बीएमसीचे श्वानपालनचे नियम व माहिती.

Submitted by अश्विनीमामी on 6 August, 2014 - 10:15

म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई

सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.

टर्म्स अँड कंडिशन्स

This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.

१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.

४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.

लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्‍शी रिन्यू करावे लागते.

व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/

http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/

http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp

http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेबलं लावली गेली तरी मोकळेपणी लिहिले की सर्वांनी

>> पुन्हा तेच! कुत्रेमालकांविरुद्ध तक्रारी लिहिल्या असताना कुत्रेद्वेषी (नंतर नंतर तर हिटलरशाही, ब्रिगेड) असं चुकीचं लेबल लावलं गेलेलं दिसलं नाही का? मोकळेपणे लिहू दिलं म्हणून काहीही चुकीची लेबलं लावली तरी निमुटपणे ऐकून घ्यायलाच हवं असा सूर दिसत आहे या वाक्यातून.

वाद तिथेच आहे सुनिधी, आमची बाजू ऐकून घेण्याची मनःस्थिती नाहीये कोणाची.

<<त्यावरून इथे मुंबई मिरर का? इतर पेपर का नाही वगैरे महान प्रतिसाद आल्यावरही त्यांनी त्यांच्यापरीने स्पष्टीकरण दिले आहे..>> यात महान प्रतिसाद काय आहेत?

त्यांनी "मुंबई मिरर" ह्याच पेपरचा उलेख केला म्हणून सातीने लिहिले << मुंबई मिररच का बरे? गरीब मराठी कुत्रेपालक पुण्यनगरी किंवा सकाळ वापरतील.>> या प्रतिसादात महान अस काय आहे ?. समजल नाही .त्यांनी नुसते एका न्यूज पेपर चे तुकडे घेऊन जावे असे लिहिले असते तर असे विचारले गेले नसते .
आणि त्यानंतर चिनुक्स पण धावत आलाच ना << मिरर' आणि 'सकाळ' यांच्या आकारात फरक आहे.>> अस सांगत. ह्याला अमांची बाजू घेण म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ?

प्रत्येकाला आपापल मत मांडायचा/ प्रतिसाद देण्याचा अधिकार आहे. जसा चिनुक्स ला तसा सातीलाही आणि मामीलाही. त्याला महान प्रतिसाद अस लेबल लावण्याची काय गरज ?

अमा हे नियम लिहिल्याबद्दल धन्यवाद. ज्यांना इतर कुत्रे मालकांबद्दल तक्रार आहेत त्यांनी ह्या नियमांची प्रिन्ट आउट काढून त्यांना द्यावी, तक्रार करावी, पाठपुरावा करावा एव्हडेच सांगता येईल. भारतात पोलिस वा नागरीसंस्था अश्या तक्रारी किती गांभिर्याने घेतील ते माहिती नाही. पण ही अडचण वाहतुकीची बेशिस्त, सार्वजनिक अस्वच्छता अश्या अनेक गोष्टीत आहेच.

गैरसमज झालेला दिसतोय माझ्या प्रतिसादातुन. 'लेबलं लावली गेली तर ऐकुन घ्यावे' असे नव्हते म्हणायचे.
लेबलं वाचली ना. तसे व्हायला नको होते. म्हणजे काही प्रतिसादातुन कुत्राद्वेष जाणवला पण सर्वांना त्यात नाही टाकता येणार हे मान्यच.

मला वाटतं की विषय जरा फारच ताणला जात आहे. कुत्रेमालकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे, कुत्रेमालक अडेलतट्टूसारखे वागतात, त्यांना इतरांची फिकीर नसते वगैरे लिहून झालेले आहे. तेच तेच परत लिहिणे, ते कोणीच मान्य करत नाही आहे असे परत परत लिहिणे, वगैरे प्रकार जरा अधिकच स्ट्रेच होत आहेत. दोनपैकी एक धागा निव्वळ वादासाठी व एक निव्वळ माहितीसाठी असे ठेवणेसुद्धा शक्य होते, पण तेही नाही झाले. Sad

मला वाटतं की विषय जरा फारच ताणला जात आहे.

>>> हो. खरंय.

