बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्पा एका लेखात बोललेले बिर्याणी लुसलुशीत झाली पाहिजे नाहीतर त्याचा मसाले भात होतो, अगदी खरे. मी मार्च मध्ये तमिळनाडू ला गेल्यावर दिंडीगुल थालप्पाकट्टी मधली मटण बिर्याणी टेस्ट करून बघणार आहे. खूप ऐकलंय. रीव्ह्यू देईलच तसा.

बिर्याणी आवडत नाही म्हणणारी माणसं असतात. Sad हे फार वाईट आहे. Lol
आणि अजुन चांगली बिर्याणी खायला मिळाली नसेल हे फार दुर्दैवी आहे.
लोक काय एकेक वर्णनं करु लागलेत हेट करायच्या धाग्यावर.
मागच्या आठवड्यात चारकोल ची अफगाण बिर्याणी खाल्ली. चांगली आहे. वेगळा फ्लेवर.
आता नणंदबाई बांद्र्याला नेणार आहेत कुठलीतरी फेमस बिर्याणी खायला.
उत्तम बिर्याणी मिळणारी ठिकाणं सांगा लोक्स. मुंबईतली. हैद्राबाद नको Happy

कुठला ही खाद्यपदार्थ आवडता आणि नावडता यात मोडतो, शेवटी प्रत्येकाची आवड-निवड. माझ्या बाबतीत थोडे विचित्र आहे, कोणी अगदी तोंड फाटेपर्यंत एखाद्या खाद्यपदार्थाची स्तुती करत असेल आणि तो जर मी चाखून पाहिला तर त्यादिवशी तो हमखास बिघडलेला असतो. अगदी स्तुती करणारे पण मान्य करतात खरेच काहीतरी बिघडले आहे. त्यामुळे आता मी शक्यतो असे काही असेल तर त्यावेळी खाण्याचे टाळतो आणि नंतर काही दिवसांनी खाऊन बघतो. बिर्याणी बाबतीत असे काही वेळा घडले आणि त्यानंतर शक्यतो फक्त बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणीच चव घेतली आहे.

उत्तम बिर्याणी मिळणारी ठिकाणं सांगा लोक्स. मुंबईतली. हैद्राबाद नको >>>

हे म्हणजे असं झालं:
उत्तम वडापाव मिळणारी ठिकाणं सांगा लोक्स. हैद्राबादेतली. मुंबईतली नको.

आता नणंदबाई बांद्र्याला नेणार आहेत कुठलीतरी फेमस बिर्याणी खायला.>>>> नाव कळू द्या.

उत्तम बिर्याणी मिळणारी ठिकाणं सांगा लोक्स. मुंबईतली. >>>>>> कुलाब्यातील दिल्ली दरबार! क्ष वर्षांपूर्वी खाल्ली होती.मस्त साजूक तुमाचा घम्घमाट!त्यांचे सर्व खाणे अलंकार टॉकीजजवळ असलेल्या दिल्ली दरबारमधे बनते असे ऐकले होते.ख्खोदेजा.नंतर चिकन खाणे सोडल्याने परत त्या वाटेला गेले नाही.
हा धागा आणि अमांचे प्रतिसाद वाचून परत एकदा चिकन खावे का या विचारात आहे.

अंजली, तुम्ही जशी व्हेज बिर्याणी ची रेसिपी टाकली आहे तशी चिकन बिर्याणी ची पण रेसिपी टाका
म्हणजे बनवायला सोपे पडेल आम्हा नवशिक्या लोकांना

हा धागा वाचुन बिर्याणी केली कालच घरी. आता जीव शांत झाला.
बर्‍याच हॉटेल मधे मिळणारी मसालेदार बिर्याणी ही बिर्याणी नव्हेच...उगीच मसाला वेगळा, त्यावर वर रंग घातलेला भाताचा थर आणि वरुन परत रोटी चिकटवुन मटका दम बिर्याणी म्हणुन फसवतात. तिखटजाळ मसाला आणि फडफडीत शिजलेला जिरा राइस चा तांदुळ म्हणजे शुद्ध फसवणुक आहे.
बिर्याणी कशी तासभर दम देउन शिजली पाहिजे. एक न एक तांदुळ उमलुन आला पाहिजे मोगर्‍याच्या पाकळीसारखा.
आणि कमी तिखट तरी चवदार आणि तलम ( हो तलम च म्हणायचय...) मसाला असला पाहिजे...वरुन तळला कांदा आणि खमंग तललेले काजु....तीच खरी बिर्याणी.
त्याच्यासोबत मग रायता , रस्सा काही काही नसलं तरी चलता है...

