Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला हा धागा खूप आवडतो.
मला हा धागा खूप आवडतो.
पण वारंवार इथे यायला जमत नाहीये.
गूढ कोडी देण्याचा प्रयत्न करावा म्हणते.
दुसरं कोणी देतंय का?
मस्त होते कोडे @कुमार
मस्त होते कोडे @कुमार
अवनी द्या की कोडे, विचारत बसूच नका
@कुमार बक्षिस म्हणून अजून एक कोडेच घाला कसे
साधारणपणे शब्दाचा अर्थ आणि
साधारणपणे शब्दाचा अर्थ आणि उपशब्द सूचक दिले आहेत.
अक्षरसंख्या कंसात.
१. नटूनथटून छान
उघड माझे कान (३)
२. रस्त्याचे नववे डोके (४)
३.पायाचा नोकर डोक्यावर बसे ! (३)
४. जोडीने सुसाट इथे धावा, गा (४)
५. सभोवती सुरुवात करून स्वतः:च्या डोळ्यात बघ (३)
६. कृष्णाकाठी थाटले नांगराचे दुकान (४)
७. रावसाहेब, बसा. पाहुणचार घ्या. नसत्या उठाठेवी कशाला (४)
८. निवडताना तृणधान्याची गोड बाजू फेकून दे (३)
९. आकार मोठा आहे पण टाक तोंडात (४)
१०. श्वास घेऊन सा लावला म्हणून हसतोस काय ?शूरवीरच की ! (३)
कविन
कविन
उत्तर आणि स्पष्टीकरण दोन्ही
उत्तर आणि स्पष्टीकरण दोन्ही अपेक्षित.
१०. साहसी शूर् वीर
१०. साहसी शूर् वीर
सासी श्वास
सा , हसी
साहस/साहसी .....बरोबर
साहस/साहसी .....बरोबर
अपेक्षित उत्तराआधी ६ प्रयत्न
अपेक्षित उत्तराआधी ६ प्रयत्न करून झालेत. तेव्हा आता बक्षिसाची रक्कम निम्म्यावर आलीय ! >>>
चीटींग....मदतीविना बरोबर ओळखल्यास बक्षीस होते. पहिल्या प्रयत्नात ओळखल्यास म्हटले नव्हते.
समजून द्या की कायतरी .....
आपण सगळे वाटूनच घ्यायचे आहे. कोडे रचणे + शब्द ओळखणे + गट ओळखणे
म्हणून तर .......८-९ जण प्रतिक्षेत......
३.पायाचा नोकर डोक्यावर बसे !
३.पायाचा नोकर डोक्यावर बसे ! (३) >>>>
पगडी = पग ( पाय) + गडी ( नोकर)
१. नटूनथटून छान
उघड माझे कान (३) >>>>
कोरणे -- निगुतीने मेकप करणे = कानकोरणेचे लघुरूप ?
8. टाकणे
8. टाकणे
बियाणे (गोड) – बिया = णे
टाक + णे
पगडी ..बरोबर
पगडी ..बरोबर
कोरणे, टाकणे .....बरोबर नाही
८ साठी अजून मदत लागेल कदाचित ... बघू नंतर
८. पेरणे / पेरणी
८. पेरणे / पेरणी
८ प्रश्न पुन्हा बघा. सूचक
८ प्रश्न पुन्हा बघा. सूचक वाढवला आहे
पुन्हा भेटूयात संध्याकाळच्या सभेत ५ वाजता
2. मार्गशीर्ष
2. मार्गशीर्ष
६. कृष्णाकाठी थाटले नांगराचे
६. कृष्णाकाठी थाटले नांगराचे दुकान (४) >>>> कुळवाडी ?
कृष्णाकाठी -- वाडी ( नृसिंहवाडी)
कुळव -- नांगर
कुळवाडी --- नांगराचे दुकान
६ हलवाई
६ हलवाई
वाई कृष्णाकाठी
हल नांगर
५. सभोवती सुरुवात करून स्वतः
५. सभोवती सुरुवात करून स्वतः:च्या डोळ्यात बघ (३)
सुरवात = मूळ
स भोवती मूळ = मु{स}ळ
४ द्वंद्वगीत असेल तर स्प
४ द्वंद्वगीत असेल तर स्प देतो
९ महा (मोठा) द्वार (तोंड)
९ महा (मोठा) द्वार (तोंड)
मार्गशीर्ष, हलवाई, मुसळ ...
मार्गशीर्ष, हलवाई, मुसळ ....तीनही बरोबर
साधारणपणे कोड्यातला प्रत्येक
साधारणपणे कोड्यातला प्रत्येक शब्द सकारण दिला आहे.
तरीही कुमारजी, मानवजी
कोडे रचताना काही कमी पडत असेल, चुकत असेल तर जरूर सांगा
८.एक तृणधान्य
८.एक तृणधान्य
९.एक खाद्य
४.जोडीने येणारा शब्द
८ पाकड पाक गोड कड
८ पाकड
पाक गोड
कड
पाकड ... अगदी बरोबर
पाकड ... अगदी बरोबर
हे टाकाऊ तृण बी सध्या फार कुणाला माहीत नसावे.
पूर्वी पाकडाशिवाय तांदूळ मिळणे दुरापास्त होते
9. बडीशेप
9. बडीशेप
१. नटूनथटून छान
.
१.उघड कान हे अर्थदर्शक
१.उघड कान हे अर्थदर्शक
.४. धावाधाव ?
.४. धावाधाव ?
४.गा..अकारण नाही दिलंय
४.जोडीने इथे सुसाट धावा, गा...
असं नाही दिलंय....आता विचार करा
१.(सुधारित )
१.(सुधारित )
मला तालात टाळी देऊन कान उघड
Pages