शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका शब्दाचे सहा वेगळे अर्थ आहेत. या प्रत्येक अर्थाची शोधसूत्रे खाली दिलीत. त्यावरून संबंधित शब्द आणि त्याचे अर्थही ओळखा.

१. डोळ्याला दिसते
२. अंगाला जाणवते
३. रात्री बघायला छान

४. हातात धरवत नाही
५. औषधासाठी वापरतात
६. एक विशेष झाड..... चंदन

Submitted by कुमार१

******

१. दर्शन ?
२. झळ ?
३. रोषणाई?
४. बोचरे?
५. मुळी ?

१. रूप ?

अस्मिता , मानव >>> चूक.
आता ....
६. एक विशेष झाड..... चंदन
....याच्याशी संबंध लागला पाहिजे. कारण
सर्व ६ शब्द एकाचेच अर्थ आहेत.

मात्र
४. बोचरे? >>> या दिशेने जरूर विचार करा.

२. शीतल की हुडहुडी Lol direct

हिम

१. डोळ्याला दिसते : धुके
२. अंगाला जाणवते : थंडी
३. रात्री बघायला छान : चंद्र

४. हातात धरवत नाही : बर्फ
५. औषधासाठी वापरतात :: कापूर
६. एक विशेष झाड..... चंदन

मजा आली,
धन्यवाद .
................
५. औषधासाठी वापरतात :: कापूर >>>

याचे वैशिष्ट्य म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि आधुनिक वैद्यक या तीनही शाखांमध्ये त्याचा वापर केला जातो

“गोल्ड स्टॅंडर्ड” साठी मला कुणी सुरेख अर्थवाही मराठी शब्द सुचवेल काय ?
संदर्भ सांगतो.

समजा, एखाद्या रोगनिदानाच्या चार चाचण्या आहेत. त्यातील जी सर्वोत्तम असते, ती 'गोल्ड स्टँडर्ड' धरली जाते. बाकीच्यांचा दर्जा तिच्याशी तुलना करून ठरवतात.

मानव
ते मीही मनात ठेवले होते
पण अजून काही येतंय का बघतो
धन्यवाद
*प्रत्यक्ष सुवर्ण हा शब्द न वापरता अन्य काही सुचेल काय, यावर विचार करतोय

एका शब्दाचेवेगळे अर्थ आहेत. या प्रत्येक अर्थाची शोधसूत्रे खाली दिलीत. त्यावरून संबंधित शब्द आणि त्याचे अर्थही ओळखा.

1. चांगलेच टोकदार आहे
2. कारागीराकडे असते
3. खायलाही चालते
4. वाजवता पण येते.

नाही.
हा अर्थही नाही
मूळ शब्दही नाही.
एकाच शब्दाचे ४ वेगळे अर्थ आहेत.

बांबू/ कळक
नाही .
३ वर प्रथम विचार करा !

“गोल्ड स्टॅंडर्ड” साठी मला कुणी सुरेख अर्थवाही मराठी शब्द सुचवेल काय ?

कांचन परिमाण
बघा बरा आहे का

अस्मिता धन्यवाद
चांगला आहे.
......
साद,
जरा क्लू वाढवा ना >>>>

2. कारागीराकडे असते >>>> हा १२ गाव-कामगारांपैकी एक

Pages