©अज्ञातवासी - भाग ६ - वेताळ आणि सहा भुते!

Submitted by अज्ञातवासी on 1 November, 2020 - 01:34

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

भाग - ५
https://www.maayboli.com/node/77156

भाग - ४
https://www.maayboli.com/node/77152

भाग - ३
https://www.maayboli.com/node/77137

भाग - २
https://www.maayboli.com/node/77129

भाग १ -
https://www.maayboli.com/node/77125

खुर्चीसमोर आज बरीच माणसे उभी होती. ओळीने. माना खाली घालून.
"अण्णा, नाशिक पाहिजे म्हणतोय तो."
खुर्चीवर एक उंच, जरासा स्थूल माणूस बसलेला.
"दम असेल तर घे की म्हणावं."
"तेच तर म्हणतोय तो. आपले सगळे धंदे ताब्यात घ्यायचं म्हणतोय. कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही तो."
"अण्णा, मी काय म्हणतो." जयदेव मध्येच म्हणाला. जयदेव उर्फ अप्पा!!
"काय म्हणतो अप्पा?"
"म्हणजे, बोलणं करून बघू ना. कशाला उगीच अजून माणसं मारायची?"
"अप्पा," अण्णा हसले. "वीस माणसं गेलीत आपली. त्याची अकरा. आता बोलणं करायचं म्हणतो. तो खुर्ची मागतोय. देऊन टाकू?"
"नाही अण्णा, पण..."
"नाही. आता जीव जाईल, नाहीतर खुर्ची राहील. तयारी करा. निकराचा घाव घालायला हवा."
आदेश सुटले. माणसं तयार झाली.
-----------
जुनं नाशिक. रात्रीची वेळ.
"जगनअण्णा ऐकणार नाही इब्राहिम."
"ऐकावं लागेल चाचा. ऐकलं नाही, तर जगनअण्णाच राहणार नाही."
"शेलरांना कमी समजू नको इब्राहिम. वीस माणसं मारलीत तू त्यांची. ते पलटवार करतीलच."
"इसी चीज का तो इंतेज़ार है चाचा! पलटवार होगा, और उसपर होगा हमारा आखरी वार. एकभी आदमी जिंदा नही बचेगा. पूरा वाडा जला दूंगा. आणि इथे येणं सोपं नाहीये, पूर्ण गल्लीत प्रत्येकाकडे मशीनगन आहेत. माझी हवेली म्हणजे किल्ला आहे किल्ला." इब्राहिम अभिमानाने म्हणाला.
बाकीचे सर्वजण विचारात पडले.
--------
"टकटक."
"कौन है भाई."
"हम लोग है."
"हम कौन."
"इब्राहिमभाई ने भेजा है."
"रुको, आता हुं!"
"तो माणूस पुढे गेला. त्याने दार उघडलं."
"कौन चाहीये?"
बंदुकीचा आवाज आला नाही.
गोळी मात्र डोक्याच्या मधोमध लागली!
त्या रात्री बऱ्याच दारांवर टकटक झाली, आणि आवाज न करता बऱ्याच लोकांच्या डोक्याचा वेध घेतला गेला.
हवेलीचा भलामोठा लोखंडी दरवाजा मात्र अजून दूर होता. पहारेकरी बाहेर उभे होते.
दूरवर कुणीतरी एक जोरात किंचाळी फोडली!
पहारेकरी सावध झाले. गल्लीतले सगळे दिवे लागले.
ताबडतोब मशीनगन घेऊन अनेक लोक रस्त्यावर आले.
------------
"रामा, मेलो आज आपण. आरे एवढ्या बंदुका. मुंबई लुटली की काय?"
"राजा, आता परत जाता यायचं नाही, सगळ्या लाईटी लागल्यात. बाकीचे कुठं आहेत?"
"ते हवेलीजवळ पोहोचले असतील."
"हरामजादे!" दूरवरून ओरडण्याचा आवाज आला, आणि त्यापाठोपाठ अनेक बंदुकांचे आवाज.
"चल, अण्णांना सांगता येईल. पळ मागे."
ते मागे वळले.
समोर दहा बारा लोक मशीनगन घेऊन उभे होते.
त्यांच्या किंकाळ्या रात्रीच्या अंधारात विरून गेल्या!
-----------
वाड्याच्या अंगणात प्रेतांचा खच पडला होता.
"अण्णा, अजून नोंद नाही." इन्स्पेक्टर मध्येच बोलले.
"धन्यवाद साहेब!" अण्णांनी हात जोडले. इन्स्पेक्टर निमूटपणे चालता झाला.
"आपले तेवीस गेले अण्णा, त्यांचे पंधरा."
स्मशानशांतता.
"सध्या नाशकात आपली किती माणसे असतील, बंदूकवाली अब्दुल?"
"अण्णा सात-आठशे तरी असतील."
"बॉम्बवाले?"
"म्हणजे अण्णा." अब्दुल चरकलाच.
"बॉम्बवाले किती असतील?"
"वीस पंचवीस."
"सगळे बोलवा. आज युद्ध होईल!!"
"अण्णा," न राहवून अप्पा मध्येच बोलला. "हे युद्ध नाही तर आत्महत्या आहे. अहो घरोघरी मशीनगन वाटल्यात त्याने. नाही शक्य त्याला संपवणं."
"अप्पा, घरात जा आणि कुठेतरी लपून बस. वाचशील तू. नाहीतर हकनाक त्यांच्या हातून नाहीतर माझ्या हातून मारला जाशील. निघा!"
जगनअण्णा ओरडलेच.
तेवढ्यात एक दिवा खळकन फुटला.
"अण्णा, हल्ला झालाय." कुणीतरी ओरडलं.
वाड्याचा दरवाजा तोडून एक ट्रक आत घुसला आणि त्यामधून बेछूट गोळीबार चालू झाला.
गोळ्यांचा अक्षरश: पाऊस पडत होता!
कुणालाही पळण्याची, तर सोडा, मागे वळण्याचीही उसंत मिळाली नाही!
कित्येकजण गोळ्यांना बळी पडले!
कित्येकजण हातबॉम्ब पडून भाजून निघाले!
गोळीबार चालूच होता.
मात्र तेवढ्यात एक गाडी प्रचंड वेगाने आत आली...
गोळीबार करणारेही क्षणभर चक्रावले, मात्र आता गोळीबाराची दिशा गाडीकडे वळली.
गाडीची गोळीबारात अक्षरशः चाळण झाली.
मात्र त्याही परिस्थितीत ती गाडी ट्रकजवळ आली...
...व त्यातून कुणीतरी एक प्रचंड मोठा बॉम्ब ट्रकवर फेकला.
क्षणार्धात तो ट्रक उद्धवस्त झाला!!!
------
'नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा नरसंहार!
वाड्यातील सगळे जण गेले. उरलो फक्त अण्णा, अप्पा, काका, सौदामिनीबाई आणि मी!
माझे वालीदही जागीच गेले. मी वाचलो. शेलरांच राज्य संपल्यात जमा झालं असतं!!
गाडीची चाळण झाली होती..
मात्र गाडीत सगळेजण सुखरूप होते... चमत्कार होता तो.
गाडीतून आधी सहाजण उतरले...
...आणि सगळ्यात शेवटी उतरला, ऐनवेळी बॉम्ब फेकणारा वेताळ...'
'...राजशेखर शेलार...'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही अप्पा, पण...">>> येथे अण्णा हवं ना?

"अण्णा, न राहवून अप्पा मध्येच बोलला>>> येथे अवतरण चिन्ह व्यवस्थित करायला हवं।

There should not be any error in the masterpiece...