पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 05:43

नमस्कार मायबोलीकर,

यावर्षीचा आपला मायबोलीचा बाप्पा २१ वा! आणि २१ म्हंटले की बाप्पाचे आवडते २१ मोदक आलेच. म्हणूनच यावर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मोदक बनवण्याची स्पर्धा. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सर्वच घरात मोदक बनवले जातात. त्या बनवलेल्या मोदकांचाच छान सजवून आणि फोटो काढून तुम्ही पाठवायचा आहे.

kujbuj_modak.jpg

यात फक्त उकडीचेच नाही तर सर्व प्रकारच्या मोदकांचा समावेश होईल.. खवा, सुका मेवा, fusion, पारंपारिक उकडीचे मोदक, तळणीचे मोदक इ. तसेच मोदकांशी साम्य असलेले व्हेज मोमोज ही चालतील.

नियम-
१) मोदक स्वतः बनवायचे आहेत. बाहेरून विकत आणलेल्या मोदकांची प्रवेशिका आढळून आल्यास बाद ठरवण्यात येईल.
२) पाककृती स्वतः तयार केलेली असावी.
३) पाककृती मध्ये वापरण्यात येणारे पदार्थ शाकाहारी असावेत.
४) मिठाई, खवा इ. मोदक बनवताना अत्यंत आवश्यकता असेल तरच साचा वापरावा. उकडीचे मोदक बनवताना साच्याचा वापर करू नये.
५) स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट २०२० पासून तुम्ही पाठवू शकता. (IST)
६) एक id प्रत्येकी २ प्रवेशिका देऊ शकेल.
७) स्पर्धा महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी खुली आहे.
८) पाककृतींचे step by step किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
९) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - {तुमचा आयडी}"
१०) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

विजेते मोदकांचा सुबकपणा, त्यांच्या कळ्या इ. निकषांवरून पोल घेऊन ठरवण्यात येतील.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक , रागावू नका.
"त्या बनवलेल्या मोदकांचाच छान सजवून आणि फोटो काढून तुम्ही पाठवायचा आहे. " यावरुन माझा फक्त तयार मोदकांच्या फोटोची स्पर्धा आहे, असाच समज झाला .
तुम्ही प्रतिसादांतून जे स्पष्टीकरण द्याल ते मूळ धाग्यातही लिहा.

शक्य असेल आणि योग्य वाटलं तर आधीच्या गणेशो त्सवा तल्या स्पर्धांच्या घोषणा वाचून पहा.

फक्त तयार मोदकांच्या फोटोची स्पर्धा आहे, असाच समज झाला . >>>>>
८) पाककृतींचे step by step किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे. ....हे वर दिले आहे कि

वेगवेगळ्या मोदकांच्या पाककृती व फोटो पहायला आवडतील. जे भाग घेतील त्यांना शुभेच्छा !
संयोजकांचे आभार.
सर्वांना विनंती की संयोजक मंडळाला सांभाळून घ्या. आपल्यापैकीच आहेत ते , नवीन आहेत आणि स्वतःची कामंधामं सांभाळून हे नियोजन करत आहेत , वेळ देत आहेत. त्यांचे कौतुक व आभार. Happy

एक भन्नाट काॅंबो सुचलंय - कालच फ्राईड आईस्क्रिम खाल्ल..फ्राईड आईस्क्रिम मोदक पण छान होतील.. कोणी तरी बघा करून. मोदक इज् नाॅट माय कप ॲाफ टी नाही तर मीच ट्राय केले असते Happy

पण मोदकाला खिडक्या पाडल्यास आतले दिसेल. >> छान की, हा फ्युजन मोदक होईल. असे विविध फळांचे "पाय" करतात. स्मोअर्स (मार्शमेल्लो वितळवून) पण फ्युझन मोदक करता येतील.
बाकी शंका विचारल्या म्हणजे भाग घेऊ असे नाही, निदान मी तरी. मतदार राजा आहे. नीट नियम माहिती पाहिजेत. नाहीतर कुणा मायेस्त्रोच्या १०० पाकळ्यांच्या ब्रह्मकमळ मोदकाला मत न देता, कांदा कोरून केलेल्या सलाड मोदकाला मत द्यायचो.....

