दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हा सोपा आहे
हिरो तुम्ही ओळखलाच.
यात एक अजून कलाकार आहे ज्याचा बाप अभिनेता आहे आणि आई छोट्या पडद्यावर अभिनेत्री आहे.
यातल्या एका व्यक्ती ची सासू सासरे व नवरा चित्रपट सृष्टीत आहेत.
अजून एका सह कलाकाराची बायको चित्रपट सृष्टीत आहे.
यात हात हलवत झोपेत चालण्याचा एक विशिष्ट सीन आहे(आतातर ओळखालच)
यातली नायक नायिका जोडी परत कधीही पडद्यावर एकमेकांबरोबर आली नाहीये.
IMG_20201102_134337.jpg

अनिल कपूर -ऐश्वर्या
हमारा दिल आपके पास हे - शुक्रिया शुक्रिया मेरे पिया

यातल्या एका व्यक्ती ची सासू सासरे व नवरा चित्रपट सृष्टीत आहेत. - हा क्लू कामी आला Happy

हा अनिल कपूर आहे???मला तर ओळखता नाही आला.

यातली नायक नायिका जोडी परत कधीही पडद्यावर एकमेकांबरोबर आली नाहीये...........
तालमधे होते कि

याय
बरोबर
सॉरी हां मला ताल आठवला नाही
अनिल कपूर चा चेहरा झाकला तरी त्याच्या आयकॉनिक कोंबडा हेअरस्टाईल ने ओळखू येतेच.

1. गाणे हिरो हिरोईन वर चित्रित नाही
2. पिक्चर चा दिग्दर्शक गाजलेला.
3. गाणे जिच्यावर चित्रित आहे ती आता एका वेब सिरीज मध्ये काम करते. चित्रपटात व्हॅम्प भूमिका किंवा आयटम सॉंग मध्ये असते.
4. चित्रपट हिरो हिरोईन पैकी 1 जण राजकारणात आहे
5. याच स्टाईल चे अनेक पिक्चर या दिग्दर्शकाने काढले.
6. हा माणूस इंटरनेटवर वेडीवाकडी विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध आहे.
7. हिरो चा बाप,काका ,चुलत भावजी, कझीन हे सर्व चित्रपट सृष्टीत आहेत.
IMG_20201102_142938.jpg

नाही. मला तो जिंदगी की जंग पिक्चर माहितीच नाही Happy
क्लू ६ वर लक्ष केंद्रीत कर. बाकी उत्तरे चालत येतील.

Happy कसा माहीत असणार.... आत्ता बनलाय इथेच... गाणे नि पिकचर....
मला उत्तर येत नाहीये म्हणून.... फक्त चित्राला कॅप्शन दिले

खि खि खि. धमाल आहे.मला खरंच वाटलं असा पिक्चर आहे.
अजून एक क्लू
1. या दिग्दर्शकाला एका ठिकाणी घेऊन गेल्याने एका मुख्यमंत्र्याने आपलं पद गमावलं.

अरे अरे एवढे क्लु???? अनु, आता रागोवेल हां मी तुला. Proud

जंगल आहे हा रा गो व चा.. 'पतली कमर चिकना बदन तिरछी नजर है'

Happy बरोबर
कॉम्ब्या वा कॉम्ब्या शो
फरदिन खान चा बाप काका चुलत भावजी(ह्रितिक) कझीन(झाईद खान) हे चित्रपट सृष्टीत

कसा माहीत असणार.... आत्ता बनलाय इथेच... गाणे नि पिकचर....<<<<< Lol मला दोन मिनटं कॉम्प्लेक्स येऊन गेला. असा सिनेमा आणि असं गाणं ऐकल्याचंही आठवत नाही म्हणून.

मी पण बराच वेळ विचार करत होते Happy मग म्हटलं असेल बॉबी चा आपटलेला चित्रपट
मला क्लू द्यायला जाम मजा येते
कधीकधी क्लू देऊन मेमरीत जास्त घोळ घालता येतो Happy

Happy पण अगदीच चूक नव्हतं....
गाणे पाणी पिऊन सुरू होते नि मध्ये कोणी तरी प्यास बुझा दो गातोय की
ओलीसांची जिंदगी की जंग नव्हे का ही ???
१०० त ३५ तरी द्या

ओळखा
trial9.jpg

कोण आहे ती कळली का?
०. हिचा पदार्पणाचा सिनेमा आहे हा. रूढ प्रेमकथा नाहीच जवळजवळ. पण शेवट तोच ...happily ever... वाला

१. मागच्या ५ वर्षातील सिनेमा
२. यातील नायक.... आता नाही....
३. हिचा याच सिनेमाबरोबर रिलीज झालेला दुसरा अ-हिंदी सिनेमा --- प्रचंड व्यवसायिक यश + पारितोषिके.
४. हा दुसरा सिनेमा वैद्यकीय + युद्धकालीन वाताहात या पार्श्वभूमीचा.
५. दोन्ही चित्रपटात तिचे एकाकी / एकटे असणे हा समान दुवा आहे.
६. क्ल्यूज मध्ये हिंदी सिनेमाचे नाव येऊन गेलेले आहे

Pages