डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by radhanisha on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..

70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...

आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुजी, धनवंती ,मृणाली ,सामो तुम्ही लिहलेलं बरोबर आहे. पण कधी कधी असं वाटतं हि सगळी कारणं समजूत घालतात. आपलं दुःख, परिस्थिती मास्क करतात. मास्क म्हणजे चेहरा नव्हे.

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. जसं की....
१. सुर्य उगवला तर फक्त माझ्यासाठी किती छान कोवळं उन घेवुन आलाय, त्याला माहित होतं आज मी व्हिटॅ. डी घेणार आहे मनसोक्त.
२. बाजुला मोठ्या आवाजात डीजे वाजतोय (श्या काय कटकट आहे पेक्षा) तर त्यात वाजणारं गाण नेहमीपेक्षा वेगळ्या चालीत म्हणुन पहा. (माहित असेल तरी उदाहरण म्हणुन सांगतो. ये दुनिया एक दुल्हन...हे गाणं......आओ बच्चो तुम्हे दिखाये च्या चालीत म्हणा पाहु)
३. तुमच्या किंवा शेजारील बागेत फुललेल फुल आपल्यासाठीच
४. रामदास आठवले ज्या कविता करतात त्या फक्त आणी फक्त माझ्यासाठी
५. मै और मेरी तनहायी अमिताभ दरवेळी माझ्यासाठीच म्हणतो
६. मायबोलीवर पाककृती टाकणारे फक्त माझ्याच प्रतिसादाची वाट बघत असतात, त्याशिवाय त्यांना त्यांची पाकृ सफल झाल्यासारखी वाटतच नाही.
७. मुलगी "आई" किंवा "ममा" किंवा "मॉम" किंवा तुमच नाव घेवुन (जनरली नवरा नावाने बोलवतो तर पोरं पण तसच) बोलत असेल तर तिची ते बोलतानाची लकब किंवा आवाजातील प्रेम जिव्हाळा लाडिकपणा दुसरं कोणी कितीही काहीही देवुन बोललं तर मिळेल काय.
८. भले गंमत समजा पण शिंचॅनचे जीवनविषयक विचार (सखाराम गटणे टाईप नव्हे) बघा हसतानाच थोडं शिकायला मिळु शकेल.
९. नवर्‍याला पाणी फक्त माझ्या हातचंच आवडत यातला आनंद दुसर्‍या कोणाच्या एव्हरेस्टवर चढण्याच्या आनंदाइतका असु शकतो.

अजुन बरच काही. सावरा स्वतःला. बाकी कोणी नाही पण तुमच्यावर जिचं जग सामावलेलं नी टिकुन आहे तिच्यासाठी तरी.....काळजी घ्या.

सध्या मी सुद्धा डिप्रेशन फेस करतेय.. मॅग्नेशियम कमी झालंय त्यामुळे. मॅग्नेशियम सप्लिमेंट चालू केल्या आहेत.. पण अगदी टोकाचे विचार नाही येत.. वर्षाअखेर असल्यामुळे कामाचे प्रेशर आहे.. विचार करायलासुद्धा वेळ नाही आहे.

जे सकारात्मक विचार करून जातं ते डिप्रेशन नव्हे. असंच केव्हा उदासवाणे वाटणे, असुरक्षित वाटणे यावरील उपाय डिप्रेशनवर चालले असते तर डिप्रेशन नावाचा आजार झालाच नसता कुणाला.

>>>>>जे सकारात्मक विचार करून जातं ते डिप्रेशन नव्हे.>>> अगदी खरे आहे. मेंदूतिल रसायनांचा गोंधळ स्वप्रयत्नाने जाणार नाही. त्याकरता डॉक्टर असतात. डॉक्टरांनी त्यांचा वेळ, पैसा व बुद्धी खर्ची घालून उत्तम शिक्षण संपादन केलेले असते. त्या शिक्षणाचा फायदा करुन घ्या.

>> जे सकारात्मक विचार करून जातं ते डिप्रेशन नव्हे.

हे अगदी खरे आहे. आजकाल डिप्रेशन हि Umbrella Term म्हणून वापरली जाते.

मला हे सगळं नवीन आहे. ना माझा अभ्यास ना वाचन, ना हे क्षेत्र ना अनुभव. अशी अवस्था मी कधी इमॅजिनच केलेली नाही. मला माहीत नाही अशी अवस्था माझ्या आयुष्यात कधी येईल का ? कदाचित नाही पण येणार. इतकंच कळतंय की प्रत्येक व्यक्ती स्पेशल असते त्यामुळे अशा अनुभवातून कुणीतरी जाणे सहज शक्य आहे. त्यामुळे माझा पासच होता पण माझ्या बाबतीत असे होईल का हा किडा स्वस्थ बसूच देईना...

