तुमचा पहिला पगार किती होता ?

Submitted by हाडळीचा आशिक on 7 January, 2021 - 03:21

पहिली शाळा, पहिला मित्र, पहिली मैत्रिण, पहिलं प्रेम आणि.......
आयुष्यात पहिल्यांदा मिळालेल्या गोष्टीचं महत्व निराळंच असतं.
तर पहिली नौकरी-पहिला पगार आणि त्या संबंधीच्या आठवणी या धाग्यावर

माझा पहिला पगार होता ९००रुपये प्रति महीना आणि ते वर्ष होतं १९९९. Happy
तुमचा ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

<< माझ्या शुन्य अनुभवासाठी जो मिळत होता तो ही चांगलाच होता >>
आय.टी.मध्ये कष्टाच्या तुलनेत, इतर क्षेत्रांच्या मानाने रग्गड पैसे मिळतात. (स्वानुभव)

माझा पहिला पगार इतका जास्त होता की सांगायला लाज वाटत आहे. नोकरी सोडून दुसरीकडे जायला त्रास झाला कारण नवीन जास्त पगार सोडा, आहे तितका पण द्यायला कुणी तयार होत न्हवते.

पहिला पगार रुपये १०,००० /महिना, साल २०१० क्षेत्र IT
पण तशी स्वतःची अशी पहिली कमाई म्हणजे ,
रुपये १००० , १९९८ साली शाळेत असताना बालचित्रवाणी मध्ये गायलेले तेव्हा ...

>> आय.टी.मध्ये कष्टाच्या तुलनेत, इतर क्षेत्रांच्या मानाने रग्गड पैसे मिळतात. (स्वानुभव)

ही मानसिकता बदलण्याची इतकी जरुरिनी आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही "क्ष" पगार मिळवता तेव्हा तुम्ही कंपनीला कमीत कमी "१० * क्ष" वॅल्यु अ‍ॅडिशन करता. जर तुम्ही तसे नसेल करु शकत तर तुम्हाला जावे लागते. म्हणूनच बरेच सॉफवेअर जॉब्ज अ‍ॅट विल सदरात मोडतात.

>> माझा पहिला पगार इतका जास्त होता की सांगायला लाज वाटत आहे. नोकरी सोडून दुसरीकडे जायला त्रास झाला कारण नवीन जास्त पगार सोडा, आहे तितका पण द्यायला कुणी तयार होत न्हवते.

याचाच दुसरा अर्थ असा कि तुम्ही मार्केटला तुमची तितकी लायकी आहे हे पटवून द्यायला कमी पडलात. जर तुम्ही कंपनीला "१० क्ष" व्हॅल्यु अ‍ॅडिशन करु शकता हे पटवून दिले तर तितका पगार मिळु शकतो.

नक्की काय म्हणायचे आहे? मी कधीच बॉण्ड लिहून दिला नाही, सगळे जॉब्स at-will च होते.

पगाराचा आणि लायकी/व्हॅल्यू ऍडीशन याचा काहीही संबंध नसतो. It is purely demand/supply game and negotiations.

>> पगाराचा आणि लायकी/व्हॅल्यू ऍडीशन याचा काहीही संबंध नसतो. It is purely demand/supply game and negotiations.

अगदी बरोबर. आत शिरण्यासाठी demand/supply game and negotiations.

पण एकदा आत शिरलात की त्या कंपनीत टिकुन राहयला (घेतलेल्या पगारावर) किंवा जसजशी वर्षे वाढत जातात तसतसे दुसरीकडे जॉब शोधायला (आहे त्या पगारावर किंवा ज्यास्त पगारावर) तुम्हाला तुम्ही किती व्हॅल्यू ऍडीशन करू शकता त्यावर पुढचे जॉब्स मिळतात. नविन कंपनीत बॅकग्राउंड तपासणे किंवा "हा कसा आहे" हे कॉमन ओळखीच्यांच्या लोकांना विचारणे या गोष्टी होतच असतात.

अर्थात तुम्ही लिहिलेला अनुभव आय. टी. क्षेत्रातील आहे. मी सॉफ्टवेअर डेवलमेंट बद्दल बोलत आहे.

