रोज रोज जेवायला काय करू ?

Submitted by अवल on 19 March, 2012 - 03:13

रोज रोज जेवायला काय करायचं ? हा स्वयंपाक घरात वावरणार्‍या समस्त लोकांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न !
चला तर वेगवेगळ्या भाज्या, उसळी, रस्से, आमट्या, इ. इ. माहिती करून घेऊयात ?
या बीबीवर तपशीलवार कृती अपेक्षित नाही. मूळ कृतीचे नाव अन अगदी थोडक्यात त्याचे विवेचन करूयात.
अन जमवूयात वेगवेगळ्या पदार्थांची सूची Happy

ही माझी यादी :
बटाटा:
१. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ १ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, हिंग, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, चाट मसाला,मीठ, कोथिंबीर.
३. उकडलेल्या बटाटा-मटारची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, उकडलेले मटार, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी : उकडलेले बटाटे, तूप, जिरे, हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर, दाण्याचे कूट.
५. उकडलेल्या बटाट्याची उपासाची रस्साभाजी : तूप, जिरे, हिरवी मिरची व ओले खोबरे वाटून, मीठ.
६. बटाटा काचरा भाजी _१ : सालं न काढता बटाट्याच्या काचर्‍या, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर बेसन.
७. बटाटा काचरा भाजी _ २ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ.
८. बटाटा काचरा भाजी _ ३ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
९. बटाटा-कांदा-टॉमेटोचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर गूळ, कोथिंबीर.
१०. बटाट्याचा तळल्या मसाल्याचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, कांदा, सुके खोबरे, लवंग, दालचिनी, मिरे, धणे, बडिशेप, मीठ, कोथिंबीर.
११. बटाट्याचे भुजणे : बटाट्याच्या गोल चकत्या, कांद्याच्या गोल चकत्या, तेल, हिंग, हळद, तिखट, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर.
१२. चिनी बटाटा : उकडलेला बटाटा, तेल, कांदा, मिरपूड, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
( बापरे कित्ती बटाटा खातो आपण Wink )

कोबी
१. कोबी-बटाटा : कोबी, बटाटा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, कोथिंबीर.
२. कोबी-मटार : कोबी, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
३. कोबी-शेंगदाणे : कोबी, शेंगदाणे, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.
४. फोडणीची कोबी : कोबी, तेल, मिहरी, हिंग, कळद, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, लिंबू.
५. चायनिज कोबी : कोबी, टॉमेटो, तेल, मिरपूड, सोयासॉस, तिखट, मीठ, साखर.
६. पीठ पेरून कोबी : कोबी, तेल, हिंग, हळद, तिखट, बेसन, धणे-जिरे पूड, मीठ, कोथिंबीर.

फ्लॉवर
१. फ्लॉवर-बटाटा-मटार : फ्लॉवर,बटाटा, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, आलं, मीठ, कोथिंबीर.
३. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो रस्सा : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, ओलं खोबरं-आलं वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. फ्लॉवर-सिमला मिरची : फ्लॉवर,सिमला मिरची, टॉमेटो, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.

मेथी
१. मेथी पाने : मेथी कोवळी पाने, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
२. मेथी-कांदा : मेथी, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
३. मेथी पीठ पेरून : मेथी, बेसन, तेल, लसूण, हिंग, तिखट, मीठ.
४. पांतळ मेथी : मेथी, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
५. मेथी-बटाटा : मेथी, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
६. मलई-मेथी-मटर : मेथी, मटार, मलई, तूप, काजू, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला.

पालक
१. पालक-कांदा : पालक, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ.
२. पांतळ पालक : पालक, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
३. पालक-बटाटा : पालक, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
४. पालक-पनीर : पालक, पनीर, तूप, बारीक चिरलेला लसूण, कांदा, टॉमेटो, हळद, तिखट, मीठ, साखर, गरम मसाला.

मसूर
१. मसूरची उसळ : मोड आलेले मसूर, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, मीठ, कोथिंबीर.
२. मसूरची आमटी : मोड आलेले मसूर, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मसूरचे खाटे : भाजलेले मसूर, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.
४. मसूरच्या डाळीची आमटी : मसूरची डाळ, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.

