तुमचा पहिला पगार किती होता ?

Submitted by हाडळीचा आशिक on 7 January, 2021 - 03:21

पहिली शाळा, पहिला मित्र, पहिली मैत्रिण, पहिलं प्रेम आणि.......
आयुष्यात पहिल्यांदा मिळालेल्या गोष्टीचं महत्व निराळंच असतं.
तर पहिली नौकरी-पहिला पगार आणि त्या संबंधीच्या आठवणी या धाग्यावर

माझा पहिला पगार होता ९००रुपये प्रति महीना आणि ते वर्ष होतं १९९९. Happy
तुमचा ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

1990: 1800 क्षेत्र इलेक्ट्रीकल इंडस्ट्री.

१९९९ साली सकाळी पेपर टाकायचो, ३५०/- प्रति महिना.

२००४ साली काॅलेज पास आऊट झाल्यावर पहिला जाॅब Heavy Engineering कंपनीमधे, ७०००/- प्रति महिना.

वर्ष - २००९
इंटर्नशिप - ५०००/-
कॉलेज चालू असल्याने परीक्षा, प्रोजेक्ट सबमिशन साठी च्या सुट्ट्यांचे पैसे कापले जायचे मग अजून कमी Happy
३५०० ते ४००० हातात मिळायचे

९ वाजता हजर राहावंच लागायचं , ९ चे ९:१५ झाले तर पैसे कापू अशी धमकी मिळायची

बेचाळीस वर्षांपूर्वी म्हणजे 1978 साली माझा पहिला पगार 700 rs महिना होता जो त्या वेळी चांगला समजला जाई. महिना अखेरीला कधी संपले पैसे आणि काढावे लागले तर मी दहा रुपये withdraw करत असे . तेवढे भरपूर होत असत. ही तुम्हा मुलांना परीकथा च वाटेल.

आमच्या ऑफिस मध्ये एक रेडी रेकनर होता तेव्हा ज्यात आपली super annuation ची अमोउंट calculate करता येत असे. ते आकडे पाहून ह्यात काहीतरी चूक आहे , एवढे पैसे कसे मिळतील रिटायर होताना अस वाटे आम्हाला.

अजून ही कोटी हा आकडा माझ्या तोंडात बसला नाहीये. म्हणजे अमक्याने दोन कोटींचा ब्लॉक घेतला ऐवजी दोन लाखाचा घेतला असच येत तोंडात.

साल २०००
क्षेत्र - सॉफ्टवेअर
पगार - ३४००

२००६ साली पहिला पगार १२,७५० होता.

पण बाँडमध्ये ठरल्याप्रमाणे, ३ महिने ८००० रुपये कटणार, अजून ३ महिने ६००० कटणार, मग अजून ३ महिने ४००० कटणार, मग अजून ३ महिने २००० कटणार... आणि २ वर्षे थांबलो तर हे व्याजानुसार परत मिळणार.

त्यामुळे पहिले ३ महिने १२७५० - ८००० = ४७५० रुपये पगार आला.. मग ३-३ महिन्यांनी २-२ हजार वाढत गेल्यासारखे वाटले.
त्यात ९ महिन्यांनी ईंक्रीमेंट होत २०००० झाल्याने चौथ्या क्वार्टरला २०-२ = १८ येत होता.

अर्थात मी त्या कंपनीत २ वर्षे थांबून मगच निघाल्याने माझा पहिला पगार १२,७५० बोलू शकतो.
पण हातात ४७५० आल्याने मला माझा पहिला मोबाईल घ्यायलाही दुसर्‍या पगाराची वाट बघावी लागणार होती.
पण त्याच महिन्याला वेस्टर्न रेल्वेला जे सिरीअल ब्लास्ट झाले तो मी अगदी पाच मिनिटांच्या अंतराने चुकवत अगदी जवळून पाहिला होता. त्या रात्री घरी कॉलही न करता रात्री एक दिड वाजता पोहोचलो होतो. घरच्यांनी माझे बरेवाईट झाले असू शकते अशी मनाची तयारीही केली होती. पण पोहोचलो घरी सुखरुप. पण त्या मुळे आईने लगेच मला दुसर्‍या पगाराची वाट न बघता माझ्या पहिल्या पगारातच तिच्या पदरचे पैसे टाकून मोबाईल घ्यायला लावला होता. पण तरी मी आपल्या परंपरेला अनुसरून पहिल्या पगारात आईसाठी साडी मात्र घेतली होती Happy