लोकांचे पहिले पगार येत आहेत. वाचायला रोचक वाटत आहेत.
पण कोणी थेट धंद्यात उडी घेतल्याची पोस्ट अजून आढळली नाही..
मायबोली ऐवजी गुज्जूबोली असती तर चित्र वेगळे असते का Happy

कामाईबद्दल अगदी अगदी खरं सांगायचं झालं तर लहानपणी घरच्यांच्या नकळत चोरलेले चारआणे,आठआणे, रुपया ही पहिली कमाई होती. नन्तर दुसरी तिसरीत असताना भाषणात तिसरा नंबर आला होता तेव्हा सहा रुपये मिळाले होते. आमच्या इथे एक आईस्क्रीमवाला यायचा त्याच्याकडून मी रुपयाचं आईस्क्रीम घेत असे. सगळ्यात महागाच आईस्क्रीम पाच रुपये होतं. त्या बक्षिसाच्या पैशांनी ते पाच रुपयांचं आईस्क्रीम खतानाचा प्रसंग आजही कधीतरी आठवतो. नन्तर 2010 साली इलेक्ट्रिकल फिल्डमध्ये जॉब करायला सुरुवात केली तेव्हा आठ हजार पगार होता. पगाराचे/नोकरीचे पहिले काही महिने भारी वाटायचं पण नंतर जॉब चेंज केला तरी सहा सात महिन्यांनी कामात तोच तोच पणा यायला लागला आणि त्यासोबत मिळणाऱ्या पगाराबद्दलही काही वाटेनासं झालं. लहानपणी घरच्यांनी हातावर एक दोन रुपये टेकवले की होणारा आनंद आणि दुकानातून काय घ्यायचं याचं विचारचक्र जे मनामध्ये सुरू व्हायचं त्याची सर आता कशालाही नाही.

@अतरंगी
Heavy Engineering कंपनी >>>> नॅशनल हेवी का रे सोमाटणे फाट्याची ??
Submitted by आसा. on 7 January, 2021 - 18:47>>>>>>

नाही. मी मुंबईला होतो.....

>> वाचायला रोचक वाटत आहेत.
+1
शिकत असतानाच अंशवेळ नोकरी सुद्धा करत होतो. दोन संगणक प्रशिक्षण केंद्रांत शिकवण्याचे काम केले (त्यातले एक नामांकित होते). ९६-९७ साली. दोन हजार रुपये पगार. महिना झाला कि रक्कम हातात दिली जायची. Simple as that. इतरांनी सांगितले ते खरे आहे, ती रक्कम सुद्धा खूप मोठी वाटायची. पहिल्या नोकरीच्या पगाराचे फार अप्रूप असते.

कामाईबद्दल अगदी अगदी खरं सांगायचं झालं तर लहानपणी घरच्यांच्या नकळत चोरलेले चारआणे,आठआणे, रुपया ही पहिली कमाई होती.
>>>>>>
आमच्याकडे शेजारपाजारच्या काकाकाकूंना मी खाली जाऊन दुकानातून काही आणून दिले की ऊरलेले चाराठाणे ते स्वखुशीने माझ्या खिशात टाकायचे. आधी क्वचित मग हे वारंवार होऊ लागले तसे चार पैसे माझ्या खिशात खुळखूळू लागले.
जेव्हा हे घरच्यांना समजले तेव्हा ते माझ्यावर ओरडले आणि मग त्यापुढे सगळ्यांची कामे समाजसेवा खात्यात फुकटात करून द्यावी लागली. तसेच आता हा चाराठाणे कमिशनची अपेक्षा ठेवत नाही हे समजल्याने लोकं कामही जास्त सांगू लागली. पण अर्थात याचे तेव्हा काही वाटले नव्हते. हा संस्कारांचाच भाग होता.

चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपची दरवर्षी तुरळक रक्कम मिळायची ती सुद्धा दर वर्ष अखेरीस एकदमच हातात पडायची तेव्हा पगार झाल्यासारखे वाटायचे.
त्यातला एक पैसा आपल्या मनाने खर्च करायचा अधिकार नसायचा. पण तरी ते पैसे घरी आईच्या हातात देताना ऊर अभिमानाने भरून यायचा.

