श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - बोकलत

Submitted by बोकलत on 24 August, 2020 - 04:27

|गणपती बाप्पा मोरया|
|मंगलमूर्ती मोरया|

ब गट
IMG-20200824-WA0001.jpgIMG-20200829-WA0000.jpg

Group content visibility: 
Use group defaults

रेखीव आहे अक्षर तुमचं बोकलत .

(कॉम्प्लेक्स दिला तुम्ही . आता मी माझ्या हस्ताक्षर नमुना टाकू की नको या विचारात आहे .)

अप्रतिम
सुरेख अक्षर आहे Happy

गजानन स्तोत्र आहे म्हणून ते तुम्हीच लिहिलय ह्यावर विश्वास ठेवावा लागेल.
सामान्य टेक्स्ट असती तर भूताकडून लिहून घेतली असती तुम्ही Proud Light 1

कॉम्प्लेक्स दिला तुम्ही . आता मी माझ्या हस्ताक्षर नमुना टाकू की नको या विचारात आहे --- असं होणार माहिती होतं, म्हणून सगळ्यात आधी नमुना ? प्रकाशित केला, आता काहीही होवो Lol

अक्षर तर सुंदरच आहे पण प्रत्यके श्लोक बरोबर त्याच ठिकाणी सुरु झालाय.
इंडेंटेशन एकदम अचूक

जाई >>सेम असच वाटलं Happy

छान आहे अक्षर बोकलत.
पण कुठेतरी पाहिल्या सारखं वाटतंय.
आठवलं.
मागे मी मिरजेला गेलो होतो तेव्हा एका घरात हडळीने धुमाकूळ घातला होता. तीने घरमालकाला धमकी दिली होती चिट्ठी लिहून, ती मी वाचली होती. असेच अक्षर. तिला तिथून घालवलं.
नंतर तुम्ही मिरजेला गेलात.

तारीफ के काबिल बोकलत Happy

मला ह्या जन्मात तरी सुलेखन जमणार नाही म्हणायचे!

सुंदर,नीटस अक्षर.पहिला श्लोकजिथे लिहिला त्याच्याचबरोबर खाली इतर श्लोक लिहिले गेले आहेत.कुठेही तिरके झालेले नाही.

अक्षर सुरेख आहे. सुलेखन म्हणतात ते हेच असावे (caligraphy नव्हे). अ आणि द ची वळणे खूप आवडली. र चे तितकेसे नाही आवडले . र कधी श सारखा तर कधी य सारखा दिसतोय. पण जे दिसतेय तेही डौलदार आणि वळणदार आहे. अक्षरांची उंची अगदी एक सारखी आहे. खूप सुंदर आणि सहज .
काही अक्षरांवर शिरोरेखा दिसल्या नाहीत.

बोकलतांचे किस्से वाचून पटतच नाही के हे त्यांनीच लिहिलेय, हडळ स्तोत्र असते तर समजू शकते पण गजानन स्तोत्र अन बोकलत, हजम नही हो रहा.

बाकी अक्षर खूप सुरेख.☺️

सुरे़ख , वळणदार अक्षर . बोकलतांचे किस्से वाचून पटतच नाही के हे त्यांनीच लिहिलेय, हडळ स्तोत्र असते तर समजू शकते पण गजानन स्तोत्र अन बोकलत, हजम नही हो रहा. >>> +१

हीरा+१.
रच्याकने, एखाद्या बायंगीकडून नाही ना लिहून घेतले? असा प्रश्नही पडलाय. Wink

अहा !! कस्सलं सुंदर आहे अक्षर . अश्या वळणाचा एखादा फॉन्ट असावा (पु.लंचा आहे तसा )असं वाटतंय मला तर !!
विषय कितीही किचकट असला तरी अश्या अक्षरात वाचायला मिळाला तर किती छान होईल !!

Pages