काल रात्री झोपायला गेल्यावर विचार करत असताना मलाही जाणवलंच. मग अमाच्या लेखनातून तिचे http://www.maayboli.com/node/7320 आणि http://www.maayboli.com/node/12383 हे लेख वाचले. तिच्या (आणि तिथे प्रतिसाद लिहिलेल्या इतरांच्या) पेटसबद्दलच्या भावना थेट पोहोचल्या. (कुत्र्याला चमेलीच्या वेणीसारखे माळून झोपते हे वाचून अशक्य हसले Happy )

आणि जाणवलं कदाचित ही भावना भितीमुळे माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. पण मी आता नक्की ही भावना समजून घेण्याचा प्रयत्न करीन.

एक अगदी बालकुत्रा पाळावा असाही एक विचार आला पण ते झेपेलच असं वाटत नाही आणि तसंही आम्ही भटक्या आणि विमुक्त जमातीत मोडत असल्याने कुत्र्याची आबाळ व्हायला नको.

अमा, मनापासून सॉरी! आणि अ बिग हग.

अ‍ॅडमिन तुम्हालाही सॉरी.

ही पोस्ट इथे अवांतर वाटल्यास मी आधीच्या धाग्यावर हलवेन. हा अमाचा धागा आहे म्हणून इथे लिहिले.

अमा, सुंदर लेख आणि माहिती.

नियम क्र. २ कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे.

कुत्र्यांच्या ट्रान्स्पोर्ट संबंधाने माहिती:

ही फक्त पाळीव कुत्र्यांसाठी आहे. स्ट्रे( रस्त्यावरील) बेल्ट नसलेल्या कुत्र्यांसंबंधाने नाही.

कुत्रे ने आण करायचा वेगळा पिंजरा मिळतो. कुत्र्याच्या साइज ला बघून त्या प्रमाणात घ्यावा. प्रवास किती तासांचा आहे त्यावर कसे जायचे ते ठरवावे. विमानाने कुत्रे कायम नेले आणले जातात. त्यांना
व्हेटला विचारून झोपेची किंवा शांत राहण्यासाठी औषधे दिली जातात. ही प्रमाणा बाहेर दिल्यास कुत्रे मरू शकतात तेव्हा स्वतःच्या डोक्याने जास्त देउ नये.

थोडे अंतर असल्यास व मोठा कुत्रा असल्यास कार ने नेणे बरे. कारण मध्ये अध्ये उतरता येते. व इतरांना त्रास होत नाही. पपी असल्यास बसने आणू शकता पण ते त्रासाचे आहे. माझे पहिले कुत्रे पपी बंगलोर हून बसनेच आले होते. मोठा कुत्रा बसने नेणे त्रासाचे आहे. शक्यतो तसे करू नये.

शिफ्ट होताना कुत्रे सामानाच्या ट्रकबरोबर आले होते. अगरवाल मूव्हरस पेट केजेस ऑफर करतात.
जास्त माहिती त्यांच्या साइट वर आहे. खर्च होतो पण नीट आणतात. माझा ड्रायवर त्यांच्याबरोबर आला होता. एक अटेंडंट बरोबर दिल्यास कुत्र्याला कमी त्रास होतो. कारण एक तर मालकापासून दूर व मोठा प्रवास म्हणजे ते घाबरलेले असतात. व काळजी करत बसतात. ओळखीचा माणूस बरोबर असल्यास ही काळजी कमी होते. ट्रानस्पोर्टरचा माणूस कसे वागवेल कि उपाशी ठेवेल माहीत नाही.

घरी आल्यावर कुत्र्यास नीट खाणे पिणे देउन त्याजवळ थोडावेळ बसावे व त्याच्या माहितीतले अंथरूण पांघरूण त्यास द्यावे. त्यामुळे ते रिलॅक्स होतात व नव्या जागेत अ‍ॅडजस्ट होतात.

ऑटिस्टिक मुलांना नवे स्टिम्युलस झेलणे खूप अवघड जाते. अशी मुले शिफ्ट करत अस्तील/ मोठा विमान प्रवास असेल तर त्यांच्या थेरपी डॉगला कार्गो मध्ये न जाता पॅसेंजर केबिन मध्ये मुला बरोबर जाता येते. भारतात जेट एअरवेज ही सुविधा देते. कुत्र्याचे सर्व कागद पत्र व डॉक्टरचे प्रमाणपत्र बरोबर बाळगले पाहिजे. व मुलाबरोबर एक अ‍ॅडल्ट पाहिजे जो परिस्थिती हँडल करू शकेल.

खालील अन्न पदार्थ उरले तरीही घरातील किंवा बाहेरच्या/ शेल्टरमधील कुत्र्यांना देउ नका. ते त्यांच्या तब्येतीस घातक आहे.

