Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुमार सर , छान होते कोडे .
कुमार सर , छान होते कोडे . खरंय तुमचे , पूर्ण शब्द ओळखताना अनेक पर्यायी शब्द कळतात ज्यामुळे परिच्छेद अर्थपूर्ण होतो.
परिच्छेद खेळाचे दोन्ही प्रकार
परिच्छेद खेळाचे दोन्ही प्रकार चालतील. अक्षरे पुसून दिले तर थोडा क्ल्यू मिळतो काय काय शब्द असू शकतात.
पूर्ण शब्दात हा की तो की तो शब्द असेल असा विचार करावा लागतो.
६ अक्षरीपासून पुढचे शब्द लगेच नाही येत नजरेसमोर. जसे आजचे किंवा अस्मितांचे पत्र.
जुने मराठी (५०-७० दशकातले) परिच्छेद / कवितेची कडवी द्यायला हवी एकदा...
पण सलग परिच्छेदाच्या संदर्भावरून सुचतात शब्द. वाक्ये सरमिसळ करून दिली तर कदाचित थोडा कठीण होईल शोध.
वाक्ये सरमिसळ करून दिली तर
वाक्ये सरमिसळ करून दिली तर कदाचित थोडा कठीण होईल शोध... >>
अजिबात संबंध नसलेली(एकाच किंवा भिन्न उगमापासून) पूर्ण वेगळी वाक्येच परिच्छेद म्हणून देता येतील. हे आवडलंय.
उगम* --- पुस्तके, नाटकं, सिनेमा किंवा कुठलेही गद्य ...
चांगल्या सूचना
चांगल्या सूचना
येउद्यत नवे काही !
८ अक्षरी मराठी शब्द
८ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे.
त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)
८१७ हे डोळ्याच्या पृष्ठभागावर येऊ शकते
३६७ चूर्ण
२६ वेतनाचा दर
४७८ सुंदर मांडणी
५७ मूलाधार
** संपूर्ण शब्द नेहमीच्या वापरातील आहे. आपल्या सर्वांनाच लागू आहे.
इतकंच पुरे !
३६७ चूर्ण -- भगरा
३६७ चूर्ण -- भगरा
४७८ सुंदर मांडणी -- आरास
५७ मूलाधार --- हे जनरल आहे की सप्त-चक्र वगैरेशी संबंधित?
कारवी
कारवी
दोन्ही चूक
५७ मूलाधार --- हे जनरल आहे
367 : भुकटी
367 : भुकटी
भुकटी नाही
भुकटी नाही
३६७ चूर्ण याअर्थी आहे की
३६७ चूर्ण याअर्थी आहे की विशिष्ट चूर्णाचे नाव?
बारीक चूर्ण , भुगा कण इ.
बारीक चूर्ण , भुगा कण इ.
विशिष्ट नाही
३६७ चूर्ण >>>
३६७ चूर्ण >>>
चूर्ण म्हटले की मनात आयुर्वेदिक येते. >>> ही कशापासून करतात तिथे पोचा व शोधा !
बुकणी वाटण
बुकणी
वाटण
बुकणी वाटण दोन्ही नाही
बुकणी
वाटण
दोन्ही नाही
३६७ चूर्ण --- चुरमा / कुटका
३६७ चूर्ण --- चुरमा / कुटका / चुराडा / कुस्करा / रवाळ / भुस्कट यापैकी?
अगदी बारीक नसते पण ---- धापट (कोंबड्यांना टाकला जाणारा कणी-कोंडा)
२६ वेतनाचा दर --- मोल
४७८ सुंदर मांडणी --- देखावा
८१७ हे डोळ्याच्या पृष्ठभागावर येऊ शकते --- पटल
कारवी
कारवी
छान प्रयत्न पण सर्व नाही
आयुर्वेदिक येते. >>> ही कशापासून करतात ?
काष्ठौषधी, बिया, सुकलेली फळे,
काष्ठौषधी, बिया, सुकलेली फळे, मुळे
बिया, सुकलेली फळे, मुळे
बिया, सुकलेली फळे, मुळे
हे सोडून वनस्पतीच्या अन्य भागांकडे ही डोकवा !
आयुर्वेदिक येते. >>> ही
आयुर्वेदिक येते. >>> ही कशापासून करतात ? >> वनस्पती: कंद, मुळे, साल, खोड, पाने, फुले, बिया.
खनिजे: अभ्रक, शंख, लवणे, धातु, रसायने वगैरे.
फुले ! यावरून काय सुचतेय ?
फुले !
यावरून काय सुचतेय ?
कंदन?
कंदन?
फुले !
यावरून काय सुचतेय ? >>
पराग?
817 - डोळ्याच्या पृष्ठभागावर
817 - डोळ्याच्या पृष्ठभागावर येते - पापुद्रा , झापड , पडदा ??
478 - सुंदर मांडणी - आरास , रचना , नेपथ्य ??
मूलाधार = ओम ?
मूलाधार = ओम ?
सुंदर मांडणी - आरास , रचना ,
सुंदर मांडणी - आरास , रचना , नेपथ्य ?? नाही
मूलाधार = ओम नाही. ही पातळी नको ! शारीरिक बघा ! Base या दिशेने
अय्यो नवीन इतक्या वेगाने
अय्यो नवीन इतक्या वेगाने सुरूही झाले?
शारीरिक बघा ! Base या दिशेने......नीव/ पुठ्ठा?
पुठ्ठा?
पुठ्ठा? चूक
हा हा !
पण बसून नका शोधू ... त्या ऐवजी...
पण बसून नका शोधू ... त्या
पण बसून नका शोधू ... त्या ऐवजी... >>>
५७ मूलाधार --- पाय, पाया, पद, पाद,
पग ( मानव यांचे चूर्ण = पराग बरोबर असेल तर....)
२६ वेतनाचा दर : मला
२६ वेतनाचा दर : मला "वेतनाचा दर " ही संज्ञाच कळली नाही. वेतन हाच एक दर आहे कामाचा. त्याचा दर म्हणजे?
बहुतेक, वेतन = कामाचा मोबदला
बहुतेक, वेतन = कामाचा मोबदला
वर्षासन = वर्षाचे एकूण उत्पन्न
रोजंदारी = रोजच्या कामाचा दिवसाअखेर होणारा हिशोब
आठवडा / तासिका तत्त्वावर
याला वेतनाचा ( कालानुरूप) दर म्हटले असेल..... पण वाट पाहू
जर वेतन = कामाचा मोबदला per
जर वेतन = कामाचा मोबदला per unit time मानले तर
रोज
सप्ताह
मास
साल
यांना वेतनाचा दर म्हणता येईल का?
उदाहरणार्थ: त्याला काय रोज मिळतो / सप्ताह मिळतो?
Pages