बिनतेलाची ओट्स मूगडाळीची खिचडी

Submitted by Shreya_11 on 30 December, 2020 - 20:39
oats khichadi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी ओट्स , अर्धी वाटी मुगडाळ , १ छोटा चिरलेला कांदा ,१ चमचा हळद , अर्धा चमचा जिरे /जिरेपूड , १ ते दीड वाटी चिरलेल्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे ( गाजर, कोलिफ्लॉवर , बटाटा , ओले हरभरे , पावटा , वाटाणा , बीटरूट , beans,पालक , मेथी यापैकी कोणतीही )

क्रमवार पाककृती: 

कुकरमध्ये डाळ घेऊन धुवून घ्या . त्यात ओट्स , कांदा , भाज्या एकत्र करा . ४ वाटी पाणी घालून मीठ घाला . हळद टाका . मला थोडा तिखट आवडता म्हणून अगदी थोडसं कोल्हापुरी तिखट घालते . आवडत असेल तर एक चमचा तूप टाका . ४ शिट्ट्या काढा . तुमची खिचड़ी तयार !!
भाज्या चिरायचाही कंटाळा आला असेल तर फक्त ओट्स आणि मुगडाळीची सुद्धा छान लागते .

वजन कमी करायचे असेल तर तुमच्या डाएट मध्ये नक्की add करा . अगदी कमी कॅलरीस आहेत आणि पोटभर होते , स्वानुभव !!

आजच्या खिचडीमध्ये घातलेल्या भाज्या ...

image_50742273.JPGimage_72192707 (2)_1.JPG

वाढणी/प्रमाण: 
१ जणांसाठी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Which oats Shreya? >>>> For this kinda recipe (khichdi), i would prefer steel cut than rolled oats.

रोल्ड ओट्स घाईघाईच्या ब्रेकफास्टसाठी (मसाला ओट्स किंवा पॉरिज साठी ठीक आहेत). पण या रेसिपीसाठी गुंईगुंई होतील.

धन्यवाद peacelily2025 , अस्मिता

@ sneha1 मी old fashioned वापरते . Quick cooking ओट्स ची खीरचं होते . एकदा चुकून आणला होता . फक्त डोसे करून संपवला .
@ मीरा - thank you!! मसाला ओट्स म्हणजे ओटस चा उपमा ना ? कि अजून काही वेगळे करता? या रेसिपीसाठी गुंईगुंई होतील +१
mi_anu Happy