भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंकीला निंटेंडो गेमवरची मारियो रेस बघत बसायला खूप आवडतं. अगदी टिव्हीला नाक लावुन बसलेला असतो. म्हटलं तुला चष्मा लागेल Proud त्यातले ग्राफिक्स जसे हलतात ते एकटक बघत बसतो. पंजा मारतो मधेच बॉल वगैरे दिसला की आणि सॅमीला काही घेणं देणं नसल्यासारखं
बरोबर टीव्हीकडे पाठ करून उलट्या दिशेला बघत बसलेली असते. Lol

हा धागा खरंच स्ट्रेसबस्टर आहे. >>> +१
मी पण हा धागा वाचत असतो.
सगळ्यांचे भूकिस्से मस्त एकदम

आशू - आता एखाद्या रविवारी ओडीन गटग प्लॅन कर.

खरं तर ह्या बाफ वरचे कुत्रे मांजरे ह्यांचे एक डॉग व कॅट शो असे काहीतरी करता येइल. आज शनिवार मला यायचे होते हपिसा त पण कंटाळा आला होता. आज वॉक मध्ये सर्व पपीज ची आई एक आहे देवी. ही रिकाम्या प्लॉट मध्ये वाळक्या पानांवर आरामात पहुडली होती. आम्हाला बघून आली. तिला पोट भर अन्न दिले. हिचे डोळे अगदी सोनेरी आहेत. बरोबर अंगावर पां ढरे ठिपके असलेले माउ पण लक्ष ठेउन होते बाकी गृपला आधीच देउन झालेले.

मग टर्न घेउन घराकडे निघालो तर गुड्डल आली तिच्या समोर सर्व खाउ ची बॅग रिकामी केली. घरा जवळ हरणी होती पण अन्न संपलेले

मग हपिसला जाताना तिला दोन मुठी अन्न दिले. ही पण छान उन्हात पहुडलेली होती. वॉचमन माझावर ओरडला नाही नशीब.

मला टाइम्स बरोबर ये णारा बोम्बॅ टाइम्स व मुंबई मिरर झोपून वाचायची सवय आहे. पण माझ्या जागी स्वी टीच झोपून गेली. मग काय
आले आवरून हपिसात.

आज रात्री पिक्चर बघायला जाणार आहे. आम्ही अवेळी बाहेर जाणार असलो की तिच्या साठी मुंबई पुणे मुंबई लावून जातो. मग ती पाच मिनिटे रडून शांत बसते.

आम्ही अवेळी बाहेर जाणार असलो की तिच्या साठी मुंबई पुणे मुंबई लावून जातो. >>>> हे भारी आहे Lol कदाचित त्यातले बोलणे, आवाज आपल्या घरातल्यांसारखे वाटत असावेत Happy

https://youtu.be/sLHR2C23b8U

ओडीन वर मी एक शॉर्ट व्हीडिओ बनवला आहे, त्याच्या पिल्लू असल्यापासून आज एक वर्षाचा होईपर्यंत.
पहिलाच प्रयत्न आहे, कसा वाटतोय ते प्लिज सांगा

पहिलाच प्रयत्न आहे, कसा वाटतोय ते प्लिज सांगा>>>> एकदम मस्त आहे.पुढच्या व्हिडिओच्यावेळी बॅकराउंड म्युझिक एकदम मंद ठेवा.
तुमच्या दोन्ही मुलांना हॅपी बर्थडे! God bless them.
खूप समृद्ध जीवन जगता आहत तुम्ही ओडीनमुळे.अर्थात त्यासाठी त्रासही घेत आहातच.बाकी तुम्च्या ह्या धाग्यामुळे मी यूट्यूबवरील मॅक्सचे(लॅब्) व्हिडिओज पहायला लागलेय.

छान आहे व्हिडीओ

ओडीन आणि तुमच्या चिरंजीवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

धन्यवाद
ते आवाज पण गंडला आहे आणि काही ठिकाणी टेक्स्ट पण फास्ट निघून जातंय
इतके ढीगभर फोटो आणि व्हीडिओ असताना काय निवडावं हेच कळत नव्हतं
आणि व्हिडीओ एडिट कसा करतात हेही माहिती नव्हतं
युतुयब वर बघून एक जमवला
सगळे व्हीडिओ एडिट सॉफ्टवेअर महाग आहेत
त्यातल्या त्यात एक बेसिक फीचर्स वाला सापडला फुकट मध्ये

पुढच्या वेळी अजून जरा वेगळा करता येईल

छान विडीओ! ओडिनला आणि त्याच्या दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि उत्तम आशिर्वाद!

ओडीन साठी श्वान फूड मागवलं होत स्पेशल
त्याचाच केक सारखा आकार केला आणि त्यावर मेणबत्ती लावली
कसा तरी त्याने धीर काढला हॅपी बर्थडे म्हणे पर्यंत आणि मग तुटून पडला

ऐकतर सगळे जण आज स्पेशल लाड करत होते त्यामुळे लैच खुशीत होता
सगळ्यांच्या गळ्यात पडून चाटून झालं
त्याचेच नेहमीचे मित्र होते त्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता
आणि भुभु मित्रांना ग्राउंड वर जाऊन भेटलो, त्यांना सगळ्यांना ट्रीट म्हणून डॉग बिस्कीट आणि चिकन स्टिकस नेल्या होत्या
मग काय धमाल नुसती

मी वाचते हा धागा पण कधी कमेंट नाही दिली..मी पण डॉगी प्रेमी मध्ये मोडते Happy
ओडीबाळ आणि बाकी सर्वांचे भुभु खूप क्युट आहेत Happy
ऑडिन आणि champ दादा तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!! Happy

वाढदिवसाच्या शुभेच्छा Odin ला

Video >> ओड्याच्या खोड्या Lol

त्याच्याबद्दल इतकं माहीत झालंय की ओडिन म्हणणं फॉर्मल वाटतंय...ओड्या लाडाच नाव वाटतं Happy

धन्यवाद सर्वांना

त्या व्हीडिओ वर कुणा मायबोलीकरांची कमेंट होती, हाच तो कॅनाल का
पण आता दिसत नाहीये

तर होय तोच हा कॅनाल :

आशुचॅंप, ओडीनला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. व्हिडिओ छान झालाय. तुम्हां सगळ्यांचं प्रेम दिसून येतंय.

ओडीन वर मी एक शॉर्ट व्हीडिओ बनवला आहे, त्याच्या पिल्लू असल्यापासून आज एक वर्षाचा होईपर्यंत.
पहिलाच प्रयत्न आहे, कसा वाटतोय ते प्लिज सांगा - फार फार गोड आहे हे पिल्लू
हा कॅनॉल कुठं आहे . आमच्या हिरो ला नेता येत का बघते तिथे

चित्रातील स्पॉटी कुठली>>>> माझ्या अंदाजाप्रमाणे खाली बसली आहे ती असावी.दुसरे अगदी बापुडवाणे दिसतेय.

Pages