अब्जाधीशांचे वर्तन तर्काच्या कसोटीवर

Submitted by केअशु on 7 November, 2020 - 01:21
टाटा अंबानी

मित्रहो! गेले काही दिवस एका प्रश्नाने मनात घर केले आहे.मी हा प्रश्न बर्‍याच जणांना विचारला पण पटेलसे उत्तर कुठेच मिळाले नाही.

वरच्या फोटोत दिसणार्‍या व्यक्ती श्री रतन टाटा आणि श्री मुकेश अंबानी हे भारतातील अब्जाधीश उद्योगपती आहेत.फोटोत ते तिरुपतीच्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी आल्याचे दिसत आहे.निदान ते मंदिर प्रांगणात आहेत इतके तरी नक्कीच.

तर प्रश्न असा आहे की हे दोघे अब्जाधीश पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? (मंदिर कोणत्या देवाचं आहे हा प्रश्न इथे महत्वाचा नाहीये.ते कोणत्याही देवाच्या मांदिरात गेले तरी फरक पडत नाही.)

आता तर्काच्या/विज्ञानाच्या कसोटीवर हा प्रश्न थोडा घासून पाहू.

१) या दोघांचा बालाजीवर विश्वास आहे.बालाजीला गेल्यास बालाजी आपल्याला आशिर्वाद देईल.नवीन कंत्राट मिळेल किंवा चालू असलेली बोलणी यशस्वी होऊन आपला उद्योग अजून फायद्यात येईल.

तर्क: श्री रतन टाटा हे हार्वर्डचे पदवीधर आहेत.मुकेश अंबानी हे युडिसिटीचे केमिकल इंजिनिअरिंगची पदवीधर आहे.म्हणजे दोघांचं शिक्षण चांगलं दणदणीत आहे.नामांकीत संस्थेतून चांगल्या गुणवत्तेतून उत्तीर्ण आहेत.इतकच काय पण दोघे जो उद्योगसमूह चालवतात तो चालवणं यासाठी प्रचंड बुद्धीमत्ता लागते.गल्लीतल्या सोम्यागोम्याचे ते काम नक्कीच नव्हे. लोकांच्या स्वभावाचा , अर्थव्यवस्थेचा आणि अशा बर्‍याच गोष्टींचा प्रचंड अभ्यास असावा लागतो.शक्य तितका योग्य निर्णय पटकन घेणं अपेक्षित असतं.

सोप्या शब्दात या दोघांचं तार्किक ज्ञान किंवा जगाचा अभ्यास हा सामान्य बुद्धीच्या लोकांच्या तुलनेत खूप खूप वरच्या दर्जाचा आहे.

मग इतकं चांगलं तार्किक ज्ञान असणार्‍या या दोघांना एका तांब्या-पितळेच्या किंवा दगडाच्या मुर्तीचे दर्शन आपल्या उद्योगाला बहरण्यास,वाढण्यास मदत कशी करु शकेल असे का वाटले असावे? असा विश्वास या दोघांना का वाटत असावा?

२) या मंदिरांमधे बांधकामाचं काहीतरी कंत्राट मिळालं असावं.त्याची पाहणी करण्यासाठी आले असतील.किंवा नवीन काही सोयीसुविधा या मंदिरात करता येईल का याची पाहणी करायला आले असतील.

तर्क: हे काम करण्यासाठी या दोघांच्या हाताखाली त्या त्या क्षेत्रातले बरेचसे तज्ञ लोक नक्कीच असावेत.त्यासाठी या दोघांना पदरचे ३-४ तास खर्चायची काहीच गरज नसावी ना?

३) दोघेही उद्योगपती आहेत.व्यवसाय म्हटला की आर्थिक चढउतार आले,अस्थिरता आली. त्यामुळे थोडा मानसिक ताण येणं शक्य आहे.कदाचित भगवंताच्या मुर्तीदर्शनाने त्यांचा मानसिक ताण कमी होऊन मनोबल वाढेल म्हणून आले असावेत.

तर्क: मानसिक ताण आलाच असेल तर यावर मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन हाच सर्वात खात्रीचा उपाय आहे.मानसोपचारतज्ज्ञ हे मानसिक ताण कसा हाताळावा,कमी करावा यातले तज्ञ असतात.निर्जीव मुर्तीपेक्षा अभ्यासु मानसोपचारतज्ज्ञ नक्कीच अधिक चांगलं मार्गदर्शन करु शकेल.शिवाय हे दोघे जागतिक स्तरावरचे प्रसिद्ध अब्जाधीश उद्योजक असल्याने जगातल्या कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञाची अपॉइंटमेंट यांना सहज मिळू शकते.

मला तरी हीच ३ कारणे दिसत आहेत.अजून काही कारणे असू शकतात का?

