डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by राधानिशा on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..

70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...

आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिंत चालताना व रेडा वेद बोलताना इतरांनी बघितले असणार ना??
>>
ईतरांना बघताना कोणी बघितलेय Happy
कोणाला ठाऊक आहे अशी घटना घडली की नाही वा घडली तर नेमकी कशी..
खरे तर अश्या पुराणातील चमत्कारील कथांवर एक वेगळा धागा काढायला हवा जसा तो भुताटकीमागील शास्त्रीय कारणांचा आहे तसा.

धागा वाचून:

असेही विचार असतात हे नवीन समजले

वरती लिंका दिल्यात त्या बघून घ्या एकदा...
Submitted by साधना on 15 October, 2020 - 14:45
>>>>>

त्या पिक्चरच्या लिंका आहेत ना? Uhoh
त्यात दाखवले म्हणजे तसे घडले आणि तसेच घडले समजायचे का?
मग तर रामायण महाभारतातील एकूण एक कथांवर विश्वास ठेवावा लागेल.
साईबाबांचे सारे चमत्कार मान्य करावे लागतील.

वरती लिंका दिल्यात त्या बघून घ्या एकदा...>> अहो पण साधना तै, तो पिक्चर आपल्या आजोबांच्या काळात शुट झालेला असणार... त्यात दिग्दर्शक सांगेल तसे संवाद आणि अभिनय केला असणार.

असेही विचार असतात हे नवीन समजले
Submitted by बेफ़िकीर on 15 October, 2020 - 14:48
>>>

बेफि तुम्ही बेफिकीर आहात,
सारेच नसतात Happy

बाकी अ‍ॅडमिन, धाग्याला टाळे लावायचे/उडवायचे मनावर घ्या. अस्थानी आत्महत्येला अवाजवी प्रतिष्ठा देणे सुरू आहे. हल्ली लोकांना हेल्पलाईन भरभर सापडत नाही तेव्हा असे विषय जरा जपून.... >>>> +१

बाकी अ‍ॅडमिन, धाग्याला टाळे लावायचे/उडवायचे मनावर घ्या. अस्थानी आत्महत्येला अवाजवी प्रतिष्ठा देणे सुरू आहे. हल्ली लोकांना हेल्पलाईन भरभर सापडत नाही तेव्हा असे विषय जरा जपून....>>>हा भयगंड बाळगून चालणार नाही. हा महत्वाचा सामाजिक स्पंदन असलेला विषय आहे. धागा बंद केला तरी मनात हे विषय घोळत रहाणारच. त्यापेक्षा समाजाचे मानसिक आरोग्य या विषयावर साधक बाधक चर्चा झाली तर त्यातून नवी दिशा सापडते.

सर्वांचे प्रतिसाद खूप छान आणि सकारात्मकतेने भरलेले आहेत. इथे प्रतिसाद लिहिताना कुणालाही सल्ला देण्याचा किंवा कुणाला जज करण्याचा बिल्कुल उद्देश नाही. मलाही थोडं इथे व्यक्त व्हावसं वाटतयं म्हणून हा शब्दप्रपंच...
माझ्या ऑफीसच्या येण्या- जाण्याच्या रस्त्यामध्ये एक अपंग व्यक्ती म्हणजे दोन्ही हातही नाही आणि गुडघ्याच्या वर दोन्ही पायही नाही( कदाचित अपघातात दोन्ही गेलेले असावेत ) दर शुक्रवारी ( बाजाराचा दिवस असल्यामुळे) स्वतःभोवती गोल गोल फिरत रस्त्यावर रांगत भीक मागत असायची. मी जेव्हा पण त्या व्यक्तीला पाहायची माझ्या मनात नेहमी त्या व्यक्तीबद्दल कणव दाटून यायची. खरचं किती परावलंबी जीवन आहे या व्यक्तीचं तरी पण आयुष्य जगण्याची एक ओढ नक्कीच त्यांच्यात असावी असं मला वाटायचं.आजही हा लेख वाचताना ती व्यक्ती डोळ्यांसमोर आली. देवाने एक धडधाकट शरीर आपल्याला दिलं असताना आपण त्याचा कुठल्याही परिस्थिती त्याग का करावा? निसर्गाने बहाल केलेल्या ह्या मानवी आयुष्यावर माझं खूप प्रेम आहे. कधी- कधी शरीरातील होणारे बदल, आजूबाजूची परिस्थिती, ताण-तणाव , भूतकाळात घडलेल्या काही दुःखद घटना ह्या मुळे मानसिक स्थितीत बदल घडतात, चिडचिड होते, थोड्याफार प्रमाणात औदासिन्य जाणवतं पण फक्त तेवढ्यापुरतचं.. पण हे आयुष्यच नको असा विचार मात्र मनाला कधी शिवत नाही.

