माबो आयडीधारकांचे वय किती वाटते?

Submitted by मानव पृथ्वीकर on 14 September, 2020 - 12:17

तुम्हास कुठल्या माबो आयडीधारकाचे वय किती आहे असे वाटते? गेस करा पाहू.

आपल्याला कल्पना येईल आपल्याला लोक किती तरुण किंवा किती वयस्क समजतात ते!

वय गेस करतान तेवढे वय का वाटते, हे लिहिणे ऑप्शनल आहे.

आणि हे सर्व खेळमेळीनेच घ्याल यात शंका नाही.

चला तर मग.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धाग्यावर आलेल्या प्रतिसादांचा सखोल अभ्यास करुन त्यावर चिंतन करुन मी_अस्मिता यांनी हा "वय धोरण अहवाल" सादर केला:

Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1

Light 1 दिवेलागणीचा अहवाल Wink

मायबोलीकर आयडींचा सही पकडे है का नक्कीच .... वय धोरण अहवाल
धोरणाचाच अहवाल कारण वयाबाबत अजूनही खात्री नाही ( काही प्रामाणिक लोकं सोडून)

कोणे ऐकेकाळी ( तीन दिवसांपूर्वी ) मानवकाका यांना स्वतःचे वय अवघे त्रेपण असूनही वय २२ ते ५२ मधले मायबोलीकर ताई दादा यांनी काका काका केल्याने मनाला अतिशय उद्विग्नता येऊन त्यांनी हा धागा काढून काय तो सोक्षमोक्ष करायचा ठरवला पण हे गुपित गुपितच राहू द्यायचे असल्याने वरवर ' विरंगुळा' नाव दिले. पण अंतस्थ हेतू मला कळलाच .... दिवे घ्या मानव दादा ..

१. सगळ्या मंडळींना सुशांत केस चा घोर कंटाळा व गणेशोत्सव नंतर आलेला रिकामपणा यामुळे आयते कोलीत मिळाले.

२. तायाबायांना तर हळदीकुंकू टाईप मजा आली तेही पार्लरचा खर्च वाचून म्हणून त्यांचा पाय निघता निघेना. ( मीही यातच Wink )

३. जेम्स बॉन्ड दादा केवळ आयडी प्रमाणे सत्यान्वेशी वाटले बाकी सगळ्यांना फक्त खेळून मजा घ्यायची होती. Light 1 घ्या आणि माझा राग राग करू नका.

४. मानव दादांनी सहजासहजी उत्तर सांगितले असते तर गुपित उघड झाले असते म्हणून आपणही खेळतच आहोत असेच दाखवत तिनशे प्रतिसादापर्यंत कळ काढली.

५. इथून पुढे वचपा म्हणून जे अध्यात्मिक लिहीत नाहीत त्यांच्या वयात मी +१० भर घालणारे.

६. बऱ्याच जणांनी मिळतंय तर पदरात पाडून घ्या या विचाराने त्यातल्या त्यात बरे वय माझे असे सांगितले.

७. उघड उघड भ्रष्टाचार झालेला म्या पाहिला यासाठी चोकलेट व पार्टी ट्रीट याची लालूच दाखवण्यात आली. व न जमल्यास चोकलेट परत घेतले, पार्टी आहे समजून आलेल्यांच्या तोंडावर दार बंद करण्यात आले.

८. काही तायाबायांना चिकणी चमेली ते 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ' हा जीवनप्रवास क्षणात पहायला मिळाला.

९. काही दादालोकांना कुणीकडून पोटच्या गोळ्या कडून बुकमार्क करून घेतला असे झाले कारण क्षणात त्यांचाही रणबीर कपूर चा जन्माचा अलोक नाथ झाला.
माझेही तसेच पोराने एवढे घाण हस्तलेखन केले आहे तिकडे तर नंबर येणारच नाही पण इकडे ही स्वेच्छा निव्रुत्ती घ्यावी लागली. किती ती लुज लुज सिच्युएशन ....

१०. इथे च माझे आणि अमितव यांचे एकाच वेळेस मैत्री/शत्रुत्व झाले . Proud त्यांना मी सदतीस वेळा अडतीस म्हणूनही माझ्या वयाबाबत ४५+ वर अडून बसले. वर घासाघीस करायला तयार होईनात दादा , मगं मी अन्जुताई आणि VB यांच्या रिक्षात बसले. त्यांनाही मंजुताई यांची सवारी मिळाली.
याचा बदला म्हणून मी त्यांना बावन केले तर 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ' म्हणू लागले ...पण नाही भजन वदवून घेतले तर नावाची .... नाही.