आता या अब्जाधीशांचं मंदिरात जाण्याची घटना इतकी महत्वाची आहे का?
तर नक्कीच आहे.का ते सांगतो.
बर्‍याचदा निरीश्वरवादी/विज्ञानवादी/पुरोगामी लोक प्रचार करत असतात की देवाचं अस्तित्व शून्य आहे.मंदिरांमधे आहेत त्या निव्वळ निर्जीव मुर्ती आहेत.देवाच्या मुर्तीच्या दर्शनाने तुमच्या जीवनातील समस्या सुटू शकत नाहीत, परमेश्वर ही माणसाने आपल्या भितीतून निर्माण केलेली संकल्पना आहे.तर्काच्या कसोटीवर त्याला अर्थ नाही.विज्ञान हे वारंवार घेतलेल्या कसोट्यांतून सिद्ध झालेलं असतं.त्याला तर्काचं,प्रयोगाचं अधिष्ठान असतं.परमेश्वर या संकल्पनेला तसं काहीच अधिष्ठान नाही.देवाच्या मुर्तीचे दर्शन घेतले नाही तरी काहीही नुकसान होत नाही.साधारण हे असे विचार सदर लोक मांडत असतात.

समाजात जसा काही लोकांना निरीश्वरवादाचा,देव न मानण्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे तसाच देवाच्या मुर्तीचे दर्शन घेण्याचा अधिकारदेखील काही लोकांना आहे.आता या देवदर्शन करणार्‍यांमधलेच वर उल्लेखलेले दोन अब्जाधीश आहेत.
आता खरी गंमत पुढे आहे.या दोघांना आदर्श मानणारे कोट्यावधी लोक जगात असणारेत.या दोघांसारखे अब्जाधीश व्हावे,यांच्यासारखे मोठे उद्योजक व्हावे असे बर्‍याच जणांना वाटत असणार.साहजिकच हे दोघे जे काही कृती करतात त्या कृतींचं अनुकरण नक्कीच केलं जात असणार.रतन टाटा , अंबानी यांच्यासारखे अब्जाधीश जर बालाजीच्या मंदिरात जात असतील तर नक्कीच या मंदिरांमधे , बालाजीच्या मुर्तीत काहीतरी अदभुत शक्ती असणार; त्याशिवाय का दोघे येत असतील? असा विचार करुन या दोघांचे अनुकरण सामान्य लोकांनी केले तर त्यांचं मतपरिवर्तन निरीश्वरवादी लोक कसे करतील? कारण मजा अशी आहे की कलियुगात पैसा हा जग चालवणारा सर्वात मोठा घटक आहे.उपरोल्लिखित दोघे पैसा मिळवण्यात प्रचंड यशस्वी आहेत.कदाचित निरीश्वरवादीही इतके धनवान नसतील.मग ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे ते लोक कोणावर अधिक विश्वास ठेवतील? मंदिरात जाणार्‍या अब्जाधीशांवर की जेमतेम खाऊनपिऊन सुखी असणार्‍या निरीश्वरवादी लोकांवर? साधं लॉजिक आहे.बहुतांश लोक हे या धनिकांच्या कृतीवर विश्वास ठेवतील आणि त्यांच्या कृतींचं अनुकरण करतील.
मग याचाच दुसरा अर्थ असा की देव न मानणारं विज्ञान हे अफाट धनसंपत्ती मिळवून देण्याबाबत परमेश्वराहून कमी ताकदीचं आहे.ते जर देवापेक्षा जास्त ताकदीचं आणि हमखास रिझल्ट देणारं असतं तर मग हे दोघे मंदिरात गेलेच नसते.