माझे वडील आजारपणात ४ वर्षे बेडवर पडून होते. गेल्यावर्षी त्याचं निधन झालं. बेडवर असताना लघवीसाठी पिशवी तसेच सारे विधी बेडवरच होते. त्यांचे पूर्ण जीवन परावलंबी झाले होते. त्यांची सारी सेवा- सुश्रुषा आईने केली. आम्ही बहिणी बाहेरगावी राहत असल्यामुळे रोज आम्हांला जाणे शक्य होत नसे तरी पण दर आठवड्याला माहेरी एक फेरी मी मारत असे त्यावेळी जमेल तेवढी वडीलांची सेवा करीत असे. बरेचदा बाबांना खूप अपराधीपणा जाणवत असे की माझ्यामुळे आम्हां सर्वांना हे सर्व करावं लागतयं.. सतत म्हणायचे, देवाने मला मरण दिलं तर बरं होईल. मी त्यांची समजूत घालत म्हणायची की असं नका बोलू.. आम्ही आहोत ना .. प्रत्येकवेळी त्यांचे ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं. एक दिवस शांतपणे त्यांच्याजवळ बसून विचारलं.. बाबा , अगदी मनापासून सांगा तुम्हांला खरचं मरावसं वाटतयं का? तुम्हांला अश्या परावलंबी आयुष्याचा वैताग आला असेल पण खरचं तुम्हांला हे आयुष्य नको वाटते का? शांतपणे वडील म्हणाले.. नाही .. मला अजून जगावसं वाटतयं.. तुम्हां मुलींसाठी मला अजून जगायचं.. माझ्याशिवाय तुम्हांला कोण आहे? मला तुमच्यासाठी जगावसं वाटतयं..
पूर्णपणे परावलंबी जीवन असलेले माझे पंचाहत्तरीतले वडील आपण मुलींसाठी जगायला हवे हा उद्देश ठेवून अजून जगण्याची अभिलाषा बाळगून असतील तर वयाची चाळीशीही पार न केलेली आयुष्यात अजून बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडायच्या असताना कुठल्याही परिस्थितीत मरणाचा विचार नाही करू शकणार.

नकारात्मक मानसिक स्थिती निर्माण व्हायला कधी कधी आजूबाजूची परिस्थिती आणि सतत नकारात्मक विचार करणारी व बोलून दाखवणारी माणसं सुद्धा जबाबदार असतात. त्यामुळे शक्यतो सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहणाऱ्या लोकांच्या संगतीत राहावे. ज्या चांगल्या गोष्टीत मन रमेल तिथे रमवावे. मला वाटते की मायबोलीवर सुद्धा बऱ्याच आयडींचे लेखन व प्रतिसाद इतके उत्कृष्ट असतात की प्रत्यक्षात त्यांना ओळखत नसतानासुद्धा मला असं वाटतं की त्यांच्या लेखनातून ते खूप सकारात्मकता पेरतात. मला त्यांचे लेखन व प्रतिसाद खूप आवडतात. माझं मनोगत संपविताना मी आपली माणसं चित्रपटातील हे प्रेरणा देणारे गीत म्हणेन ..
जीवन गाणे गातच रहावे...
झाले गेले विसरून जावे..
पुढे पुढे चालावे...
(खूपच अवांतर असेल तर क्षमा असावी).

प्रकाश सर, चर्चा होऊ शकेल पण मायबोलीसारख्या फोरमवर होणे योग्य वाटत नाही. उद्या एखाद्या मायबोली वाचकाने तुमची विधाने quote करून आत्महत्या केली तर काय कराल? या अशा विधानांमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करता या चर्चा योग्य वेळ, ठिकाण आणि व्यक्ती असे असेल तर घडाव्यात असे मला वाटते.

प्रकाश सर, चर्चा होऊ शकेल पण मायबोलीसारख्या फोरमवर होणे योग्य वाटत नाही.>> अशाच फोरम वर चर्चा होउ शकते
उद्या एखाद्या मायबोली वाचकाने तुमची विधाने quote करून आत्महत्या केली तर काय कराल?>>>> एखाद विधान को ट करा.