मूग
१. मूगाची उसळ : मोड आलेले मूग, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. मूगाचे बिरडे : मोड आलेले सोललेले मूग, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लवंग, दालचिनी, लसूण, आलं, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मूगाचे खाटे : भाजलेले मूग, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.

वाल
१. वालाची उसळ : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. वालाचे बिरडे : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, ओले खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. वालाच्या डाळीची उसळ : वालाची डाळ, तेल, ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.

कोशिंबीरी
१. काकडीची : काकडी, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
२. टॉमेटोची : टॉमेटो, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
३. गाजराची : गाजर, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
४. बीटाची : बीट, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
५. तोंडल्याची : वाफवलेला तोंडल्याचा किस, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
६. मूळ्याची : मूळा, दही/लिंबू, मीरपूड, साखर, मीठ, कोथिंबीर.
७. केळ्याची : केळी, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
८. कांद्याची : कांदा, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
( टिप : कोणत्याही दही घातलेल्या कोशिंबीरीच सफरचंद सोलून त्याचे अगदी बारीक तुकडे चिरून टाकले तर फार छान लागते कोशिंबीर )
(वेळ मिळाला की अजून टाकते. तो पर्यंत तुमच्या येऊ द्यात Happy )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोबी थोरन ( केरळी पद्धत ) कुणी लिहीले नाही?

फोडणीत उडीद डाळ, कढीपत्ता, हि. मिर्ची घालायची, परतुन वाफवुन झाली की मग शेवटी कोथिंबीर आणी खवलेले ओले खोबरे घालायचे. वेगळी चव. कोबीचा उग्रपणा खोबर्‍याने कमी होतो.

टुनटुन,
आता रवा बराच चांगला मिळतो. पण पुर्वी आमच्याकडे दोनतीन प्रकार करायचे. आधी लोहचुंबक फिरवायचे, म्हणजे लोखंडाचे कण निघून जात. ( हो त्या काळात भेसळ असे. ) मग ताटात पसरून उन्हात ठेवत, म्हणजे अळ्या / टोके निघून जात. मग चाळून घ्यायचा ( मैदा, कणीक, रवा, धान्य अश्या वेगवेगळ्या चाळण्या असत.)
आणि मग बेताचा भाजून ठेवायचा.

आता रवा बराच साफ मिळत असल्याने, न भाजताच फ्रीझरमधे ठेवतात.

दिनेशजी मी तेच तर विचारले इब्लिस यांना.:स्मित: चाळण्या भरपूर आहेत माझ्याकडे.

रवा चाळणे म्हणजे एक डोकेउठाड काम आहे. कचकच जास्त असते, आणी रवा कुठल्याही चाळणीने चाळला तरी ती त्याबरोबरच खाली पडते.:अरेरे:

पण तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आता रवा खूप स्वच्छ मिळतो, पण अळ्या किडे होऊ नयेत म्हणून मी तो एकतर भाजुन ठेवते नाहीतर फ्रिझरमध्ये ठेवते.

अतिशय उपयुक्त धागा. आम्ही नुकतीच स्वयंपाकाला बाई लावली आहे.
आत्ता या धाग्याच्या आधारे महिनाभराची यादी करुन ठेवता येईल आणि जेवणात तोचतोचपणा येणार नाही. Happy

हा धागा सध्या फेबु वर लैच कॉपीपेस्ट होतोय Wink
मग म्हटलं इथेच वर काढूत। आपोआप लोकांना कळेल की कुठून, कोणाचं,काय काय पळवलय!
एक हळवा प्रयत्न Biggrin

हा धागा माझ्याच नाही तर किती तरी जणींच्या साठी खूप खूप महत्त्वाचा आहे! Copy paste होणारच.
काय करूच्या विचाराने डोकं शिणतं खरंच.
पुन्हा एकदा धन्यवाद अवलदी.