काय वाटतं तुम्हाला? असे अत्यंत बिझी अब्जाधीश मंदिरात का जात असावेत? का वेळ देत असावेत मंदिरात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अंधश्रद्धा आणि मेंदूविज्ञान हे मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण आहे. यात जावडेकर लिहितात,
"आपल्याभोवतीचे जग अनेकदा स्वैर (random) असतं. कुठलाही नियम न पाळणारे असतं. त्यात काही म्हणजे काहीही होऊ शकतं, अतर्क्य घटना घडतात. त्यावर आपलाच नव्हे तर कुणाचाच ताबा असत नाही. घडणाच्या घटना 'अनियमित असल्यानं त्यात कसलीच संगती नसते. पण तरीही आपण त्यामागे काहीतरी कारण असणारच असं गृहीत धरून त्यांचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न करतो. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतल्या अॅडॅम गॅलन्स्की (Adam Galinsky) यांनी एक प्रयोग केला. काही स्वयंसेवकांना वीसपचवीस धूसर, अस्पष्ट चित्र दाखवली. त्यातल्या निम्म्या चित्रांमधे खुर्ची, होडी यासारख्या काही वस्तूंच्या आकृती,ठिपक्याठिपक्यांच्या मधे लपलेल्या होत्या, बहुतेक लोकांनी त्या बरोबर हुडकून काढल्या.पण ज्यांच्यामधे कसल्याही आकृती दडलेल्या नव्हत्या,फक्त ठिपक्यांची स्वैर रांगोळी होती त्यांच्यातही ब-याच लोकांना आकृत्या ’दिसल्या’. विशेषतः जे लोक मनाने कमकुवत होते, ज्यांना भोवतालची परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात आहे असे वाटत होतं, त्यांच्या बाबतीत हे प्रकर्षानं घडताना दिसलं. अशा लोकांना नसलेल्या गोष्टी दिसतात, नसलेले संबंध दिसू लागतात. माहिती अपुरी असली तरी स्वत:च्या कल्पनाशक्तीनं रिकाम्या जागा भरून पूर्ण चित्र तयार करणयात आपला मेंदु वाकबगार असतो. त्याला गोंधळ, अनिश्चितता मानवत नाही. प्रत्येक गोष्टीमागचे कारण समजलेच पाहिजे हा जणू त्याचा हट्ट असतो. दोन घटना एकामागोमाग घडताना दिसल्या तर दुसरीमागचे कारण पहिलो घटना हेच असणार, अशी समजूत मे करून घेतो. मारुन मुटकून असा संबंध जोडणं कितीही मूर्खपणाचे असले तरी कारण आजबात माहीत नसण्यापेक्षा हास्यास्पद कारणसुद्धा मेंदू स्वीकारतो, हे अनेकदा दिसून आले आहे. त्यातूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो."

@प्रकाश घाटपांडे
वरील दोन अतिशय बिझी असणारे अब्जाधीश सामान्य माणसाप्रमाणे कसलीच संगती नसणार्‍या किंवा अर्तक्य गोष्टी/उपचार करण्यात पदरचे ३-४ तास का खर्च करतील? एवढं सांगा. _/\_

केअशु, कोणीच इतकं बिझी नसतं की चार तास कुठे घालवू शकणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो वेळ गोल्फ खेळण्यात घालवतात तो वेळ त्यांच्याकडे कुठून येतो? You can always make time for things that you think are worth your time. You can write to both or meet in person and ask. That's the best way to get your query answered. Everybody else is just going to speculate it!

वरील दोन अतिशय बिझी असणारे अब्जाधीश सामान्य माणसाप्रमाणे कसलीच संगती नसणार्‍या किंवा अर्तक्य गोष्टी/उपचार करण्यात पदरचे ३-४ तास का खर्च करतील? >>>

अब्जाधीश सामान्य नसतो का.. त्यांना पैशापलीकडे काही दिसूच नये का.. झाली इच्छा, गेले देवदर्शनाला. त्यांच्यासाठी तरी विषय संपला.

वरील दोन अतिशय बिझी असणारे अब्जाधीश सामान्य माणसाप्रमाणे कसलीच संगती नसणार्‍या किंवा अर्तक्य गोष्टी/उपचार करण्यात पदरचे ३-४ तास का खर्च करतील? एवढं सांगा. _/\_
हे आपले मत झाले. त्यांच्या मते या कसलीच संगती नसणाऱ्या किंवा अतर्क्य गोष्टी नसतील म्हणुन त्यांना हवा तेवढा वेळ खर्च करत असतील. दुसरी एक शक्यता, वरच्या फोटोवरुन तसे दिसत नाही, पण घरचे आस्तिक असतील आणि त्यांच्या इच्छेखातर सोबत जात असतील.

केअशु, दोन गोष्टी.

१) तुम्ही ह्या समूहाला कुठेतरी वर बसवून ठेवलंय कि त्यांच्या प्रत्येक हालचाली मागे काहीतरी प्रॉफिट ओरिएंटेड भाग असतो असे.
Why ? They too do all kind of silly stuff in their off time.

२) टोकन्स ना इतके महत्व नसते. तुम्ही देवावर वेळ घालवणारे टोकन दिलेत, तसे प्रत्येक प्रकारचे टोकन तुम्हाला सापडतील. ह्या सगळ्या टोकन्सचं reconciliation कसं करणार ?
बघा. आता मी पण काही श्रीमंत नास्तिक उदाहरणे देतो-
बिल गेट्स
वॉरन बफे
जॉर्ज सोरोस
लॅरी पेज
जेम्स कामेरॉन

हे नास्तिक टोकन्स.

कधी असा विचार केलाय का, की अब्जाधीश असून सुद्धा जर तुम्हाला हवा तेव्हा आणि हवा तेवढा वेळ आपले छंद आणि आवडी जपायला काढता येत नसेल तर काय फायदा ईतके कमावलेल्या पैश्यांचा?

त्यांना हे उमजलेले असते म्हणून ते हा वेळ काढतात, आपसूक काढला जातो.

