तुम्हास कुठल्या माबो आयडीधारकाचे वय किती आहे असे वाटते? गेस करा पाहू.
आपल्याला कल्पना येईल आपल्याला लोक किती तरुण किंवा किती वयस्क समजतात ते!
वय गेस करतान तेवढे वय का वाटते, हे लिहिणे ऑप्शनल आहे.
आणि हे सर्व खेळमेळीनेच घ्याल यात शंका नाही.
चला तर मग.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धाग्यावर आलेल्या प्रतिसादांचा सखोल अभ्यास करुन त्यावर चिंतन करुन मी_अस्मिता यांनी हा "वय धोरण अहवाल" सादर केला:
दिवेलागणीचा अहवाल
मायबोलीकर आयडींचा सही पकडे है का नक्कीच .... वय धोरण अहवाल
धोरणाचाच अहवाल कारण वयाबाबत अजूनही खात्री नाही ( काही प्रामाणिक लोकं सोडून)
कोणे ऐकेकाळी ( तीन दिवसांपूर्वी ) मानवकाका यांना स्वतःचे वय अवघे त्रेपण असूनही वय २२ ते ५२ मधले मायबोलीकर ताई दादा यांनी काका काका केल्याने मनाला अतिशय उद्विग्नता येऊन त्यांनी हा धागा काढून काय तो सोक्षमोक्ष करायचा ठरवला पण हे गुपित गुपितच राहू द्यायचे असल्याने वरवर ' विरंगुळा' नाव दिले. पण अंतस्थ हेतू मला कळलाच .... दिवे घ्या मानव दादा ..
१. सगळ्या मंडळींना सुशांत केस चा घोर कंटाळा व गणेशोत्सव नंतर आलेला रिकामपणा यामुळे आयते कोलीत मिळाले.
२. तायाबायांना तर हळदीकुंकू टाईप मजा आली तेही पार्लरचा खर्च वाचून म्हणून त्यांचा पाय निघता निघेना. ( मीही यातच )
३. जेम्स बॉन्ड दादा केवळ आयडी प्रमाणे सत्यान्वेशी वाटले बाकी सगळ्यांना फक्त खेळून मजा घ्यायची होती. घ्या आणि माझा राग राग करू नका.
४. मानव दादांनी सहजासहजी उत्तर सांगितले असते तर गुपित उघड झाले असते म्हणून आपणही खेळतच आहोत असेच दाखवत तिनशे प्रतिसादापर्यंत कळ काढली.
५. इथून पुढे वचपा म्हणून जे अध्यात्मिक लिहीत नाहीत त्यांच्या वयात मी +१० भर घालणारे.
६. बऱ्याच जणांनी मिळतंय तर पदरात पाडून घ्या या विचाराने त्यातल्या त्यात बरे वय माझे असे सांगितले.
७. उघड उघड भ्रष्टाचार झालेला म्या पाहिला यासाठी चोकलेट व पार्टी ट्रीट याची लालूच दाखवण्यात आली. व न जमल्यास चोकलेट परत घेतले, पार्टी आहे समजून आलेल्यांच्या तोंडावर दार बंद करण्यात आले.
८. काही तायाबायांना चिकणी चमेली ते 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ' हा जीवनप्रवास क्षणात पहायला मिळाला.
९. काही दादालोकांना कुणीकडून पोटच्या गोळ्या कडून बुकमार्क करून घेतला असे झाले कारण क्षणात त्यांचाही रणबीर कपूर चा जन्माचा अलोक नाथ झाला.
माझेही तसेच पोराने एवढे घाण हस्तलेखन केले आहे तिकडे तर नंबर येणारच नाही पण इकडे ही स्वेच्छा निव्रुत्ती घ्यावी लागली. किती ती लुज लुज सिच्युएशन ....
१०. इथे च माझे आणि अमितव यांचे एकाच वेळेस मैत्री/शत्रुत्व झाले . त्यांना मी सदतीस वेळा अडतीस म्हणूनही माझ्या वयाबाबत ४५+ वर अडून बसले. वर घासाघीस करायला तयार होईनात दादा , मगं मी अन्जुताई आणि VB यांच्या रिक्षात बसले. त्यांनाही मंजुताई यांची सवारी मिळाली.
याचा बदला म्हणून मी त्यांना बावन केले तर 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ' म्हणू लागले ...पण नाही भजन वदवून घेतले तर नावाची .... नाही.
