नातीगोती! - भाग ६.५

Submitted by अज्ञातवासी on 22 November, 2020 - 12:26

भाग ६ https://www.maayboli.com/node/77268

भाग ५
https://www.maayboli.com/node/77246

भाग - ४
https://www.maayboli.com/node/77226

भाग - ३
https://www.maayboli.com/node/69646

भाग १
https://www.maayboli.com/node/63469

भाग २
https://www.maayboli.com/node/69583

"आता दुकानात जायचं की शेतात?"
"दुकानात!"
"बरं. चला."
आमची वरात दुकानाकडे निघाली. रस्त्याने बरीच मंडळी आमच्याकडे कुतूहलाने बघत होती.
"बघ कसे बघतात मेले!" जाईने नाक फिस्करलं!
मला हसूच आवरेना!!!
"अग ए, कुठे शिकलीस हे!"
आजी म्हणते!
"अच्छा, सांगावं लागेल काकूंना."
"सांग. मी नाही कुणाला घाबरत."
रस्तातच आमची मस्ती चालू होती, व बोलता बोलता आम्ही दुकानात पोहोचलो.
दुकान बरंच मोठं होतं. आय मिन, इतर दुकानापेक्षा जवळजवळ दुप्पट मोठं. शेजारीच सुनीलाकाका व शरदकाकाचही दुकान होतं. पण गजाननकाकाच्या दुकानाची सर कशालाच नव्हती.
"अरे लवाजमा आला वाटतं." महेशदादाने आमचं हसून स्वागत केलं.
हो ना. खूप फिरून आलो आम्ही.
महेशदादाने जाईला उचलून काउंटरवर बसवलं. तीही मस्त गंमत बघू लागली.
"दुकान किती मोठं आहे तुझं!"
"नुसतं माझं नाही. तुझंही."
"म्हणजे?"
"म्हणजे दुकानाचा अर्धा भाग मोहनकाकाच्या नावावर आहे. आधी दोन दुकाने होती येथे, पण त्याने सरळ सांगितलं. एकत्र करा, आणि वापरा."
"तुझा बाप देवमाणूस होता." गजाननकाका म्हणाला.
"आहेच."
"बाकी, शेतात गेला होतात की नाही."
"कसचं काय? जाईने नेलंच नाही."
"जोक नाहीये शेतात जाणं," महेशदादा हसला. "दिवसभर चालत राहिलीस, तरी शेताचा अंत लागायचा नाही."
"इतकी शेती?"
"हो. मोहनकाकाला शेतीचं प्रचंड वेड. सांगायचा, सायलीच लग्न झाल्यावर मी इथेच येऊन राहील. त्यासाठी शेती घेत गेला."
माझे डोळे अचानक पप्पाच्या आठवणीने भरून आले.
"मला बघायची आहे शेती."
"महेश, हिला फिरवून आण. जा आता दुकानात गर्दीही नाही."
महेशदादा बाहेर पडला, व त्याने गाडी काढली. पाच मिनिटात आम्ही शेतात पोहोचलो.
मी अवाक होऊन बघतच राहिले!!
डोंगरापलीकडे सूर्य मावळत होता, तिथपर्यंत एक हिरवागार पट्टा पसरला होता...
माझी तिथपर्यंत नजर पोहोचत नव्हती.
एक टुमदार सुंदर घर, त्यासमोर दोरीचा साधा झोका.
रेल्वेच्या डब्यांसारख्या कांद्याच्या चाळी, आणि अनेक फळझाडे व फुलझाडे.
हीच आमची शेती!
"बरं, सायली, तुला तुझी शेती किती आहे माहिती आहे का?"
मी नकारार्थी मान डोलावली.
"हे बघ, या शेतीत चार वाटे आहेत. मोहनकाका, बाबा, शरदकाका आणि सुनीलकाका. आपले आजोबा आणि शरद आणि सुनीलकाकांचे वडील सख्खे भाऊ.
मग, आधी आठ एकर शेती होती. हळूहळू वाढत गेली..."
"आता बाबांची दहा एकर आहे. शरदकाका आणि सुनीलकाकाची प्रत्येकी आठ एकर. आणि तुझी किती अंदाज कर?"
"माझी काय. आपली म्हण."
"नाही, तुझीच. तुझी शेती आहे..."
"सांग बघू."
"मला नाही माहिती!"
"एकशे वीस एकर!!!"
मी वेड्यासारखी त्याच्याकडे बघतच राहिले!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाग छोटा झालाय, याची जाणीव आहे. कथेचा फ्लो तुटायला नको, म्हणून टाकलाय. Happy
पुढील भाग मोठा येईल!

@गार्गी - धन्यवाद
@गौरी - हो... Happy धन्यवाद
@मृणाली - धन्यवाद
@ च्यवनप्राश - धन्यवाद
@लावण्या - धन्यवाद।
@रुपाली - धन्यवाद।
@मेघा - धन्यवाद

पुढचा भाग थोडा मोठा टाकण्याचा प्रयत्न करतोय, शनिवारपर्यंत पोस्ट करेन!