बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका मुस्लीम कुटुंबाकडे जेवायला गेलो असताना मी शाकाहारी म्हणुन त्या स्त्रीने वेज बिर्याणी बनवली होती. इतकी अप्रतिम बनवली होती की काय सांगु? त्यात वापरलेले बरोब्बर मसाले, त्यांचे प्रमाण व शिजवण्याची बरोब्बर पद्धत यामुळे ती इतकी अफलातुन झाली होती. त्यात वेज घातलेले असते की नॉनवे़ज त्यामुळे चव वेगळी येते इतकेच. मुळ मसाले, प्रमाण, बनवण्याची पद्धत तीच असते. म्हणुन तर त्याला बिर्याणी म्हणतो आपण. नाहीतर मटन पुलाव हा प्रकार अस्तित्वात पण नसता.

पण बिर्याणी बनवणे हे अवघड प्रकरण आहे किमान माझ्याकरता तरी.

आमच्या साताऱ्याचे कंदी पेढे प्रसिद्ध आहेत, >> वर कुठे तरी एका प्रतिसादात मी कोल्हापूरच्या पदार्थांनी कसं डीसअपॉइंट केलं ते लिहिलं. अगदी तसच सातारी कंदी पेढ्यानी पण अपेक्षाभंग केला. परवा कोल्हापूरहुन येताना मोदींचे कंदी पेढे घेतले, पण नाही आवडले. यापेक्षा राजकोट आणि धारवाडचे पेढे फारच आवडले होते.

माझा प्रतिसाद अवांतर वाटेल, पण माझा मुद्दा असा आहे की चव आणि आवड ही गोष्ट फारच व्यक्तीसापेक्ष असते.

अंडा बिर्याणी कूकर मे पाककृती - कबिता ताई

https://www.youtube.com/watch?v=gVLpdg_HtTM

याची लिंक मागायच्या निमित्ताने बायकोला फर्माईश सुद्धा केली. त्यामुळे या आठवड्यात खायचा योग येईल पुन्हा.
धन्यवाद पाककृती मागितलेल्यांचे Happy

अरे हो, प्लीज हि बिर्याणी ऑथेंटीक आहे का जाणकारांनी तपासून सांगावे Happy
आणि रसिकांनी बनवून, चव चाखून स्वाद सांगावा...
मला तर फार आवडलेली Happy

साताऱ्याच्या कंदी पेढ्यांपेक्षा मला मिरजेच्या बसपा चे कंदी पेढे छान वाटतात.

मला तर आवडतात सातारा कंदी पेढे. अर्थात मी तिथला जावई असल्याने मला चांगले आणि अस्सल बनवून देत असतील. कल्पना नाही. पण मला वाटते एखाद्या ठिकाणची एखादी गोष्ट प्रसिद्ध आहे म्हणून ती कुठेही घेतली तरी एकसारखीच चांगली असेल असे नसावे.

जसे काही लोकं मुंबईला येऊन कुठेही गल्लीबोळातला कळकट मळकट वडापाव खातात आणि मग आपल्या गावी परत जाऊन सांगतात, उगाच हवा आहे वडापावची काही खास नाही. अश्यातला प्रकार तर नाही ना हे देखील जरूर बघावे.

मी वालचंद सांगलीला असताना तिथे एकाने वडापावची गाडी टाकलेली आणि नाव दिलेले मुंबईचा वडापाव. आणि एवढा बकवास वडापाव विकत होता की आम्ही मुंबई गँगने त्याला जाम शिव्या घातलेल्या. बाकी काही नाही, पण मुंबईचे नाव बदनाम होते यार Sad

>>मी कोल्हापूरच्या पदार्थांनी कसं डीसअपॉइंट केलं ते लिहिलं.
हो वाचल तेही! अगदीच अरेरे झाल कारण त्या ठिकाणांना भेटी दिल्याशिवाय आमची कोल्हापूरची ट्रीप पूर्णच होत नाही.... त्यात अजुन एक खासबाग मिसळ पण जोडा!
पण तुम्ही म्हणता तसे या गोष्टी आवडणे न आवडणे अगदी व्यक्तिसापेक्ष आहे!
बाकी मोदींचे पेढे म्हणून हायवेवर बरीच आउटलेट निघालीत पण मोती चौकातल्या अशोक मोदींच्या दुकानातले ताजे ताजे कंदी पेढे हे खरे कंदी पेढे Happy

तुझी बायको सातारची आहे हे माहीत नव्हतं ऋ.

अंडा बिर्याणीचा उल्लेख मी पण केलेला की मागच्या पानावर. बिनडोक चर्चेत इग्नोर झाला असेल. माझ्याकडे फोटो नाहीये पण व्हिडीओ आहे

मृणाली, मधुराची रेसिपी पण मस्त आणि सोपी आहे. तिची बडबड म्युट करायची आणि डिस्क्रिपशन मध्ये रेसिपी वाचायची

साताऱ्याच्या कंदी पेढ्यांपेक्षा मला मिरजेच्या बसपा चे कंदी पेढे छान वाटतात.
>>> मथुरा चे पेढे मला आवडतात..