बाकी आस्तिकता नास्तिकता आणि यशस्वी वा अपयशी असणे किंवा सुखी वा दुखी असणे याचा आपसात काही संबंध नसतो. हा मुद्दा फिरून ईथेच संपणार

अतिशय फावला वेळ असणारी दोन सामान्य माणसे, पैसे कमवायचे सोडून इथे मराठी आंतरजालावर वेळ घालवत, कसलीच संगती नसणार्‍या किंवा अर्तक्य गोष्टी/उपचार करण्यात पदरचे ३-४ तास का खर्च करतील? >>>

माझे उत्तर: त्यांना आवडते म्हणून.

वरील दोन अतिशय बिझी असणारे अब्जाधीश सामान्य माणसाप्रमाणे कसलीच संगती नसणार्‍या किंवा अर्तक्य गोष्टी/उपचार करण्यात पदरचे ३-४ तास का खर्च करतील? एवढं सांगा. _/\ >>>>>> मेन्दु ची गरज. ते ही मानव आहेत.

सदर धागा हा काही तार्किक उत्तर मिळावं म्हणून काढला आहे. "गेले असतील दोघं काही कारणांनी;तुम्ही कशाला ताप करुन घेता उगीच डोक्याला? असे भावनिक किंवा वैतागून उत्तर मिळावे म्हणून नाही काढलेला.तस्मात तसे प्रतिसाद येऊ नयेत ही सर्वांनाच नम्र विनंती
-------------------------------------------------
@जिज्ञासा
गोल्फ खेळण्यातून जसा आनंद मिळतो तसा आनंद या दोघांना देवदर्शनातून मिळत असेल तर याचाच दुसरा अर्थ या दोघांचा देव या संकल्पनेवर विश्वास आहे.
यातून दोन अर्थ निघतात.
१) विज्ञानाच्या कसोटीवर पारित न होणार्‍या देव या संकल्पनेमधेदेखील मनाला बरं वाटू देण्याची/मन:शांती देण्याची क्षमता आहे.आणि जी आहे ती कदाचित खूप जास्त आहे.अगदी मानसोपचारतज्ज्ञांपेक्षाही जास्त असावी.तसं नसतं तर हे दोघे मानसोपचारतज्ज्ञांकडे कौन्सिलिंगसाठी गेले असते किंवा त्यांना तरी घरी बोलावलं असतं.तार्किकदृष्ट्या तरी हेच दिसतंय.
हे दोघे माझ्या पत्राला उत्तर देण्याइतपत मी त्यांच्यासाठी महत्वाचा असेन असे मला वाटत नाही. Happy भेट तर लांबच!

@नौटंकी
<झाली इच्छा, गेले देवदर्शनाला>
इतके सहज ठरतात या अब्जाधीशांचे कार्यक्रम? वाटलं नि गेले?

@मानव पृथ्वीकर
<त्यांच्या मते या कसलीच संगती नसणाऱ्या किंवा अतर्क्य गोष्टी नसतील म्हणुन त्यांना हवा तेवढा वेळ खर्च करत असतील.>

मलाही हेच वाटतंय.तेच थोडंफार शोधता यावं म्हणून हा धागा

@कॉमी
off time इतका? कितीही वेगवान विमान वापरलं तरी किमान ३-४ तास तरी जातीलंच.
जे नास्तिक आहेत ते विज्ञानाला मान्य नसणार्‍या देव या संकल्पनेला मुळातच मानत नाहीत.त्यामुळे त्यांचा संबंध या धाग्यात येतच नाही.आपण बोलत आहोत ते विज्ञानाच्या कसोटीवर न बसणारी देव संकल्पना काही अब्जाधीशांना ते सुद्धा चिक्कार शिक्षण झालेल्या अब्जाधीशांना का पटत असावी याबद्दल.

@ऋन्मेऽऽष
ते रिकामा वेळ ज्या कृतीत घालवताहेत त्या कृती निरर्थक असतील का?

@उपाशी बोका
आपण चर्चा करतो त्यातून विचारांचे आदानप्रदान होते.विचारांना खाद्य मिळते.मंदिरात जाणे हे या अब्जाधीशांचे निव्वळ कंडीशनिंग जरी मानले तरी ते सुद्धा मनाला बरे वाटणे म्हणजे दुसर्‍या अर्थाने मानसिक बळ मिळणे हा फायदाच आहे.निरर्थक कृती नव्हे.

तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे ते सांगून टाका Happy
गंमतीचा भाग. रागावू नका.

आवड निवड असते असेच वाटते. त्यांना आवडत असेल किंवा याचा फायदा होतो असंही वाटत असेल. 3-4 तास का घालवू नयेत हे नाही समजत. मनोरंजन महत्वाचं असतंच.

Pages