११. संशोधक अतिशय लहान निघाले. इतक्या लहानपणी संशोधन केल्याबद्दल अभिनंदन , पाहिलं नं कसं आहे जग ....

१२. बऱ्याच जणांनी खरीखुरी उत्तरे दिली त्यांचे ही कौतुक.

१३. बऱ्याच जणांनी विपू खणून जुने संदर्भ आठवून उणे दुणे काढले. हा भोचकपणा आहे की उत्तम स्मरणशक्ती मलाही कळत नाही.. मीही त्यातलीच.

१४. एकुणच मला आम्ही जातो डिस्कोला तुम्ही जा काठी घ्यायला ही व्रुत्ती दिसल्याने अत्यंत खेद वगैरे काही झाला नाही. एवढ्या तेवढ्यात खेद होणारे सशाचे काळीज घेऊन मायबोलीवर इतकी वर्ष जिवंत रहाता तरी येईल का Proud

१५. मी खरोखरच तरुण असूनही मी ज्यांना साथ दिली त्यांनी मला वार्धक्य दिले , हे लक्षात ठेवू का ? Wink Light 1

१६. काही लोकं आपल्या वयाचा अदांज इतरांना येतोय हे लक्षात यायला लागले की गायब होऊन इकडे तिकडे हिंडून परत येऊन कमी झाले आहे का याची वाट बघत , कळ सोसायचे मगं कमी झाले की आत्ताच तर आलो दाखवायचे. Light 1

१७. बऱ्याच जणांनी आपले वय मूळ वयाच्या जितके वजा तितके खूष होऊन दाखवले. पण हा आनंद निखळ निर्मळ वगैरे नसून विकृतीची छटा Light 1 असलेला 'मोगँबो खूष हुवा' सारखा होता हे मला लगेच लक्षात आले , पण नव्या मित्र मैत्रीणींसाठी कुठे अँसिडमध्ये उडी घ्या म्हणून मी त्यांच्या कलाकलाने घेतले. एकिकडे पार्टी व दुसरीकडे अँसिड असताना कुणीही गरीब व्यक्ती काय निवडणार !! (मी यातच पण दोन्हीबाजूने)

१८. जेम्स बॉन्ड Light 1 यांनी वारंवार सत्याची आठवण करून दिली त्यासाठी त्यांनी sarcasm असणारे बरेच प्रतिसाद दिले पण सत्य हवं होतं कुणाला उलट सत्याचे बिंग/बिंगो फुटू नये म्हणून तर कसरत चालली होती. Proud

१९. Light 1 संशोधक आणि इतर तान्ह्या आयडींना बघून मला " ये किसका बच्चा है भई झाले " पण बाळ"कडू" घेण्यासाठी मायबोलीही योग्य जागा आहे हे आठवून मी शांत झाले. मी त्यांना तेहतीस म्हणाले तर त्यांनी काळानिळा इमोजी पाठवला , या तेहतीस आकड्यावर इथे किती लोक पार्टी देत आहेत हा सकारात्मक दृष्टिकोण ठेव , बाळ संशोधका Wink Light 1

२०. Light 1 काही मित्र आयडींच्या अपेक्षेपेक्षा अधिक वयामुळे मला मानसिक धक्का पोचला आहे पण काही आयडी लहान निघाल्याने त्याही बाजूने धक्का बसल्याने मी कुठेही पडले नाही.

२१. Light 1 मानवदादा यांना 'काका काका' म्हणून ते खरंच कुणाचे काकबळी होते व त्यांना नक्की कुणी 'मामा' बनवले आहे हे कळले असेलच...
एकुणच 'काका मला वाचवा' नंतर 'काका (शब्दापासून) मला वाचवा ' याने इतिहासाची पुनरावृत्ती होते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.

धन्यवाद मानव , it was a killer !! Light 1

Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1
Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 20:40
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या त्या आय् डी चा विशिष्ट प्रतिसाद वाचल्यावर , किंवा विशिष्ट पोस्ट वाचून मग त्याचे वय अमूक असावे असे वाटले... असे पुरावे देऊन वय ओळखले तर संयुक्तिक ठरेल ..

हो.

बघतो. Happy

>>> स्वाती आंबोळे चिरतरुण आहेत. मी पंधरा वर्षापासून पाहतोय. त्यांचं वय स्थिर आहे.

मुटे, पर्सनल होऊ नयेत ही विनंती! त्या माझ्या कोणी लागत नाहीत, पण एक ज्ञानी व्यक्तिमत्त्व आहे. तुम्हीही आहातच अर्थात, अख्खे आयुष्य शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व्यतीत केले आहेत तुम्ही!

