Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाट
हाट
हो ट धरायचा आहे --- कारण
हो ट धरायचा आहे --- कारण तुम्ही टक ओके केलात ---- आणि क वरून प्रश्न...
अश्विनी अगदी जवळ येऊन
अश्विनी अगदी जवळ येऊन हुकल्यात...
खेळ कोणता ते सांगायचे .
हाट नाही.
प्रश्न : कसा
प्रश्न : कसा
कसे
कसा >> बरोबर ...
कसा >> बरोबर ...
अश्विनी
अश्विनी
तुम्ही खेळ व व्यावसायिक चे स्पष्टीकरण द्या. तर बरोबर.
३४= प्रश्न विचारलाय --- कसा
३४= प्रश्न विचारलाय --- कसा कधी कवा
व्यावसायिक = ? ट क सा ?
* ट क सा *
* ट क सा *
१ चे अक्शर येउन गेलेय पण खेळ ?
पाट ?
पाट ? सारीपाट मधील?
पाट नाही तुमचे मागचेच
पाट नाही तुमचे मागचेच अक्षर घ्या पण १२ ? अर्थ
नाट खेळ आहे.....? नाट लावणे
नाट खेळ आहे.....? नाट लावणे माहीत आहे
नाट खेळ आहे. होय, ५
नाट खेळ आहे. होय, ५ कवड्यांचा .....
शेवटचे शोधा, मी जरा निघतोय
मलाही नाट लावणे माहीत होते .
मलाही नाट लावणे माहीत होते . नाट हा खेळ आहे नवीन कळले.
नाटकसा *
नाटकसा *
........ शेपूट राहिले....
नाटकसाळ
नाटकसाळ
नाटकशाळ, नाटकशाळा, नाटकसाळ
नाटकशाळ, नाटकशाळा, नाटकसाळ nāṭakaśāḷa, nāṭakaśāḷā, nāṭakasāḷa f A bought or homeborn girl bred up as a singer, dancer, actress, or performer. She is also a concubine or inferior wife.
मोल्सवर्थ शब्दकोश
आणि
साळ f A school. A workshop. Place. Uncleaned rice. साळ घालणें To lay a warp.
वझे शब्दकोश
साळ = कारखाना / school /
साळ = कारखाना / school / workshop या अर्थी
व्यावसायिक ---- नाटकसाळ = नाटकासंबंधी काही काम करणारा
ref ---
अंकसळ, अकसाळी = सोनार; ( दाते)
लव्हार, लव्हारकाम, लव्हारकी, लव्हारसाळ हे लोहार साठी समानार्थी घेतलेत ( मोल्सवर्थ )
सो, साळ --- त्या व्यवसायात काम करणारा या अर्थाने घेतलाय
नाटकशाळा : नाटकगृह
नाटकशाळा : नाटकगृह
नाटकसाळ : वेश्या
काही कोशांत दोन्ही शब्द समानार्थी दिलेत. पण हा बारकावा आहे.
छान !
अश्विनी पर्यायी उत्तराशी
अश्विनी पर्यायी उत्तराशी पोचल्या होत्या.
पण स्पष्टीकरण नव्हते.
सर्व लोक छान खेळ.
नाटकसाळ : वेश्या --- नसावं
नाटकसाळ : वेश्या --- नसावं ना..
त्या एखाद्या पुरूषाच्या, समाजात प्रतिष्ठा नसलेल्य,, भिन्नलिंगी जोडीदार असतात. पण आयुष्यभर त्याच्याशी एकनिष्ठ / पत्नी प्रोटोकॉलने रहातात. यात उपजीविका करण्यासाठी + वेगवेगळ्या पुरूषांना रिझवणे हे पैलू नसतात बहुतेक. हा माझा समज आहे. चूक बरोबर माहीत नाही.
त्याचे नर्तकी व वेश्या हे
त्याचे नर्तकी व वेश्या हे दोन्ही अर्थ दिलेत.
मला अर्थ माहीत होता . पण नाट
मला अर्थ माहीत होता . पण नाट हे खेळाचे नाव माहीत नव्हते . त्यामुळे सांगता आले नाही.
मला एक बाळबोध शंका आहे.
मला एक बाळबोध शंका आहे.
जालावरील शब्दकोश म्हणजे फक्त मुखपृष्ठ व त्यावर मध्यभागी शोध घेण्याची चौकट असे स्वरूप असते. छापील शब्दकोश पाहतांना आपल्या नजरेसमोर त्याची दोन्ही पाने एका नजरेत असतात.
ज्याप्रमाणे वृत्तपत्राची छापील आवृत्ती जशीच्या तशी जालावर पाहण्याची सोय आहे, तशी शब्दकोशाच्या बाबतीत उपलब्ध आहे काय ?
गुगल सर्च दिल्यावर books
गुगल सर्च दिल्यावर books.google. मधील लिन्क आली रिझल्ट्समध्ये तर दिसते छापील आवृत्ती दोन्ही पाने...
epustakalay.com वर शब्दरत्नाकर आहे छापील आवृत्ती पीडीएफ
महाराष्ट्र सरकारची एक स्कॅन केलेल्या ग्रंथांची यादी येते. त्यातही मूळ प्रत उघडते. साईट विसरले मग देते...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ....
https://sahitya.marathi.gov.in/
यात कोश आणि इतरही बरीच जुनी पुस्तके आहेत.
कारवी धन्यवाद. बघतो.
कारवी धन्यवाद.
बघतो.
एक कोडे खूप दिवसांनी.... दहा
एक कोडे खूप दिवसांनी.... दहा अक्षरी शब्द ओळखा. अक्षरांची शोधसूत्रे खालीलप्रमाणे ---
१. 123 **ची तीव्र इच्छा / नितांत गरज असलेला (**काहीही असू शकते शारीरिक / मानसिक गरज)
२. 45 गांधीजींशी संबंधित वस्तुविशेष
३. 9310 पराकाष्ठा करणे, नियंत्रणाबाहेर जाणे (भूतकाळ)
४. 94 घरात / बाहेरही बसण्या-झोपण्याचे उंच साधन / रचना
५. 8710 बांधकाम / खोदकाम करताना लागणारे साधन
६. 95 शिकस्त, महत्त्वाची बातमी
७. 394 दोन अवयवांना एकत्र आणणारी कृती (उदा - टाळी (२ तळहात), थाप ( हात-मांडी) )
८. 98 तीन नातेवाईक देवांचे उत्सव येणारा महिना
९. 916 जन्मदात्रीशी संबंधित
१०. 23 (शुद्धलेखनाची चूक सोडून) भुतांसाठी वेधक गोष्ट
११. 46 पुढे जायला, वर यायला, आकार द्यायला, शक्ती मिळवायला हे लागते
दहा अक्षरी शब्द नाटकाशी संबंधित आहे.
७८९१० मेघमाला
७८९१० मेघमाला
थोडेसे बदलावे लागेल. ७८९१०
थोडेसे बदलावे लागेल. ७८९१० ज्यावरून ओळखले ते शब्द? शोधसूत्रांची उत्तरे हवीत ना...
98 तीन नातेवाईक देवांचे उत्सव
98 तीन नातेवाईक देवांचे उत्सव येणारा महिना >>> माघ ? सो ८९= घमा ?
माघ घमेला
माघ
घमेला
माघ बरोबर; घमेला नाही
माघ बरोबर; घमेला नाही
Pages