अरे वा ! मोदक स्पर्धा.
बरं स्पर्धेत नुसते फोटो बघूनच पोट भरायचं आहे की चव बघून निकाल लावला जाणार?? विचारतेय ईतक्यासाठी की चव बघून निकाल जाहीर करणार असाल तर मी परिक्षक व्हायला एका पायावर तयार आहे. Wink

मी तिखट मोदक शोधत आहे>> तुम्ही मासवडी हा प्रकार ऐकला/खाल्ला आहे का? तसाच बनवतो आम्ही हा प्रकार.. मोदकाची आमटी शोधा युट्यूब वर

फ्राईड आईस्क्रिम मोदक पण छान होतील.. कोणी तरी बघा करून. >> आणि केलेत तर खाऊन घ्या लगेच. नायतर नैवेद्याला फ्राईड आईसक्रिम मोदक आणि ५ आरत्यांनंतर प्रसादाला रबडी.... Happy

आणि केलेत तर खाऊन घ्या लगेच. नायतर नैवेद्याला फ्राईड आईसक्रिम मोदक आणि ५ आरत्यांनंतर प्रसादाला रबडी.>> Lol एवढी छान आयडीया होती..पार रबडी फिरवली तुम्ही Lol

म्हणजे तुम्ही मोदक चहात बुडवून खात नाही>> ह्यासाठी नवा धागा उघडावा लागेल.. तुम्ही मोदक कसा खाता? आजकाल ह्याचीच ट्रेंड आहे Happy

हत्तीचे मुंडके असतं गणपतीला. हत्तीला सतत वाढणारे दात असतात त्यामुळे पाला इ चावून चावून खाता येतील अशा हाय इन सेल्युलोज गोष्टी लागतात. सबब (समजा संयोजकांनी स्पर्धेत ओके केले तरी) भारी असले तरी कृपया गणपतीला मांसाहारी मोदक नैवेद्यासाठी देवू नये ही विनंती. त्याला पचणार नाहीत. Happy

नाजूक कळीदार उकडीचे मोदक, खुसखुशीत तळून टम्म झालेले तळणीचे मोदक हे मोदकांचे प्रकार जास्ती प्रिय.
माबो वरच्या एकसो एक सुगरणींच्या छान छान फोटोंच्या प्रतीक्षेत.
आम्ही आपले तळणीचे मोदक वाले.
उकडीचे मोदक करून बघण्याची इच्छा आहे. बघू कधी जमतंय ते.

संयोजक, तुम्ही दिलाय तोच मोदकांचा फोटो फेसबुकवर एका ग्रूपमध्ये पाहिला - https://m.facebook.com/groups/730873784351277?view=permalink&id=81413394...

इथला फोटो तिकडे गेलाय की तिथला फोटो इकडे आलाय बघा बरं!

मी संयोजकांना आधीच्या पोस्टमध्ये विचारलेलं फोटोविषयी, तर त्यांनी उत्तर दिले नाही.
हा फोटो मी आधीच कुठे ना कुठे पाहिलाय........

आता बघुया काय उत्तर येते ते,,.

उलट, प्रताधिकारमुक्त फोटो आहे का ह्याची खात्री करतोय. मदतच आहे ही. Happy आणि जागरुकपणा आपल्या बाजूने.
फोटो गूगलमधून सुद्धा येतोय , आता मायबोलीवरच्याच कोणाचाच असेल तर ठिक आहे.

संयोजक, बघा, तुम्हाला फोटोचे कळवल्याने , प्रताधिकार मुद्द्याच्या कोंडीत/ वादात नाही सापडणार आता.
बाकीच्यांचं चालू द्या.. ज्यांना आमच्या मदतीचं काही घेणं-देणं नाहीये. .. आणि नावं ठेवणं चालू आहे.

Pages