एखादया धाग्यावरचे किरकोळ वाद सोडून द्यायचे सगळ्यांनीच

Happy

प्रतिसादाचा दोघांनीही राग मानू नका

उणे एक वर्षासाठी एक रूपया या दराने कुठल्याही आयडीचे वय आमच्याकडे कमी सांगण्यात येईल.
(शंभर रूपये दिल्यास एका आयडीचे वय उणे सात असे देखील सांगितले आहे).

@बेफ़िकीर, मी गमतीने लिहिले. चुकीचा अर्थ गेला असल्यास क्षमस्व.
@स्वाती आंबोळे, जाहीर माफी मागतोय. तुमचा उपहास किंवा चेष्टा करण्याचा माझा हेतू नव्हता .

(खोचक, रोचक, मिश्किल वगैरे लिहिण्याचा नादात अशा तऱ्हेचे वाक्य माझ्याकडून निघून जातात. पण त्याचा अर्थ चुकीचा जातो, हे नंतर कधी स्वतःला जाणवते किंवा कुणीतरी लक्षात आणून देतो. अगदी नेहमीच्या बोलण्यात किंवा संवादात सुद्धा असे होते.)

पुन्हा एकदा माझं खरं वय ओळखायचा क्लू द्यावासा वाटला _

अहो, ते काय वाट्टेल तें वय सांगतील तुमचं, म्हणून तुम्ही रोज रोज मटण व दातांची नवनवीन कवळी यावरच अख्खं पेन्शन खर्च करणार का !!!
20190201_190648 (2).jpg

मानव - 26
ऋन्मेष - 22
बोकलत - 23
अस्मिता - 16
फारएण्ड - 27
माबो वाचक - 26
धनश्री - 19
सोकाजीराव - 40
किल्ली - 18
साजीरा - 24
भाऊ नमसकर - 48
उर्वरित सर्व महिला - 16 ते 25

कितीही वेळा वर आला तरी मी हा धागा अजूनही वाचला नाही, वाचत नाही, कुणाचं आपल्यापेक्षा अधिक असलेलं वय माहीत असल्यावर त्याच्याशी प्रतिवाद करताना, उपरोधाने बोलताना बिचकायला होतं, असा स्वतः बद्दलचा अनुभव म्हणून. Happy

मी कधी तरी मायबोली च्या संकेत स्थल वीआर येते म्हणुन मला आयडी माहीत नाही म्हणून तुमच्याच चाहत्यांची आयडी इथे कॉपी पेस्ट करत आहे मानव पृथ्वीकर sir चे चाहते :-
शब्दस्नेह -४०
मनमानसी -३८
श्रीगणेशा -४५
वामन राव - ६०
अनिंद्य - ४२
ऋतुराज. - ३५
निमिष_सोनार - ४५
उदय - ३८
sanjana25 - ३०
धनश्री- ३६
स्वान्तसुखाय -४८
फलक से जुदा -२५
शशिकांत ओक - ६०
अ'निरु'द्ध -३३
पाचपाटील -४०
धनुडी-३५
अमृताक्षर -३०
गोल्डफिश -४०
म्हाळसा -३८
मनिम्याऊ- ३६
गोंदया -45
सतीश -३८
अतुल. -४४
चंद्रमा -४९
नावातकायआहे -२५
Sagar Salunkhe
peacelily2025 -३४
निल्या कुलकर्णी -३८
वीरु - ३९
SHITAL ADHAVE -४८
Srd -४१
NEILSAGAR -३०
व्यत्यय -२२
मृणाल १ -३२
च्यवनप्राश -४३
सियोना -३४
Gru -३०
mrunali.samad -३२
लावण्या -३४
स्मिता_१३ -३०
वाचिका - ३५
रूपाली विशे - पाटील -३२
किशोर मुंढे -३८
पुंबा -३९
चिनु - 32
हरचंद पालव -३४
ऋन्मेऽऽष - ४३
ए_श्रद्धा -४०
Dr Raju Kasambe -४५
स्स्प -४२
अतुल@ -४१
Diyu- ३०
सस्मित -४८
मधुरा कुलकर्णी -३६
सखा -३२
मेघा. -४०
हेमंतकुमार -६०
भास्कराचार्य -४५
अक्षय. -३०

मानव - ३८
बोकलत - ४०
अस्मिता - ३८
फारएण्ड - ४२
माबो वाचक - ३०
सोकाजीराव - ३२
किल्ली - ३०
साजीरा - ३२
भाऊ नमसकर - ५२

सॉरी, सर ! माबोवर तुमचं वय इतकं कमी असल्याचं वाचलं, म्हणून पटकन तुम्हाला " अरे, तुरे " संबोधलं गेलं !!20190205_222946.jpg

Pages