शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाडी
इतकं सोपं नसेल तरीही.
हे मी संपादित केलं होतं.

खेळ द्यूत , पत्ते असं काही??

सारिपाट आठवतोयं पण दोन अक्षरी नाही.
पट पण म्हणतो आम्ही, खात्री नाही.
बुद्धीबळाला समानार्थी ?

नादी ?
ही खेळण्याची पद्धत बरोबर नाही , Happy

छान, कोंडी फोडलीत
आता..

१२ - हगवण / झाडाशी संबंधित

३४ - नळकांडे / नस..... नाड

५६ – मेंढपाळास कुणीही हाक मारली / एक बैठा खेळ

१२ - हगवण / झाडाशी संबंधित --- झाडा ? हा काल नव्हता आठवला.

५६ – मेंढपाळास कुणीही हाक मारली / एक बैठा खेळ ---- डह ?
बैठे खेळ शोधताना हे सापडले ---
डह
पु. गळ्यावर हात मारून एक विशिष्ट आवाज काढतात तो. गुराखी मुलें खेळांत डह घालतात. ड पहा. [ध्व.]
दाते शब्दकोश

मूळ पान फूल फळ फांदी तुरा कळी बीज कोंब शेंग --- Happy सगळे २ अक्षरी पण एकही कामाचा नसणार

५६ – मेंढपाळास कुणीही हाक मारली / एक बैठा खेळ --- हमामा, हुंबरी याअर्थी २ अक्षरी?

फांदी साठी पेपरांच्या कोड्यात नेहमी एक शब्द येतो !

५६ हे मुलाचे नाव पण असते. >> महाराष्ट्राच्या इतिहासातले प्रसिद्ध.

बाजी बरोबर

१२ - हगवण / झाडाशी संबंधित

३४ - नळकांडे / नस..... नाड

५६ – मेंढपाळास कुणीही हाक मारली / एक बैठा खेळ ....... बाजी

१२ - हगवण / झाडाशी संबंधित --- शाखा फाटा टाळ (आंबा) झाप (नारळ) मेढ/ मेढी ( लग्नात पुजतात ती फांदी)
यातले हगवण आणि वृत्तमाध्यमांशी काय जुळत नाही ! ??नाडबाजीवरून उलटे जावे लागेल.

मेंढपाळ....... बाजी
एक बैठा खेळ ....... बाजी

हा काय संबंध आहे? आपले इतिहासातील कुणी बाजी मेंढपाळ होते? बाजी म्हणजे डाव ( बाजी मारणे = जिंकणे) ना?

शाखा फाटा टाळ (आंबा) झाप (नारळ) मेढ/ मेढी ( लग्नात पुजतात ती फांदी) >>> नाही

बाजी (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80+)

स्त्री. १ पत्ते, गंजिफा, सोंगट्या यांचा खेळ, क्रीडा
पु. १ एक नांव. २ (कु.) धनगरास मारावयाची हांक.

दाते शब्दकोश

फोक

फोक अगदी बरोबर.
छान.
......................................
वृत्तमाध्यमांचे अनिष्ट वर्तन = फोकनाडबाजी
पूर्ण शब्द इथून घेतला :

माध्यमांची फोकनाडबाजी!

- प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/trending_detail/4787

या लेखातही ‘फोकनाड’ वारंवार आलेला आहे :

मी मराठी वर्तमानपत्रं का वाचत नाही?
पडघम - माध्यमनामा
सुभाष मेहेत्रे
https://www.aksharnama.com/client/article_detail/4828

Pages