तुमचा पहिला पगार किती होता ?

Submitted by हाडळीचा आशिक on 7 January, 2021 - 03:21

पहिली शाळा, पहिला मित्र, पहिली मैत्रिण, पहिलं प्रेम आणि.......
आयुष्यात पहिल्यांदा मिळालेल्या गोष्टीचं महत्व निराळंच असतं.
तर पहिली नौकरी-पहिला पगार आणि त्या संबंधीच्या आठवणी या धाग्यावर

माझा पहिला पगार होता ९००रुपये प्रति महीना आणि ते वर्ष होतं १९९९. Happy
तुमचा ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

20 रुपये, आठवड्याचे, 40 पैसे एका किलो मीठ विकल्यावर. सायकलवर 20 किलोची गोंण घेऊन दिवसभर गावभर फिरल्यावर कुठे 4-5 रुपये मिळवून परत घरी.. सन 1989

छान
40 पैसे घेऊन नमकहलाली करणं हे चांगलेच

( आज नमक हरामीचा दर 40 पैसे आहे म्हणे )

छान धागा, हडळीचा आशिक! माझा पहिला पगार भरत सारखाच आहे (आम्ही समवयस्क म्हणून) ऑडिटर कडेच तेही. ४०० रुपये पगार होता. Non army navy shop मध्ये अफगाण चर्च ला जायचे मी. ऑडिटर च्या तर्फे account बघायला. साल साधारण ८९ .

डिसेंबर 2014- रू 22,500.00 पहिला पगार अँड त्यात घरी पगार झाल्यावर सांगितलं होतं मला जॉब लागल्याचं म्हणून दादा ने 30000 दिलेले बक्षीस म्हणून..

रुपये 1350 दरमहा, लार्सन आणि तुब्रो, पवई मध्ये, डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी म्हणून, सप्टेंबर 1990 ला.>>> माझे वडीलही साधारण याच काळात इथे होते. दोन की पाच नंबर गेटला जेवण खूप भारी मिळायचं बोलतात. अजूनही त्याची आठवण काढतात कधीतरी.

पगार नाही पण कमिशन मिळाले. पहिल्या महिन्यात खूप कमी मिळाले होते Happy १५०० रूपये.
आता वर्षातून चार महीने काम केले तर वर्षभर पुरेल एव्हढे कमिशन मिळत राहते.

५०० रुपये. कॉलेज मध्ये कमवा आणि शिका योजना. २००३ साली बागकाम करायचो.
७२०० रुपये दर महीना २००७ मध्ये. पहिला जॉब Happy

2005 मध्ये मास्टर्स करीत असताना UGC कडून दर महा 5000 रुपये scholarship मिळत असे GATE qualified असल्यामुळे. त्यावेळी एकदम 6 महिन्यांनी 30000 रुपये मिळाले होते. पुढील semester ची फी भरायला ते वापरले होते.
इतके भारी वाटले होते ना तेव्हा.
नंतर ती scholarship फार उशिरा मिळालेली. आणि एका semester ची मिळालीच नाहीये अजून पर्यंत. आधी खूप प्रयत्न केले. आता नादच सोडून दिला.
DBT scheme अंतर्गत आताच्या मुलांना हिच scholarship दर महा डायरेक्ट त्यांच्या account मध्ये जमा होते.

पहिला पगार ३५ रु तास डी वाय पाटील कॉलेज मध्ये क्लॉक अवर बेसिस . सी ++ ट्युशन घेत होते पुण्यात एकूण पगार ७००० (साल २००३). माझा आणि बहिणीचा खर्च भागात असे . ती फार्मसी च्या लास्ट इयर ला होती . माझे पोस्ट graduation झाल्यावर १ महिना घरून पैसे मिळतील असे सांगण्यात आलं होते , यात नौकरी शोधायची . लहान असताना मी आणि माझी चुलत बहीण कालनिर्णय विकायचो प्रत्येक कॅलेंडर मगं १ रु. वाड्यातल्या , ओळखीच्या लोकांकडे जाऊन विकयचो . ( गरज नव्हती पण असेच ). मुंबईमध्ये लग्न झाल्यावर पहिला जॉब ५५०० साल २००४. नंतर पटनी कॉम्प्युटर्स मध्ये चांगली सॅलरी मिळाली.

Rs. 1600/- in 1983 - Trainee Engineer - Petroleum refinery . Donated first salary to my school.

५०० रु महिना व कमिशन हे काही फा र मिळाले नाही. युरेका फोर्ब्स अ‍ॅक्वागार्ड विकायचे. सिकंद्राबाद मध्ये मारड पल्लीत सकाळी सात ते ९ डेमो द्यायचे. व मग ऑफिसात जाउन पेपर वर्क. दोनच महिने ही नोकरी केली. मग नागार्जुना कोटेड ट्युब्स मध्ये ८०० रु. एडमिन असिस्टंट. मग कॉपिरायटर १००० रु. प्रतिमहिना. ऑल धिस इन १९८६ १९८८ काळात. १९९५ मध्ये चीफ कॉपी रा यटर म्हणून ६००० रु मिळाले तेव्हा ग्रेट वाटलेले. व फ्रीलान्स पण काम करून पैसे मिळायचे.

सातवी नंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत ओळखीच्या डॉ.कडे, घराशेजारील दवाखान्यात कम्पाउंडर म्हणून दोन महिने काम केले होते.. महिना ३०० रू/-

Pages