अंडा बिर्याणी फोटो पाहून आठवले. हैद्राबादला कुठे कुठे अप्रतीम बिर्याणी मिळेल सांगता येत नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या ऑफिस जवळ एक रेस्टॉरंट निघाले. तिथे मटण, फिश आणि अंडा बिर्याणी अप्रतिम मिळायच्या. दर शनिवारी (टूर वर नसलो तर) आम्ही चार कलिग्स तिथे जाऊन या तिन्ही बिर्याणी ऑर्डर करून शेअर करून खायचो. पाच सहा वर्षे ते रेस्टॉरंट तिथे होते नंतर दुसरीकडे लांब शिफ्ट झाले. या पाच सहा वर्षात आम्ही दुसरी कडे गेलो नाही बिर्याणी खायला. कुणी पाहुणे आले त्यांना खास हैद्राबादी बिर्याणी खायचीय तर तिथे घेऊन जायचो. फक्त कुणी व्हेज बिर्याणी खाणारे असेल तरच पॅराडाईझला जायचो.

आता अंडा बिर्याणी खायची असेल तर जुन्या एअरपोर्ट जवळ उर्वशी म्हणुन एक रेस्टॉरंट आहे, तिथे जातो बरेचदा खास अंडा बिर्याणी खायला.

बेळगाव हून धारवाड ला जाताना एका चौकात एक प्रसिद्ध दुकान आहे(मला तो चौक आणि दुकान दोन्ही चं नाव आठवत नाही.)
तिथे एखाद्या मोठ्या बेसन लाडू च्या आकाराचे सुंदर थोडे ओलसर कंदी पेढे मिळतात.
एकदा ते खाल्ले की पुण्यातल्या दुकानांमधले कोरडे वाटायला लागतात.
अर्थात प्रत्येक कुक चा एक हात असतो.अमके चांगले तमके वाईट असे ठरवता येत नाही.
पदार्थ ताजा, चांगल्या हायजीन प्रॅक्टिस वापरून केलेला असला म्हणजे झालं.

तुझी बायको सातारची आहे हे माहीत नव्हतं ऋ. >>>> मी सुद्धा कन्फ्यूज होऊन आता कन्फर्म केले परत. कारण कराड-सातारा अशी दोन्ही नावे घेत असतात, तर गाव सातार्‍याचेच आहे. एक राहते घर कराड विद्यानगरीत. आणि सासूबाईचे माहेर सांगली. थोडक्यात त्या पुर्ण ईलाक्याचा मी जावईबापू आहे बोलायला हरकत नाही Happy

अंडा बिर्याणीचा उल्लेख मी पण केलेला की मागच्या पानावर. बिनडोक चर्चेत इग्नोर झाला असेल. >>> हो का, मग झाला असेल इग्नोर. तिथे एवढे घमासान चालू होते, पण माझा विशेष सहभाग नाही, यानेच माझा जळफळाट झाला आणि मी ते पुर्ण पानच इग्नोर केले Happy

बिर्याणी ऑथेंटीक आहे का जाणकारांनी तपासून सांगा >>
या वरून सुचले. निवृत्त झालो की आणि तर, मी मुंबई पुण्याला येऊन Tea Taster, Wine Taster वगैरे असतात तसे Hyderabadi Biryani Taster चे काम करू शकतो.

चांगली आहे रेसिपी रुन्मेष . कबिताच्या रेसिपी छान असतात.

बाकी जळफळाट होण्याचे काय कारण ? संबंध नसताना कुठेही किल्ली ( आयडी नव्हे) मारल्यासारखं चालू व्हायचं की हास्यास्पदरित्या Biggrin . पुढच सगळं होतं आपोआपच Wink
हाकानाका

साताऱ्याच्या कंदी पेढ्यांपेक्षा मला मिरजेच्या बसपा चे कंदी पेढे छान वाटतात.
>>
क्या बोले बोकलत बहोत सही. ते बसपा नाही तर बसाप्पा आहे. सध्या तुम्ही राहता तिथेच जवळ या बसाप्पांचे घर आहे व बाहेरच एक छोटेखानी दुकान. मुख्य दुकान गावात मेन मार्केटमध्ये आहे. मिरजेच्या तसेच वाडीच्या पेढ्यांची सर कुठेच नाही.

सातार्‍याच्या कंदी पेढे व मिरज/नरसोबावाडी/कुरुंदवाड/गणेशवाडी इथे बनवण्यात येणार्‍या खव्याचे पेढे म्हणजे पुलाव आणि बिर्याणी Happy दोन्हीच्या बनवण्याच्या पद्धतीत चांगलाच फरक आहे.
खव्याची प्रत (क्वालिटी) मिरज/नरसोबावाडी/कुरुंदवाड/गणेशवाडी भागात अत्यंत उच्च असते. म्हणून ते पेढे चांगले लागतात. एकुणातच वाडीच्या आसपासचे दुधाचे पदार्थ बासुंदी वगैरे फार उत्तम असते. तिथे वाढलेले काही आयडी इतके कडू कसे हे मात्र एक कोडंच आहे Light 1

Not sure what's wrong with you. मुळात प्रश्न हा तुला पॉईंट करून नव्हता. व्हेज बिर्याणी म्हणजे पुलाव हे अनेकांकडून ऐकलंय सो त्यापैकी कोणाही एकाला होता. तू उत्तर दिलंस म्हणून पुढचं डिस्कशन तुझ्यासोबत झालं.

