Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दूरसंभाष का
दूरसंभाष का
नाही पण अगदी जवळ आलात
भ्रमणभाष?
भ्रमणभाष?
बरोबर स्पष्टीकरण ?
बरोबर
स्पष्टीकरण ?
१. मिथ्याग्रहापुढे वजनदार
१. मिथ्याग्रहापुढे वजनदार बोलल्याने कुठूनही सहज संवाद होतो ( ५) ----- भ्रमणभाष
मिथ्या ग्रह = भ्रम
त्याच्यापुढे
वजनदार बोलणे = भाषण
भाषणचे अक्षर फेरफार = णभाष
कुठूनही सहज संवाद होतो = मोबल्या = भ्रमणभाष
४. स्वादिष्ट खाल्ल्याने सारेच
४. स्वादिष्ट खाल्ल्याने सारेच कपाळ ठणकत त्यातून आले (५) --- चटकदार
च
कपाळ ठणकत = टक
त्यातून आले = दार
स्वादिष्ट खाल्ल्याने सारे = चटकदार
कारवी मस्तच
कारवी मस्तच
१ ला
वजनदार मण
बोलणे भाष
४. चट >>> सारे
अनेक आभार !
समाप्त
वा कारवी!
वा कारवी!
१ ला
१ ला
वजनदार मण >>
ओके भ्रम -- मण -- भाष असे होते.... हे नाही सुचले
मी साधेसुधे बोलणे vs वजनदार म्हणजे आशयाने जड असे बोलणे = भाषण धरले
भाषणचे अक्षर फेरफार नव्हते क्ल्यू मध्ये, ते मनानेच घेतले
शोधसूत्राचे अर्थ किती तर्हेने लागतात ना ....
छान रचले होते
अरे वा , कारवी
अरे वा , कारवी
टक माहिती नव्हते टक लावून बघणे सोडल्यास....
टक = कपाळ्शूळ -- १ मधल्या
टक = कपाळ शूळ -- १ मधल्या सहज संवाद साठी कोशात शोधाशोध करताना अपघाताने सापडले.
मला पण आज सकाळीच कळले.
म्हणूनच मला हा धागा आवडतो. ५-१० नवीन गोष्टी कळतातच दर आठवड्याला.
पुढच्या भारतवारीत मी कोश
पुढच्या भारतवारीत मी कोश आणायचं नक्की केलयं .
कोशाविना तळमळतोयं जीव
ऑनलाईन आहे की. कुमार सरांनी
ऑनलाईन आहे की. कुमार सरांनी दिली होती लिंक बृहद्कोशाची.
https://bruhadkosh.org/
epustakalay साईटवर पण काही आहेत
साद छान होती कोडी, कारवी छान
साद छान होती कोडी, कारवी छान सोडवलीत.
आता गूढ शब्दकोड्यांंबद्दल थोडी माहिती:
गूढ शब्द कोड्यांचे नियम असतात. इंग्रजी गूढ शब्द कोड्यात ते काटेकोरपणे पाळले जातात.
१. प्रत्येक अक्षराचा हिशेब लागला पाहिजे. चट आणि टक यातुन एक ट गाळावा लागेल. तशी सूचना शोधसूत्रात अपेक्षित आहे. (हेच भ्रम आणि मण ला लागु). आधी सुद्धा कुणी अशी कोडी दिली होती, तेव्हा हे सांगायचे राहून गेले.
२. कोडे कठीण करण्याच्या नादात कधी एखाद्या शब्दावर बऱ्याच प्रक्रिया करावे लागेल असे शोधसूत्रही आधी पहाण्यात आले . उदा: समनार्थी शब्दही शोधायचा आणि मग त्याच्या अक्षरांची अदलाबदलही करायची. साधारणपणे गूढ शब्द कोड्यात शोधसूत्रात दिलेल्या अक्षरांचीच अदलाबदल करणे अपेक्षित असते.
उदा. धिप्पाड असून हा कायम गोंधळतो (४)
इथे शोधसूत्रात दिलेल्या " हा कायम" या अक्षरांची अदलाबदल करून उत्तर मिळते.
हेच कोडे जर असे दिले:
धिप्पाड असून नेहमी गोंधळतो हा मध्ये येतो (४)
आता इथे नेहमी वरून कायम हा शब्द शोधायचा आणि त्याच्या अक्षरांची अदलाबदल करायची. म्हणजे अनेक प्रक्रिया झाल्या. हे टाळावे.
पण एखादा सोपा/नेहमीच्या वापरातला समनार्थी शब्द शोधून त्याची अदलाबदल असेल तर चालू शकते.
उदा. धिप्पाड मृत्यूदेव गोंधळतो, हा का मध्ये येतो (४)
इथे मृत्यूदेव = यम हे साहजिक आहे चालून जाते.
ही माहिती म्हणुन दिली आहे. हे तंतोतंत पाळावेच याचा आग्रह नाही.
