बीएमसीचे श्वानपालनचे नियम व माहिती.

Submitted by अश्विनीमामी on 6 August, 2014 - 10:15

म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई

सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.

टर्म्स अँड कंडिशन्स

This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.

१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.

४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.

लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्‍शी रिन्यू करावे लागते.

व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/

http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/

http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp

http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मोबाईल वरूनच टाकले
मजकुरात इमेज किंवा लिंक द्या वर क्लिक केलं
फोटो अपलोड केला आणि इन्सर्ट केला

हां ओडीन. ग्रीक देवाचं नाव आहे.
मी कधी भुभू पाळला तर त्याचं नाव जेरेमी किंवा चिरंतन किंवा ह्यु ठेवणार आहे. त्याच निमित्ताने आपली आवडती नावं परत परत घ्यायची संधी Happy

माझ्या एका ताईने घेतला आहे भुभु तिरामिसू , भाची म्हणे तुमची नात आहे Happy
माझी नात तिरामिसू कोर्गी...IMG-20200823-WA0001.jpg
सगळे मिसू वेडे झालोत Lol

कोर्गी आहे जाई , आमच्याकडे काही जणं धुमसत आहेत Lol
मिसूचे विडीओ पहात रहातो, काही दिवस पाठवू नको म्हणाले ताईला शेवटी

मजकुरात इमेज किंवा लिंक द्या वर क्लिक केलं >>> हे माहीत आहे, हे केलं
फोटो अपलोड केला >>>> हे पण केलं. इमेज दिसली पण.
आणि इन्सर्ट केला >>>> हा, ही स्टेप नाही जमत. ,इन्सर्ट बटण नाहीच आहे

धन्यवाद सर्वांना
ओडीन ला सांगतो सगळे त्याला हँडसम बॉय म्हणत आहेत
त्याला गुड बॉय म्हणलं की लगेच शेपटी हलायला लागते आनंदाने
आता तर म्हणजे गळ्यात पडून चाटेल Happy

त्याला गुड बॉय म्हणलं की लगेच शेपटी हलायला लागते आनंदाने >>>. Lol कौतुक फार चांगलं कळतं त्यांना. मी ऑनलाइन डॉग ट्रेनिंग शिकत होते त्यात पण सांगितलं होतं की डॉगला ट्रेन करताना treat or punish पेक्षा praise and play जास्त इफेकटीव्ह असतं. बिगल्स खूप हट्टी आणि इगोइस्टिक असतात पण आमचं बाळ play and praise ने बऱ्याच गोष्टी शिकलं. ट्रेनिंगसाठी ट्रीटस देणं नंतर नंतर अनेक कारणांनी अयोग्य ठरतं.

हो खरंय
आम्हालाही अनुभव आहे शिक्षा केली तर आपल्या गैरहजेरीत किंवा लक्ष नसताना ती गोष्ट करण्याकडे कल असतो
उलट जर कौतुक होतंय कळलं तर लक्ष वेधून घेतात
पण तुम्ही म्हणता तसे ट्रीट देण्याचे दुष्परिणामही आहेत
हातात ट्रीट दिसलं तरच तो सीट, डाऊन, रोल, शेकहॅन्ड, हायफाय असल्या कमांड ऐकतो नैतर साफ दुर्लक्ष करून ढिम्म बसून राहतो नैतर सरळ निघून जातो
आणि शूज, चपला, मोजे त्याच्या तावडीत सापडले की ते काढून घेण्यासाठी ट्रीट घ्याव्या लागतात नैतर चावून त्याची चाळण झालीच समजा
आणि काढून घेतोय म्हणल्यावर पळून जाऊन लपून बसतो कॉट नैतर टेबलाखाली

शूज, चपला, मोजे त्याच्या तावडीत सापडले की ते काढून घेण्यासाठी ट्रीट घ्याव्या लागतात >>> अशा चोऱ्यामाऱ्या करून फटीत किंवा टेबलखाली अवघड ठिकाणी बसायचं हे एक आवडतं प्रकरण आहे. पण वस्तू मिळवण्यासाठी ट्रीट देत असाल तर चुकीचा मेसेज जातो आहे. अशा वेळेस फक्त शिक्षाच योग्य. ट्रीट देऊन चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन दिल्यासारखं होईल. तो ट्रीट्स मिळवण्यासाठी जास्त बदमाशी करायला लागेल. फटके मिळतात कळलं तरच चोऱ्या कमी होतील. Lol अजून एक तरी मोजा गिळून झाला की नाही?

