ब्राऊन मोदक

Submitted by नादिशा on 31 August, 2020 - 04:16

1) बारीक गॅस वर कढई ठेवून
1/2 वाटी साजूक तूप
वितळवून घेणे.
2) त्यात 1 वाटी गव्हाचे पीठ(न
चाळता ), 1/2 वाटी बारीक
रवा बारीक गॅस वर छान
खमंग भाजून घेणे.
3) हे भाजलेले मिश्रण थंड होऊ
द्यावे.
4)थंड झाल्यावर हे एका
ताटामध्ये घेऊन त्यात
पिठीसाखर पाऊण वाटी, 2 ब्रु
कॉफी च्या पुड्या , थोडी
जायफळपूड टाकणे. सगळे
नीट एकत्र करून घेणे.
5) मग मोदकाच्या साच्यामध्ये
घालून मोदक बनवणे .
6) चिरंजीवाच्या फर्माईश वरून निम्म्या
मोदकांच्या मध्यभागी
टूटीफ्रूटी stuff केली.
7) एवढ्या साहित्यामध्ये 17
मोदक बनतात.

मोदकांचे नाव चिरंजीवांनी सुचवले . अगदी गडद ब्राऊन असा या मोदकांचा रंग आला नाही .पण रोजच्या मोदकांच्या नामकरणाची जबाबदारी आमच्या 9 वर्षीय चित्रकार चिरंजीवांनी खांद्यावर घेतलेली असल्याने त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी सुचवलेले नाव स्वीकारले आहे.

माझ्याकडे कोको पावडर शिल्लक नव्हती. कॉफी ऐवजी 2 चमचे कोको पावडर टाकली तर रंग थोडा अजून गडद येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहिताना लेखनाचा विभाग पाककृती व आहारशास्त्र निवडाल का?
आताही संपादन मध्ये जाऊन करता येईल.
पुढच्या वेळी मोदक शोधायला जाईल तेव्हा proper विभागात पाककृती सापडेल .

मायबोलीवरून पाकृ शोधून करून बघणे होत असते, म्हणून हा सल्ला Wink

संपादन वर क्लिक करा.
आणि खाली खाली या, मजकुराच्या खाली, शब्दखुणा Fieldच्या खाली. तिथे Group Audience field दिसेल.
त्यात आधीचा ग्रुप काढून पाक एवढेच टाइप करा की खाली ड्रॉप डाऊन मध्ये "पाककृती आणि आहारशास्त्र" हा ग्रुप दिसेल. तो सिलेक्ट करा आणि सेव्ह करा.

Wow मस्त च.करायला हवे.साखरेऐवजी गूळ घालेन.पण ब्रू कॉफी आणि गुळाची टेस्ट चांगलीं लागायची नाही.त्यासाठी साखरच हवी.(हल्ली स्वगत भरपूर वाढलं y.)

धन्यवाद मानव पृथ्वीकर!तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आणि जमले एकदाचे. कालपासून धडपडत होते, सूचनांमुळे भांबावले होते आणि कसे करायचे कळत नसल्याने हताश वाटत होते.
मनःपूर्वक आभार !