तो सेव्ह केलायं... तरीही ! इ
तो सेव्ह केलायं... तरीही ! इ पुस्तकालय बघते. आभार.
मानवदादा रोचक प्रतिसाद.
छान खेळ चालू आहेत. चर्चाही.
छान खेळ चालू आहेत. चर्चाही.
मानव,
उपयुक्त माहिती.
धन्यवाद
अजून एक, जर भाषांंतर हवे
अजून एक, जर भाषांंतर हवे असेल तर कुठल्या भाषेत हवे याची सूचनाही शोधसूत्रात अपेक्षीत आहे.
उदा. नक्कीच आम्ही हिंदी असल्याने सखा परतला (४)
हेच जरा खुबीने आम्ही उत्तर भारतीय असल्याने असेही करता येईल. उत्तर भारतातील मुख्य भाषा हिंदी आहे. आम्ही दिल्लीकडचे / लखनौकडचे असल्याने असेही करता येईल. संस्कृत मध्ये भाष़ांंतर असेल तिथे प्राचीन वगैरे शब्द प्रयोग वापरून दर्शविता येईल.
आता जर कुठल्या भाषेत भाषांंतर करायचे हे सांगितल्याने कोडे सोपे होत असेल, तर शब्द निवड बदलून कठीण करता येईल का बघावे.
कोडे घातले की त्याला वेगळा क्लू देण्याची गरज नसावी, जे काही करायचे आहे ते सर्व शोधसूत्रात नेमके, खुबीने दिलेले असावे. अनावश्यक शब्दांचा वापर कमीत कमी असावा.
गूढ शब्दकोड्यांंना इंग्रजीत
गूढ शब्दकोड्यांंना इंग्रजीत काय म्हणून शोधायचे?
हे नियम वगैरे माहीत नव्हते... तुम्ही घातलेली + सोडवलेली बघूनबघूनच अंदाजाने रचली.
पण मराठीत जास्त मजा येत असावी... बाराखडी, एका शब्दाचे विविध अर्थ, शब्दाचा दिसणारा अर्थ आणि भावार्थ यातील फरक यामुळे.
गूढ शब्दकोड्यांंना इंग्रजीत
गूढ शब्दकोड्यांंना इंग्रजीत काय म्हणून शोधायचे? >> cryptic crossword.
काय मंडळी,
काय मंडळी,
दम खायचा आहे की हवे नवीन ?
सर,तासाभराने द्याल का?सोडवता
सर,तासाभराने द्याल का?सोडवता आले नाही तरी डोके दुखवून घ्यायला आवडेल.
होय, देतो तासाने....
होय, देतो तासाने....
रविवार विशेष !
दम खायचा आहे की हवे नवीन ? >
दम खायचा आहे की हवे नवीन ? >>> नव्याने दमायचे आहे
संगम खेळ
संगम खेळ
दोन प्रकारांचा संगम असलेल्या खेळात आपले स्वागत!
भाग १
८ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)
१३ = अस्तित्वदर्शक अंश
५२ = साहित्यकृतीचे कथानक
८४ = खात्यात शिल्लक असेल तर मिळेल
३६७ = नका थांबू तिथे !
संपूर्ण शब्द = ‘ही’ने मनावर घेतले की कायापालट होतो.
………………………
भाग २
वरीलप्रमाणे कायापालट झाल्यावर ते दृश्य आपल्यासाठी ******* असते.
आता हा ७ अक्षरी शब्द असा तयार करायचा आहे:
खाली एकूण सात शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून हा शब्द तयार करायचा.
सहवासातून
कायमसाठी
नमस्काराच्या
कनवाळूपणे
करवादणे
मनोधैर्यवान
मनमोकळा
……………………………………
१३...काया,देह,यापैकी आहे का?
१३...काया,देह,यापैकी आहे का?
१३...काया,देह,यापैकी >> नाही
१३...काया,देह,यापैकी >> नाही.
अंश असे बघा.
काही सूक्ष्म...
कण,रेणू
कण,रेणू
पण नाही.ते नाही येणार कारण ३६७ चा शब्द येणार नाही.
बीज?
बीज?
८ अक्षरी शब्दासाठी प्रत्येक
८ अक्षरी शब्दासाठी प्रत्येक अक्षराला एकच क्ल्यू? सुचलेल्या पर्यायातून अक्षरे नक्की नाही करता येणार.
८४ = खात्यात शिल्लक असेल तर मिळेल ----- जमा
३६७ = नका थांबू तिथे ! ------ मज्जाव
५२ = साहित्यकृतीचे कथानक ------ कथा गोष्ट
चांगले प्रयत्न पण
चांगले प्रयत्न पण
सर्व नाही.
खात्यात >>> म्हणजे फक्त 'तेच' खाते नका समजू.
कथा गोष्ट >>> इतका सामान्य शब्द नाही.
थोडा समीक्षकी !
८४..मोक्ष,पुण्य?
८४..मोक्ष,पुण्य?
Pages