आवांतर :
लहानपणी ची बिर्याणी ची सुरेख आठवण आली.आमच्या घरासमोर सुतार चाचा रहायचे.त्यांचं इस्त्री चं दुकान होतं. त्यांच्या मुली आमच्याच वयाच्या होत्या.सणावारी एकमेकांकडे ताटं जायची. दिवाळी ला आमच्या कडुन फराळाचं ताट आणि ईद ला त्यांच्याकडुन शीरखुर्मा यायचाय.
ईद ला अजुन एक गोष्ट न चुकता आमच्या कडे पोचायची ती म्हणजे "बिर्यांणी".
ईद च्या आधी च्या आठवड्यात त्यांच्या अंगणात एक दिवस सुका मेवा चिरणे आणि लसुण सोलायचा कार्यक्रम व्हायचा.. हो कार्यक्रमच..त्यांच्या ५-६ नातलग बायका एकत्र येउन हा एवढा पातेले भरुन सुकामेवा बारीक बारीक चिरायच्या आणि लसुण सोलायच्या.
ईद च्या आधल्या दिवशी असलम चाचा स्वतः रात्री बिर्याणी बनवयला घ्यायचे..त्यांच्या घरामागे छोटं परसदार होतं तिथे चुल मांडायचे. बिर्याणी करायचं पातेल हे भलं मोठं...चार-पाच वर्षे वयाची २ लहान मुलं आत मांडी घालुन बसु शकतील एवढा त्याचा घेर होता. भाभी आणि बाकी मुली त्यांच्या हाताखाली काम करयच्या....पहाटे कधीतरी कोळशाच्या दम वर ते पातेलं चढलं की सकाळी ७-८ पर्यंत मंद आचेवर दम देत बिर्यांणी पकायची...ईद दिवशी सकाळी ६ चा नमाज पढुन परत घरी आलं की मग चाचा पातेलं उघडायचे...ईद दिवशी सकाळी ८ वाजता घरात बिर्यांणी ची थाळी आणि सोबत रस्सा पोचलेला असायचा....त्या दिवशी सकाळी नाष्टा कम जेवण तेच असायचं आमचं....
इतकी तलम , अलवार बिर्याणी मी पुन्हा कधीही खाल्ली नाही....
आजही बिर्याणी म्हटलं की चाचा आठवतात...तशी चव आता परत नाही चाखायला मिळणार...पण मला बिर्याणी आवडण्याचं सगळ्यात मोठं कारण असलम चाचांच्या हातची बिर्याणी हेच आहे....

आता काही दिवसांनी या धाग्याचं नाव बदलायची वेळ येइल असं एकुण प्रतिसादांवरुन दिसतेय... Wink

अमां नी कांदा कुरकुरीत तळण्यासाठी छान उपाय सांगितला.. माझा ताप बराच कमी होईल आता. Bw

बिर्याणी मधे ड्रायफ्रुट्स अन मनुके घातलेले थोडे ऑड वाटते खरे.. ते पुलाव मधे छान लागतात. लज्जतदार बिर्याणी जितकी आवडते तितकाच ड्रायफ्रूट्स अन मनुके घातलेला गोडसर कश्मीरी पुलाव ही मला आवडतो.

पुण्यामध्ये कुठे चांगली बिर्याणी मिळते ? मागे एकदा कर्वे रोड वरून घेतली होती, रेस्टॉरंट चे नाव आठवत नाही पण एकदम बंडल होती

मला वाटते कुठे चांगली बिर्याणी मिळते याबाबत बिर्याणी लव्हर्स/फॅन क्लब असा एखादा धागा काढला तर बरे होईल. (जसे वडापाव फॅन क्लब धागा आहे). त्यानिमित्ताने कुठे कुठे चांगल्या बिर्याणी मिळतात ती माहिती एकत्रित होईल. वरती च्रप्स यांनी हैद्राबाद मधली ठिकाणे दिली आहेत. धन्यवाद च्रप्स.

ज्यांना आवडत नाही बिर्याणी त्यांनी इथे लिहावे.

मागे एकदा कर्वे रोड वरून घेतली होती, >>>> कर्वे रोडवरून कोणी बिर्याणी ऑर्डर करतं का? Wink

बिर्याणी ऑर्डर करावी, फातिमा नगर, साळुंके विहार रोड, NIBM, कॅम्प या भागातुन.
PEO (Pune Eat Outs) म्हणून एक FB ग्रुप आहे, तो जॉईन करा. असंख्य केटरर्स, हॉटेल्स आणि होम कुक्सच्या बिर्याणीचे ग्राहकांनी लिहिलेले रिव्ह्यूज वाचायला मिळतील. फक्त बिर्याणी नाही तर बाकीही अनेक. छान FB ग्रुप आहे.