बापरे, प्रश्न वाचून मन झरकन भूतकाळात गेले आणि लंबी सफर करून आले. मी ग्रॅज्युएट होत असताना बँकेत, एलाइसी वगैरेत 90 दिवसांचे टेम्परारी जॉब्स मिळत. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जाऊन नाव नोंदणी करणे हे अतिशय महत्वाचे धर्म कर्तव्य मानले जाई. (हे एस्चेंज आहे का अजून अस्तित्वात)… तर शेवटच्या वर्षीची परीक्षा दिल्यावर सगळी धर्म कर्तव्ये पार पाडून मला अँप्रेनटीस म्हणून एका मोठ्या मल्टीनॅशनल मध्ये 1 वर्ष मिळाले व पहिला पगार रु 400 वजा 10 रु प्रॉ टॅक्स असा रु 390 मिळाला. ह्या गोष्टीला आता 34 वर्षे तरी झाली.... मी पहिल्या पगारातून एच एम टी चे घड्याळ घेतले होते जे आजही माझ्याकडे आहे.

बाकी नोकरी लागल्या दिवशी दोन्ही हातात भरून मावणार नाहीत इतकी प्रेझेंट्स घेऊन 'माँ, मुझे नौकरी लग गई', ओरडत घरी धावत यायचे एक स्वप्न हिंदी चित्रपट पाहून उराशी जपले होते. पण पहिल्या दिवशी ऑफिसात ऍडव्हान्स म्हणून पैही दिली नसल्याने हे स्वप्न स्वप्नच राहिले.

पगाराचं जाउदे...पण आकाशवाणी वर शा. संगीत गाण्याच्या पहिल्या रेकॉर्डिंगची बिदागी ₹. ४००/- मिळाली असे पुसटसे आठवते..१९९३ मधे.

१९९० : ईलेक्ट्रॉनिक्स. ईजिनियर : महिना ७५० रुपये, एका छोट्या कंपनीत. खुप चांगला अनुभव मिळाला त्या जोरावर दिड वर्षात बहु राष्ट्रीय कंपनीत चांगला जॉब मिळाला.
त्यावेळी संध्याकाळी तीन तास कॉम्पुटर डाटा फिड करण्यासाठी महिना २ हजार मिळत होते.

२००८: १५०० रु, परीक्षा झाल्यावर एका कन्सल्टन्ट कडे २ महिने होतो आणि मग
सी ए आर्टिकलशिप ला असताना २००९: ३००० रु २०१० : ४००० रु आणि शेवटच्या वर्षी २०११ : ६००० रु Happy पुण्यात राहूनही भागा(वा)यचं त्यात, घरून कधी मागावे लागले नाहीत !

तोवर शाळासोबती इंजिनीरिंग झाल्यावर कॅम्पस मधून ऍव्हरेज ~३-४ लाखाचे पॅकेज मिळवून मस्त मजा करत होते (शनिवार रविवार सुट्टी , ट्रेक , खाणे - 'पिणे' Wink काहीजण ऑनसाईट ) आणि आम्ही एक दोघे शनिवारपर्यंत ऑफिस आणि रविवारी अभ्यास असं सगळं करत होतो. परत धाकधूक फायनल परीक्षा क्लिअर होईल का ? की मे -नोव्हें वाऱ्या कराव्या लागतील.. छान मस्त दिवस होते ते !

१९८९ ऑडिट क्लर्क ४००. (पूर्ण महिना न भरल्याने प्रो रेटा पैसे मिळाले होते)
मग एका लह्नानशा पार्टनरशिप फर्म मध्ये ७०० रु मासिक.
१९८८ मध्ये BSRB मध्ये निवड झाली होती. पण रुरल पोस्टिंग मिळाल्याने जॉब नाकारला होता. परीक्षा देणं चालू होतं. मममानसिकतेनुसार पब्लिक सेक्टरमधली नोकरी शोधणे चालू होते.
पण घरी बसून खूप गिल्टी वाटायला लागल्याने मिळेल ती नोकरी करायची म्हणून या दोन नोकर्‍या केल्या.
तीन की चारच महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातल्या वित्त संस्थेत लागलो. पगार १४००-१५०० असावा , नक्की आठवत नाही. पी एस यू बँकांपेक्षा जास्त होता असं तिथून आमच्याकडे आलेल्यांनी सांगितलं होतं.
१९९१-१२ चा फॉर्म १६ मिळालाय. ग्रॉस इनकम ३६९०० दिसतंय. टॅक्स वाचवायला गुंतवणूक करायची असते वगैरे अक्कल तोवर आली नव्हती. त्यामुळे त्यावर्षीपासून आयकर कापला गेलाय. लवकरच पूर्ण गुंतवणूक करूनही टॅक्स लागेलच अशी स्थिती आली.