मला कशाचीही ददात नसेल आणि हातीपायी धडकी असेन तर मी ९९ वर्षांची झाले आणि देवाने जरी विचारलं की काय विचार आहे ? तरी मी म्हणेन की जा बाबा तुझ्या कामाला. मला राहू दे इथेच. एक एक सेकंद इथे कमी पडतो. किती तरी छंद आहेत त्यांना वेळ देता येत नाही, बरंच नवीन शिकून होत नाही. धाकट्या भावाची खोड मोडायचं ठरवतेय पण योग येत नाही... एक ना अनेक गोष्टी आहेत. निर्वाणाला जाणे हे माझ्यासारख्या अडाणी मुलीचे कामच नाही. अगदी मी संत ज्ञानेश्वर असते तरीही आत्ताशी तर ज्ञानेश्वरी लिहीलीये, यापेक्षा भव्य काय करता येईल या विचाराने पुन्हा जगण्याचं बळ मिळालं असतं.

विषयांतराबद्दल क्षमस्व .

>>जे सकारात्मक विचार करून जातं ते डिप्रेशन नव्हे. असंच केव्हा उदासवाणे वाटणे, असुरक्षित वाटणे यावरील उपाय डिप्रेशनवर चालले असते तर डिप्रेशन नावाचा आजार झालाच नसता कुणाला.>> +१

डिप्रेशन हा आजार आहे. शरीराचे इतर अवयव आजारी झाले तर डॉक्टरांकडे जातोच ना तसेच मेंदू आजारी असेल तर डॉक्टरचे उपाय हवेत. आपलेच मन असे कमकुवत कसे वगैरे स्टिग्मा बाळगू नका. जीवनसत्वांची कमतरता, संप्रेरकांच्या कामातली गडबड, मेंदूतील केमीकल लोचा जे काही कारण आहे त्यानुसार योग्य उपचार उपलब्ध आहेत. उपचार दीर्घकालासाठी आहेत म्हणून प्लीज टाळू नका . ब्लड प्रेशर आटोक्यात रहाण्यासाठी, डायबेटिस , वाढलेला वाईट कोलेस्टोरॉल यासाठी देखील दीर्घकाल औषधे घेतली जातातच ना, तसेच हे देखील.

एक गोष्ट आवर्जून सांगायची राहिली. मायबोलीकर ग्रेट आहेत. किती सुंदर प्रतिसाद आहेत.
आणि मानवकाका - सुपर्ब !

मला एक गोष्ट पुन्हा पुन्हा ठसवावीशी वाटते. मनोविकारांवर खूपच सल्ले दिले जातात त्यातले बहुतेक अमुक खा, अमुक तऱ्हेचे व्यायाम करा, प्राणायाम, कपालभाती करा, जप करा, शांत ठिकाणी जाऊन आवडेल ते स्तोत्र वाचा अशा पद्धतीचे असतात. अर्थात ते आपुलकीपोटी दिले जातात हे खरेच. पण मनोविकार म्हणजे मेंदूकडून योग्य ती आज्ञा योग्य त्या अवयवाला योग्य त्या वेळी ना पोचणे आणि दुसऱ्याच कुठल्यातरी असंभवनीय, भविष्याविषयी, अभावात्मक विचारांमध्ये मेंदू गुंगून राहाणे आणि भवतालाची जाणीव गमावली जाणे होय. अशा परिस्थितीत तुम्ही हे करा ते करा हे सांगणे निष्फळ असते. मेंदू कार्यक्षमता गमावू लागलेला असतो. अशा कमी कार्यक्षम मेंदूकडून योग्य ती आज्ञा सुटणे कठीण बनते. मेंदूचा हुरूप आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी डॉक्टरी इलाज आवश्यक असतात. (कारण मेंदू ध्यान, योग्य आहार वगैरे उपचार स्वतः: स्वतः:वर करवून घेण्यास असमर्थ असतो.) तेही लवकरात लवकर, आजार दिसू लागताक्षणीच सुरू केले तर बराच फायदा होतो. अशा लोकांच्या जवळच्या माणसांनी या लोकांशी खूप खबरदारीने आणि समंजस प्रेमाने वागणे अपेक्षित असते. खरे तर जवळच्या प्रेमाच्या माणसांनाच त्या रोगाचा त्रास जास्त होतो. भोवतालचे वातावरण उल्हसित ठेवणे, आपापसात वादविवाद शक्यतो न करणे, रोग्यासमोर तर नच करणे, मुलांमध्ये पुसटसाही भेदभाव आणि पक्षपात होऊ न देणे, रोग्यामुळे आपल्याला त्रास होतोय हे सततच काय, केव्हाही बोलून न दाखवणे, त्याला सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवणे म्हणजे पालक, जोडीदार, भावंडे, आप्त मित्र ह्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. रोग्याला बिचाऱ्याला कळतच नसते की आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय. तसे ते त्यांना जाणवून देणे हे फारच घातक ठरते. आपल्या समाजामध्ये मनोविकारांविषयीचे भान आणि जाणीव नसतेच आणि असलेच तर अत्यंत विकृत असते. मनोविकारतज्ज्ञ लोक मोठी शहरे सोडली तर फारसे उपलब्ध नसतात. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी डॉक्टरी उपचार जरूर घ्यावेत आणि मेंदूचे दौर्बल्य आणि आलस्य घालवावे.
ता. क. : डॉक्टर सोडून इतर लोक जे उपाय रोग्यासाठी सुचवतात त्यातले कित्येक उपाय रोग्याच्या निकटवर्तीयांनी स्वत: च्या आचरणात आणले तर उत्तम, असे असतात. कारण त्यांना मन:शांती, स्थिरबुद्धी आणि स्वास्थ्य राखणे अत्यंत आवश्यक असते आणि ते मेंदूला तशा आज्ञा देऊ शकतात. स्वत: वर उपचार करू शकतात.

