दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मला सोनं महाग झालं म्हणून चांदी घेऊन आले म्हणणारी हिरॉईन आणि लेहंगा महाग झाला म्हणून ओढणी घेऊन येणारा कंजूस हिरो माहिती आहे
(आम्ही त्याचे लेहंगा हुवा बडा महंगा मै चx ले आया गायचो Happy )

सोना लई जा रे ; चांदी लई जा रे ( माझं गाव माझा देश )
पैसा पण लई जा रे;
पण दिल नाही देणार

द्या आता खंग्री रंगीत ..... वंशावळ कु /सुकर्म अभियान युक्त

कातरवेळी संध्याकाळी आकाशाखाली आम्ही किती जण होतो असं
शेखर सुमन रेखा यांना विचारतात
अटी लागू -- किती जण = १
कोणत्या गाण्यात --- सांझ ढले गगन तले हम कितने एकाकी ( उत्सव)

कारवी बरोबर
किमान 2 असतील Happy
कवी आपल्या काकीला विचारतो आपण किती होतो ए काकी
त्यामुळे कवी आणि त्याची काकू हे मेंबर नक्की असतील Happy

आपण किती होतो ए काकी >>>
शक्य आहे गाणारे वाडकर. मराठी.... सो असे हिंदी असूच शकते.
पण मग शेसु अनपढ असावा का? २ पर्यंतही मोजायला काकी लागते?

शे सु टुन्न होता सोमरस पिऊन
म्हणून काकू ला विचारतो. किती होतो गं आपण? मला वाटतं काही लोकांनी अजून सोमरस कॉन्ट्री चे पैसे दिलेलेच नाहीत.
फालतू जोक्स आवरते घेऊन पुढचे सोपे कोडे देते
2 हिंट दिल्या की लगेच ओळखाल.
IMG_20201028_213743.jpg

हनिमूनtravels
प्यार की ये कहानी सुनो

हो
वाटलेच लोक लगेच ओळखतील Happy
आता रियल खंगरी हंट चालू करायलाच हवाय Happy

IMG_20201028_222828.jpg

Life in a metro?

रिश्ते

ओके..नेमके नाही आठवले.सगळे सीन्स सरमिसळ वाटतात त्या सिनेमातील गाण्यांत.

माझे एक सोपेसे
रानात नाचत ,पाण्यात भिजत, हिरोच्या मागे गात,नाचत उड्या मारणारी हिरोईन.
नंतर सर्दी पण होते दोघांना.

अनु, यादो के सब जुगनू जंगल मे रहते है (फिर 'तेरी कहानी याद आई') बहुधा 'तेरे दर पर सनम' नसावे. पण दोन्ही गाणी सारखीच वाटतात.

Pages