त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आवर्जून करण्याजोगी हि एक पारंपारिक recipe आहे . सासूबाई , वाहिनी आणि त्यानंतर आता मी , बऱ्याचदा भिशीचा प्रोग्रॅम असेल तर किंवा कुठे करून न्यायच असेल नेहेमी करून नेते ,आणि सगळ्यांना हमखास आवडते . करायला थोडी किचकट आहे पण चव खूपच यम्मी आहे !...
साहित्य :
आमटीचे (curry ) साहित्य  : १. अर्धी वाटी सुके खोबरे किसून आणि कोरडे परतून
                                         २. तेलात परतून घेतलेले कांदे (२)
                                         ३. लसूण पाकळ्या (७ ते ८ )
                                        ४ . आलं (१ ते १ १/२ इंच )
                       ५. काळा मसाला (२ चमचे , प्रकाश चा शेवभाजीचा मसाला घातला तर अजून उत्कृष्ट चव येते .)
                                        वरील सर्व साहित्य थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे  . 
मोदकासाठी सारण करावयाचे साहित्य :   १ अर्धी वाटी तीळ भाजून
                                                         २. एक वाटी किसलेले  सुके खोबरे कोरडे भाजून
                                                         ३. दोन छोटे चमचे खसखस भाजून
                                                          ४. चवी प्रमाणे  मीठ
                                                         ५. बारीक चिरलेली कोथिंबीर
                            वरील  सारणाचे सर्व साहित्य एकत्र करून एक बाउल मध्ये काढून घ्यावे. 
मोदकाची पारी      :                १. एक वाटी किंवा जेवढे मोदक करायचे तेवढे अंदाजाने डाळीचे पीठ
                                           २. १ छोटा चमचा धणे-जिरे पूड
                                           ३. १ छोटा चमचा लाल -तिखट
                                            ४. पाव चमचा हळद
                                            ५. पाव चमचा खाण्याचा सोडा हे   सर्व एकत्र करून त्याचा कणकेसारखा गोळा
                                             (dough )तयार करावा . 
कृती                  : १.   एका मोठ्या कढईत एक (स्पायसी हवं असेल तर २ चमचे ) तेल घालून तेल तापले कि
                            त्यात जिरे-मोहरी हिंग हळदीची फोडणी करावी , कांदे खोबऱ्याचे वाटण चांगले परतून घ्यावे
                 थोडा काळा मसाला घालावा , तेल सुटत आले कि आमटीला हवे असेल तेवढे पाणी घालून ,
                 मीठ  व चवीला थोडा गूळ (ऐच्छिक ) घालून आमटीला एक उकळी आणावी ,  आमटीला
                उकळी आल्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी , व गॅस बंद करावा (आमटीचा ). 
               २. डाळीच्या पिठाचा गोळा(dough ) जरा तेलाचा हात लावून  मळून घ्यावा , नंतर त्याचे
       छोटे छोटे गोळे करून , एक एक गोळ्याची पारी (मोदकासाठी करतोतशी पणखूप लहान
       आकाराची करावी त्यात वरील केलेले तिळाचे सारण भरावे , असे छोटे छोटे मोदक तयार करून चाळणीवर उकडून घ्यावेत नंतर गार झाले कि ते आधी तयार केलेल्या आमटीत सोडून , आमटीला उकळी द्यावी , सोबत कांद्याची कोशिंबीर आणि लिंबू , अहाहा !.. झक्कास लागते .
 
 
मस्त आहे कथा!
मस्त आहे कथा!
मोदक आणि आमटीची अद्वितीय प्रेमकाहाणी. शेवट तर खूपच आवडला.
पुभाप्र. पुलेशु.
मला अशा तर्रीबाज रेसिपीज फार
मला अशा तर्रीबाज रेसिपीज फार फार आवडतात.. पुढच्या वेळेस रेसिपी पाककृती व आहारशास्त्रात टाका
Yummmyyy.. नक्की करून बघते
Yummmyyy.. नक्की करून बघते
धन्यवाद !... हायझेनबर्ग
धन्यवाद !... हायझेनबर्ग ,नंबर१वाचक ,आणि म्हाळसा ..
म्हाळसा खरं तर मी विषय पाककृती चाच निवडला होता , पण इकडची सवय असल्यामुळे इकडे पोस्ट झाली बहुतेक.
मस्त पाकृ. करून पाहणार.
मस्त पाकृ. करून पाहणार.
मस्त.
मस्त.
हा पदार्थ एकदा करून बघायचा आहे
फोटो पण टाका
फोटो टाका हो
फोटो टाका हो
वर्णिता , mi_anu , स्वप्ना
वर्णिता , mi_anu , स्वप्ना_राज : प्रतिसादाबद्दल धन्यवाद !.. फोटो मी नक्की टाकीन , दिवाळीत भाऊबीजेला करणार आहे.