११. संशोधक अतिशय लहान निघाले. इतक्या लहानपणी संशोधन केल्याबद्दल अभिनंदन , पाहिलं नं कसं आहे जग ....
१२. बऱ्याच जणांनी खरीखुरी उत्तरे दिली त्यांचे ही कौतुक.
१३. बऱ्याच जणांनी विपू खणून जुने संदर्भ आठवून उणे दुणे काढले. हा भोचकपणा आहे की उत्तम स्मरणशक्ती मलाही कळत नाही.. मीही त्यातलीच.
१४. एकुणच मला आम्ही जातो डिस्कोला तुम्ही जा काठी घ्यायला ही व्रुत्ती दिसल्याने अत्यंत खेद वगैरे काही झाला नाही. एवढ्या तेवढ्यात खेद होणारे सशाचे काळीज घेऊन मायबोलीवर इतकी वर्ष जिवंत रहाता तरी येईल का
१५. मी खरोखरच तरुण असूनही मी ज्यांना साथ दिली त्यांनी मला वार्धक्य दिले , हे लक्षात ठेवू का ?
१६. काही लोकं आपल्या वयाचा अदांज इतरांना येतोय हे लक्षात यायला लागले की गायब होऊन इकडे तिकडे हिंडून परत येऊन कमी झाले आहे का याची वाट बघत , कळ सोसायचे मगं कमी झाले की आत्ताच तर आलो दाखवायचे.
१७. बऱ्याच जणांनी आपले वय मूळ वयाच्या जितके वजा तितके खूष होऊन दाखवले. पण हा आनंद निखळ निर्मळ वगैरे नसून विकृतीची छटा असलेला 'मोगँबो खूष हुवा' सारखा होता हे मला लगेच लक्षात आले , पण नव्या मित्र मैत्रीणींसाठी कुठे अँसिडमध्ये उडी घ्या म्हणून मी त्यांच्या कलाकलाने घेतले. एकिकडे पार्टी व दुसरीकडे अँसिड असताना कुणीही गरीब व्यक्ती काय निवडणार !! (मी यातच पण दोन्हीबाजूने)
१८. जेम्स बॉन्ड यांनी वारंवार सत्याची आठवण करून दिली त्यासाठी त्यांनी sarcasm असणारे बरेच प्रतिसाद दिले पण सत्य हवं होतं कुणाला उलट सत्याचे बिंग/बिंगो फुटू नये म्हणून तर कसरत चालली होती.
१९. संशोधक आणि इतर तान्ह्या आयडींना बघून मला " ये किसका बच्चा है भई झाले " पण बाळ"कडू" घेण्यासाठी मायबोलीही योग्य जागा आहे हे आठवून मी शांत झाले. मी त्यांना तेहतीस म्हणाले तर त्यांनी काळानिळा इमोजी पाठवला , या तेहतीस आकड्यावर इथे किती लोक पार्टी देत आहेत हा सकारात्मक दृष्टिकोण ठेव , बाळ संशोधका
२०. काही मित्र आयडींच्या अपेक्षेपेक्षा अधिक वयामुळे मला मानसिक धक्का पोचला आहे पण काही आयडी लहान निघाल्याने त्याही बाजूने धक्का बसल्याने मी कुठेही पडले नाही.
२१. मानवदादा यांना 'काका काका' म्हणून ते खरंच कुणाचे काकबळी होते व त्यांना नक्की कुणी 'मामा' बनवले आहे हे कळले असेलच...
एकुणच 'काका मला वाचवा' नंतर 'काका (शब्दापासून) मला वाचवा ' याने इतिहासाची पुनरावृत्ती होते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
धन्यवाद मानव , it was a killer !!
Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 20:40
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५८
५८
धन्यवाद जेम्स दादा..
धन्यवाद जेम्स दादा..
अरेच्चा थापा काब्र मारेन मी.>
अरेच्चा थापा काब्र मारेन मी.>>> खान्देशी आहात का?
अस्मिता... अहवाल १ नंबर...
अस्मिता... अहवाल १ नंबर...
भारीच अहवाल अस्मिता !
भारीच अहवाल अस्मिता !
वाह! अहवाल एक नंबर अस्मिता
वाह! अहवाल एक नंबर अस्मिता
अस्मिता एकदम भारी अहवाल....
अस्मिता एकदम भारी अहवाल.... हहपुवा..

>> we have a memer here !