तुझ्या मनाविरुद्ध प्रतिसाद आले तसा तुझा थयथयाट सुरू झाला. मग मूर्खांचे नंदनवन वगैरे लेव्हलला तूच पोहचलीस.

पुढे अगदी तू ज्यांच्या ज्यांच्या पोस्ट मधून वाक्य कोट करून लिहीत आहेस त्या सगळ्यांनी 'व्हेज बिर्याणी असते' हे मान्य करूनही सोयीस्कर रित्या त्याकडे दुर्लक्ष केलंस. गंमत म्हणजे मी पहिल्या काही पोस्ट मध्ये जे मुद्दे मांडलेत तेच सगळ्यांनी मांडलेत.

मग व्हेज बिर्याणी असते ला अनुमोदन आले तसे तुझं एका आयडीचं अटेंशन सिकिंग सुरू आहे वगैरे सुरू झालं. इतर बीबी वर मी व्हेजिटेरिन लोकांसारखी नाजूक नाही वगैरे करून झालं. आम्ही पुढच्या चर्चेला पोहचलो तरी आपलं याचा जळफळाट सुरू आहे त्याचा जळफळाट सुरू आहे इत्यादी प्रकार चालू झाले आहेत.

मला ना व्हेजिटेरियन असल्याचा अभिमान आहे ना नॉन व्हेज न खाल्याचं दुःख आहे. बिर्याणीची रेसिपी माझ्या पूर्वजांनी लिहिलेली नाही अथवा ती माझी कुलदैवत नाही की तिच्यासाठी मी एवढा जीव तोडावा
मुळात या विषयावर अटेंशन सिकिंग अथवा थयथयाट करण्यापेक्षा माझ्याकडे अनेक दुसरे मुद्दे आहेत जे मी वापरू शकते त्यामुळे मला तुझ्याकडून महत्व हवं आहे वगैरे वाटत असेल तर प्लिजच. आणि सोशल नेटवर्किंग मध्ये स्वतःला कोणासमोर सिद्ध करायची गरज नसते एवढी मचुरीटी माझ्यामध्ये आली आहे . तेंव्हा ज्यांना अजूनही असं करावं वाटतं किंवा इतर कोणी असं करत असेल असं वाटत असेल तर खूप साऱ्या शुभेच्छा!

थोडक्यात त्या पुर्ण ईलाक्याचा मी जावईबापू आहे बोलायला हरकत नाही
>>>
मग आता तुला दादा न म्हणता जीजू म्हणावं की काय?

Craps, कॅट फाईट Biggrin 2 वर्षाच्या मुलाची आई आहे हो मी (म्हणजे आता लहान नाही राहिले) , असल्या गोष्टीमधला इंटरेस्ट केंव्हाच गेला

व्हेज लोकांसाठी - तुम्ही कठल ( फणस) बिर्याणी खाल्ली आहे का? नॉन व्हेज बिर्याणी च्या तोंडात मारेल इतकी भारी असते...

एकुणातच वाडीच्या आसपासचे दुधाचे पदार्थ बासुंदी वगैरे फार उत्तम असते.///

करेक्ट. वाडीची बासुंदी आता कोथरूडमध्येही उपलब्ध असते. मला फार आवडते.
मोदी पेढे आम्हिही सातारा हायवेवर घेतले होते ते एकदम फ्रेश आणि छान होते. त्यांचं पुण्यात कर्वे नगर मध्ये आऊटलेट आहे आता.

परत अटेन्शन सिकिंग Uhoh काय प्रॉब्लेम आहे देव जाणे या आयडीला.

खूप बिल झाल. कंटाळा आला सध्या .

>> कठल ( फणस) बिर्याणी

बिर्याणी खाल्ली नाही पण कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी खाल्ली आहे व ती मटणला तोडीस तोड असते वादच नाही.

चला मी मुद्यावर येते.

मिशिगन मध्ये हैदराबादची पॅराडाईज बिर्याणी मिळते. मी आत्तापर्यंत खाल्लेली सगळ्यात बेस्ट बिर्याणी असं म्हणू शकेन इतकी सुंदर आहे. आणि ही अजिबात अमेरिकनाईझड झालेली नाही. तिचं माईल्ड व्हर्जन पण माझ्यासाठी तिखट म्हणावं असं आहे. नवरा त्यांची तिखट बिर्याणी खातो.
मिशिगनला गेलात तर नक्की try कराच

Pages