खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेम्स बॉण्ड, रेसिपी मी मागितली हो. मला फक्त भरल्या घोसावळ्याची दिलीत तरी पुरे. मागची पेंडिंग रेसिपी माझ्या कामाची नाही . Happy :

अरे वा इतक्या सगळ्यांना धिरडे आवडल्याचे वाचून छान वाटले.
देवकी, अस्मिता धन्यवाद.
इकडे सगळेच पदार्थ फार तो पा सू असतात बुवा.

किती छान छान पदार्थ बनवतायत सगळे..कचोरी.. भरली घोसाळी..
मृणाली मला ते नाचणीचे सत्व वाटले..
मी हि काहीतरी बनवेन म्हणतेय उद्या..

आ हाहाहा ओहोहोहो अगागागागा काय एकेक पदार्थ! शबद कमी पडतील. सकाळी सकाळी जबरदस्त भूक लागली.
श्रवू काय करणार आहेस? पार्सल पाठव बरं

कोणी जागे असेल तर कॉफीपानाला या Happy
कोणी नुकताच उठला असेल तर त्याच्यासाठी चहा ठेवतो Happy

IMG_20201001_060053.jpg

सुमित्रा, मिसळ पाव मस्त, कोल्हापुर का? कारण मी फक्त कोल्हापुर अन बेळगावातच मिसळ सोबत ब्रेड खाल्लाय.

लावण्या मस्तच, वेज की नॉन व्हेज?

सन्मित काय आहे ते? छान दिसतेय पण जमल्यास टिश्श्युपेपर वापरा किंवा स्वच्छ कापड (सॉरी आवडले नाही तर)

एक से एक पदार्थ

आज आमच्याकडे अधिक पौर्णिमेनिमित्त पुरणाचे धोंडे Happy

Thanks VB for suggestion, Please don't say sorry. Rava ani maidyachya mith , ova , jire ghalun keleya purya ahet

Pages