्यात असतो (५)

३. समजावून काही उपयोग नाही ( ५, ट)
४. सढळपणे (५)

५. लागलीच (६, ड)
६. खळखळ वाहात (५)

७. राज्यकर्ता ( ५, ती)
८. कर्मकांडाशी संबंधित व्यक्ती (५)

९. पूर्णपणे ( ४, क्र १ चे पहिले )
…………………………….

६ *** झरा
७ राष्ट्राधिपती/ राज्याधिपती

*** झरा
७ राष्ट्राधिपती/ राज्याधिपती

सर्व नाही

१. गहदम
७. सत्ताधीपती?

२. हा मध्यात असतो (५) >>>> 'हा' कोण आहे?
वर्तुळकेंद्र, फुलाचा मधुकोष, गणिती मध्य, balance/equilibrium यापैकी?

नाही, पण
डचमळत .... याच शब्दासम शोधा

शिगोशिग नाही; कृती संदर्भात पहा

6 डळमळीत
7 तख्ताधिपती
बरोबर, छान !

बाकी नाही

तीर्थोपाध्याय बरोबर !
……..

१. गहदम
२. हा मध्यात असतो (५)

३. समजावून काही उपयोग नाही ( ५, ट)
४. सढळपणे (५)

५. लागलीच (६, ड)
६. डळमळीत

७. तख्ताधिपती
८. तीर्थोपाध्याय

९. पूर्णपणे ( ४, ग )
…………………………….

Pages