आठवणी राहिल्या कि लिहायच्या..
पहिला पगारात मी आईसाठी सोन्याचे कानातले केले होते..तेव्हा सोने 8000रूपये तोळा होते..
बहिणीसाठी सोनाटा चे घड्याळ..
इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाच्या सुरुवातीलाच college campus तर्फे सिलेक्शन झाले होते...शेवटची परिक्षा संपल्यावर चार दिवसांनी लगेच जॉईन झाले होते, रिझल्ट लागायच्या आधीच.

माझेही ऋन्मेष प्रमाणेच बाँड होता. पण त्यांनी कधी पगारातून पैसे कट केले नाहीत.

२००६ साली मला ७५०० रुपये स्टायपेंड होता.. कंपनीची बस फुकट होती. त्यानंतर दर ६ महिन्याला बर्‍यापैकी इन्क्रीमेंट होत २ वर्षाचा १.५ लाखाचा बाँड संपला.

अडीच वर्षं त्याच कंपनीत राहिलो तेव्हा माझ्या टीम मधे सोन्याचे भाव हजार रुपयांनी उतरले असं ऐकलं. त्यावेळी १३५०० रुपये तोळा असलेलं सोनं अचानक १२५०० झालं होतं. मग मी नुसत्या फोन वरून ५ तोळे सोनं खरेदी केलं जे मला ५८००० रुपयांना पडलं. त्या क्षणी माझ्याकडे अकाउंटवर ९० हजार होते.. जर तेवढ्या पैशांचं सोनं घेतलं असतं तर किती बरं झालं असतं ही बोच माझ्या मनाला अजुनही टोचु पहाते (पण मी टोचून नै घेत..! Proud )

पहिला पगार २००७ साली रिसर्च असिस्टंट म्हणून ₹१२ हजार. पहिल्या पगारातून हौशीने घरासाठी मायक्रोवेव्ह आणला होता सरप्राईज म्हणून! मग लक्षात आलं की जिथे तो ठेवायचा होता तिथे बोर्डच नव्हता! मग इलेक्ट्रिशियनना बोलावायला लागलं सगळ्यात आधी!
मध्यंतरी आईशी गप्पा मारताना कळलं की तिने तिच्या पहिल्या पगारातून घरी हप्त्याने फ्रिज आणला होता. त्याकाळी फार अप्रुप होतं फ्रिज घरी असण्याचं! मग मी आईला म्हणाले की बघ मी तुझी मुलगी शोभते एकदम!

2004 आठवीला होत़ो तेव्हा मी सकाळी पेपर टाकायला जायचो..

पगार 400 रुपये होता पण पेंपलेट वैगेरे भरले तर 200 आणखी मिळायचे.. + रविवारी गाड्या धुवायला जायचो.. तीनच गाड्या धुवायचो.. त्याचे 480 मिळायचे.

400+200+480 = 1080 रूपये माझा पहिला पगार..

खुप होते तेव्हा..अर्धा पगार घरी द्यायचो तरीसुद्धा पैसे वाचायचे.. कधी पाॅकेटमनी मागायची गरजच पडली नाही..

आज पगार चांगला आहे पण ती मजा ह्या पगारात नाही...

आता मागे वळून पाहताना वाईट नाही तर अभिमान वाटतो.

My parents raised me very well...

२००४ साली tax consultant म्हणून २५०० पगार होता. त्याआधी त्याच ऑफीसमध्ये कॉलेजला असताना पार्टटाइम Account चे काम शिकताना ५००!- stipend मिळायचे. मार्च , जुलै, ऑक्टोबर अखेर खूप काम असायचे मग त्या कामाचे पगारा व्यतिरिक्त जास्तीचे पैसे मिळायचे. आता नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय आहे पण गतकाळातील नोकरीतल्या पगाराची पाहीलेली वाट... त्यातली गंमत वेगळीच होती.

