मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
गुलाबछकडी >>>> अगदी
गुलाबछकडी >>>> अगदी बरोबर !
श्रवु, +१
छान डॉक्टर!
छान डॉक्टर!
मानव, छान प्रयत्न. त्यातून
मानव, छान प्रयत्न. त्यातून मला सोपे गेले.
...................................
खाली एका प्राण्याचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत. ते ओळखा. त्यांची अक्षरसंख्या ( *) क्रमाने दिली आहे.
१. * * *
२. * * *
३. * * *
काही सूत्रे :
• १ आणि २ मध्ये दुसरे अक्षर समान आहे.
• १ चे तिसरे अक्षर = ३ चे दुसरे अक्षर.
• १ व २ मध्ये फक्त शेवटच्या अक्षरात फरक आहे.
तिन्ही ओळखले की अजून एक वेगळा समानार्थी शब्द सहज लक्षात येईल.
१. कुंजर २. गजेंद्र ३. वारण
१. कुंजर
२. गजेंद्र
३. वारण
अरे तिसरी अट नाही बसत, आता लक्षात आलं.
१. कुंजर
१. कुंजर
३. वारण
वा ! दोन्ही बरोबर.
आता २
कुंजरू
कुंजरू
कुंजरू >>> बरोबर.
कुंजरू >>> बरोबर.
म्हणजे दक्षिण भारतीय हत्ती.
म्हणजे दक्षिण भारतीय हत्ती.
दक्षिण भारतीय हत्ती. >>> काय
दक्षिण भारतीय हत्ती. >>> काय फरक असतो उत्तरेपेक्षा ?
काही नाही.
काही नाही.
जसं रॅट च रॅटू, नेक्स्ट च नेक्स्टु त्याअर्थी
गूढ कोडी द्यायचा एक प्रयत्न.
गूढ कोडी द्यायचा एक प्रयत्न....
कंसात शब्दाची अक्षर संख्या.
1.सत्याची मधुर वस्ती (4)
2.गावाबाहेर, तीराचे पितृछत्र हरपले, आता कसला धरबंध ? (3)
3. निर्बुद्ध अपेक्षा असेल पंचांगात (3)
. निर्बुद्ध अपेक्षा असेल
. निर्बुद्ध अपेक्षा असेल पंचांगात (3) >>
आषाढ ?
. निर्बुद्ध >> ढ
आशा (अपेक्षा)
बरोबर.... आषाढ
बरोबर.... आषाढ
१ खरेवाडी व
१ खरेवाडी व
२ वेसण
असल्यास स्पष्ट करतो.
वेसण ....बरोबर
वेसण ....बरोबर
वेस = .गावाबाहेर
वेस = .गावाबाहेर
बाण – बा (पितृछत्र) = ण
१ ??
खरेवाडी .....नाही
खरेवाडी .....नाही
२. छान रचले.
२. छान रचले.
१ आलेय, थोडा थांबतो !
१ आलेय, थोडा थांबतो !
1. सत्याची मधुर वस्ती (4)
1. सत्याची मधुर वस्ती (4)
सत्याची = सु
वासि = वस्ती
>> सुवासिक
'सुवासिक' नाही
'सुवासिक' नाही
तो एक मधुर पदार्थ आहे. (आपण त्याला सुवासिक करतो)
खरेवाडीच्याच दिशेनी जा
सत्य = खर वस्ती = वस >> खरवस
सत्य = खर
वस्ती = वस
>> खरवस
खरवस ...अर्थात बरोबर
खरवस ...अर्थात बरोबर
खाली दिलेल्या अक्षर समूहातून
खाली दिलेल्या अक्षर समूहातून ९ शब्द तयार करा. त्यांची अक्षरसंख्या अशी आहे:
२ अक्षरी चार ,
३ अक्षरी तीन आणि
४ व ५ अक्षरी प्रत्येकी एक.
प्रत्येक अक्षर एकदाच वापरा आणि सर्व वापरा.
या ९ शब्दांमध्ये एक मूळ शब्द असून बाकीचे आठ त्याचे विविध अर्थ आहेत. शेवटी मूळ शब्द पण ओळखा.
...........
संस्थर बडष्ट टकंगन वफट
ढाळकत मगंत काटक गजूका
कष्ट, कंबर.
कष्ट, कंबर.
बरोबर. येउद्यात...
बरोबर.
येउद्यात...
दोन अक्षरी..स्थळ, ढाळ,काजू
दोन अक्षरी..स्थळ, ढाळ,काजू
तीन अक्षरी.. काटक,कंगन
दोन अक्षरी..स्थळ, ढाळ,काजू
दोन अक्षरी..स्थळ, ढाळ,काजू
तीन अक्षरी.. काटक,कंगन >>>
सर्व चूक. कारण..
या ९ शब्दांमध्ये एक मूळ शब्द असून बाकीचे आठ त्याचे विविध अर्थ आहेत.
हे जुळले पाहिजे.
..वेगळी जुळणी करा.
आता ७ राहिलेतः
आता ७ राहिलेतः
संस्थ ड टगन वफट
ढाळकत मगंत काट गजूका
संगनमत
संगनमत
गंडस्थळ
फटका
गवत
काढा
जूट
कट < मूळ शब्द
Pages