शब्दखेळ (3)

Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेम..> नाही. पोचता पण आले पाहिजे ना तिथे.
निशाणा बरोबर आहे, पण नेम चुकला. Happy आता काय मारायच ते तुम्ही बघा. Happy

बाण

लक्ष्य >> लक्ष मारत नाहीत.
अच्छा म्हणजे आपल्याला पोचायचे आहे तर.>> तिथे
पण जे मारताही येते. > हो
उत्तर / निर्णय सारखे. >> नाही

काय चाललय, काय चाललय. मी सांगितल्या शिवाय आज काही तुम्ही धक्याला लागत नाही. किती वेळ द्यायचा. का बोअर झाले. Happy
नीट प्रयत्न केले नाही तर ६ सारख दिसतं. Happy

शृंग >> नाही.
बरोबर दोन्ही पुल्लिंगी पाहिजेत.

६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही>>
नि (निश्चितची सुरूवात) + अंतर चा समनार्थी शब्द, हे बरोबर.

नि = नि (निश्चितची सुरूवात) --- हे उत्तर आधी टिक झालेले आहे
योजन = अंतर चा समनार्थी शब्द
शून्य = शेवटी हाती काहीच नाही

विस्कळीत प्रयत्न = नि योजन शून्य

५ पोचायचा की मारायचा --- ठोसा थाप गुद्दा मुद्दा शिक्का हक्क
दमले, थोड्या वेळाने सुचेल....

५. धक्का
पोचतो / मारतो पण >> कुमारजी दोन्हीचा अर्थ एकच. वेगवेगळे दोन अर्थ अभिप्रेत आहेत.

नेम..> नाही. पोचता पण आले पाहिजे ना तिथे.
निशाणा बरोबर आहे, पण नेम चुकला. Happy आता काय मारायच ते तुम्ही बघा.

अच्छा म्हणजे आपल्याला पोचायचे आहे तर.>> तिथे
पण जे मारताही येते. > हो
उत्तर / निर्णय सारखे. >> नाही

पोचायचा की मारायचा.
नाही. उगाच काहिही मारू नका. मग कसे योग्य जागी पोचाल.
इथे तुम्ही मगा पासून तेच करताय.
...... हे सगळे क्लू आहेत त्या शब्दा साठी.

तीर

(बाण;
काठ; किनारा)

तीर

(बाण;
काठ; किनारा)>> एकदम बरोबर. सुटल एकदाच. देण्यात काही चूक झाली होती का?.

छान, मानवजी, कुमारजी, देवकीताई, कारवीताई. Happy

सुटलं एकदाच.... Happy दोनच अक्षरी नि किती वेळ खाल्ला !
धक्का पण चाललं असतं पण तुमचा अपेक्षित शब्द वेगळा होता
धक्का - मारायचा
धक्का - पोचायचा ( समुद्रातील जेटी, उदा -- भाऊचा धक्का )

धक्का - पोचायचा >> हो, पण जेंव्हा धक्का लिहिला होता तेंव्हा पोचायचा अर्थ आला नव्हता. दोन्ही अर्थ एकच लिहिले होते. मी बाण ला समानार्थी किंवा धक्का दुसर्‍या अर्थी अस लिहिणार होतो, पण ते फारच फोडून झाले असते. Happy

हो ते बरोबर.... उत्तर देणार्‍याने तसे स्पष्टीकरण दिले तर धक्का = तीर / कठडा
त्यांनी धक्का नकळत पोचणे आणि धक्का मुद्दामहून मारणे या दोन अर्थी घेतला होता.
भाषेची गंमत.

लवकर फोडून देण्यातही मजा नाही. क्ल्यू देत जायचे कोणी उत्साहाने सोडवते तोवर.
नवीन क्ल्यू बरोबर आधी योग्य दिशेने जाणाराही चुकीचा ट्रॅक पकडतो तेव्हा क्ल्यूही सुचेनासे होतात. Happy

मी देऊ का एक कोडं?पण मलाच उत्तर ठाऊक नाही.इथली हुशार माणसे पटकन सोडवतील.
खालच्या तीन अक्षरी shabdhanmadhil मधले अक्षर ओळखायचं आहे.पहिले आणि
तिसरं अक्षर दिलं आहे. तीनही शब्दांचे अक्षर एकच आहे.

गा - } _ न
ढ - } _ न
व - } _न

ळु

अरे वा मानव! किती पटकन सोडवलेत. आता मी कायप्पाच्या ग्रूपवर उत्तर सांगून भाव खाते.

विक्रम,
तुम्ही देत नसलात तर मी देतो

नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी

खाली ओळीने ८ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. त्या अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:

• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ८ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.

१ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. पाणी देणारा (३ अक्षरी).. शेवटी द ( **द)
२. एक कठोर शिक्षा (४)... शेवटी र

३. एकेक बाब घेऊन (५).. शेवटी र
४. खणलेली खाच (५).... शेवटी व

५. सत्ता (४)... शेवटी स
६. एका मोठ्या नदीशी संबंधित प्रदेश (८ ) र

७. शरीर अभिसरणदोष (५) .. शेवटी ध
८. सुंदर निवास (४) ...शेवटी क्र १ चे पहिले अक्षर.
.........................................

Pages