पहिल्या पगारातून की आठवत नाही पण पहिली खरेदी माझ्यासाठी टायटनचं घड्याळ -नेहरू जन्मशता ब्दी निमित्त त्यांची इनिशिअल्स असलेलं . तोवर बाबांचं जुनं घड्याळ वापरायचो.
पुढे एका दिवाळीला आईबाबा दोघांना घड्याळं घेतली होती.

माझा पहिला पगार सहाशे रुपये, वय सतरा, स्क्रीन प्रिंटिंग मध्ये मदतनीस म्हणून, मिळणाऱ्या पैस्यांनी हळू हळू माझा कॉन्फिडन्स परत मिळवून दिला होता.

मी कॉलेजला असताना एका मुलीचे एक महिनाच (कारण परिक्षा एका महिन्यात होती) ट्युशन घेतले होते त्याचे 300रू. मिळाले 2011 मध्ये पण फार आनंद झाला होता, नंतर Account classes सुरु केले गावात असल्याने महिना 6000 (2012-2015) मिळायचे त्यामध्ये आई आणि सासूबाई दोघींना साडी घेतली कारण मी शिक्षण घेत असतानाच क्लासेस घेत होते त्यामुळे त्यांचा खुप सपोर्ट असल्याने शक्य झाले, नंतर कॉलेजमध्ये नोकरी मिळाली 5आकडी पगाराने 2016 साली सुरुवात झाली पण त्या पहिल्या 100च्या तीन नोटा अजूनही जवळ आहेत ....

१९८६ - Bank - पहिला पगार १०३९/-
दर ३ महिन्यानी DA वाढतो किन्वा कमी होतो INDEX बदलाप्रमाणे , शक्यतो कमी होत नाही , नेमका फेब्रुवारीत join झाल्याने त्या महिन्यात DA वाढल्याने चार आकडी पगारात join झालो . तो पर्यन्त clerical starting salary तीन आकडीच होती.

पहिला पगार रु. १५ फक्त, सन १९८२, दहावी नंतरच्या सुट्टीत ३/३.५ महिने करायला घेतलेला. काम सकाळी ३ तास, मुख्य काम: देवपुजा करणे ( फारस्म नाही आवडायचं मला हे काम, अजून ही आवडत नाही) किरकोळ घरगुती कामे करणे. गावातले सधन असल्याम्मुळे खायला प्यायला, काही पदार्थ, वस्तू घरी न्यायला मिळायच्या . "प्रामाणिक पणे काम करतो " असे प्रमाणपत्र मिळाल्यामू ळे आनंदी झालो होतो. पुण्यात प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे हे काम सोडले.

"प्रामाणिक पणे काम करतो " असे प्रमाणपत्र मिळाल्यामूळे आनंदी झालो >>

हे महत्त्वाचे. पण दुर्दैवाने असे काही कौतुक क्वचितच वाट्याला येते, असा अनुभव आहे.

पगार ऑन लाईन ट्रान्सफर करतात

पण 1 रु रेव्हेन्यू स्टॅम्प चे कट करतात , आम्ही सह्या तर कशावर करत नाही.

आजच्या अकाउंट ट्रान्सफर च्या काळात 1 रु रेव्हेन्यू स्टॅम्प ह्या फॉर्मलीटीला काही अर्थ आहे का ?

पहिला पगार १२०००/- आयटी सेक्टर.साल २०१४. आईला साडी घेतली होती कुणाचं तरी लग्न होतं तेव्हा.

Pages