१) टर्की स्किन, ड्रिपिन्ग्स आणि ग्रेव्ही.
२) टर्की ट्वाईन व टर्की बोन्स
३) कॉर्न ऑन द कॉब,
४) अनिअन्स आणि गार्लिक. - कांदा लसूण ज्या प्रकाराने वापराल ते.
५) मशरूम्स
६) रेझीन्स व द्राक्षे.
७) सेज
८) फॅट ट्रिमिन्ग्स व फॅटी फू ड्स
९) ब्रेड डो,
१०) चॉकोलेट
११) अल्कोहोल कोणत्याही स्वरूपात.

बापरे अमा....
तुमचा केवढा अभ्यास आहे ह्या विषया वर....
चांगला धागा काढला आहे तुम्ही, मला मुळात कुत्र्याची आधी भिती वाटायची..आता नाही वाटत, पण तुमचा हा धागा
श्वान प्रेमींसाठी खरेच चांगला आहे....शुभेच्छा !!!

ही एक चांगली बातमी. बी एम सी मुंबईतील श्वान मालकांवर ५०० रु फाइन लावायचा विचार करत आहे. एस्प. साउथ बाँबेत / चौपाटीवर नॉन कुत्रेपालकांना जो त्रास होतो त्यापासून सुट्का मिळू शकेल.

http://www.mumbaimirror.com/mumbai/civic/Now-pay-up-Rs-500-if-you-fail-t...

एका माण सा चा कुत्रा हरवला तो दुसरीने अनवधानाने विक त घेतला पुढे त्याला कुत्रा परत मिळवण्यासाठी कोर्ट केस करावी लागली. पुढे काय?

http://www.reshareworthy.com/man-reunites-with-lost-dog-on-judge-judy/

कुत्र्याच्या मम्मी/ बाबाला कुत्रा हरवल्यास अति शय यातना होतात. स्नूपी कॉमीक्स व जालावर ह्यावर माहिती सापडेल. तर तुमचा कुत्रा साधारण जंगली भागात/ खेडेगावात/ इतर जागी हरवल्यास खालील ट्रिक कामी येइल. शहरी भागात पोलिस तक्रार करता येते., खांबावर फोटो व तुमचा नंबर लावणे हे तर आहेच. कुत्रा हरवल्यास - माझा एक कुत्रा बरेच वेळा भटकतगे ला/ हरवला आहे - . तर तुमच्या लक्षात आल्यावर लगेच त्याला हाका मारायला सुरुवात करावी. पण जास्त वेळ गेल्यास खालील ट्रिक करावी.

तुम्ही दिवस भर घातलेला एखादा कपडा/ त्याची चिंधी व कुत्र्याचा पाण्याचा बोल एखाद्या योग्य जागी ठेवावे, व बारा तासा त परत येउन बघावे. तुमचा वास घेउन महाशय तिथे बसून राहिलेले दिसतील. अन्न ठेवू नये इतर प्राणी खाउन जातील.

मुंबईसारख्या शहरात ही युक्ती किती चालेल माहित नाही कारण अन्न/ पाणी कपडा ह्या गरजा पूर्ण होउ न शकलेले कितीतरी अभागी ह्युमन्सच आपल्याला रोज दिसतात. पण ह्या शहरात एक कनवाळू मानसिकता पण आहे. कितीतरी लोक्स - गाडी पुशे. दूधवाले मेडस व इतर संड्री पब्लिक मला आजिबात ओळखत ना ही. पण कुत्र्यांना ओळखतात. अश्यावेळी हरवलेला कुत्रा ते लोक तुमच्या बिल्डिंग सिक्युरिटी कडे देउ शकतात. हरवलेला कुत्रा बाहेर जगणे खूप अवघड आहे कारण त्यांना तश्या जीवनाची सवय नसते. हाय खाउनच मरून जा ऊ शकतात. त्या मुळे ही नंबर वन इमर्जन्सी समजावी. कुत्र्यांना रिडेबल चिप बसवता येते. त्यानुसार त्यांचा शोध घेता येतो. हे खर्चिक प्रकरण आहे.

