शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंठ हवा त्यात >>> नको. दागिना बनताना लागणारी बाब आहे घालताना नाही

धांगडधिंगा >>>> यातून दागिना बनतो? शोधसूत्राची उकल द्या बरं Happy

कलाकुसर
कल्ला -ल = कला
कुसर कौशल्य

कोलाहल चा ल काढला >>> ल काढायचाच आहे. पण कशाचा?

७. गलबल्याचा ल // कौशल्याने हटवा // म्हणजे छान दिसेल असे आहे ना आपले शोधसूत्र
५ ----> २.५ ----> ५ असा पाथ दिला होता काल एका क्ल्यूत
तो इथेही चालणार
कलकलाट ----> २.५ ----> ५ अक्षरी उत्तर असा मार्ग आहे.

कलाकुसर >>>>> झकास. बरोबर

खूप दिवसांनी एक गूढकोड्याचा प्रयत्न. सगळे शब्द ५ अक्षरी. उत्तराबरोबर त्याची उकलही द्यायची आहे.
* = शब्द वा काही भाग मराठीशिवाय इतर भाषातही आहे / आढळतो.
काही फक्त शोधसूत्रे आहेत; काहीत उत्तरांचा अर्थ / भावही दिलेला आहे.

५. व गुंतव // नि मागे बघ // काय गदळ उरलय जाळीवर
६. आवडीने घे; + हुशारी आली? // मग चालू लाग की // वटवट्या *
७. गलबल्याचा ल // कौशल्याने हटवा // म्हणजे छान दिसेल ---- कलाकुसर

आता २च उरले. अस्मिता २ चौकारानी संपवून टाका ताज्या दमाने. सर आणि हीरा तर सेट आहेत कालपासून.

अजून पुढे जाऊन

५. व गुंतव // नि मागे बघ // काय गदळ उरलय जाळीवर
? वळ ??
दोन क्रियापदे त्यात व सामाईक
एक -- वळ -- मिळालेय
जाळी आणि कचरा रोजच्या पहाण्यातला. खरं कचरा नव्हे तो काही चांगलेच आहे पण उपेक्षित आहे बिचारा.
उत्तर एक ठिकाण आहे. पूर्वी महत्त्वाचे पण आता सुनसान.... एकदम बकर्‍या फिरतील असे

६. आवडीने घे; + हुशारी आली? // मग चालू लाग की // वटवट्या *
असे काही तरी जे घेतले जाते
त्याची आवडही असते / आवडही तेच असते
घेतल्यावर येते हुशारी.... टक्केवारीवाली नाही.... एकूणच
मग वटवट्याला म्हणायचे जा बाबा एकदाचा..... मग... सतावतोच ना तसा...
उत्तर -- हा एक अवगुण आहे

मी स्वतः सहजपणे पास म्हणत नाही.... आयती उत्तरे वाचायला मजा येत नाही म्हणून ....
म्हणून क्ल्यू देत जातेय हां...
कोणाला उत्तरे हवी असतील तर देते..... म्हणजे खूप वेळ धागा अडकलाय इथेच...

त्यांची भट्टी तापलेली आहे >>> हे खरंय.... आता क्ल्यू दिलेत नवीन; सुटेल त्याने तुम्हालाही

५. गोवळकोंडा

गुंतव : गोव, मागे बघ: वळ, जाळीवर उरला: कोंडा

एक व जास्त होतोय, व गुंतव यातून क्लू मिळणे शक्य नाही,
तेव्हा एक व काढण्यास "अपूर्ण गुंतव" असे म्हणतात येईल.
गोव अपूर्ण करून: गो

मावळ दरी ? किंवा मावळ खोरे >>>>> नाही

५. गोवळकोंडा
गुंतव : गोव, मागे बघ: वळ, जाळीवर उरला: कोंडा

हे बरोबर आहे. (म्हणजे मी असे रचले आहे.)
बरं झालं तुम्ही आलात. मला तेच हवे होते की --- शोधसूत्र चुकीची हिंट देतेय का?
मला उत्तर माहिती आहे म्हणून कळेल. अर्थ लावणार्‍याला यात कशी कशी दिशाभूल होतेय?

व गुंतव नि मागे बघ यात --- गुंतव मागे बघ दोन क्रिया आणि सामाईक व -- हा अर्थ येणार नाही?
मग सामाईक व साठी कसे सांगायचे?
गुंफ व नि मागे बघ --- असे होते आधी. मग बदलले. व गुंतव नि मागे बघ असे केले.

६चे पण असेच काही झालेय ....माझ्या डोक्यात आहे ते वाचल्यावर लोकांना दिसत नाहीये....आज खूप अडकले

व गुंतव नि मागे बघ यात --- गुंतव मागे बघ दोन क्रिया आणि सामाईक व -- हा अर्थ येणार नाही? >> मला तरी वाटत नाही की व गुंतवणे म्हणजे व सामाईक करणे होते.
अक्षरे सामाईक करणारे व तशी सूचना देणारे कोडे मी तरी पाहिले नाही, जास्तीचे अक्षर वगळण्याचा सूचना असतात.