करेक्ट!!
>>>>रोग्यामुळे आपल्याला त्रास होतोय हे सततच काय, केव्हाही बोलून न दाखवणे, त्याला सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवणे म्हणजे पालक, जोडीदार, भावंडे, आप्त मित्र ह्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते.>>>> रोगी लोकं डॉक्टरकडे न जाता इतरांचं लाईफ नकळत मिझरेबल कर असतात.

हिरा आणि सामो यांचे मत आवडले. डिप्रेशन मध्ये जर घरातील कर्ता मुलगा असेल तर वयस्कर आई वडिलांचे खूप हाल होतात.कारण अशा अवस्थेत मुलांची लग्न होणे जवळपास अशक्य असते.

मेंदूतिल रसायनांचा गोंधळ स्वप्रयत्नाने जाणार नाही. त्याकरता डॉक्टर असतात >>>>>अगदी अगदी,सामो!
हीरा,स्वाती २ यांचे प्रतिसाद छानच.

३ वर्षांपूर्वीचा माझा अनुभव: खूप डिप्रेस झाले होते.रडावंसे वाटत होते आणि बरेच काही काही प्रॉब्लेम्स होते.डॉ.कडे गेल्यावर त्यांनी जे औषध दिले,ते केमिस्टकडून घेताना सहज विचारले की कशावरती आहे म्हणून? तर डोक्याचे आहे म्हणाला.घरी येऊन गुगलकाकांना विचारले तर अँटीडिप्रेसंट होते.त्यातल्या एका घटकाची मला अ‍ॅलर्जी होती.त्यांना फोन केला नाही की औषधे घेतली नाहीत.बाहेरगावी जाऊन आल्यावर आधी दूध ,केल्शियम नियमित केले ८ दिवसांनी डॉ.कडे गेले.त्यांना सांगितले की अशी अशी अ‍ॅलर्जी आहे.तेव्हा ते गप्प बसले.म्हतलेकदाचित माझे मानसिक असू शकेल पण अधी १५-२० दिवस दूध घेतले नव्हते.आता मला बरेच बर्‍ वटते आहे.तेव्हा डी व्हिटॅमिनची टेस्ट करायला सांगितली.ते खूप कमी होते.नंतर त्यावर गोळ्या घेतल्यावर खूप बरे वाटले.

धाग्याचा विषय गंभिर आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर अनेकांना आव्हानांचा सामना करावा लागतो. शिक्षण, शिकल्या नंतर नोकरी, शिक्षणांत गती नसेल तर पुढे... सर्व क्रिकेट खेळणारे काही तेंडुलकर बनत नाहीत.

कोरोना (आणि त्यामुळे येणारी अनेक बांधने) मुळे डिप्रेशन/ नैराश्यता हे प्रश्न भेडसावणारे अनेक आहेत... मनुष्याला बोलायला कुणीतरी हवेच हवे. बोलत रहा, व्यक्त होत रहा. वर अनेक दिग्गजांनी म्हटल्याप्रमाणे नैराश्यता हा आजार आहे असेच माझे मत आहे. थोडाफार व्यायाम, समतोल आहार, मुबलक झोप, वार्तालाप.... शक्य तिथे इतरांना ( सहजतेने अवाक्यात असणारी) मदत (मग नोकरी शोध असेल किंवा बायोडेटा तयार किंवा गाण्याची तालिम... ).

राधानिशा, मांजराच्या धाग्यानंतर बरेच दिवसांपासून दिसल्या नाहीत. व्यवस्थित असतील अशी अपेक्षा. लोकांनी इथे किंवा कुठेही कमेंट करताना थोडे तारतम्य बाळगायला हवे. आपल्याला जरी नाही आवडले एखादे लिखाण तर आपण दुर्लक्ष करू शकतो किंवा सौम्य शब्दांत सांगू शकतो. धागा आला तेव्हा मी आणि काही लोकांनी लेखाबद्दल आक्षेप नोंदवला होताच की पण त्यामागचे कारणही दिले होते. आपण आभासी जगात संवाद साधत असलो तरी पलीकडच्या व्यक्ती मात्र खऱ्या असतात आणि त्यांच्यावर आपल्या कमेंट्सचा चांगला/वाईट परिणाम होऊ शकतो..... जस्ट सेइंग यू क्नो

Pages