MBBS

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
1999 साली इंटर्नशिप 1200 रु

मी संध्याकाळी स्वतंत्र प्रॅक्टिस करायचो खेड्यात , 5000 मिळायचे

2000 साली शासकीय बॉण्ड सेवा , 10200

@अतरंगी
Heavy Engineering कंपनी >>>> नॅशनल हेवी का रे सोमाटणे फाट्याची ??

जागतिक मंदी डिसेंबर २००७ मध्ये सुरू झाली . या एक वर्षात पुण्यात फक्त Persistent Systems चा एकच walk-in झाला होता त्यातही आयत्या वेळी criteria वाढवल्यामुळे जाम तोडफोड झाली .Walk-in हि कॅन्सल झाला.
त्यानंतर IT-sector मध्ये नोकरी मिळेल हि आशाच सोडली . कुठेही नोकरी करण्याची तयारी होती . अशातच MSBTE इथे एक मैत्रिणीच्या रेफरन्स ने १०,०००/महिना कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर नोकरी मिळाली .
एकही रुपया कट न होता जेव्हा पहिला पगार आला तेव्हा एवढा आनंद झाला होता ... काय भारी दिवस होते ते !!!

अरे हो वरची माझी पोस्ट दुसर्‍या पगाराची आहे
तसे म्हटले तर पहिला पगार डिप्लोमाला सहाव्या सातच्या सेमिस्टरला साईटवर कामाला असताना १५०० रुपये मिळायचा. पहिले बँक अकाऊंट त्याचसाठी काढले होते. पण ते पैसे मला कधी उपभोगताच आले नाही. आईबाबाच ढापायचे. अजून शिक्षण बाकी होते. त्यामुळे काही बोलू शकायचो नाही Happy

२००७ - पहिला पगार ११,५००/- - सत्यम् कम्प्युटर्स
तेव्हा फार ताठ मानेने हैदराबादच्या रस्त्यांवर फिरायचो..पण त्यानंतर आमचा राजू काॅर्पोरेट स्कॅंडल मधे पकडला गेला..और फिर हम कही मुॅंह दिखाने के काबिल नही रहे

मी लहानपणी लोकांच्या अंगात आलेलं उतरवायला जायचो तेव्हा पन्नास रुपये आणि पावशेर तांदूळ मिळायचे.
Submitted by बोकलत >> आता किती मिळतात.

वर्षः २००३
क्षेत्रः सॉफ्टवेअर
पगारः ३०,००० प्रति महिना

मी त्या पगारातला ज्यास्त काहीही खर्च न करता सरळ बॅन्केत ठेवून आईला तुला काय करायच ते कर सांगायचो. त्याकाळच्या मनाने ठिकठाकच होता पगार. पण अधून मधून कुठुनतरी बातम्या यायच्या की कुणालातरी गुगलनी घेतले आणि महिना एक लाख वगैरे दिले. त्या वेळी वाचून जळजळ व्हयची. पण जाउ देत तो आय आय टी तला असल्यामुळे घेतले असेल वगैरे स्वतःला सांगून समजूत घालून घ्यायचो. मागे वळून बघताना दोन गोष्टी जाणवतात की माझ्या शुन्य अनुभवासाठी जो मिळत होता तो ही चांगलाच होता आणि अजून ज्यास्त मिळून ही मी काही विशेष वेगळे करणार होतो अशातला भाग नाही. ऊलट मी एका नविन स्टार्ट अप मध्ये पहिलाच एम्प्लोयी असल्याने खूप छान शिकायचा अनुभव मिळाला.

दुसरी गोष्ट अशी की थोडे ज्यास्त प्रयत्न केले असते तर गुगल किंवा तत्सम कंपनी मध्ये पण शिरु शकलो असतो पण त्यावेळेला अशा कंपनीज मध्ये शिरायला आणि सर्व्हाव्हाय व्हायला काय काय करायला लागत याचे रीसोर्सेस उपलब्ध नव्हते (जे की आय आय टी सारख्या ठिकाणी उपलब्ध असतात)

Pages