@radhanisha, तुम्ही लिहिलेल्यापैकी काही ओळी मला महत्त्वाच्या वाटतात. हे सगळं लिहिणं, ज्या एका आंतरिक सक्तीतून येतं, तेही माझ्या चांगलंच ओळखीचं आहे... मी सलगच्या सलग काही वर्षं अश्याच काहीशा आयडेंटिटी क्रायसिसमध्ये, आयसोलेट होऊन घालवलेली आहेत... पण कधीतरी असंच एकदा जीए कुलकर्णींची 'स्वामी' नावाची कथा वाचली होती आणि ठिसूळ झालेलं मन एकदम लख्खकन उजळून निघालेलं होतं, हे आठवतं..

रुपालीताईंचा प्रतिसाद खूप आवडला - पटला.

नकारात्मक मानसिक स्थिती निर्माण व्हायला कधी कधी आजूबाजूची परिस्थिती आणि सतत नकारात्मक विचार करणारी व बोलून दाखवणारी माणसं सुद्धा जबाबदार असतात
हे विशेष. आजूबाजूला थोडी सकारकता वाढवुन पहावी

संपादित. प्रकाश सरांनी मजकूर वाचला आहे त्यामुळे आता मी तो काढून टाकला आहे. त्यांनी quote करायला सांगितले म्हणून तसे केले. असा प्रतिसाद कायमस्वरूपी राहू नये म्हणून आता काढलाय.

>>बाकी अ‍ॅडमिन, धाग्याला टाळे लावायचे/उडवायचे मनावर घ्या. अस्थानी आत्महत्येला अवाजवी प्रतिष्ठा देणे सुरू आहे. हल्ली लोकांना हेल्पलाईन भरभर सापडत नाही तेव्हा असे विषय जरा जपून....>>
प्लीज धागा नका उडवू. धागाकर्त्या व्यक्तीने इथे लिहिले आहे त्या कडे मदतीसाठी हाक असे बघा. जे प्रतिसाद अयोग्य वाटतील ते अ‍ॅडमिननी संपादित करावेत.
आजच युट्युबवर AVAHAN IPH चॅनेलचा चिंता आणि नैराश्यावरचा विडीओ बघितला.
https://www.youtube.com/watch?v=3JErJM48VHE
' केप ऑफ गुड होप' नावाचा त्यांचा सपोर्ट ग्रुप आहे.

>>>म्हणून कोणत्याही प्रकारे अशा अनैसर्गिक मृत्यूचे समर्थन करणे टाळावे असे वाटते.
अगदी!
सकाळपासून हा धागा अस्वस्थ करतो आहे.
लेख लिहिणे एक प्रकारचा कॅथर्सिस असू शकतो पण प्रतिसादांच्या ओघात लोक बरंच काही बोलून गेलेत जे जिज्ञासा म्हणते तसं ट्रिगर म्हणून वाचलं जाऊ शकतं. आणि इथे प्रतिसाद देणारेच लोक किंवा व्यक्त होणारेच वाचक नसतात. अनेक लोक मायबोलीच्या शब्दात "रोमात" असतात.
आणि आपण कुणीच तज्ज्ञ नाही. आणि तज्ज्ञांना सुद्धा असं लेख वाचून काही ठरवता येणार नाही.

जिज्ञासा, यापेक्षा सविस्तर वाक्ये कथा - कादंबरीत, चित्रपटात, नाटकात, असू शकतात, आत्महत्येच्या बातम्या त्यात आत्महत्येचं दिलेलं कारण वृत्तपत्रात, टीव्हीवर असू शकतात. कुठे कुठे लोकांना जबाबदार धरणार? इथे तर फक्त चर्चा आहे विषयावर.

औदासिन्य, विरक्ती, निरर्थकता, अनिच्छा या शब्दांच्या छटा तशा वेगवेगळ्या आहेत. 21 वर्षे हे काय आयुष्य संपवायच वय झालं का? असाही प्रश्न उपस्थित होउ शकतो? पण संजीवन समाधी याला एक वेगळीच अध्यात्मिक प्रतिष्ठा आहे. त्यात नैराश्याची छटा नाही. प्रत्यक्षात नैराश्य होते की नाही हे तपासण्याची सोय पण आता नाही. आपले विहित कार्य समाप्त झाले आहे असे समजून आपले आयुष्य आपण संपवण्याचा निर्णय घेणे यालाही एक तात्विक मूल्य आहे. जगण नकोस नाही पण पुरेसे झाले म्हणून स्वेच्छामरण पत्करणे यालाही एक तात्विक मूल्य आहे. जगण्याकडे पहाण्याचे प्रत्येकाचे दृष्टिकोण वेगवेगळे असू शकतात. तेच मृत्यु बाबत आहे.>>>>> जिज्ञासा हा मूळ प्रतिसाद आहे. यातील वाक्य तोडून तुम्ही तुमच्या सोयीने घेत आहात. यातून वितंडवादच होतो. उपयुक्त असे हाती लागत नाही असा माझा अनुभव आहे. असो.

