पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - पारंपारिक मोदक - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 31 August, 2020 - 02:55

पाफा तुम्हाला अनेक धन्यवाद. तुमच्या मुळे खायला मिळाले आम्हाला मोदक. तुम्ही एवढं सांगितलंत म्हणून केले ह्या वर्षी मोदक नाहीतर केले नसते मी. भरपूर अडचणी होत्या मोदक करण्यात आणि कोरोनामुळे उत्साह ही नव्हता पण केले शेवटी. त्यासाठी मायबोली आणि पाफा ना पुन्हा एकदा धन्यवाद.

माझ्याकडे वासाचे तांदूळ नव्हते पण बेडेकरांची मोदक पिठी होती घरात म्हणून त्याची उकड काढली आहे .

मोदक पात्रातली चाळणी ही नव्हती घरात . आणू या आणू या म्हणतेय तोवर लॉक डाऊनच सुरू झाला. त्यामुळे मी ह्या वर्षी किसणीवर वाफवले आहेत मोदक. किसणीच्या छिद्रातून छान मिळाली वाफ त्याना अगदी चाळणी सारखी आणि मस्त मऊ लुसलुशीत झाले मोदक.

मी सगळे मोदक फुलांचे करणार होते म्हणून केशरपाणी केले होते पण उशीर व्हायला लागला म्हणून एकच केला. ते केशरपाणी सगळ्या मोदकांवर शिंपडून टाकले.

हा एकच फोटो काढू शकले आहे पण मोदक मीच केलेले आहेत ह्याची खात्री बाळगावी. बसत नसेल नियमात तर नाही प्रवेशिका ग्राह्य नाही धरली चालेल. हा धागा खास पाफा ह्यांच्या साठी.

IMG_20200831_120452.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमोहोर , एक मदत हवी आहे . मोदकासाठी उकड काढताना चुकून दुप्पट पाणी घेतले. त्यामुळे उकड सैल झालीय . नवीन उकड काढून मोदक केले . या सैल झालेल्या उकडीचे काय करता येईल ?

त्यात कांदा,हिरवी मिरची,कोथिंबीर घालून थालीपीठ करा.मस्त लागतात.मात्र वरील सर्व बारीक चिरून हवे.

मलाही भाकरी सुचलेले ,पण भाकरी थापण्यासाठी त्यात तांदुळपीठी घालावी लागेल . थोडी शिजलेली उकड आणि कच्ची पिठी अशी भाकरी होईल का ?

सॉरी , जरा जास्तच प्रश्न विचारतेय , पण फ्रीज मध्ये ठेवलेला उकडीचा गोळा डोळ्यासमोर येतोय आणि शक्यतो तो वापरायचा आहे . टाकून द्यायचा धीर होत नाहीय . 2 वाट्या पिठीची उकड आहे.

अक्की रोटी (akki roti) असं सर्च करून पहा. थालीपीठच, वर देवकीताईंंनी लिहिलंय तसं. मस्त होतात. कर्नाटकातला पदार्थ आहे.

उकडचे गोळे , कणकेच्या गोळ्यात भरायचे आणि पुरणपोळीसारखे लाटायची.
मी , मोदकाची उकड उरली तर अशी संपवते. पण सहसा 2-3 गोळे असतात.
या पोळीला गवसणी म्हणतात. (बहुतेक दिनेशदा नी उल्लेख केलेला)

Pages