मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
विजय, तुमचे उत्तर काय आहे ?
विजय,
तुमचे उत्तर काय आहे ?
अलि.
अलि.
"धुंद मधुमती नाच रे" या गाण्यात
ये प्रियकरा, येइ मंदीरा, अलि रमले कमळात रे , नाच रे
अशी ओळ आहे.
छान होते हे.
छान होते हे.
छान !
छान !
.................
एका फळाच्या तीन जाती ओळखा. त्यासाठी सूत्रे अशी:
१. हे एका क्रियापदाचे रूप आहे.
२. हा शब्द निवांत गप्पा मारतानाच्या बोलीभाषेत असतो.
३. हा तीन अक्षरी असून त्यात एक जोडाक्षर आहे.
फणस १ कापा २ बरंका ३ ???
फणस
१ कापा
२ बरंका
३ ???
३. आठळ्या
३. आठळ्या
निरफणस
निरफणस
रुद्राक्षी
रुद्राक्षी
१ कापा २ बरका बरोबर ३ चूक
१ कापा
२ बरका
बरोबर
३ वेगळे आहे
३. सकल्या
३. सकल्या
३. सकल्या >> +११
३. सकल्या >> +११
रुद्राक्षी>>> कल्पना नाही.
निरफणस >> ५ अक्षरी झाला.
एक ६ अक्षरी गाण्याचा प्रकार
एक ६ अक्षरी गाण्याचा प्रकार ओळखा.
हा शब्द तयार करताना फूल आणि वाहन एकत्र मिसळा.
सकल्या.......म्हणजे हा फणस
सकल्या.......म्हणजे हा फणस कसा असतो?
सकल्या.. = मध्यम प्रकारचा फणस
सकल्या.. = मध्यम प्रकारचा फणस
एवढेच कोशात आहे.
शब्दकोड्यात येतो म्हणुन माहीत
शब्दकोड्यात येतो म्हणुन माहीत आहे एवढेच.
कापाही नाही, बरकाही नाही असा मध्यम प्रकारचा फणस.
O.k. dhanyvad.
O.k. dhanyvad.
https://marathivishwakosh.org
https://marathivishwakosh.org/2465/
इथे रुद्राक्षी फणसाबद्दल आहे. तामिळनाडूतील जात
छान माहिती धन्यवाद
छान माहिती
धन्यवाद
साद, फूल गुलाब आहे का ?
साद,
फूल गुलाब आहे का ?
गुलाब आहे का ? >>> होय !
गुलाब आहे का ? >>> होय !
आता ३ अक्षरे जोडा
युगलगीत असे आहे का ?
युगलगीत असे आहे का ?
सॉरी हा पाच अक्षरी झाला.
सॉरी हा पाच अक्षरी झाला.
गुलाबकटिका?
गुलाबकटिका?
वरील सर्व नाही.
वरील सर्व नाही.
वाहन >> जुना शब्द शोधा.
पालखी पडाव कजावा कऱ्हान तराफा
पालखी
पडाव
कजावा
कऱ्हान
तराफा
मानव, नाही.
मानव, नाही.
सामान वाहणारी छोटी गाडी.
शेवटी ६ अक्षरी शब्दाचा अर्थ जुळला पाहिजे (गाणे )
हो साद, हे जुळत नाही माहीत
हो साद, हे जुळत नाही माहीत आहे, प्रयत्न सुरू आहेत हे दाखवायला लिहिले.
गाण्याचा प्रकार म्हणजे भक्तीगीत, नाट्यगीत, भजन, लावणी, भारुड, पोवाडा इत्यादि सारखे ना?
गाण्याचा प्रकार >>> हा मलाही
गाण्याचा प्रकार >>> हा मलाही नाही नक्की माहित.

शब्दाचा अर्थ मी उचललाय फक्त.
सापडला एकदाचा गुलाबछकडी
सापडला एकदाचा
गुलाबछकडी
छकडा म्हणजे बैलगाडी सारखी
छकडा म्हणजे बैलगाडी सारखी असते ना..
Pages