अमा छान ट्रिक!
माझ्या कुत्र्याच्या अंगात माय्क्रो चिप बसवली आहे. एक वर्षच झाल असेल त्याला येउन पण त्याच्या शिवाय आता घर मी इमॅजिन करु शकत नाही

चांगली माहिती आहे अमा.तुम्ही तुमच्या पिंकी ची(पिंकी च ना नाव) खूप चांगली काळजी घेता हे तुमच्या वेळोवेळी च्या लिखाणातून दिसते.
आमच्या नातेवाईकांना सोसायटीत एकांनी पाळलेला कुत्रा चावला.हे मास्क लावून सोसायटीत 2 फेऱ्या मारतात.अँजिओप्लास्टी नंतर रोज 40 मिनिट चाला असं डॉ ने सांगितलंय.घरात 40 मिनिट चालायला धीर राहत नाही.कुत्रा यांना आणि कुत्र्याला रोज बघत असतात.नेमके त्या दिवशी कुत्रा वाल्या बाई गप्पा मारत असताना तो दोरी ओढून पळाला आणि या काकांना चावला.वय 77, डायबेटीस, बीपी,अँजिओप्लास्टी. बाई पण खूप घाबरल्या होत्या.आता रेबीज चे 5 डोस, हॉस्पिटल मधून घरी आल्यावर अंघोळ, कपडे भिजवणे वगैरे चालू आहे.त्यांना आता सोसायटीत चालायला मनाई केलीय.बाई आणि कुत्रा पण दिसले नाहीत बऱ्याच दिवसात. कुत्रा मालक नुसते सुसंस्कृत असून भागत नाही,त्यांच्यात स्वतःचा कुत्रा नीट दोरी ओढून कंट्रोल करायची शक्ती पण असावी लागते हा नवा धडा मिळाला.

आवाजात कमांड हवी मालकाच्या. नुसती शक्ती असून डेन - रॉट - पिटबुल सारखे राक्षस कसे आवरणार ? पहिल्या दोन्ही जातींबद्दल स्वानुभवाचे बोल.

दोन्ही बाफ वाचले.. काही माहिती नव्याने कळाली.. दोन्ही धाग्यावरचे प्रतिसाद वाचते थोड्यावेळात..

धन्यवाद अमा
हाही धागा मस्त आहे
माझ्या भुभु चे अजून महानगरपालिका रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये
लॉक डाऊन मध्ये ते मला इतकं महत्वाचे वाटलं नाही
आता करून घेईन लवकरच आणि त्या नंबर चा बिल्ला करून गळ्यात अडकवणार आहे
सध्या त्याच्या गळ्यात एक बारके घुंगरू आहे
ते आम्हाला तो कुठं हिंडतोय हे कळावं म्हणून

तो आता नऊ महिन्यांचा होईल लवकरच त्याचे पेपर्स पण आणावे लागतील ब्रिडींग साठी
साधारण दीड वर्षाचा झाला की करतात असे कळलं आहे
त्याचे हार्मोन चेंजस जाणवू लागले आहेत
बॉयहुड पासून मॅनहुड कडे वाटचाल सुरू व्हायला लागली आहे

महत्वाचे म्हणजे घरी कुत्रा आणल्यास त्याला तुमचा आहार जेवायला घालायची सवय लावू नका ते चुकीचे आहे. शाकाहार किंवा मांसाहार दोन्हीही.

रविवारी वगैरे ट्रीट म्हणून पोर्क/ बफेलो मीट/ मटन द्यायला हरकत नाही. उकडलेले बिन तिखट मीठ मसाल्याचे चिकन कुस्करून देता येइल पण
पोळी / ग्लुकोज बिस्कि टे घालू नका. अगदी म्हातार्‍या कुत्र्यांना थोडी बिस्किटॅ दिली तरी हरकत नाही. कारण दात पडलेले असतात चाव्ता येत नाही. तेव्हा शक्ती साठी पण नाहीतर ते हानिकारकच आहेत.

पपी लोकांसाठी इ कान्युबा ग्रॅन्युल्स व पेलेट्स उपलब्ध आहेत. ह्या बारीक चुरा व बारीक पेलेट्स अश्या असतात.

पेडिग्री ब्रांड डॉग फूड बेस्ट व स्वस्त उपलब्ध आहे. त्यात चिकन व मिल्क पेडिग्री माझ्याकडे टनानी खपते. घरचे कुत्रे, बाहेरची ओळखीची फ्रेंडली कुत्री, मांजरे कावळे सर्व आ व डीने खातात. हे पोटात गेले व ओले झाले की फुगते त्यामुळे टमी फुल फीलिन्ग येत असावे. व तब्येतीला चांगले.

पेडिग्रीचे अ‍ॅड ल्ट चिकन राइस मीट राइस व सीनीअर डॉग असे व्हेरिअंट पण उपलब्ध आहेत. कुत्र्याच्या ब्रीड वय व साइज प्रमाणे हे द्यावे लागते. त्या सोबत ताजे पाणी आवश्यक आहे. उ उन्हाळ्यात मी पाण्याची बाटली व बोल घेउन फिरते. फ्रेंडली कुत्र्यांना पाणी पाजत असते.