ओके. व सामाईक करायला काय सूचना द्यावी, ती पण स्पष्ट, ते बघावे लागेल. करते विचार कसे देता येईल.
मला वाटले व जोडणारे अव्यय असल्याने चालेल.
व गुंतव म्हणजे -- गुंतव चे क्रियापद आणि व गुंतवायचा आहे ही सूचना दोन्ही सूचित होईल या विचाराने मी दिले होते.

आज शोधसूत्रात काही बिनसले नक्की, कारण इतका वेळ लागत नाही सुटायला. कोणाला ना कोणाला सुचतेच.

दोन सूचना एकत्र देण्याला काही हरकत नाही. याला &lit प्रकार म्हणतात, जो चांगला प्रकार समजल्या जातो, असे कोडे बनवणे कठीण असते.

मला मुळात व गुंतव हे व सामाईक करण्यास सुचवते हेच वाटत नाही.

मला मुळात व गुंतव हे व सामाईक करण्यास सुचवते हेच वाटत नाही >>>>
हे वाचणार्‍यालाच वाटायला हवे नाही तर कोडे रचणे फसले, जसे आता झालेय.
बघते &lit प्रकार वाचून मराठीत कसे होऊ शकेल. धन्यवाद.

आवडीने घे: नाम?

(सुखाचेहे नाम आवडीने घ्यावे)

सॉरी, आज उशीर झाला; सकाळी बाहेर गेले कामासाठी; मग लाईट नव्हते......
६चे उत्तर लिहीते आता, कारण माझा शब्द-क्ल्यू संबंध मांडला जात नाहीये योग्य त्यामुळे सोडवणारे भरकटतात.

६. आवडीने घे; + हुशारी आली? // मग चालू लाग की // वटवट्या -------- चहाटळकी

आवडीने घे; + हुशारी आली --- चहा हे तरतरी येणारे पेय + चहा म्हणजे आवड एखाद्या गोष्टीची.
मग चालू लाग की --- टळ की (सामान्य बोली भाषेतील 'चालता हो' )
चहाटळ ---
वि. १ चावट; एकसारखी बडबड, वटवट करणारा; इत्यादि

खूप दिवसांनी एक गूढकोड्याचा प्रयत्न. सगळे शब्द ५ अक्षरी. उत्तराबरोबर त्याची उकलही द्यायची आहे.
* = शब्द वा काही भाग मराठीशिवाय इतर भाषातही आहे / आढळतो.
काही फक्त शोधसूत्रे आहेत; काहीत उत्तरांचा अर्थ / भावही दिलेला आहे.

पूर्ण उत्तर
१. मनसोक्त खा वारंवार पण नेमलेल्या निरूंद जागीच -- चराचरात
२. सुरेख जागेसी जडे अभाव चिन्ह जेथे, प्रज्ञा-सत्त्व-धीर वसे तेथे --- अलंकापुरी
३. इवलेसे कुणी याचा वास येताच संशय येऊन मेले * --- जंतुनाशक
४. ना तेल ना पाणी ओतून घे भाजके रूचकर ओथंबलेले --- भरभरीत
५. व गुंतव नि मागे बघ काय गदळ उरलय जाळीवर --- गोवळकोंडा
६. आवडीने घे; हुशारी आली? मग चालू लाग की वटवट्या * --- चहाटळकी
७. गलबल्याचा ल कौशल्याने हटवा म्हणजे छान दिसेल --- कलाकुसर
८. दिसतो तसा नसतो त्याला याने चोपा भारीच नखरेल भासेल --- नटमोगरा/री
९. जर कैदी नाही तर हालचालीवर कडा पहारा का? * --- नजरबंदी
१०. इथे गानरसिक, गानलुब्ध लोक रहातात --- गाणगापूर

यावेळेला रचताना गडबड केली बहुतेक मी.
शोधसूत्रात त्रुटी असूनही अथक प्रयत्न करणार्‍यासाठी हीरा, कुमार सरांचे आभार.
प्रयत्न करूनही दिशाभूल करणार्‍या शोधसूत्रामुळे न सोडवता परत गेलेल्यांना मनापासून सॉरी.
(देवकी, सियोना, मंजूताई, केया, अस्मिता, मानव.... इतर कुणी?)

@ मानव -- वेळ मिळाला की हे वरचे तपासाल का प्लीज ? सांगा, कुठल्या शोधसूत्रावरून त्या त्या उत्तराचा अंदाज बांधणे शक्यच नव्हते. पुढच्या वेळेला चुका टाळता येतील.
&lit प्रकार पाहिला. डोकेबाज + कठीण वाटला. माझी vocab कमी आहे हे माहीत होते. इतकी गाळात आहे हे त्या &lit शब्द / उदाहरणांवरून कळले.
मराठीत करायला आवडेल. कसा आणता येईल ते बघते.