बाकी वर नरेनने लिहिल्या प्रमाणे मी अतिकौतुक झालेल्या ठिकाणी खाल्लेलं फूड हमखास आवडलं नाही. काल पहिल्यांदा कोल्हापूरची मिसळ खाल्ली तर पुण्याचीच मिसळ बरी असते हे कळुन चुकलं (मी मिसळ फॅन नाही). सोळंकीचं आईस्क्रीम खाल्लं ते पण ओव्हर hyped. प्रचंड शोधाशोध करून कोणी राजाभाऊची (65 वर्षांची परंपरा) भेळ खाल्ली, ती पण टंपड होती. आणि हे बायस्ड मत नाही. खूप मोठा बायकर्सचा ग्रुप होता आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक होते, पण सगळ्यांच मत असं होतं.

त्यामुळे हेटही करू नये आणि उच्च अपेक्षाही ठेऊ नयेत. जेव्हा जे आवडेल ते appreciate करावं हेच बरं. अन्न शिजवण वेगवेगळ्या कारणांनी कधी कधी फसतं आणि कधी कधी अप्रतिम चवीचं होतं. शिवाय प्रत्येकाच्या टेस्ट बड्स वेगवेगळ्या असतात हे तर सत्य आहेच.

पिंपरी चिंचवड मधील पण >> आबासाहेब, कोकणे चौकात चितळे शॉपच्या कॉम्प्लेक्स मध्ये तिसऱ्या मजल्यावर कराची म्हणून आहे तिथे गुळचट चवीची पण सो कॉल्ड शाही बिर्याणी मिळते. मला ओके ओके वाटली. हैदराबाद हाऊस तर तुम्हाला माहित असेलच. त्याशिवाय मला आवडणारी बिर्याणी म्हणजे डांगे चौकापाशी (काळेवाडी फाट्याकडून डांगे चौक जाताना, सर्व्हिस रोडला लागून आहे म्हणून न चुकता डांगे चौकाच्या अलीकडून सर्व्हिस रॉड पकडा) दिल्ली दरबार म्हणून आहे. मशीदीला जोडून असलेलं हे रेस्टोरंट अप्रतिम आहे सामिष खाण्यासाठी. तंदुरी चिकन, चिकन खिमा, आणि इतर करी डिशेससुद्धा बेस्ट आहेत.

मझ्या ऑफिसच्या बाजुच्याच बिल्डिंगमधे दिल्ली दरबार आलंय. आनंदाने नाचत गेलो. पण हिरमोड झालेला. बिर्याणी आजिबात चांगली नव्हती.

मझ्या ऑफिसच्या बाजुच्याच बिल्डिंगमधे दिल्ली दरबार आलंय. आनंदाने नाचत गेलो. पण हिरमोड झालेला. बिर्याणी आजिबात चांगली नव्हती.
>>>>

कुक घाबरला असेल, एकदा न नाचता जाऊन बघा Wink Light 1

बांद्र्याला फेमस बिर्यानी -> लकी रेस्टोरेन्ट >>> एक्दा मुद्दामून जाउन आणली होती . अज्याबात चव आवडली नाही

बान्द्र्याला एक अलि'ज बिर्यानि आहे . ती , लकी पेक्शा पन्नास पटीने आवडली

बांद्रा लकी ची पण बिर्याणी खाल्ली आहे पण मला शालिमार.. मोहंमद अली रोड ची दम बिर्याणी जास्त आवडते.. खाल्ल्यावर हेवी फीलिंग येत नाही..

आपण काय बिर्याणीचे फॅन बिन नाही (अर्थात नॉन व्हेज खात नसल्यामुळे "हाय कंबख्त तूने पी ही नही" वगैरे लोक म्हणू शकतात).... कधीमधी महीन्यातून एखाद्या वेळेला कलीग्स बरोबर जाउन हैद्राबाद हाउस, अरोमा वगैरे ठिकाणी खाल्लेली काजू बिर्याणी बरी लागते.... क्वचित कधी तरी घरी पातेल्यात भाज्यांचे थर लावून आणि तो कुरकुरीत कांदा वगैरे पेरुन करतो बिर्याणी पण ते तितकेच!
फॅन वगैरे नक्कीच नाही Happy

एकदा न नाचता जाऊन बघा >> हर्पेन किती हसवाल? Rofl

बिर्याणी आवडते (शाकाहारी) ... पण तिखटजाळ नसलेली जास्त आवडते म्हणजे मग घास खाल्यावर जाहिरातीत दाखवतात तसं डोळे मिटून अहाहाहा करता येतं

कोकणे चौकातलं हैद्राबाद हाऊस बंद झालं ना?
पिंपरी मधल्या तिरंगाची बिर्याणी पण छान असते म्हणे ( मी व्हेज बिर्याणी खाणाऱ्यांमधली पण नॉट फॅन)

व्हेज बिर्याणीला पुलाव म्हणणारे इंडो चायनीज ला काय नावाने बोलावतात म्हणे ?

आता बिर्याणी साठी प्रसिद्ध हॉटेलांची नावे येतच आहेत तर पुणे कॅम्पातले ब्लू नाईल चा उल्लेख होणे आवश्यक वाटते

Pages