>> we have a memer here !
नाही हो, कुणालाही करता येते हे इथे जाऊन :
>> Submitted by अजिंक्यराव पाटील on 16 September, 2020 - 18:35
अरे बापरे तुम्ही तर शिक्काच मारला लगेच
https://breakyourownnews.com/
-------
>> कट्टी cancel
>> Submitted by किल्ली on 16 September, 2020 - 18:39
फारच महाग बुवा कट्टी. अखेर ट्रम्प यांनाच लक्ष घालावे लागले
-------
>> ट्रंपचे हस्तक मायबोलीवर आहेत शंका होतीच Proud
>> Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 19:26
मायबोलीकडे दुर्लक्ष परवडणार आहे का त्यांना
-------
>> आयला सॉलिड आहे. ब्रेकिंग न्यूज च्या खाली डिटेल्स पण भारी आहेत
>> Submitted by धनुडी on 16 September, 2020 - 19:31
अशीच भाषा असते ना चॅनल वाल्यांची?

साधे मराठी: अतुल आज सकाळी जेवला. त्याने डाळभात खाल्ला.
चॅनलचे मराठी: आज सकाळी जेवला अतुल. त्याने खाल्ला डाळभात.
(No subject)
@अस्मिता,
@अस्मिता,

आज सकाळी जेवला अतुल. त्याने खाल्ला डाळभात. >>>> आज सकाळी जेवला अतुल यानंतर विजांचा कडकडाट आणि सोबतीला तुमचा फोटो दाखवून तीन वेळा झूम इन झूम आऊट करणार.त्याने खाल्ला डाळभात नन्तर तुमच्या ताटावर तीन वेळा झूम इन झूम आऊट आऊट सोबतीला विजांचा कडकडाट आहेच.
>> Submitted by मी_अस्मिता on
>> Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 20:40
वाह... एकदम झकास लेखाजोगा मांडला धाग्याचा
>> ५. इथून पुढे वचपा म्हणून जे अध्यात्मिक लिहीत नाहीत त्यांच्या वयात मी +१० भर घालणारे.
शेवटी आपल्या हातात काय आहे? या क्षणभंगुर आयुष्यात वय पंधरा काय न पन्नास काय.... काय फरक आहे का? विश्व उत्पत्ती पासून अंतापर्यंतच्या अखंड काल प्रवाहात किती नगण्य हा फरक.
(जमले का मला? जमले असल्यास प्लीज दहाची भर घालू नका)
>> १०. VB यांच्या रिक्षात बसले..... जुने संदर्भ आठवून........... भोचकपणा आहे की उत्तम स्मरणशक्ती... मीही त्यातलीच.
तुम्हाला सुद्धा त्यांची रिक्षाच आठवली? हो मी हि त्यातलाच. VB यांच्या दोन वर्षापूर्वीच्या रिक्षाच्या धाग्यात त्यांनी लिहिले आहे "दहा वर्षापूर्वी नोकरी लागली" त्यावरून मी त्यांचे वय काढले
)
(आता इथून पुढे या धाग्यावर कुणाचे वय कुणी कसे गेस केले हे सांगायला हरकत नाही
>> खाल्ला डाळभात नन्तर
>> खाल्ला डाळभात नन्तर तुमच्या ताटावर तीन वेळा झूम इन झूम आऊट आऊट सोबतीला विजांचा कडकडाट आहेच.
>> Submitted by बोकलत on 16 September, 2020 - 21:13
हो. आणि शेवटी म्हणणार. "कसा खाल्ला ब्रेक नंतर पाहू. बघत राहा... खा चोवीस तास"
अतुल, मी गेले १३ वर्ष जॉब
अतुल, मी गेले १३ वर्ष जॉब करतीये, तरी तुमचा अंदाज चुकला आहे.
अहवाल मस्त.
अहवाल मस्त.
अरेच्चा थापा काब्र मारेन मी.
अरेच्चा थापा काब्र मारेन मी.
धनुडीतै, तुम्ही कुठल्या ? (शंका यासाठी...वर बोल्ड केलय)>>>>> छेछेछेछे 007 तुम्ही शोधून काढलं पाहिजे, नाव सार्थ करा
वयाचंच चाललंय तर :
वयाचंच चाललंय तर :
१) ८० बाटल्या तुमच्या आवडीच्या पेयाच्या घ्या..
२) त्यातून तुमच्या वयाएवढ्या बाटल्या बाजूला काढा..