रॉयल कॅणाइन व ड्रूल्स हे इतर ब्रँड पण आहेत. थोडे महाग वाटतात मला पण तुमच्या कुत्र्याच्या ब्रीड साठी आवश्यक ते व्हेटच्या सल्ल्याने घेता येइल जसे किडनीचा आजार असल्यास किंवा इतर काही त्रास असल्यास त्या अनुरूप डाएट प्लॅन करता येतो.

करोना काळा त खूप लोकांनी घरची कुत्री सोडोन दिली आहेत. हे बरोबर नाही कुत्रा मांजर मुळे करोना होत नाही. ती गैरसमजूत आहे. तुमची ११०% कमिट मेंट नसेल तर कृपया घरी कुत्रा पाळायला आणू नका. त्यावर अन्या य करू नका ती फक्त खेळायची व टाकून द्यायची गोष्ट नाही.

आमच्या कुत्र्याला मध्ये इन्फेक्षन झाल्याने केस गळले होते. पण व्हेटने सांगितल्या प्रमानॅ उपाय केले व घोड्यांना व इतर प्राण्यांना देतात ते ओमेगा ३ ऑइल दिल्यावर केस फारच काळे सुळसुळीत व चमकदार झाले आहेत. हे ही तुमच्या व्हेट ला विचारून द्या.

घरी पेट आणल्यास त्याचे ग्रुमिन्ग पण करणे गरजेचे आहे.

शंका:
पेडिग्री नव्हतं तेव्हा लोक कुत्र्याना काय द्यायचे?कच्चे चिकन का?(म्हणजे भात पोळी बिस्कीट देऊ नका बरोबर वाटतंय पण इंडियन मसाले नसलेल्या , प्लेन थेट दुकानातून आणलेल्या कच्च्या नॉन व्हेज ला पण प्रॉब्लेम आहे का?) म्हणजे पेडिग्री नसेल/परवडत नसेल तर सेकंड बेस्ट काय आहे?
आमच्याकडे बड्डे गिफ्ट म्हणून कुत्रा आणा, आम्ही सगळी नीट काळजी घेऊ वगैरे भावनिक अपील मागच्या वर्षी पासून चालू आहे.कुत्रा नुसती हौस म्हणून आणायचा नसतो.ते एक लहान बाळ आहे.आपल्याला काय आवडतं या बरोबरच त्याला आपल्या बरोबर करमेल का, आपण त्याला वेळ देऊ का हे पण महत्वाचं हवंअसं सर्व समजावून अजून 5 वर्षं होल्ड केलंय.(मागून 'माणसांना वेळ देत नाहीस, कुत्र्याला काय देणार आहेस' असे कुत्सित उद्गार उमटतात.)
मला ते ठिपके वालं कुत्रं आवडतं.पण इतकं छान असल्याने ते चोर पकडणार नाही, नुसतंच मिरवेल असंही वाटतं.

शंका:
पेडिग्री नव्हतं तेव्हा लोक कुत्र्याना काय द्यायचे?कच्चे चिकन का?(म्हणजे भात पोळी बिस्कीट देऊ नका बरोबर वाटतंय पण इंडियन मसाले नसलेल्या , प्लेन थेट दुकानातून आणलेल्या कच्च्या नॉन व्हेज ला पण प्रॉब्लेम आहे का?) म्हणजे पेडिग्री नसेल/परवडत नसेल तर सेकंड बेस्ट काय आहे?>> कच्चे नॉनव्हेज खातात कुत्रे पण आपले घरचे पेट असते म्हणून आपण थोडी मेहनत घेउन ते उकडून कुस्करून देतो. घरातल्या लहान मुलाचा वरण भात कसा त्याला खाता येत असला तरी कुस्करून त्यात साय घालून देतो तसाच प्रकार आहे. अर्थात हे बाँडिंग होण्यावर आहे.

आमच्या नात्यातले एक जण हुं पाळू कुत्रा पण त्याला कधीच ड्रॉइन्ग रूम परेन्त येउ दे णार नाही. कार्पेट वर तर त्याची बसायची हिम्मतच होणार नाही. त्याची जागा बाहेर. असे टाइपचे बोलले. त्यानंतर मी कधीच त्यांच्या घरी गेलेले नाही. काही लोक बाँड होतात काहींना ती कायम्च अडचण वाटत राहते. व ते पेट सोडून देतात. असे कुत्रे शेल्टर मधून चांगल्या घरी दिले जातात किंवा किल शेल्टर असेल तर मारून टाकतात.