आवडीने घे; + हुशारी आली? // मग चालू लाग की // वटवट्या * >> हे कुणाला आल नाही तरी खरेतर छान होत,
पण वटवट्या आणि चहाटळकी समान नाही. नुसत चहाटळ उत्तर असत तर वटवट्या योग्य.
मला अस वाटत की शब्दाचा अर्थ असलेल किंवा दर्शवणार काही तरी पाहिजे. (संकेत म्हणून शक्यतो सुरुवातीला किंवा शेवटी). उदा : १,५ आणि ६ मधे ही दिशा मिळत नाही. चराचर चा नक्की अर्थ काय?. ५ मधे स्थान दर्शवणारे नाही. जस अलंकापुरीच्या क्लू मधे "वसे तेथे" यामुळे आहे.
मला फक्त कलाकुसर आल होत. आळंदी सुचल होत पण अलंकापुरी लक्षात आल नाही.
(देवकी, सियोना, मंजूताई, केया, अस्मिता, मानव.... इतर कुणी?)>> आणि मी Happy
मोगराचा नवीन अर्थ कळला. धन्यवाद.

सॉरी कशाला कारवी. मी तर पहिल्यांदा पहात होते असे कोडे. सरांनी पहिले कोडे सोडवल्यानंतर लक्षात आले. पुढील वेळी नक्की प्रयत्न करेन.

मला 'चहाटळकी' द्यावे वाटत होते पण आधी दोन चुकल्याने हेही चूक असेल वाटलं . येत नसलं तरी काही बाही देत खेळत रहाते आणि उकल विचारली की पळून जाते. चहाटळ माहिती होतं पण टळकी नाही.

कारवी छान होते कोडे. सगळे शब्द माहितीतले होते. हीरा व कुमारसर यांनी मस्त खेळले. मानवदादांनी सिक्सर मारला.

अस्मिता जे सुचते ते लिहून जावे, इथे थोडेच -ve मार्क आहेत वा मर्यादित प्रयत्न संख्या.
पहिल्यांदा सुचते ते बरोबर असते जनरली
उकल म्हणजे आपण शोधसूत्राचा अर्थ कसा लावला उत्तरापर्यंत पोचायला... द्यायची बिनधास्त ती पण. सगळे आपलेच तर आहेत.
त्यात कोडे रचणार्‍यालाही कळते की आपल्या शब्दांचा असाही अर्थ निघू शकतो. अधिक बांधीव रचता येते.

ओके सियोना, पुढच्या कोड्यात या.

ज्यांना गूढची सुरवात करायची आहे त्यांनी रविवार सकाळ मधील आधी घ्या. ती तुलनेने सोपी आहेत.
आपली 'पदव्युत्तर' असतात
Bw

@ विक्रमसिंह ---
शब्दाचा अर्थ असलेल किंवा दर्शवणार काही तरी पाहिजे. >>>
हो, माझ्या काही सूत्रात असते काहीत नसते. तशी सूचना लिहीते मी वर.
कधीतरी शब्दार्थ बेमालूम गुंफायला जमत नाही, वाक्य लंबेचौडे होते किंवा खूप सोपे होत कोडे त्याने.

५ हे ठिकाण आहे + अन्य क्ल्यू -- खेळताना दिले होते सूत्रात नसले तरी. ५ ला भरपूर क्ल्यू दिलेत + कलाकुसरला. सगळेच सूत्रात नाही ना घालता येत. खेळताना लोक योग्य दिशेने / विरूद्ध दिशेने जाऊ लागले की मग तसे पुढचे क्ल्यू पुरवता येतात.

चालू लाग की मधला की चहाटळ ला चिकटला म्हणून चहाटळकी; वटवट्या = चहाटळकी नव्हे.

मलाही मोगरी नटमोगरीला क्ल्यू काय देऊ शोधतानाच कळला.

चराचर = चर + अचर = सर्व सजीव निर्जीव मिळून झालेली सृष्टी = सर्व जग
चरा = अतःश खा हे वारंवार करा = चरा चरा
कुठे चरा? तर निरूंद जागेत = चरात
चर = खाच / खणलेला जमिनीचा पट्टा / खंदक
आता खाचीत खंदकात अडनिडे बसून मनसोक्त खाणार कसे हा प्रॉब्लेम वेगळा Happy

इतर कुणी?)>> आणि मी >>>>
बडे अच्छे लगते है मधल्या 'और तुम' सारखे....
Happy येऊन, प्रतिसाद न लिहीता नुसतेच वाचून, ??!! वाटून गेलेलेही असतील याची कल्पना होतीच.

१,५ आणि ६ मधे ही दिशा मिळत नाही. >>>> हे पुढच्या वेळी सुधारते.

खूप धन्यवाद सार्‍यांना.
कोडे संपले; आता नवीन येऊ द्या.

Pages