प्रकाश सर, कोण कोणती गोष्ट कशी वाचेल आणि त्याचा काय अर्थ काढेल हे आपल्या हातात नाही. अनेकदा चित्रपटांवरून प्रेरणा घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना बघायला मिळतातच. तेव्हा अशा गोष्टींचे उदात्तीकरण टाळावे हेच सगळ्यात उत्तम नाही का? Offline चर्चा होऊच शकतात. चर्चा होऊ नये असे मी कधीच म्हटलेले नाही.

आपण ज्याला उदात्तीकरण म्हणता त्याला मी विचारमंथन म्हणतो.जगण्याकडे पहाण्याचे प्रत्येकाचे दृष्टिकोण वेगवेगळे असू शकतात. तेच मृत्यु बाबत आहे. हे मी म्हटले आहेच. तुमची मत व माझी मते वेगळी आहेत. तुम्हाला तुमची मते मांडण्याचा अधिकार आहे. मला माझी. असो.

मला जिज्ञासाचं म्हणणं पटतं.
आत्महत्येच्या बातम्या छापताना वृत्तपत्रंसुद्धा बातमीखाली हेल्पलाईनचे फोन नंबर्स छापतात. तशी सोय इथे करून मिळणार असेल तर एक वेळ ठीक आहे.
आत्महत्या करणारा करतो. त्याला किंवा तिला भले तेव्हा वाटत असेल की आपलं विहित कार्य पूर्ण झालंय. मागे राहिलेल्या कुटुंबीयांना, मित्रमैत्रिणींना काय वाटत असेल?
इथे वाचणाऱ्यांपैकी कोण कुठल्या मनःस्थितीत असेल आणि त्याच्या/तिच्या मनात काय विचार सुरू होतील कुणी सांगावं?

इथे वाचणाऱ्यांपैकी कोण कुठल्या मनःस्थितीत असेल आणि त्याच्या/तिच्या मनात काय विचार सुरू होतील कुणी सांगावं?>>>> अगदी सहमत

मराठी संकेतस्थळ विषयक चर्चा हा ट्रिगर ठरून आत्महत्या अशी एक घटना 6-7 वर्षांपूर्वी घडली होती. नक्की तपशील आठवत नाहीत पण आधीच उदास असलेल्या मनस्थितीत तो ट्रिगर ठरला असावा.
तर मायबोलीकरानो, ट्रिगर चांगल्या चर्चेतून घ्या.धागाकर्तीनेही असे काहीही टोक गाठणार नाही असे वचन द्यायचे आहे.
सर्व व्यवस्थित होणार आहे.हँग इन देअर. आजपेक्षा उद्या चांगला आहे.

निअर डेथ एक्स्पिरीयन्स बकवास आहेत. त्याच्या नादाने उभ्या रसरशीत आयुष्याची होळी करु नक असल्या भाकडकथा/ मेंदूचे खेळ फार वाचू नका. मुख्य म्हणजे प्रेमात पडा Wink

धागाकर्तीनेही असे काहीही टोक गाठणार नाही असे वचन द्यायचे आहे >>>> त्यांनी तसे काही लिहिले/सुचवले असते तर ह्या चर्चेचा सूर निराळा वाटला असता. मी स्वतः नैराश्याचा सामना केला आहे त्यामुळे या मुद्यावरचे असे ओपन एंडेड लिखाण मायबोलीवर येणाऱ्या कोणाही एखाद्या नैराश्यग्रस्त व्यक्तीसाठी मी धोकादायक मानतो.

मी स्वतः नैराश्याचा सामना केला आहे>> नैराश्य आलंय हे नेमकं कसं ओळखावं..? नेमकं काय फिलिंग्स येतात..?? बरेचदा असंही होत असेल की नैराश्य आलंही अन गेलं तरी त्या व्यक्तीला ते जाणवत नसेल... पुस्तकाचं पान पलटावं तसं जीवनातल्या नैराश्याच्या पानाला पलटुन प्रवास पुढे सुरु रहात असावा...

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला..
स्वीकारावी पूजा आता
उठी उठी गोपाला...

(झोपले वाटतं अ‍ॅडमिन/ वेबमास्तर/ संयोजक करा बंद धागा ....
म्हणलीये भूपाळी आता बघू काय होतं....दहा वर्ष मायबोलीवर आहे, कधी कुणाला धागा बंद करा म्हणाले नाही की कधी कुणाला भूपाळी ही म्हणाले नाही... ये भी चेकमार्क हो गया लाईफमे.... )

Pages