कमिन्ग टू फूड माझे कुत्रे बॅजर हाउंड म्हणजे पक्ष्यांची शिकार करणारे आहे. त्यामुळे कधी कधी पाठलाग करून चेस करून कबुतर मारून आणते व खाते. कुत्रा नैसर्गिक रीत्या शिकारी प्राणी आहे कच्चा मांसाहार पचवू शकतो. पण पग सारखे कृत्रिम रीत्या डिझाइन केलेले ब्रीड त्यांचे तोंड नाक नैसर्गिक रीत्या डेव्हलप झालेले नाही. त्यांना खास आहार द्यावा लागेल. असे ब्रीड शक्यतो घेउ च नयेत. आपली साधी भारतीय इंडी ब्रीड बेस्ट असतात. आमच्याकडे हे शिकार प्रकरण कधीकधी होते. पण तिला तूप मीठ भात आपण खात असल्यास एक घास. मोमो मधले चिकन चिकन नगेट्स( ट्विटर रेडिट वर नगेट मागून घेणार्‍या कुत्र्यांचे भरपूर विनोदी व्हिडीओ आहेत.) गोडात पेढा, बुंदी लाडू थोडे थोडे खाते. कारण त्यात मिल्क फॅट्स, घी असते. ही अ‍ॅनिमल फॅटच आहे.

पेडिग्री खरेच खूप स्वस्त आहे व त्यावर सरकार नेहमी सूट देत असते . कुत्रा पाळायचा खर्च महिन्याला १००० ते किती ही येउ शकतो. ते लोक पेडिग्री नक्की अफोर्ड करू शकतील. तुम्ही तर काय मिया बीवी आयटी में कुत्ता सोये पलनेमें ... ( हलके घ्या)

आमच्याकडे बड्डे गिफ्ट म्हणून कुत्रा आणा, आम्ही सगळी नीट काळजी घेऊ वगैरे भावनिक अपील मागच्या वर्षी पासून चालू आहे.कुत्रा नुसती हौस म्हणून आणायचा नसतो.ते एक लहान बाळ आहे.आपल्याला काय आवडतं या बरोबरच त्याला आपल्या बरोबर करमेल का, आपण त्याला वेळ देऊ का हे पण महत्वाचं हवंअसं सर्व समजावून अजून 5 वर्षं होल्ड केलंय.(मागून 'माणसांना वेळ देत नाहीस, कुत्र्याला काय देणार आहेस' असे कुत्सित उद्गार उमटतात.)>> हो हे बरोबर आहे. तुम्ही वेळ देउ शकत नसाल तर आजिबात घेउ नका. त्यापेक्षा कुत्रा ठेवू अशी मागणी करणार्‍या व्यक्तीला अ‍ॅ निमल चॅरिटी मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करू द्या. काही तास काम केल्यावर समजून येइल व मागणी बंद होईल. कुत्र्याचे मानसिक हाल करण्यापेक्षा हे बरे आहे. कुत्रा घेणे पपी घेतल्यास पुढील १३ - १६ वर्शाची कमिट मेंट आहे.

ते ठिपके वालं कुत्रं आवडतं.पण इतकं छान असल्याने ते चोर पकडणार नाही, नुसतंच मिरवेल असंही वाटतं.>> हे डालमेशिअन ब्रीड आहे. ते खरेच सुरेख पण हाय मेंटेनन्स ब्री ड आहे. त्यापेक्षा १०१ डालमेशिअन सिनेमा बघून घ्या. बेस्ट. त्याने चोर पकडावेत अशी अपेक्षा का? सिक्युरिटी साठी कुत्रा हवा असेल तर डॉबर मॅन किंवा रॉट वाइलर ब्रीड घ्या. ह्याचा प्रॉपर खर्च फूड मेडिसिन ट्रेनिन्ग १० के आहे महिन्याचा असे धरून चाला. तुमचा बंगला आहे का? फ्लॅट मध्ये हे राहणे फार अवघड आहे. त्यात वॉक ला नेउ शकला नाहीत तर त्यांची शक्ती खर्च होत नाही व वैतागून ओरडत भुंकत बसतील मत त्याला सोडून द्यावे लागेल. त्या पेक्षा त्या वाटेला जाउ नये. फार्म हाउस असेल तर तिथे ठेवा .

Pages