शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काकाकाकाकाकाका करता.
या अक्षरांत विरामचिन्हे घालून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.

काका का 'काका काका' करता?
काका, "का? का? का? का?" का करता?
का? काका, का? का " का? का?" करता?

९ क्रियापदे ओळखायची आहेत (३/४ अक्षरी).

माहिती :
* प्रत्येकाचे दुसरे अक्षर असे :

त, क, क, ब, स, ग, ज, भा, ड.

* सर्व क्रियापदे एकाच (अनुस्वारयुक्त) दोन अक्षरी शब्दाच्या पुढे लिहिल्यास वाक्प्रचार तयार होतात.

* प्रत्येक वाक्प्रचार दोन शब्दांचाच आहे.

* अपेक्षितपेक्षा पर्यायी उत्तराने योग्य वाक्प्रचार होत असल्यासच ते बरोबर धरले जाईल.

'अंग ' नाही पण त्याच दिशेने विचार करा. तसाच दुसरा शब्द आहे !

क्रियापदांची शेवटची अक्षरे अनुस्वारीत नाहीत.

टाकणे, दिसणे >>
बरोबर. अशीच शोधत गेल्यावर 'तो' शब्दही मिळेल.

तोंड:
त, उतरणे
क, टाकणे
क, चुकवणे
ब, दाबणे
स, पसरणे
ग, लागणे, रंगवणे
ज, वाजवणे
भा, सांभाळणे
ड. सोडणे

मानव,
मस्तच. सर्व बरोबर !

स : पसरणे >>> किंवा दिसणे

अजून होउ शकतात.
तोंड फुटणे, फिरवणे, लपवणे, आवरणे

रंग

एका शब्दाचे सहा वेगळे अर्थ आहेत. या प्रत्येक अर्थाची शोधसूत्रे खाली दिलीत. त्यावरून संबंधित शब्द आणि त्याचे अर्थही ओळखा.

१. डोळ्याला दिसते
२. अंगाला जाणवते
३. रात्री बघायला छान

४. हातात धरवत नाही
५. औषधासाठी वापरतात
६. एक विशेष झाड

चंदन

Pages