फटके पण देऊन पाहिले पण त्याचा परिणाम उलट झाला
मोजा नाही गिळला पण पायपुसणे फाडून त्याचा एक तुकडा मटकवला
मी काढून घेतोय कळल्यावर पळता पळताच गिळला
नंतर खोकत बसला होता
मी इथे गॅसवर, व्हेटला फोन केला तर म्हणाले उलटी होईल असे काहीतरी द्या
म्हणलं अस काही नाहीये मग म्हणाले पॉटी मधून नाही पडलं तर घेऊन या
पुढचे दोन दिवस त्याची पॉटी तपासून बघत होतो काही नाही
परत व्हेट ला फोन केला तर म्हणले खाणं पिणं ऍक्टिव्हिटी नॉर्मल आहे का? ओकारीचे आवाज काढतोय किंवा रेस्टलेस आहे का म्हणलं असलं काही नाही छानपैकी खातोय पितोय खेळतोय
मग म्हणले द्या सोडून आता काही काळजी नाही
म्हणलं अहो ते आतड्याच्या आत अडकून बसला तर
म्हणाले मग तो रेस्टलेस झाला असता
आपली तब्येत ठीक नाहीये हे सगळयात आधी त्यांना कळतं आणि ते बॉडी लँग्वेज मधून स्पष्टपणे दाखवतात
म्हणलं ओके

शिक्षा म्हणजे आता एकदाच छडी ने फटका दिला आहे
त्यामुळे छडी ला घाबरतो, अगदी फारच मस्ती करायला लागला, ऐकेना झाला की मग फक्त छडी हातात घेऊन नुसती दाखवायची
मग लगेच सुतासारखा सरळ येतो

दर वेळी ट्रीट च द्यावी लागते असे नाही
त्याला फसवायला काही युक्त्या आहेत
मास्क घातला की त्याला वाटतं आता बाहेर जाणार
लगेच कॉट खालून बाहेर येऊन दारात थांबतो आणि आयता सापडतो
किंवा दाराचा नुसता कडीचा आवाज केला तरी चालतं
मी तर चला बाय, येतो काय आई असं म्हणत आतल्या खोलीत गेलो तरी येड्याला वाटत की मी तिथुन गायब होईन
की लगेच तोंडात असेल ते टाकून पळत येतो

दर वेळी ही युक्ती चालतेच असे नाही पण सक्सेस रेट चांगला आहे Happy

तुम्ही कोणी व्हिक्टोरिया स्टिलवेल चा शो बघता /बघितलाय का? 'इट्स मी ऑर द डॉग' अशा नावाचा रिअ‍ॅलिटी शो आहे. क्रेझी डॉग ओनर्स आणि लाडावलेले किंवा बिघडलेले डॉग्ज! वेगवेगळ्या ब्रीड्स च्या, काही ना काही कारणामुळे मिस्बिहेविंग डॉग्ज चे प्रॉब्लेम्स पॉझिटिव्ह रिएन्फोर्स्मेन्ट ने कसे सोडवायचे याच्या मस्त टिप्स मिळतात.
https://youtu.be/aPDMYmQhkDY
https://youtu.be/ry_CqGt8BAA
हे एक दोन एपिसोडस आहेत, असे बरेच आहेत यूट्यूब वर. इंटरेस्टींग आयडिया असतात एकेक.

कुत्रे आजिबात म्हणजे आजिबात आवडत नाहीत,भटके पण नाही आणि पाळीव पण नाही,भीतीच वाटते,एकदा तर एका बाई शी भांडण पण झालं,तिने रस्तात मोकळं सोडलं त्या पपी ला,तो आला पळत पळत माझ्या पायाशी मी गॅस वर,खूप आरडा ओरडा केला आणि त्या बाई ला पण ओरडले तर ती मलाच ओरडली इतकं काय झालं ओरडायला,काही नाही करत तो,म्हटलं तुझ्या गळ्यात घालून फिर मला काय करायचं आहे पण रस्त्यात सोडायच काय कारण?

तेव्हा पासून कुत्रांसोबत त्यांच्या मालकांचा पण राग यायला लागला होता,
पण इकडे वाचायला खूप छान वाटत आहे,घरातल्या शेंडेफळांचे कौतुक सांगावे असं तुम्ही सगळे सांगताय असं वाटत होतं तितक्यातच तुम्ही लोक खरच त्या पेट ला लहान बाळ असल्याचंच समजता हे वाचण्यात आलं,

पण तरीही घरातलं बाळ असो की पेट त्याच बाहेरच्या लोकांनी कौतुकच करावं असा आग्रह असणाऱ्या लोकांना लांबूनच बिग नो

पण तरीही घरातलं बाळ असो की पेट त्याच बाहेरच्या लोकांनी कौतुकच करावं असा आग्रह असणाऱ्या लोकांना लांबूनच बिग नो>>>

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही

लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

मी एकवेळ कुत्र्याची खात्री देऊ शकेन पण माणसांची देता येत नाही आजकाल

आणि लहान मूल असल्याबद्दल तर विचारूच नका
बाहेर जाताना यायचं असतच पण गाडीवर बसून चक्कर पण मारायची असते
ती नाही मारली तर रुसून बसतो
माझ्या मुलाचे मित्र येतात खेळायला तेव्हा त्यांच्यात हा शेपूट हलवत
त्यांनी नाही घेतलं खेळायला तर भांडतो मग आम्हाला मध्ये पडून त्याला पण घ्या खेळायला असं सांगावं लागत
पत्ते वगैरे खेळत असतील तर हा तिथेच बसून सगळ्यांवर लक्ष ठेऊन असतो

Pages