३) उरलेल्या बाटल्यात ४० दुसऱ्या आवडीच्या पेयाच्या बाटल्या मिळवा...
आणि ज्या एकूण बाटल्या येतील त्यांची संख्या इथे सांगा..
तुमचे वय आमच्याकडून सांगितले जाईल.
तशी रिक्षा नाही हो तिने वयं
तशी रिक्षा नाही हो तिने वयं कमी केले ही रिक्षा...
अमितव करतच नव्हते...
धन्यवाद सर्वांना , मलाही मजाच
धन्यवाद सर्वांना , मलाही मजाच आली.
मानव दादा धाग्याचे जन्मकारण ओळखले ना , सांगा काय ते
>> अतुल, मी गेले १३ वर्ष जॉब
>> अतुल, मी गेले १३ वर्ष जॉब करतीये, तरी तुमचा अंदाज चुकला आहे.
>> Submitted by VB on 16 September, 2020 - 21:35
हो बरोबर ना. जॉब लागल्याचे वय २२ ते २७ समजून मी अंदाज केला वय ३५ ते ४०
(आता इथून पुढे या धाग्यावर
(आता इथून पुढे या धाग्यावर कुणाचे वय कुणी कसे गेस केले हे सांगायला हरकत नाही Lol )
सांगा बरं तुम्हीच आधी माझे 45 कसं गेस केले
प्लीज दहाची भर घालू नका)....
प्लीज दहाची भर घालू नका)....
दोन ओळीत काय होणारे।
अस्मिता च्या अस्मितेला धक्का
अस्मिता च्या अस्मितेला धक्का लागल्यामुळे ती फुल्ल सुटलीये
सॉलिड अहवाल तुझा
(मला खरं तर सॉलिड अहवाल 'गं बाळे 'तुझा असं म्हणायची हुक्की आलीये पण माझा गळा पकडेल अस्मिता)
नाही ओ थोडासा अंदाज चुकला आहे
नाही ओ थोडासा अंदाज चुकला आहे तुमचा, असो, सांगू का आता मी असा विचार करतीये
.
.
.
सांगू का
धन्स गं , धनुडी ताई
धन्स गं , धनुडी ताई
आपल्या सर्वांच्या"अशा" वागण्याने तयार झालाय अहवाल
Asmita that was cherry on the
Asmita that was cherry on the cake .
अस्मिता या धाग्याचा जन्म इथे
अस्मिता या धाग्याचा जन्म इथे झाला. शेवटले प्रतिसाद बघा तिथे.
>> सांगा बरं तुम्हीच आधी माझे
>> सांगा बरं तुम्हीच आधी माझे 45 कसं गेस केले Proud
>> Submitted by mrunali.samad on 16 September, 2020 - 21:45
अहो तुम्ही धाग्यावर कुठेतरी लिहलय फोटो खूप जुना आहे. म्हणून मला वाटले सध्या ४५ असेल वय
>> दोन ओळीत काय होणारे। Proud
>> Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 21:46
ते फक्त PoC होते... अजून बीटा, मग पहिले, दुसरे वगैरे व्हर्शन्स येणार ना पुढे
>> सांगू का
>> सांगू का
>> Submitted by VB on 16 September, 2020 - 21:47
राहू द्या हो. अन्दाज करणे हीच तर मौज आहे ह्या धाग्याची.
>> अस्मिता या धाग्याचा जन्म
>> अस्मिता या धाग्याचा जन्म इथे झाला. शेवटले प्रतिसाद बघा तिथे.
>> Submitted by मानव पृथ्वीकर on 16 September, 2020 - 21:54
उगमापाशी नदी कित्ती छोटी असते नाय... असे फील आले. तब्बल अडीचतीन वर्षापूर्वीचा धागा
अस्मिता (ताई :फिदी:), मस्त
अस्मिता (ताई
), मस्त 


अहो वयाचा तुमच्या या आयडीवरच्या लेखनावरुन केलेला माझा अंदाज होता तो. त्याचा तुमच्या खर्या वयाशी संबंध नाही. घासाघिस करुन मी फारतर स्क्रिन टाईम वाढवून देतो, बाकी घरातही कुणाकडे लक्ष देत नाही, ते इथे देऊ म्हणता!
मला ५२ खडूस खवचट पणावरुन म्हटलंत तर मात्र मला फार्फार आवडेल.
Pages