जाई हो न ,लोकांना कष्ट नको असतात ग।आणि मजा म्हणूनच वर काढला धागा।

पण ठिके हा धागा काही फार ग्रेट वगैरे नाही।
मुळात प्रतिसादांमधे कितीतरी जास्त माहिती आहे Happy पण तितकेही कष्ट घेत नाहीत लोकं।
खरं तर जेव्हा खरच कष्ट घेऊन केलेलं वा क्रिएटिव्ह चोरलं जातं तेव्हा वाईट वाटतं।

असं कसं अवलताई,
हे वाचल्याने रोज थोडा वेळ वाचत असेल आणि तो वेळ लिहायवाचायला देता येत असेल तर हा धागा ग्रेटचं नं Happy मी तर प्रिंट आउट काढून फ्रिजवर लावावी म्हणतेयं.

हो ना ..
व्हाट्सएप वर सेम टु सेम हाच मेसेज पाहिला मी..
रूचकर रेसिपीज म्हणून एक ग्रुप आहे, माझ्या एका मैत्रीणीने मला ऐड केले होते.ग्रुप नाही आवडला म्हणून मी कालच एक्झिट झाले.
त्या ग्रुपवर हाच मेसेज आला होता...

उपयुक्त धागा , थँक्यू अवल. खरंय काहींना कॉपीपेस्ट करण्यात काहीच चुकीचं वाटत नाही. नावासकट तरी टाकावं.
मी आवडलेल्या रेसिपी , लेखाची ची लिंक देते. मग माबोवर येऊन वाचतील लोकं.

अवल , तुमचा गैरसमज झालाय .
मला अस म्हणायचं होत की हे रोजच्या वापरातले नुस्के आहेत जे सर्वांना लिंक देऊन शेयर करता येतात.
स्वतःच्या नावावर खपवून लोकांना कसलं समाधान मिळत ? हे चोरून शेयर करून समाधान मिळत का मी किती जाणकार आहे स्वयंपाकमधील ?
पण ते तुम्हा आम्हा ओळ्खण्याऱ्या लोकांना कळतच शेयर करणारी व्यक्ती कितपत प्रो आहे ती. . त्यापेक्षा कोणाला सांगायचं असेल तर ही लिंक घे ..ह्या लिंकमधून मी ही माहिती मिळवली हे सांगण्यात काय कमीपणा वाटतो ? तुम्ही आज माहिती चोराल पण कधी ना कधी पितळ उघडे पडेलच की . आणि मुळातच ही माहिती चोरून तुम्ही असे काय दिवे लावता .

अंगत पंगत(angst pangat)हा खूप छान ग्रुप आहे फेसबूकवर.अगदी ऑथेंटिक मराठी रेसिपी असतात.आत्तापर्यत पाहण्यात आलेला सर्वात उजवा ग्रुप.मस्तच.अर्थात स्वयंपाकघरातील कानमंत्र (छोट्या छोट्या टीप्स kitchen management) असा एकही ग्रूपप नाही पण रेसिपीस् चे अनेक आहेत फेसबूकवर.

**रोजच्या जेवणात दुधी भोपळा / लालभोपला/ दोडका / पडवळ/ भेंडी / यासारख्या भाज्या वाफवून घेऊन त्यांचे भरीत करता येईल....
...** बटाटे ,सुरण , निर फणस, कारले,भेंडी यासारख्या भ्याज्या उभ्या चिरून ,त्याचे काप करायचे,,त्यात नुसते तिखट मीठ हिंग हळद यांची मिक्स करून , ती पूड भरायची/...लावायची...
## थोडासा रवा लावला तर बेस्ट..
आणि pan वर थोडेसे तेल लावून फ्राईज करायचे...एकदम मस्त...कुरकुरीत...
## तोंडी लावायला काही नसेल / भाजी उरलेली असेल...अश्यावेळी असे काप मस्त...

हे भारी आहे -
बटाटे ,सुरण , निर फणस, कारले,भेंडी यासारख्या भ्याज्या उभ्या चिरून ,त्याचे काप करायचे,,त्यात नुसते तिखट मीठ हिंग हळद यांची मिक्स करून , ती पूड भरायची/...लावायची...
## थोडासा रवा लावला तर बेस्ट..

आयडिया आवडली आहे.

कुळिथाची पिठी-भात आणि मुळ्याच्या शेंगांची भाजी बनवली आहे.
या सिझनला पार्ल्यात मस्त शेंगा आल्यात.

धागा वर आला ते एक बर झालं.

Pages